लोक काय म्हणतील

* रिता गुप्ता

शिक्षण संपवून सिल्कीला नोकरी सुरू करण्यास केवळ ७-८ महिने झाले असतील की आजूबाजूच्या लोकांनी आणि नातेवाईकांनी तिचे जगणे महाग करून टाकले. कुटुंबात किंवा शेजारीपाजारी राहणाऱ्यांमध्ये कुठे एखादे लग्न किंवा एखादा गेटटुगेदर असेल तर तिला पाहून प्रश्नांचा पूर ओढवला जात असे.

‘‘अगं सिल्की, शिक्षण पूर्ण झाले? कुठे काम करत आहेस? किती पॅकेज मिळते?’’

‘‘आणि मला सांग आजकाल काय चालले आहे’’ सिल्की या प्रश्नावर खूप घाबरायची, कारण तिला पुढचा प्रश्न माहित असायचा.

‘‘मग तू कधी लग्न करणार आहेस? कोणी शोधून ठेवला असेल तर सांग आम्हाला?’’

लाजून दांत दाखविणाऱ्या कोणत्याही काकू, आत्या किंवा मावशीची आपुलकी दर्शविणाऱ्या या प्रश्नामुळे सिल्कीला खूप त्रास होई, परिणामी, तिने हळूहळू या कौटुंबिक समारंभांपासून स्वत:ला अलग केले.

‘‘अहो, ज्याच्या लग्नाला / वाढदिवसाला / आला आहात त्याविषयी बोला, प्लेटभरून जेवण करा. माझी साडी का बनवू लागता?’’ सिल्की कुरकुरत असे.

तिच्या आईचीही अशीच परिस्थिती होती. जेव्हा-जेव्हा फ्लॅटच्या महिलांची मंडळी जमायची, तिला पाहताच प्रत्येकजणी जणू मॅरेज ब्युरो उघडत असे, ‘‘माझा मुलगा सिल्कीपेक्षा ३ वर्ष लहान आहे, म्हणजे सिल्कीचे वय, इतके झाले आहे.’’

एक म्हणत असे.

‘‘अहो, या वयात आमची २ मुलं होती,’’ दुसरी अभिमानाने म्हणायची.

‘‘बघ, तू आता मुलगा शोधणे सुरु करायला हवे,’’ तिसरी समजावण्याच्या स्वरात म्हणायची.

‘‘कोणाबरोबर काही चक्कर तर नाही, कोणत्या जाती/धर्माचा आहे? बाई, हल्ली मुली आधीच कुणाला तरी पसंद करून घेतात. चांगले आहे ना तुला हुंडा नाही द्यावा लागणार,’’ दोन मुलांची आई अनिता शांत स्वरात म्हणते जणू काही मुली त्यांच्या भोळयाभाबडया मुलांच्या शिकारीसाठीच शिकत आहेत.

‘‘आत्ताच, सिल्कीचा पुढे शिकण्याचा मानस आहे, एकाद वर्ष नोकरी करून ती आधी शिकेन…’’ सिल्कीची आई रडवेल्या आवाजात म्हणाली.

‘‘पहा, आधी लग्न करा, नंतर शिक्षण चालू राहील,’’ एकीने म्हटले.

‘‘वेळेवर लग्न करणे अधिक महत्वाचे आहे, अन्यथा आपण नंतर शोधत रहाल,’’ दुसरी घाबरवण्याची कोणतीही कसर सोडत नाही.

‘‘जर माझी मुलगी असती तर मी कधीच तिचे हात पिवळे करून समाधानी झाले असते. मी तर नक्कीच माझ्या मुलाचे २५ वर्षांपूर्वीच लग्न लावून देईल, नाहीतर आजकालच्या या मुली खूप चलाख असतात… कोण जाणे, त्याला आपल्या जाळयात अडकवेन,’’ दोन मुलांची आनंदी आई उपदेश देई.

सिल्कीच्या आईकडून अजून ऐकवले जात नसे. तेथून निघण्याशिवाय पर्याय नसतो. पण मनात संशयाचे बीज फुटू लागते की मुलीला अधिक शिकवणे खरोखरच चुकीचे ठरेल काय किंवा जास्त वयात लग्न करण्यात खरोखरच समस्या येईल काय?

पाय खेचण्यात पुढे

हेच ते ४ लोक असतात, ज्यांच्या भीतीने किंवा असे म्हणूया याच ४ लोकांना खूष करण्यासाठी किती निर्णय घेतले जातात. याच ४ लोकांच्या गोष्टी ऐकून एखाद्या मुलीचे वेळेपूर्वीच लग्न लावून दिले जाते किंवा नोकरी सोडण्यास भाग पाडले जाते. हे लोक मुलांपेक्षा जास्त इतरांच्या मुलींमध्ये स्वारस्य घेतात. याच ४ लोकांना आनंदी ठेवण्यासाठी कधीकधी रात्री उशिरा आल्याने ओरड होते तर कधीकधी एखादा ड्रेस घालण्यास मनाई केली जाते.

काही महिन्यांतच लग्न उरकवून तिची आई एक दिवस पुन्हा त्यांच्यासोबत बसली होती की मागून कुजबुज ऐकू आली.

‘‘सिल्कीच्या लग्नात किती दुरावस्था होती,’’ एक आवाज.

‘‘मला तर गोड डिश मिळालीच नाही. जर आपण व्यवस्था करू शकत नसलो तर इतक्या लोकांना का बोलावावं,’’ आणखी एक कुजबूज.

‘‘मुलाला पाहिले. मला तर जास्त वयाचा वाटत होता,’’ तिसरी चुगली.

सिल्कीची आई विचार करीत होती, तिने तिच्या मुलीचे लग्न त्यांच्या सल्लयानुसार लावले तिचे कौतुक करतील. पण इथे तर वेगळाच रेकार्डर कानात वाजत होता. आतून चिढत पण बाहेरून स्मितहास्य करत ती मागे फिरली. म्हणाली, ‘‘बहिण, तुमचा मुलगा कसा आहे? काल त्याला बाजारात पाहिले. कुणी मुलगी त्याच्या मोटारसायकलच्या मागील बाजूस बसली होती.’’

‘‘अरे…तो…हो…मुलगा सांगत होता की त्याच्या कार्यालयातीलच कुणी मुलगी आहे, जी बळजबरीने त्याच्या गळयात पडून राहते,’’ परंतु या उडत्या बातमीने मुलाच्या आईच्या चेहऱ्याचा रंग उडू लागला होता. आता तिचे नाक ४ लोकांसमोर जे कापले जात होते.

आता संभाषण सिल्कीच्या लग्नावरून दुसरीकडे सरकले.

फक्त खेद
जिथे ४ लोक भेटणार तेथे ४ गोष्टी होणारच. देश-परदेश, राज्यावरून चर्चेचा विषय होत- होत स्वत:भोवतीच टिकाव धरू लागतो. मुख्यत: त्यांवर जे उपस्थित नसतात. मग इतरांच्या बाबतीत मोडता घालणे हे नेहमीच एक आवडते मनोरंजन असते. केवळ या गोष्टींसाठी महिलांना जबाबदार धरू नये. पुरुषही गप्पा मारण्याची समान सामाजिक जबाबदारी तेवढयाच कठोरपणे निभवतात.

आपण सिल्कीबद्दल बोलत आहोत. सिल्कीच्या आईला असे वाटले की तिने मुलीचे लग्न केले आहे. तिला पुढे शिकू दिले नाही. आता तिच्याशी ४ लोक आनंदी असतील आणि ती ४ लोकांमध्ये एक उदाहरण बनेल. पण दुर्दैवाने, असे काहीही घडले नाही, उलट वर्ष-दीड वर्ष उलटताच तेच लोक तिला पुन्हा प्रश्नांच्या गोत्यात उभे करू लागले.

‘‘तिच्या लग्नाला किती वर्ष झाले आहेत? ती केव्हा चांगली बातमी सांगणार आहे?’’ दुसरीच्या उत्सुकतेचा अंत नव्हता.

‘‘अहो, ती नुकतीच एका नवीन नोकरीत सामील झाली आहे. तिला प्रथम काही दिवस स्थिर-स्थावर होऊ देत,’’ सिल्कीच्या आईने समजावले.

‘‘योग्य वेळी मुले झाली पाहिजेत अन्यथा आजीवन पश्चात्ताप करावा लागेल. ठाऊक नाही, हे लोक कोण-कोणती औषधे खातात नंतर गर्भधारणा करण्यास अक्षम होतात,’’ ४ मुलांच्या आईने आपले मत विनामूल्य व्यक्त करण्यास सुरवात केली.

आता ती हुशार होत चालली होती, म्हणून ४ लोकांची कंपनी तिला आवडू लागली. ४ लोकांबरोबर बसून तीही इतरांना ज्ञानाच्या गोष्टी शिकवू लागली. खरं म्हणजे आता ती जेव्हा न मागता कोणालाही विनामूल्य सल्ला द्यायची तेव्हा तिला अद्वितीय आनंद वाटायचा. ४ लोकांसह एखाद्या ५ व्याला लाजिरवाणे करणे, त्याला बेइज्जत करणे यासारख्या स्वर्गीय आनंदाचा रस घेऊ लागली.

वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप
आता सिल्कीची आईसुद्धा विचार करत नाही की एखाद्याला वारंवार छेडणे की तिच्या मुलाचे/मुलीचे लग्न का होत नाही अशाने एखाद्यावर काय परिणाम होईल. इतरांकडून सुवार्ता ऐकण्यास आतुर तिचे मन आता एक क्षणही विचार करत नाही की ठाऊक नाही कुठल्या कारणाने एखादी स्त्री आई का होऊ शकत नाही. आपल्या सभोवतालच्या छोटया-छोटया गोष्टीदेखील जाणून घेण्याच्या प्रवृत्तीमुळे ती एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करीत आहे याचा तिला अजिबात संकोच होत नाही. आपली मुले भले फेल होत असतील परंतु स्पर्धात्मक परीक्षेत इतरांच्या मुलांचा काय परिणाम आला, ही उत्सुकता ती ४ लोकांसह अवश्य व्यक्त करते.

सिल्कीच्या आईला हळूहळू हे कळलेच नाही की ती देखील त्या ४ लोकांमध्ये सामील झाली आहे, ज्यांना लोक टाळू इच्छितात, ज्यांचे शब्द गंभीरपणे घेतले जात नाहीत आणि ज्यांचे कामच आहे काही ना काहीतरी बोलत राहणे. ज्या रसिक व्यक्तींना कठीणाईने समजावले जाऊ शकते अशा प्रकारच्या त्यांच्या आचरणास लोक फक्त ऐकतात पण आपल्या मनाचेच करतात.

फोनवरील फसवणूक टाळण्यासाठी काय कराव

* नीरज कुमार मिश्रा

‘‘हॅलो…नमस्कार. मी स्टेट बँक ऑफ इंडियातून बँक मॅनेजर प्रभाकर बोलत आहे. आपण आपले एटीएम कार्ड सत्यापित करा, अन्यथा ते अवरोधित केले जाईल.’’

निशा शिकलेली होती, पण अचानक हा फोन आला आणि जेव्हा कॉलरने स्वत:ला स्टेट बँकेचा मॅनेजर म्हणून सांगितले जाते तेव्हा तिने असा विचार केला की हा फोन वास्तविक मॅनेजरचा आहे आणि मग निशाने फोन करणाऱ्याला आपला १६ अंकी एटीएम कार्ड नंबर तसेच कार्डच्या मागील बाजूस लिहिलेला सीव्हीव्ही नंबरही सांगितला.

तो बनावट कॉलर इतक्या चतुराईने बोलत होता की निशाला काय भानगड आहे हे समजू शकले नाही आणि जेव्हा कॉलर मधेच इंग्रजीत बोलला तेव्हा तर तिला खात्रीच पटली की हा प्रभाकर बँकेचा मॅनेजरच आहे.

बोलण्याच्या जाळयात अडकवून त्याने निशाच्या मोबाइलवर आलेला ओटीपी (वन टाइम पासवर्ड)सुद्धा विचारला.

संध्याकाळी निशाने जेव्हा तिच्या बँकेचा ताळेबंद तपासला तेव्हा त्यातून ८० हजार रुपयांची खरेदी झालेली होती.

शाखेत जाऊन मॅनेजरकडे तक्रार केली, पोलिसांतही तक्रार केली, पण प्रत्येकाकडून हेच उत्तर आले की खरेदी तुमच्या कार्डवरूनच केली गेली आहे, त्यामुळे आम्ही काहीही करू शकत नाही.

शिक्षित ठग

यास बँकिंग फसवणूक म्हणा की ओटीपी फसवणूक म्हणा, परंतु यात ग्राहकच फसवणुकीचा बळी ठरत आहेत. हे ठग काही मिनिटातच आमची कष्टाने मिळवलेली संपत्ती लुबाडत आहेत.

हे ऑनलाइन ठग सुशिक्षित आहेत, इंग्रजी बोलणारे आहेत आणि तंत्रज्ञानाविषयीदेखील माहितगार आहेत. ते इंटरनेटच्या बऱ्याच स्रोतांकडून आमचे नाव आणि नंबर जाणून घेतात आणि नंतर कॉल करून आमच्याकडून आवश्यक माहिती गोळा करतात व आमचे पैसे लुबाडतात.

आज इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंगमुळे फसवणूक करणे सोपे झाले आहे. असे फोन मुख्यत: लँडलाईन नंबरवरुन येतात जेणेकरून कोणालाही संशयास्पद वाटू नये, आज प्रत्येक व्यक्ती कॅशलेस होऊ इच्छित आहे, म्हणून तो आपल्या मोबाइलमध्येच आपल्या खात्याशी संबंधित सर्व तपशील ठेवतो आणि स्मार्टफोनमधून त्याचे सर्व कार्य करू इच्छितो. त्याला बँकेत जाऊन लाईनमध्ये उभे राहण्याची गरज वाटत नाही.

अशा परिस्थितीत, जेव्हा आपल्याला असा कॉल येतो की आपली लॉटरी निघाली आहे किंवा खाते बंद केले जाऊ शकते तेव्हा आपण सहजपणे कॉलरला सर्व माहिती देता.

करोडपती बनवण्याचा दगा

अशीच एक नवीन फसवणूकही समोर आली आहे. हे ठग तुम्हाला कॉल करतात आणि म्हणतात की ‘कौन बनेगा करोडपती’च्या वतीने तुम्हाला एक कार देण्यात येत आहे. फक्त या कारचे पेपर बनविण्याकरिता तुम्हाला पैसे द्यावे लागतील. जर आपण खूष होऊन होय म्हटलत तर मग हे ठग आपल्याला कार्डाचा तपशील विचारतील आणि पैसे उडवून नेतील.

त्याचप्रमाणे नीरजजी आणि त्यांचा मुलगा यांना एका जुन्या जीप कार विक्रीसाठी असलेल्या साइटवर कारची जाहिरात दिसली आणि त्या मालकाच्या फोन नंबरवर संपर्क साधला तर तथाकथित कार मालकाने त्यांना गाडी बघणे व तपासणीसाठी त्याच शहरातील एका ठिकाणी बोलावले.

जेव्हा नीरजजी आपल्या मुलासमवेत कार बघायला गेले, तेव्हा त्यांना गाडी आवडली आणि मग दोन्ही पक्षांनी निश्चित तारखेला करार करण्याचा निर्णय घेतला.

जेव्हा ते कारचा सौदा झालेल्या ठिकाणी पोहोचले तेव्हा गाडी किंवा कार मालक तेथे नव्हते आणि कार विक्रेत्याचा फोन नंबरही बंद येत होता.

या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनीही सहकार्य केले नाही, उलट नीरजजी शिक्षित असूनही अशी चूक केल्याचा चुकीचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.

आपल्याला या सर्व घटनांमधून हेच शिकायला मिळते की आपण कुठल्याही परिस्थितीत कोणासही एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्ड नंबर, पासवर्ड किंवा ओटीपी सांगू नये. जर आपल्या फोनवर असे कॉल वारंवार येत असतील तर आपण पोलिसांकडे जावे आणि लेखी तक्रार करावी. तंत्रज्ञान आपला मार्ग सुलभ करते परंतु जागरूक न राहिल्यामुळे आपल्याला तोटाही सहन करावा लागू शकतो.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें