का आकर्षित करीत आहेत पुरूषांना मोठ्या वयाच्या महिला

* मिनी सिंह

१९८१ मध्ये रिलीज झालेल्या ‘प्रेम गीत’ फिल्मच्या गाण्याची एक ओळ ‘न उम्र कि सीमा हो न जन्म का हो बंधन’ बॉलीवुड सिताऱ्यांवर एकदम चपखल बसते. सध्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये मलाइका अरोरा आणि टॅक्टर अर्जुन कपूरच्या अफेअरची चर्चा आहे आणि यापेक्षा जास्त चर्चा त्यांच्यामधील एज गॅपची आहे. दोघांच्या वयात जवळपास अकरा वर्षांचे अंतर आहे आणि यामुळे त्यांना नेहमीच सोशल मीडियावर ट्रोल व्हावे लागते.

एका इंटरव्यूमध्ये मलायका अरोराने सांगितले होते की आपण एका अशा समाजात राहतो, जिथे जर एका वयस्कर माणसाने एका तरुण मुलीसोबत रोमान्स केला तर लोक तो स्वीकारतात, परंतु जर एका जास्त वयाच्या महिलेने आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुलावर प्रेम केले, तर लोक ते एक्सेप्ट करत नाहीत.

समाजात ही समजूत आहे की लग्नाच्या वेळी मुलीचे वय मुलापेक्षा कमी असायला हवे. कारण असे मानले जाते की पती हा घराचा प्रमुख असतो, तर त्याला अनुभवी आणि जास्त समजूतदार असायला हवे. भारतात सरकारकडून देखील लग्नाचे कायद्यानुसार वय मुलासाठी २१ आणि मुलीसाठी १८ ठेवले आहे.

परंतु बदलत्या काळानुसार प्रेम करण्याच्या पद्धतीतदेखील पुष्कळ बदल झालेला आहे आणि या सगळयाचे सगळयात मोठे उदाहरण आहे मुलांचे आपल्या वयापेक्षा मोठया मुलींकडे आकर्षित होणे. आता वयातील अंतराला दुर्लक्षित करून प्रेमाला आदराच्या भावनेने पाहिले जाऊ लागले आहे. मुले आपल्यापेक्षा वयाने लहान नाही, तर स्वत:पेक्षा मोठया मुलींना जास्त पसंत करू लागले आहेत.

पुरुष आणि स्त्रीमधील वयात या अंतराची रिलेशनशिप बनलेली पाहणे, आज सामान्य गोष्ट ठरत आहे. परंतु याचे काय कारण आहे? का वयासोबत जिथे सौंदर्य कमी होते तिथे काही सकारात्मक गोष्टीदेखील महिलांमध्ये वाढतात, ज्या पुरुष कदाचित नोटीस करतात, का मग अशा काय गोष्टी आहेत ज्या पुरुषाला मोठया वयाच्या महिलांकडे आकर्षित करतात? चला पाहूया…

काय म्हणतात सायकॉलॉजिस्ट

काही सायकॉलॉजिस्ट मानतात की ४५ ते ५० वर्षांच्या वयामध्ये त्यांच्यात सेक्सबद्दल उत्तेजन आणि समज वाढते आणि एखाद्या कमी वयाच्या महिलेच्या तुलनेत त्या पुरुषांना जास्त संतुष्ट करू शकतात. हेदेखील एक कारण आहे की पुरुष मॅच्युअर महिलांकडे आकर्षित होतात. तर कित्येक शोध सांगतात की जिथे पुरुष इंटीमेट होण्यात जास्त वेळ लावत नाहीत, तिथे महिलांना यासाठी वेळ हवा असतो.

महिलादेखील आपल्यापेक्षा कमी वयाच्या पुरुषांकडे अट्रॅक्ट होतात, कारण ते अधिक ऊर्जायुक्त असतात. याशिवाय सेक्शुअल प्रेझेन्टेशन महिलांना पुष्कळ चांगले जमते. सोबतच त्या फिजिकल आणि इमोशनल दोन्ही भावना व्यक्त करतात. त्यामुळे पुरुष – महिलांच्या वयाचे हे कॉम्बिनेशन पर्फेक्ट म्हटले जाऊ लागले आहे. आणखीदेखील पुष्कळ कारणे आहेत, ज्यामुळे पुरुषांना मोठया वयाच्या महिला आवडू लागल्या आहेत, जसे

आत्मविश्वास : मोठया वयाच्या महिला स्वत:ला खूप चांगल्या पद्धतीने समजतात. त्यादेखील निर्णय बालिशपणाने नाही तर खूप विचार करून घेतात. त्या स्वत: पुष्कळ मर्यादेपर्यंत मॅनेज्ड असतात. त्यांना ठाऊक असते की त्यांनी आपल्या आयुष्याकडून काय अपेक्षा ठेवाव्यात आणि काय नाही. त्या आत्मविश्वासू असतात आणि यामुळे पुरुषांना मॅच्युअर महिला जास्त आकर्षित करतात.

जबाबदार : काळ आणि अनुभवासोबत मॅच्युअर महिला जिथे आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडणे शिकतात, तिथेच त्या कठीण काळाचा सामनादेखील खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात. कित्येक बाबतीत त्या फक्त आपल्या अनुभवाची मदत घेत नाहीत, तर गरज पडल्यावर त्यांचे उपायदेखील शोधतात, ज्यामुळे कित्येक जागी पुरुष त्यांच्यासोबत रिलॅक्स फील करतात.

अशा महिला आपल्या करिअरबाबत पुष्कळ सेट होतात. आपल्या जीवनाला आणखी उत्तम बनवण्यासाठी पुरुषांना अशाच जबाबदार सोबतीची गरज असते, जी प्रत्येक मार्गावर त्यांच्यासोबत खांद्याला खांदा मिळवून चालेल.

स्वतंत्र : तरुणी आणि किशोरींपेक्षा एकदम वेगळे विचार ठेवणाऱ्या मोठया वयाच्या महिला मानसिकरीत्या स्वतंत्र असतात. पुष्कळदा मोठया वयाच्या महिला कमावत्या असतात आणि पूर्ण तऱ्हेने आत्मनिर्भर असतात. त्यामुळे गरज पडल्यावर त्या आपल्या साथीदाराला आर्थिक स्वरूपात सपोर्टदेखील करतात.

प्रामाणिक : प्रेम संबंधांमध्ये आदर आणि स्पेस दोघांचेही वेगळे महत्त्व आहे आणि मोठया वयाच्या महिला ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने समजतात. त्या आपल्या नात्याविषयी खूप प्रामाणिक असतात. सोबतच आपल्या साथीदाराच्या भावनादेखील समजतात, परंतु जर त्या आपल्या साथीदाराला विषयी प्रामाणिक आहेत, तर त्यांचीदेखील इच्छा असते की त्यांचा साथीदारानेदेखील त्यांच्याप्रती प्रामाणिक रहावे.

अनुभवी : मोठया वयाच्या महिला अनुभवी असतात, कारण त्यांनी आपल्या जीवनात पुष्कळ काही अनुभवलेले असते. त्यामुळे जीवनात येणाऱ्या अडचणींसाठी त्या सज्ज असतात.

बोलण्याची रीत : मोठया वयाच्या महिलांचे वागणे ‘क्षणात एक क्षणात एक’ असे नसते. त्या कोणतीही गोष्ट नीट समजून उमजून आणि आणि व्यवस्थित रीतीने करतात.

सेक्स : लाजण्याऐवजी मोठया वयाच्या महिला सेक्सच्या दरम्यान आपल्या पार्टनरला पूर्ण रीतीने सपोर्ट करतात. त्या स्पष्ट पद्धतीने सांगतात की त्यांना आपल्या पार्टनरकडून काय अपेक्षा आहेत, जे पुरुषांना खूप आवडते.

साठीतले प्रेम काय करावे आणि काय करू नये

* दीपान्विता राय बॅनर्जी

अर्ध्याहून अधिक वय उलटून गेल्यानंतर जेव्हा आपल्या जीवनात नव्या साथीदाराच्या स्वरूपात एखाद्या स्त्री किंवा पुरुषाचे आगमन होते, तेव्हा एका नव्या अध्यायाची सुरुवात होते. हा नवा अध्याय वाचण्याची जबाबदारी घेणे हे महाकठीण काम आहे.

आपण या अशा नवीन नात्यांविषयी खासकरून उतारवयात निर्माण झालेल्या या नात्यांची जोपासना, जोखीम, पारख आणि दक्षता यावर चर्चा करूया. म्हणजे वयाचे अनेक टप्पे पार करून तुम्ही जेव्हा एखाद्या नव्या नात्यात बांधले जाता, तेव्हा त्यातील धोका वेळीच ओळखता येईल. हट्टीपणा किंवा मानसिक असंतुलनाच्या नाही तर वास्तवाचे भान विकसित करणारी समज तुमच्यात निर्माण होईल.

स्त्री-पुरुष मैत्रीतील काही खास गोष्टी :

* स्त्री आणि पुरुष यांच्यातील मैत्री ही फक्त मैत्रीपुरतीच मर्यादित राहणे कठीण असते. याची परिणती रोमान्समध्ये होण्याची दाट शक्यता असते.

* स्त्री आणि पुरुष यांच्यातील मैत्री सामान्य असेल तर ती दीर्घकाळ टिकू शकते, पण अशा मैत्रीत जेव्हा रोमान्स येतो तेव्हा त्या मैत्रीचे आयुर्मान खुंटते. मध्येच साथ सोडून देण्याची शक्यता वाढते.

वयाच्या एका टप्प्यानंतर केलेली क्रॉस मैत्री म्हणजे विरुद्ध लिंगी व्यक्तिशी केलेली मैत्री ही कधी आणि कोणत्या परिस्थितीत होऊ शकते आणि अशा मैत्रीचे लाभ काय आणि यात काय जोखीम असते यावर बरेच संशोधन झाले आहे.

जेव्हा एखाद्या कमी वयाच्या मुलाला त्याच्याहून अधिक वयाच्या स्त्रीप्रति आकर्षण वाटते : अनेकदा काही कमी वयाच्या युवकांची मानसिक स्थिती परिपक्व असलेली दिसून येते आणि ते त्यांच्याप्रमाणेच एखाद्या मानसिकदृष्टया परिपक्व स्त्रीच्या साथीची अभिलाषा बाळगतात आणि जेव्हा अशी स्त्री त्याचवेळेस त्यांना भेटते जिच्या आवडीनिवडी, वर्तन, विचार आणि दृष्टिकोन यांच्याशी मिळतेजुळते असतात, तेव्हा तिच्यासोबत मैत्री अधिक घट्ट होते. आणि नंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात अथवा लग्नात झाले तर आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नसते.

कमी वयाच्या स्त्रीला जास्त वयाच्या पुरुषाचे वाटणारे आकर्षण आणि याची कारणे : अशा स्थितीत स्त्रिया आपल्याहून दुप्पट वयाच्या किंवा अगदी आपल्या पित्याच्या वयाच्या व्यक्तिसोबत मानसिक, शारीरिक पातळीवर नाते प्रस्थापित करण्याची इच्छा बाळगतात. सायकोलॉजिकली पाहिल्यास असे पुरुष हे वयाने परिपक्व असण्यासोबत सेक्स अपीलनेही परिपूर्ण असतात. त्यांना स्वत:ला पेश करण्याची कला अवगत असते आणि ते आपल्या वयानुसार नाही तर आपल्या व्यक्तिमत्त्वानुसार जगत असतात.

असे पुरुष प्रभावशाली असतात. हे आपल्या कर्म, विचार आणि सामर्थ्य यात शक्तिशाली असतात. आपल्या परिवाराची पूर्ण काळजी घेणारे किंवा आपले प्रतिष्ठेचे पद आणि कर्मजीवन उत्तमरीतीने निभावून नेणारे असतात. अशा पुरुषांना आपले सर्वस्व अर्पण करून कमी वयाच्या स्त्रिया तृप्त होऊ पाहतात.

अनेकदा तर पतिकडून होणारी अवहेलना यामुळे या स्त्रिया अशा कर्मठ आणि रोमँटिक पुरुषांकडे आकर्षित होतात. यांच्या सान्निध्यात या असमाधानी स्त्रिया आपला गमावलेला आत्मविश्वास परत मिळवतात. या पुरुषांनी केलेली प्रशंसा किंवा मदत यांना जगण्याची उमेदही दाखवते.

६० किंवा त्याहून अधिक वयाच्या पुरुषांना कमी वयाच्या स्त्रियांचे आकर्षण : अशी स्थिती आजच्या काळात सर्वसामान्य समजली जाते. काम आणि व्यवसायाच्या निमित्ताने जास्त वयाच्या पुरुषांचा कमी वयाच्या स्त्रियांशी जेव्हा सतत जवळून संबंध येत असतो, तेव्हा पुरुषांना या स्त्रियांप्रति सहानुभूती, आपलेपणा आणि रोमान्सची भावना निर्माण होणे स्वाभाविक असते.

कमी वयाच्या स्त्रियांसोबत त्यांचे नाते कसे असेल हे त्या पुरुषाच्या व्यक्तित्वावर अवलंबून असते. त्या पुरुषाच्या बॅकग्राउंडवरच त्याच्याशी नाते प्रस्थापित करू पाहणाऱ्या स्त्रीच्या त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा स्पष्ट होत असतात. कसे ते जाणून घेऊया :

वयस्कर कामुक पुरुष आणि त्याच्या स्त्रीकडून अपेक्षा : असे पुरुष स्त्रीच्या शरीराची लालसा बाळगणारे असतात. ते आपल्या कामनापूर्तीतील असमाधानाची ढाल करून स्त्रियांना भोगण्याचा बहाणा शोधत असतात. यामुळे त्यांना समाजव्यवस्था, न्यायव्यवस्थेला न मानण्याच्या दोषातून मुक्त होण्याचे कारण मिळते. अशाप्रकारे अपराधभावनेतून स्वत:ला सोडवून फक्त आपला स्वार्थ साधण्याचे काम हे करत असतात.

भोगी पुरुषांची ओळख आणि अशा पुरुषांपासून स्त्रियांचे स्वसंरक्षण : हा एक महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. नोकरी असो किंवा व्यवसाय किंवा करिअरचा कोणताही टप्पा असो २० ते ४० वयोगटातील स्त्रियांना विशेषकरून वयस्कर पुरुषांच्या सान्निध्यात काम करावे लागते.

अशा स्त्रिया या आपल्या संभाषण, विचार, व्यवहार आणि गुणांमुळे नेहमीच सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. त्यामुळे हे स्वाभाविक आहे की वयस्कर पुरुषांना अशा स्त्रियांचे सान्निध्य आवडते. पण गोष्टी तेव्हा बिघडू लागतात, जेव्हा हे मैत्रीच्या नावावर या स्त्रियांना भुलवून आपल्या जाळयात ओढतात. ज्या स्त्रिया जाणूनबुजून स्वत:च्या रिस्कवर या नात्याला वाढवतात, त्यांच्यासाठी ही चर्चा भलेही काही कामाची नसेल परंतु त्यांना सावध करणे गरजेचे आहे ज्या अशा पुरुषांशी काहीही विचार न करता मैत्री करतात आणि नंतर न त्यांना पाठी फिरण्याचा मार्ग उरतो वा पुढे जाण्याचा. अशा वासनांध पुरुषांच्या मानसिकतेची झलक पुढे देत आहे, जेणेकरून अशा पुरुषांना सहज ओळखता येईल :

* असे पुरुष सुरुवातीच्या काळात भावनिक पातळीवर संवाद साधतात.

* ते त्या स्त्रीच्या प्रत्येक गरजेची काळजी घेऊ पाहतात.

* त्या स्त्रीचा पती किंवा तिच्या कुटुंबातील लोकांतील उणीवा शोधून स्वत:ला चांगले भासवून तिच्यावर छाप पाडण्याचा प्रयत्न करतात.

* कामाच्या ठिकाणी अतिरिक्त सुविधा देतात.

* कधीकधी स्त्रीच्या शरीराला स्पर्श करून त्याला केअरचे स्वरूप देतात.

* खोटं बोलण्यात आणि अभिनयात हे माहीर असतात.

* आपल्या सावजास भरपूर वेळ देतात, जाळयात ओढण्याची घाई करत नाहीत.

वयस्कर पुरुषांचा कमी वयातील स्त्रीसोबत भावनात्मक संबंध : जास्त वयाचे काही असेही पुरुष असतात, जे कमी वयाच्या अशा समजूतदार स्त्रीसोबत मैत्रीपूर्ण भावनात्मक संपर्क ठेवू पाहतात. जी विचार, स्वभाव आणि भावना यात त्यांच्याशी साधर्त्य साधणारी असते.

जर असे संबंध सहज असतील, विचारांच्या आदानप्रदानापासून स्वस्थ मानसिकता दर्शवणारे असतील आणि दोघांच्या कौटुंबिक संबंधाना नष्ट न करणारे असतील तर अशी मैत्री योग्य आहे.

भावनात्मक आधार शोधणाऱ्या पुरुषांची कौटुंबिक स्थिती : असे पुरुष बऱ्याचदा आपल्या पत्नीला तो मान देऊ शकत नाहीत, ज्याची त्याच्या पत्नीला अपेक्षा असते. असे पुरुष आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या तर निभावत असतात आणि आपल्या पत्नीच्या गरजाही पूर्ण करतात, पण पत्नीला स्वत:च्या योग्यतेचे समजत नाहीत.

असेही असू शकते की पत्नीमध्येही त्यांचा सहारा बनण्याची योग्यता नसेल. घर परिवारांत क्लेश असतील किंवा पुरुषाच्या कामकाजी जीवनातील समस्या त्याची पत्नी समजून घेत नसेल किंवा त्या पुरुषाच्याच आपल्या पत्नीकडून इतक्या अपेक्षा असतील ज्या पूर्ण करणे पत्नीला शक्य नसेल.

कारण काहीही असो जर बाहेरील स्त्री पुरुषांमध्ये संबंध निर्माण झाले असतील तर लव्ह इन सिक्स्टीजसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या स्त्रीपुरुष दोघांनाही लागू होतील :

* अशा संबंधांना निभावताना पहिल्यांदा त्या संबंधाचा प्रकार निश्चित करा. यावर दोघांनीही अंमल केला पाहिजे. उदाहरणार्थ हे नाते शेवटपर्यंत फक्त मैत्रीचेच राहील किंवा हे नाते पुढे कोणत्याही वळणावर नेण्यासाठी दोघे मोकळे असतील.

* दोघे आपली मैत्री समाज, कुटुंब यांच्यापुढे जाहीर करणार की लपून छपून मैत्री ठेवणार हे दोघांनी ठरवावे.

* दोघांनी एकमेकांना लहानशी भेटवस्तू देण्यापुरतेच सीमित राहावे. मोठमोठया भेटवस्तू देणे टाळा, ज्यामुळे कुटुंबात कलह निर्माण होतील आणि तुम्ही नसत्या समस्येत फसू शकता.

* आपल्या नात्यात पारदर्शीपणा ठेवा आणि सत्याच्या बाजूने रहा. यामुळे तुमच्या मित्राला मर्यादेचे भान राहील आणि तुमच्याकडून तो कमी अपेक्षा ठेवेल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें