आरोग्य परामर्श

* डॉ. अभिनव गुप्ता, निर्देशक, न्यूरो अँड स्पाइन, बालाजी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, साहिबाबाद

प्रश्न : माझ्या वडिलांना स्पाइनल डिस्कचा त्रास झालाय. डॉक्टरांनी सर्जरी करायला सांगितली. आम्हाला जाणून घ्यायचयं की ओपन सर्जरीच्या तुलनेत मिनिमली इनवेसीव सर्जरी किती योग्य आहे?

उत्तर : ज्या रुग्णांचं डिस्क खूप खराब झालं आहे त्यांना स्पाईन सर्जरीची गरज असते. अलीकडे मिनिमली इनवेसीव डीकनप्रेशन आणि मिनिमली इनवेसीव स्टॅबिलायझेशन प्रक्रियेचं चलन खूपच वाढलंय. ओपन सर्जरीच्या तुलनेत हे खूपच सुरक्षित आणि प्रभावी पर्याय आहे. यामध्ये स्पाईनच्या आजूबाजूच्या मांसपेशीना मोठमोठे चिरा देऊन कापणं आणि वेगळं करण्याची गरज पडत नाही. यामध्ये छोटीशी चीर देऊन सर्जरी केली जाऊ शकते.

मिनीमली इनवेसीव सर्जरीचे साईड इफेक्ट्स कमी असतात आणि रिकव्हर होण्यास वेळदेखील कमी लागतो.

प्रश्न : मी ४३ वर्षीय प्राध्यापिका आहे. गेल्या दोन महिन्यापासून कमरेखालती वेदना होतात. तपासणी केल्यानंतर बल्जिंग डिस्क असल्याचं समजलं. मी काय करू?

उत्तर : बल्जिंग डिस्कच्या उपचारात फिजिओथेरपी खूपच प्रभावी आहे. जर यापासून आराम मिळाला नाही तर सर्जरीची गरज लागते. आर्टिफिशियल डिस्क रिप्लेसमेंटद्वारे ही समस्या दूर होऊ शकते. या सर्जरीद्वारे क्षतिग्रस्त डिस्कला आर्टिफिशियल डिस्कमध्ये बदललं जातं. हे डिस्क लागल्यानंतर पीडित व्यक्तीला पुढे मागे वाकण्यात आणि इतर कार्य करण्यात त्रास होत नाही. पाठीच्या कण्याचा लवचिकपणा पूर्वीप्रमाणे सामान्य होतो आणि मणक्याच्या हाडांवर पडणारा झटका सहन करण्याची क्षमतादेखील वाढते. आर्टिफिशियल डिस्कचा सर्वात मोठा फायदा हा आहे की तुम्ही आयुष्यभर काम करू शकता.

प्रश्न : मी ५२ वर्षीय नोकरदार स्त्री आहे. माझ्या कमरे खालचा भाग आणि कुल्ह्यामध्ये सतत वेदना असतात. मी काय करू?

उत्तर : तुम्हाला  सायटिकाचा त्रास आहे. खरंतर सायटिकामुळे होणाऱ्या वेदना खूपच गंभीर असतात. परंतु अनेक प्रकरणात हे कोणत्याही ऑपरेशनशिवाय काही आठवडयातदेखील बरं होतं. अनेक लोकं हॉट पॅक्स, कोल्ड पॅक्स आणि स्ट्रेचिंगने या समस्येपासून आराम मिळतो. परंतु ज्या लोकांना सायटिकामुळे पाय अधिक बारीक झाले आहेत वा ब्लॅडर वा बाऊलमध्ये परिवर्तन झाल्याने मलमूत्र त्यागण्याच्या सवयीमध्ये बदल होऊ शकतो. त्यांच्यासाठी ऑपरेशन करणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त जीवनशैलीमध्ये बदल करा. असं भोजन करा ज्यामध्ये कॅल्शियम आणि विटामिन डी पुरेपूर असेल. शारीरिकरित्या सक्रिय राहून नियमितपणे व्यायाम करा. नेहमी आरामदायक बिछानावरती झोपा. जे खूप कडक नसावं आणि अगदी खूप मऊदेखील नसावं.

प्रश्न : माझ्या सासूबाईंना एकदा ब्रेन स्ट्रोक झाला आहे. त्या खूपच अशक्त झाल्या आहेत. त्यांना हा त्रास पुन्हा होण्याचा धोका आहे का?

उत्तर : उपचारानंतरदेखील आवश्यक काळजी घेणं गरजेचं आहे. कारण एकदा स्ट्रोक आल्यानंतर पुन्हा स्ट्रोक होण्याची शक्यता पहिल्या आठवडयात ११ टक्के आणि पहिल्या तीन महिन्यांमध्ये २० टक्के असते. त्यांच्या आहाराकडे लक्ष द्या. त्यांना संतुलित आणि पोषक भोजन द्या. हा हलकेफुलके व्यायाम करणे व फिरण्यासाठी सांगा. डॉक्टरांनी सांगितलेली औषधे वेळेवरती द्या.

प्रश्न : मी आणि माझे पती दोघेही सॉफ्टवेअर इंजिनियर आहोत. गॅझेट्स आमच्या आयुष्याचा एक भाग बनला आहे. मला जाणून घ्यायचे की गॅझेटच्या अतिवापराने स्पाईनशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात का?

उत्तर : गॅझेटचा वाढता वापर अलीकडेच स्पाइनशी संबंधित समस्यांचं एक सर्वात मोठं कारण पुढे येतंय. याच्या वापराच्या दरम्यान योग्य पोश्चर न ठेवल्याने याचा धोका अधिक वाढतो. कारण यामुळे मास पेशींवरती दबाव पडतो. गॅझेट्सच्या अत्याधिक वापरापासून दूर रहा. करतेवेळी स्वत:चे पोश्चर ठीक ठेवा. प्रत्येक दोन तासानंतर एक ब्रेक घ्या. काही मिनिटं ऑफिस वा घरात इकडे तिकडे चालत राहा. थोडसं स्ट्रेचिंग करा. यामुळे तुमच्या मासपेशी आणि सांध्यांना आराम मिळेल. आठवडयातून एकदा डिजिटल डिटॉक्स आवर्जून करून घ्या. यादरम्यान गॅझेटचा वापर अजिबात करू नका.

प्रश्न : मला स्पॉडिलाइटिस आहे, परंतु समस्या एवढी गंभीर नाहीए. मला जाणून घ्यायचेय की काही घरगुती उपायाने आराम मिळू शकतो का?

उत्तर : जर स्पॉडिलाइटिसची समस्या किरकोळ असेल तर घरगुती उपायांनी आराम मिळू शकतो. यासाठी हॉट आणि कोल्ड थेरीपी खूपच महत्त्वाची आहे. यामुळे सांधे आणि मांसपेशीमधील वेदना आणि घट्टपणा दूर होतो. जिथे  तुम्हाला वेदना होत असेल तिथे हीटिंग पॅड्स लावा. तुम्ही हॉटशॉवरदेखील घेऊ  शकता. सूज कमी करण्यासाठी सुजलेल्या जागी बर्फ लावा. यामुळे सूजदेखील कमी होईल आणि वेदनेपासूनदेखील आराम मिळेल. या व्यतिरिक्त सूज, वेदना आणि घट्टपणा कमी करण्यासाठी नॉन स्टेरिएड अँड टू इनफ्लॅमेटरी ड्रग्सदेखील घेऊ शकता. फिजिकल थेरेपीदेखील याच्या उपचाराचा महत्त्वाचा भाग आहे.

आरोग्य परामर्श

* डॉक्टर ज्योती बाली, इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट बेबीसून फर्टिलिटी अण्ड आईवीएफ सेंटर

प्रश्न : माझं वय ४० वर्षे आहे. मला खूप जास्त वैजायनल डिस्चार्ज होतं. हे कंडिशन खूपच त्रासदायक वाटतं. असं का होतं आणि यावर उपाय शक्य आहे का?

उत्तर : सामान्यपणे रिप्रोडक्टिव्ह वयामध्ये वैजायनल डिस्चार्ज एक सामान्य समस्या आहे. तुमची स्थिती सामान्य नाही आहे. तुम्ही डॉक्टरचा सल्ला घ्यायला हवा. दोन्ही स्त्रावाच्या दरम्यान योनीमध्ये खाज, जळजळ, पांढरा रंगाचं दाट डिस्चार्ज, स्किन रॅशेज, सूज, वारंवार लघवीला होणं आणि लघवी करतेवेळी वेदनेसारख्या समस्या निर्माण होतात. असामान्य योनी स्त्रावाची अनेक कारणे असू शकतात. जसे की, यौनसंबंधाच्या दरम्यान होणारं संक्रमण रोगप्रतिकारक क्षमता कमी होणं व ज्यांना मधुमेह आहे त्यांच्या योनीमध्ये फंगल इस्ट नावाचा संक्रमण रोग होऊ शकतो. स्त्रिया सुरुवातीला या समस्येकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे कधीकधी गर्भाशय कॅन्सर होण्याचीदेखील शक्यता निर्माण होते. तसंच सुरुवातीलाच याकडे लक्ष दिलं तर यावर उपचार केले तर निश्चितपणे ही समस्या बरी होऊ शकते. परंतु दुर्लक्ष वा बराच उशिराने उपाय केल्यानंतर गंभीर वा असाध्य रोगदेखील होऊ शकतो .

प्रश्न : माझं वय ३४ वर्षे आहे. मला वारंवार एंडोमिट्रीओसीसची समस्या होत असते. मी सर्जरीद्वारे रिमुव्हदेखील केलं आहे. परंतु पुन्हा एंडोमिट्रीओसीस सांगितलं जातंय. मला पिरियड्समध्ये अधिक स्त्राव तसंच वेदना होतात.

उत्तर : गर्भाशयात होणारी समस्या आहे, ज्यामध्ये गर्भाशयाच्या आतील थर बनवणारा एंडोमिट्रीयम लाइनिंगमध्ये असामान्य वाढ होऊ लागते आणि तो गर्भाशयाच्या बाहेर पसरू लागतो. कधी कधी एंडोमिट्रीयमचा थर गर्भाशयाच्या बाहेरच्या थरा व्यक्तीरिक्त अंडाशय, आतडे आणि इतर प्रजनन अंगांमध्येदेखील पसरला जातो. ज्याला एंडोमिट्रीओसिस म्हटलं जातं. मोठया एंडोमिट्रीयम थरामुळे प्रजनन अंगात जसं फेलोपियन ट्यूब, अंडाशयाच्या क्षमतेवर परिणाम होऊ लागतो. इंडोमिट्रीओसिस स्त्रियांमध्ये पिरीएडच्या दरम्यान अधिक ब्लीडिंग आणि वेदनेचं कारण देखील बनतं. यामुळे स्त्रियांना खूप त्रास होतो तर दुसरीकडे रिप्रोडक्टिव्ह वयामध्ये हे इन्फर्टिलिटीचं कारणदेखील बनतं. ही समस्या एखाद्या बाहेरच्या संक्रमणामुळे नसून शरीराच्या आंतरिक प्रणालीच्या कमतरतेमुळे होते. इंडोमिट्रीओसिसच्या अंडाशयापर्यंत पसरणाऱ्या या भागावरती सिस्टदेखील बनतं.

मेडिकल ट्रीटमेंटने आर्टिफिशियल मेनोपोजच्या माध्यमातून एंडोमिट्रीओसीसला रोखलं जातं. यासाठी हार्मोनल औषधं वा महिन्यातून एक इंजेक्शन पुरेसं असतं. याव्यतिरिक्त इंडोमिट्रीओसिसच्या समस्येने ग्रस्त रुग्णाला जर आई व्हायचं असेल तर यासाठी आययुआय आणि आयव्हीएफसारख्या स्पेशल ट्रीटमेंट आहेत. जर रुग्णाचे वय अधिक असेल आणि अनेक सर्जरी झल्या असतील तर गर्भाशय आणि ओवरीज काढून हिस्टरेक्टोमी याचा सर्वाधिक उत्तम उपाय आहे.

प्रश्न : मी ७ महिन्याची गर्भवती आहे. माझं वय २८ वर्षे आहे. जसजशी वेळ जवळ येतेय, प्रसुतीबद्दल विचार करून मी घाबरुन जाते. कारण मी असं ऐकलंय की प्रसुतीच्या वेदना खूपच असहनीय असतात. मला जाणून घ्यायचंय की मी पेनलेस डिलिव्हरी करू शकते का? या पद्धतीने प्रसुती केल्यानंतर माझ्या व माझ्या होणाऱ्या बाळाच्या आरोग्यावर कोणता दुष्परिणाम तर नाही ना होणार?

उत्तर : अलीकडे एपीड्यूरल एनेस्थेशियाद्वारे पेनलेस प्रसुती करणं खूपच सामान्य प्रक्रिया आहे. हे पूर्णपणे सुरक्षित आहे. याचे कोणतेही दुष्परिणाम नाही आहेत. तसंच मुलासाठी आणि आईसाठीदेखील या प्रक्रियेद्वारा प्रसुतीच्या असहनीय वेदनेपासून वाचू शकतात. या प्रक्रियेत एका छोटया कॅथेटरच्या मदतीने एपीड्यूरल आणि एनेस्थेशियाला लोअर बॉडीच्या एपीड्यूरल पार्टमध्ये टाकलं जातं. काही काळासाठी तुमचं ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं. परंतु डॉक्टर आणि एनेस्थेशिया एक्सपर्टच्या देखरेखीखाली स्थितीला नियंत्रित केलं जातं.

प्रश्न : माझं वय ३८ आहे. मेडिकल तपासणीत माझ्या जननांगाच्या ट्यूबवर क्लोसिस आढळलं आहे. मला दुसरं मूल हवं आहे. परंतु अशा परिस्थितीत मी गर्भवती होणं शक्य आहे का? हा आजार माझ्या येणाऱ्या बाळाच्या आरोग्यावरतीदेखील परिणाम करू शकतो का?

उत्तर : गर्भाशय टीबी हा एक असा रोग आहे जो प्रामुख्याने स्त्रियांच्या जननांगांमध्ये जसं की अंडाशय, फेलोपियन ट्यूब, गर्भाशय, गर्भाशय ग्रीवा आणि योनी व श्रोनिच्या आजूबाजूच्या लिंफ नोड्सला प्रभावित करतो. हा रोग प्रामुख्याने स्त्रियांच्या रिप्रोडक्शन वयाच्या दरम्यान प्रभावित करतो. अनेकदा वांझपणाचे कारण बनतं. जेनाईटल टीबीचा उपचार दोन स्तरावर केला जातो. पहिला स्तरांमध्ये दोन महिन्यापर्यंत कमीत कमी तीन अँटीटीबीच्या औषधांसोबत तसंच दुसऱ्या स्तरांमध्ये चार ते दहा महिन्यासाठी कमीत कमी दोन अँटीटीबीच्या औषधांसोबत कायम उपचार चालू राहतो आणि जेनाईटल पार्टमध्ये सर्जरीद्वारा उपचार केले जातात. उपचाराच्या दरम्यान तुम्हाला देण्यात आलेल्या सूचनांचं योग्य प्रकारे पालन करा. याच्या उपचारानंतर एआरटी तंत्रज्ञानाद्वारे गर्भधारणा करू शकता. परंतु तुम्हाला पूर्णपणे डॉक्टरांच्या देखरेखीमध्ये हे करावं लागणार.

आरोग्य परामर्श

* शिवानी कंडवाल, आहार विशेषज्ज्ञ, डायबिटीस एज्युकेटेड,, फाउंडर न्यूट्री वाईब्ज

प्रश्न : माझं वय ३४ वर्षे आहे. कोविड -१९ झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या केसांची चांगली काळजी घेऊन आणि त्यामध्ये तेल लावूनदेखील ते खूपच गळत आहेत. तुम्ही कृपया मला सल्ला द्या की मी माझ्या आहारात आणखी काय घेऊ शकते की ज्यामुळे माझे केस गळणे बंद होईल?

उत्तर : या अवस्थेला टॅलोजेन एफियुविएम म्हणतात. हे या आजारानंतर होऊ शकतं. यासाठी तुम्ही प्रोटीन आणि झिंकयुक्त आहार घ्या. जर तरीदेखील काही फरक पडत नसेल तर फेरीटीन, विटामिन डी ची टेस्ट करून घ्या. कारण याच्या कमतरतेमुळेदेखील केस गळू शकतात.

प्रश्न : माझं वय ३० वर्षे आहे आणि मी पीसीओडीची पेशंट आहे. मला माझ्या आहारात मी कोणत्या गोष्टी टाळाव्यात?

उत्तर : अलीकडे प्रत्येक ५ पैकी एका स्त्रीला तरी पीसीओडी आहे. याचं कारण आपली व्यस्त जीवनशैली. यासाठी तुमची दिनचर्या व्यवस्थित करा. तुमच्या आहारात साखर, मैदा, तळलेले पदार्थ, पॅकेट्स दूध, रिफाइंड तेल वगैरे काढून टाका. जेवढं होऊ शकेल तेवढया ताज्या (फायबर युक्त) भाज्या, फळं आणि मोड आलेले धान्य घ्या.

प्रश्न : माझा मुलगा अजिबात पोष्टिक खात नाही. त्याला फक्त पिझ्झा आणि पास्ता आवडतं. कृपया अशा आहाराचा सल्ला द्या जे पौष्टिकदेखील असेल आणि माझ्या मुलालादेखील आवडेल?

उत्तर : मुलांचा पौष्टिक आहार देण्यासाठी गरजेचं आहे की आहार दिसायला छान आणि रुचकरदेखील असावा. यासाठी भाजी पूर्ण बनवून पोळी वा पासत्यामध्ये टाका. याव्यतिरिक्त साध्या ब्रेड ऐवजी मल्टी ग्रेन ब्रेडचं सँडविच वा मल्टी ग्रेन पास्त्याचा वापर करा. नट्स आणि सिड्स शेक बनवून प्यायला द्या.

प्रश्न : माझं वय ४२ आहे आणि मला मधुमेह आहे. तुम्ही मला गोड पदार्थांचा पर्याय सांगा त्यामुळे मला जेव्हा गोड खावसं वाटेल तेव्हा मी खाऊ शकेन?

उत्तर : मधुमेह तुमच्या वाईट जीवनशैलीमुळे होतो. सर्वप्रथम तुमची दिनचर्या व्यवस्थित करा आणि दररोज व्यायाम करा. याव्यतिरिक्त जेव्हा गोड खावसं वाटेल तेव्हा तुम्ही एक खजूर, १०० ग्रॅम फळ, फ्रुट स्मुदी, डार्क चॉकलेट इत्यादी खाऊ शकता.

प्रश्न : माझी आई मधुमेहाची पेशंट आहे. तिने भात खाणे योग्य आहे का? दिवसातून किती वेळा आणि कोणता भात खायला हवा म्हणजे पांढरा का ब्राउन?

उत्तर : कोणताही नैसर्गिक आहार वाईट नसतो. परंतु आपण त्याचा सेवन कसं करतो आहोत हे पाहायला हवं. तुम्ही भात देऊ शकता, परंतु त्याची पेज काढून. ज्यामध्ये जेवढं भाताचं प्रमाण आहे तेवढीच दाळ वा भाजी मिसळून द्या. पांढरा ऐवजी ब्राऊन भात अधिक हेल्दी असतो.

प्रश्न : मी ३० वर्षांची आहे. माझंजन ४५ किलो आणि उंची ५ फूट ७ इंच आहे. माझं वजन खूपच वेगाने कमी होत आहे. कृपया करून याबाबत सल्ला द्या की मी काय खावं जेणेकरून माझं वजन वाढेल?

उत्तर : पहिल्यांदा हे गरजेच आहे की तुमचं वजन कमी होण्याचं कारण जाणून घेणं. यासाठी तुम्ही तुमची थायरॉईड टेस्ट करून घ्या. या व्यतिरिक्त तुमच्या आहारातील पौष्टिक तत्त्वांकडे खास लक्ष द्या. प्रोटीन, कार्बोहायड्रेट युक्त भोजन घ्या.

प्रश्न : माझी नखं खूपच कमजोर झाली आहेत. आठवडयामध्ये जेवढी वाढतात तेवढीच तुटतात. मी नखं वाढविणाऱ्या तेलाचादेखील वापर केला आहे परंतु यामुळे फारसा काही फायदा झाला नाही. कृपया करून मला सल्ला द्या की मला कोणता आहार घ्यायला हवा ज्यामुळे माझी नखं निरोगी होतील आणि वाढीसदेखील लागतील?

उत्तर : तुम्ही तुमच्या आहारात प्रोटीन घ्या. कमीत कमी १ वा १.५ ग्राम प्रति १ किलोग्राम शरीराच्या वजनाच्या हिशोबाने प्रोटीन घ्या. यासाठी डाळी, सोयाबीन, पनीर, चिकन, दूध आणि दुधाने बनविलेल्या वस्तू खाऊ शकता. झिंक युक्त जसं की कडधान्ये, नट्स, दही इत्यादी खाऊ शकता.

प्रश्न : माझं वय २६ वर्षे आहे आणि नुकतीच कोविड -१९ ची रिकवरी केली आहे. मला प्रत्येक वेळी खूप आळस येतो. कृपया करून मी आहारात काय घेऊ शकते ते सांगा

उत्तर : कोविड -१९ नंतर अशा प्रकारची कमजोरी येणे खूपच सामान्य झालं आहे. परंतु डायटमध्ये बदल करून तुम्ही तुमची एनर्जी लेवल वाढवू शकता. तुमच्या आहारात एनर्जी वाढविणारे खाद्यपदार्थ वाढवा जसं की कडधान्य खाद्यपदार्थ, रताळी, डाळी, फळे, अंडी, चिकन मासे, सत्व इत्यादींचा आहारात समावेश करा. कोणत्याही आजाराच्या वेळी शरीरात इन्फ्लंमेशन वाढतं, ते कमी करण्यासाठी ओमेगा-३ फॅटी अॅसिडच्या पदार्थांचा तुमच्या डायटमध्ये समावेश करा. ओमेगा-३ फॅटी अॅसिड अक्रोड, अळशीच्या बियांमध्ये असतं आणि जर तुम्हाला वाटतं की तरीदेखील तुम्हाला आराम मिळत नाही आहे तर तुम्ही त्याची सप्लीमेंट देखील घेऊ शकता.

आरोग्य परामर्श

* डॉक्टर, सुदीप सिंग सचदेव, नेफ्रोलॉजिस्ट, नारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, गुरुग्राम

प्रश्न : मी २२ वर्षांची आहे. काही दिवसांपासून मला श्वास घेण्यास खूप त्रास होत होता. मला भीती वाटत होती की मला कोरोना तर झाला नसेल, पण तपासणीत माझ्या किडनीमध्ये फॉस्फरसचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनात आले. मला योगा करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, परंतु मला हे जाणून घ्यायचे आहे की ही समस्या आहाराद्वारे दूर केली जाऊ शकते का?

उत्तर : तुम्ही ज्या समस्येचा उल्लेख करत आहात त्याला हायपरफॉस्फेटमिया म्हणतात. हे फॉस्फरसच्या अतिसेवनामुळे होते. यापासून सुटका मिळवण्यासाठी योगासोबतच आहारात बदल केल्यास फॉस्फेटचे प्रमाणही कमी करता येते.

सॉफ्ट ड्रिंक, चॉकलेट, प्रक्रिया केलेले मांस, प्रक्रिया केलेले चीज, जंक फूड, आईस्क्रीम इत्यादींचे सेवन कमीत कमी करावे. याशिवाय बीन्स, ब्रोकोली, कॉर्न, मशरूम, भोपळा, पालक आणि रताळे इत्यादींचे सेवनदेखील कमी करावे. अगदी मांस, मासे, कॉटेज चीज, मोझरेला चीज इत्यादींचे सेवन महिन्यातून एकदाच करावे.

प्रश्न : मी २६ वर्षांची आहे. बरेच दिवस माझे पोट खालच्या भागात कधीही दुखू लागते. कधीकधी ही वेदना सौम्य असते तर कधी तीक्ष्ण असते. यासोबतच मला रात्री वारंवार लघवी होऊ लागली आहे, त्यामुळे मला जळजळ होण्याची समस्या होते. मला सांगा हे का होत आहे आणि त्यावर उपाय काय आहे?

उत्तर : तुम्ही सांगितलेली लक्षणे मूत्रपिंडाचा आजार दर्शवतात. सुरुवातीला या आजाराची काही विशिष्ट लक्षणे दिसत नाहीत, परंतु तुम्ही सांगितलेल्या लक्षणांवरून असे दिसते की हा त्रास किरकोळ नाही. तथापि तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. सर्व प्रथम आपण हे नेफ्रोलॉजिस्टकडून तपासले पाहिजे. जितक्या लवकर समस्येचे निदान होईल तितके चांगले, कारण निदान आणि उपचारात उशीर केल्याने केवळ तुमचा जीवच धोक्यात येऊ शकत नाही, तर तुम्हाला इतर अनेक समस्यांचा सामनादेखील करावा लागू शकतो. सर्वात धोकादायक परिणामांपैकी किडनी रोगाची शेवटची पायरी, अशक्तपणा आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग यासारख्या संबंधित रोगांची ओळख आहे.

रोग टाळण्यासाठी निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीचा अवलंब करा आणि आवश्यक असल्यास आपल्या आहारातदेखील बदल करा. अधिकाधिक पेये, विशेषत: पाणी प्या, जेणेकरून मूत्रपिंड शरीरातून सोडियम, युरिया आणि विषारी पदार्थ सहजपणे काढून टाकू शकतील. सोडियम किंवा मीठाचे सेवन कमीत कमी करा.

प्रश्न : मी ३८ वर्षांची नोकरदार महिला आहे. कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे मी माझ्या तब्येतीकडे कधीच लक्ष देऊ शकले नाही, त्यामुळे माझी किडनी जवळपास खराब झाली आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपणाचे कुठले दुष्परिणाम आहेत का? समस्येपासून मुक्त होण्याचा दुसरा कोणताही मार्ग आहे का?

उत्तर : जेव्हा मूत्रपिंड निकामी होऊन अंतिम टप्प्यात पोहोचते तेव्हा डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपणानेच त्यावर नियंत्रण मिळवता येते. डायलिसिस आठवडयातून एकदा किंवा त्याहूनही अधिक वेळाही केले जाऊ शकते, ते परिस्थितीवर अवलंबून असते. प्रत्यारोपणामध्ये खराब झालेले मूत्रपिंड निरोगी मूत्रपिंडाने बदलले जाते. ८० टक्के प्रत्यारोपण प्रकरणे यशस्वी होतात. प्रत्यारोपणाच्या प्रकरणांमध्ये एकच भीती असते की शरीर कदाचित प्रत्यारोपणास नाकारणार तर नाही का? तथापि हा धोका पत्करणे महत्त्वाचे आहे, कारण निरोगी मूत्रपिंड तुम्हाला चांगले जीवन जगण्यास मदत करू शकते.

प्रश्न : मी ३२ वर्षांचा आहे. खरं तर अनेक दिवसांपासून मला माझ्या खालच्या ओटीपोटात असे दुखत आहे जणू कोणी सुई टोचत आहे. ही वेदना माझ्या प्रायव्हेट पार्टमध्येही जाणवत आहे, त्यामुळे माझे जगणे कठीण झाले आहे. कृपया मला सांगा की यापासून मुक्त कसे व्हावे?

उत्तर : हे दुखणे किडनी स्टोनचे लक्षण असू शकते. आनुवंशिकता, औषधांचे दुष्परिणाम, लघवीत वारंवार संसर्ग, खनिज घटकांचे जास्त प्रमाण, पाण्याचे कमीत कमी सेवन इत्यादींमुळे खडे तयार होतात. कॅल्शियम किंवा यूरिक अॅसिड हळूहळू मूत्रपिंडात जमा होते आणि खडयाचा आकार घेते. सर्वप्रथम स्वत:ची तपासणी करा म्हणजे खरी समस्या काय आहे हे कळेल.

जर खडा लहान असेल तर काही औषधे आणि जास्त पाणी प्यायल्याने तो लघवीद्वारे बाहेर निघेल. जर तो मोठा असेल तर शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढला जाईल. त्यामुळे तपासणी करण्यास अजिबात उशीर करू नका.

प्रश्न : माझ्या एका मैत्रिणीचे किडनी प्रत्यारोपण होत आहे. किडनी दानासाठी डॉक्टरांनी माझी निवड केली आहे. तथापि मला यावर काही आक्षेप नसला तरी मला हे जाणून घ्यायचे आहे की याचे काही दुष्परिणाम आहेत का? किडनी दान केल्यानंतर कोणकोणती काळजी घ्यावी लागेल?

उत्तर : तू कोणाला तरी जीवदान देणार आहेस याचा मला आनंद आहे. तुला घाबरून जाण्याची गरज नाही, कारण एक किडनी असूनही एक निरोगी आणि चांगले जीवन जगता येते. तुला फक्त काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल जसे की निरोगी जीवनशैली जगणे, वेदनाशामक औषधांचे सेवन कमी करणे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँटीबायोटिक्स घेणे, शारीरिकदृष्टया सक्रिय असणे, पौष्टिक आणि संतुलित आहार घेणे इत्यादी. या सर्व गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्हाला कधीही कुठला त्रास होणार नाही.

आरोग्य परामर्श

* डॉ. यतीश अग्रवाल

प्रश्न : मी ४५ वर्षांची गृहिणी आहे. माझा नवरा कपडयांचा एक मोठा व्यापारी आहे आणि तो माझ्यापेक्षा ४ वर्षांहून मोठे आहेत. आमचा २२ वर्षांचा १ मुलगा आणि १९ वर्षांची १ मुलगी आहे. काही काळापूर्वीच फॅमिली डॉक्टरांच्या सांगण्यावरून आम्ही सर्वांनी आमची युरिन, मल आणि रक्ताच्या चाचण्या करून घेतल्या, इतर सर्व अहवालांमध्ये तर कुठली काही कमतरता नव्हती, परंतु आम्हां सर्वांमध्ये व्हिटॅमिन-डी फारच कमी प्रमाणात मिळालं. आमचे खाणे-पिणे चांगले आहे, घरात हिरव्या भाज्या आणि फळे रोज येतात, प्रत्येकजण ते आनंदाने खातात, परंतु तरीही आमच्या शरीरात व्हिटॅमिन डी कमी आहे. कदाचित असे तर नाही की हा चाचणी अहवालच चुकीचा असावा? निरोगी राहण्यासाठी आपल्याला दररोज किती प्रमाणात व्हिटॅमिन डी आवश्यक असते? त्याची पूर्तता करण्यासाठी आपण कोण-कोणते साधे उपाय करू शकतो? शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो?

उत्तर : गेल्या एका दशकात देशाच्या विविध भागात व्हिटॅमिन डीची पातळी तपासण्यासाठी बरेचसे मोठे अभ्यास झाले आहेत. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की निरोगी दिसणाऱ्या सामान्य लोकांमध्ये केल्या गेलेल्या या विस्तृत अभ्यासात ५० ते ९४ टक्के लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची पातळी असमाधानकारक आढळून आली आहे. आपल्या कुटुंबातदेखील ही कमतरता मिळणे यासाठी अनैसर्गिक म्हटले जाऊ शकत नाही.

तपासणी केल्यावर भारतीय लोकांमध्ये व्हिटॅमिन डीच्या या कमतरतेमागील अनेक कारणे आढळली आहेत. बहुतेक भारतीय शाकाहारी आहेत आणि शाकाहारी आहार, ज्यामध्ये भाज्या, कडधान्य (डाळी), अन्न, फळे यांचा समावेश आहे, व्हिटॅमिन डीच्या बाबतीत हे अत्यंत कमकुवत आहे. अशा प्रकारे आपल्या शरीरातील व्हिटॅमिन डीचा सर्वात मोठा नैसर्गिक स्त्रोत म्हणजे शरीराच्या यंत्रणेद्वारे स्वत:च त्याचे उत्पादन करणे. जेव्हा सूर्याची अतिनील प्रकाश किरणे आपल्या त्वचेला वेधून त्यात असलेल्या ७ डायहायड्रोकोलेस्ट्रॉलवर आपला प्रभाव टाकतात तेव्हा त्याच रासायनिक प्रक्रियेद्वारे आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी ३ तयार होतो. हे खरं आहे की आपल्या देशावर सूर्य देवाची पूर्ण कृपा आहे, परंतु वाढत्या वायू प्रदूषणामुळे अल्ट्राव्हायोलेट प्रकाश किरणे आपल्या त्वचेपर्यंतचा प्रवास पूर्ण करू शकत नाहीत. दुसरे म्हणजे, आमचा गव्हाळी सावळा रंग, जो त्यामध्ये असलेल्या मेलेनिन रंगद्रव्यामुळे आहे, उरलेल्या अतिनील प्रकाश किरणांना आत प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करतो. तिसरे, आपल्या जीवनशैलीत आपल्याला उघडया उन्हात उठा-बसायलाही वेळ मिळत नाही.

शाकाहारी लोकांसाठी दूध, दही, तूप, लोणी, पनीर आणि खुंबी तर मांसाहारींसाठी अंडयातील पिवळे बलक, मासे आणि डुकराचे मांस हे व्हिटॅमिन डी ३ चे नैसर्गिक स्त्रोत आहेत. परंतु शरीराची व्हिटॅमिन डी ३ ची दैनंदिन गरज पूर्ण करण्यासाठी व्हिटॅमिन डी ३ चे पूरक आहार घेणे नेहमी आवश्यक असते.

शरीरातील व्हिटॅमिन डीची मुख्य उपयोगिता हाडांमध्ये कॅल्शियम साठा करून ठेवण्यात आहे. यामुळे हाडे मजबूत होतात. शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडांमध्ये साठलेला कॅल्शियम कमी होतो, ज्यामुळे मुलांमध्ये रिकेट्सची समस्या उद्भवते आणि प्रौढांमध्ये हाडे कमकुवत होतात.

प्रश्न : सामाजिक अंतर, मुखवटा घालणे आणि वेळोवेळी हात धुणे यासारख्या खबरदाऱ्या घेण्याव्यतिरिक्त कोविड १९पासून सुरक्षित राहण्यासाठी आपण काय-काय उपाय करू शकतो? अशा काही युक्त्या आहेत काय ज्याद्वारे आपण आपल्या शरीराची शक्ती वाढवू शकतो? काही होमिओपॅथी डॉक्टर म्हणतात की ऑर्सीनिक आणि कॅफर औषधे घेतल्यास आपण स्वत:मध्ये कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती विकसित करू शकतो. व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर असे काही व्हिडिओदेखील चालू आहेत की दिवसभर गरम पाणी, ग्रीन टी, आले, दालचिनी, वेलची आणि तुळसीचा चहा पीत राहिल्याने कोरोना विषाणू जवळ येत नाही. या सर्व गोष्टींमध्ये किती सत्य आहे?

उत्तर : लॉकडाऊन असूनही शक्य तितके शरीर आणि मन स्वस्थ व तंदुरुस्त ठेवण्याच्या सर्व सामान्य उपायांकडे लक्ष द्या. घराच्या छतावर, बाल्कनीमध्ये किंवा खोलीतच उठता-बसतांना साधे व्यायाम करा. रात्री ७-८ तासांची झोप घ्या. निरोगी संतुलित आहार घ्या..

अशी काही कामे करत राहा की मन प्रसन्न आणि आल्हाददायक राहील. घरामध्ये खेळले जाणारे खेळ, टीव्हीवरील विनोदी चित्रपट आणि मालिका, मुले व कुटुंबियांसह मनातील गोष्ट, घरातील वनस्पतींची काळजी घेणे यासारख्या छोटया-छोटया गोष्टींनी मन निरोगी ठेवू शकता. नेहमीच टीव्हीवर कोविड १९शी संबंधित नकारात्मक बातम्या पाहत राहणे अजिबात चांगले नाही.

घरात कोणी धूम्रपान करत असेल तर त्यावर बंदी घाला. जर तुम्हाला अल्कोहोलची आवड असेल तर ते घेऊ नका. हे ते सुपरिचित उपाय आहेत, ज्याद्वारे शरीराची अंतर्गत बायोकेमिस्ट्री निरोगी राहते आणि ज्याचा शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर अर्थात इम्युनिटीवरदेखील अनुकूल परिणाम होतो.

जिथपर्यंत होमिओपॅथ डॉक्टरांच्या दाव्यांची बाब आहे, तर आतापर्यंत त्यांचे कोणतेही वैज्ञानिक पुष्टीकरण झालेले नाही. म्हणून त्यांच्यापासून काही फायदा होत असेल हे सांगणे कठीण आहे. जिथपर्यंत दिवसभर गरम पाणी, ग्रीन टी, आले, दालचिनी, वेलची आणि तुळसीचा चहा पिण्याचे उपाय आहेत, त्यांच्या बाजूनेही कोणतेही ठोस पुरावे तर उपलब्ध नाहीत, परंतु जर कोणाची इच्छा असेल तर ते अवलंबण्यात काही नुकसानदेखील नाही.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें