* प्रतिनिधी
कोलेस्टेरॉल हे हृदयरोगाचे एकमेव कारण आहे असे आपण आयुष्यभर मानतो. खरं तर, ही एक सामान्य धारणा आहे की शरीरातील जास्त कोलेस्टेरॉल आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्या बंद होण्यास कारणीभूत आहे, ज्यामुळे बहुतेकदा छातीत दुखते आणि अत्यधिक झाल्यावर हृदयविकाराचा झटका येतो. तथापि, सत्य यापेक्षा बरेच क्लिष्ट आहे.
चला, कोलेस्टेरॉल म्हणजे नेमकं काय ते सगळयात आधी पाहू. हा यकृताद्वारे तयार केलेला चरबीयुक्त पदार्थ आहे, ज्याचा उपयोग शरीराची हजारो कार्ये करण्यात मदत करण्यासाठी केला जातो. सुमारे ७५ टक्के कोलेस्टेरॉल यकृताद्वारे तयार केले जाते, उर्वरित आपण खात असलेल्या अन्नातून मिळते. आपले शरीर पेशी पडदे तयार करण्यात मदतीसाठी हे वापरते. याशिवाय आपण पुरेसे हार्मोनल संतुलन राखण्यास सक्षम होणार नाहीत. कोलेस्टेरॉल ही एक व्यापक संज्ञा आहे, जी चांगले कोलेस्टेरॉल आणि वाईट कोलेस्टेरॉल दोन्ही दर्शवते. लोक सामान्यत: कोलेस्टेरॉल हा शब्द फक्त खराब कोलेस्टेरॉलसाठीच वापरतात, जे सहसा हृदयरोगासाठी जबाबदार एकमेव घटक मानले जाते. मात्र ते खरं नाही.
हृदयाशी संबंधित समस्यांची अनेक कारणे असतात. रक्तप्रवाहातील अडथळा, सूज आणि जळजळ, खराब जीवनशैली, तणाव ही काही कारणे आहेत, तर कोलेस्टेरॉलचे केवळ ३० टक्के हृदयाच्या समस्यांमध्ये योगदान असते. म्हणून फक्त कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, आदर्शपणे आपण संपूर्ण हृदयाच्या काळजीसाठी उपायांचा शोध घेऊ शकता आणि तेही लहानपणापासूनच.
आपण हृदयाच्या विचारातून निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून हृदयरोगापासून बचाव करू शकता. आपल्या हृदयाचे रक्षण करण्यात मदत करण्यासाठी येथे काही रणनीती दिल्या आहेत :
आहार चांगला असावा
निरोगी आहार घेतल्याने आपल्याला हृदयरोगाचा धोका कमी असतो. फळे, भाज्या आणि शाबूत धान्याने समृध्द आहार हृदयाचे रक्षण करण्यास मदत करू शकतो. आहारात जास्त प्रमाणात मीठ आणि साखर टाळा. संतृप्त चरबीचे मर्यादित सेवन महत्वाचे आहे. या दिशेने पहिले पाऊल म्हणजे स्वयंपाकासाठी असे तेल निवडणे, ज्यात योग्य प्रमाणात योग्य घटक असतात, जे हृदयाच्या आरोग्याची काळजी घेतात. तेल ओमेगा -३ मध्ये समृद्ध असावे आणि त्यात ओमेगा -६ व ओमेगा -३ मधील गुणोत्तरदेखील आदर्श असावे. त्यात व्हिटॅमिन ए, डी, ई आणि ऑरिझोनॉलसारखे पोषक घटकदेखील असावेत.
वजन मर्यादेत ठेवा
जास्त वजन असणे म्हणजे कंबरेभोवती अतिरिक्त चरबी साठवणे. यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. नियमित व्यायामाचा नित्यक्रमात समावेश केल्यास हृदयरोगाचा धोका कमी होतो. जेव्हा आपण योग्य प्रमाणात अन्न घेण्याबरोबरच आपल्या जीवनशैलीत शारीरिक क्रियाकलापदेखील जोडता, तेव्हा याचा परिणाम आणखी चांगला होतो.
ताण नियंत्रणात ठेवा
तणाव व्यवस्थापित करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधावेत जसे की रिलॅक्स करणारे व्यायाम किंवा ध्यान आपले आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते.
रात्री चांगली झोप घ्या
ज्यांना पुरेशी झोप मिळत नाही त्यांना लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका येणे, मधुमेह आणि नैराश्य येण्याचा धोका जास्त असतो. प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी प्रत्येक रात्री ७-८ तास झोप घेणे खूप महत्वाचे आहे.
द लॅन्सेट ग्लोबल हेल्थच्या अभ्यासानुसार, १९९० पासून भारतावरील एकूण आजारांच्या ओझ्यात हृदयरोगाचे योगदान जवळजवळ दुप्पट झाले आहे. ही आकडेवारी लक्षात घेता, हे स्पष्ट करणे फार महत्वाचे आहे की केवळ उच्च कोलेस्टेरॉल कमी करणे हृदयाच्या आरोग्याची हमी देऊ शकत नाही, कारण इतर अनेक घटकदेखील यात भूमिका बजावतात. आपल्या स्वत:च्या हृदयाची जबाबदारी घेण्याची आणि यासाठी संपूर्णपणे निरोगी जीवनशैलीचे पालन करण्याची वेळ आली आहे.