आल्प्स ब्युटी क्लिनिकच्या संस्थापक, संचालिका डॉ. भारती तनेजा द्वारे

कोरोनामधून बरे झाल्यानंतर केस गळतीने मी हैराण आहे. कृपया मला उपाय सांगा की मी माझ्या केसांची काळजी कशी घ्यावी?

या समस्येला ‘टेलोजन एफ्लुव्हियम’ या नावाने ओळखले जाते. याच कारणाने काही आजार किंवा मानसिक धक्का लागल्याने काही काळ केस गळणे सुरू होते. त्यामुळे शरीराच्या यंत्रणेला एक धक्का लागतो. त्यामुळे केसांची नवीन वाढ थांबते आणि काही वेळाने केस गळायला लागतात.

कोविड-१९ मधून बरे झाल्यानंतर त्यांचे केस काही आठवडे किंवा महिने गळत राहतात कारण ते त्या धक्क्यातून बाहेर पडू शकत नाहीत. जेव्हा रुग्ण हळूहळू बरे होऊ लागतात, तेव्हा त्यांच्या केसांची वाढ परत येते.

त्यामुळे तोपर्यंत शरीरासाठी आणि केसांसाठी अत्यंत आवश्यक असलेले प्रथिने अन्नामध्ये घ्या. केसांच्या वाढीस चालना देणारे लोह, व्हिटॅमिन डी आणि इतर पोषक तत्वांचे सेवन करण्याचे सुनिश्चित करा. केस गळणे टाळण्यासाठी ताजे कोरफड मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि जेलमध्ये १/४ ऑलिव्ह ऑइल मिसळा आणि दररोज टाळूला मालिश करा.

मालिश केल्यानंतर डोक्यावर शॉवर कॅप घाला आणि सुमारे एक तासानंतर शॅम्पूने धुवा. याच्या नियमित वापराने केसगळती कमी होते.

कोविड-१९ सारख्या महामारीमध्ये लॉकडाऊनच्या काळात सतत घरी राहिल्यामुळे माझ्या चेहऱ्यावरील चमक हरवत चालली आहे. ती परत आणता येईल का?

कोविड-१९ मध्ये शारीरिक हालचाली कमी झाल्याचा परिणाम त्वचा आणि केसांवर होतो. शारीरिक हालचालींमुळे शरीरात निर्माण होणाऱ्या ऊर्जेमुळे चयापचय चांगले राहते.

तुमची चयापचय क्रिया कमी होऊ नये म्हणून तुम्ही घरीच वर्कआउट करा. अन्नामध्ये प्रक्रिया केलेल्या अन्नाऐवजी नारळपाणी किंवा ताज्या रसाचा समावेश करावा. याशिवाय ताजी फळे आणि भाज्या खा.

त्वचेची चमक वाढवण्यासाठी काकडी, टोमॅटो आणि बटाटे धुवून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा आणि गोठवा. सकाळी जेव्हा तुम्ही तुमचे काम सुरू कराल तेव्हा चेहऱ्याला क्युबने मसाज करा आणि कोरडे होऊ द्या. थोडया वेळाने स्वच्छ धुवा.

तुमची त्वचा चमकत राहील. शरीरातील रक्ताभिसरण वाढवण्यासाठी आणि मृत त्वचा काढून टाकण्यासाठी १ चमचा बेसनामध्ये अर्धा चमचा ओटमील/रवा मिसळा.

जर तुमची त्वचा तेलकट असेल तर त्यात गुलाबपाणी टाका. जर तुमची त्वचा सामान्य असेल तर त्यात दही घाला. जर त्वचा कोरडी असेल तर मलाई/दुधाची साय घालून मालिश करा. याने तुमची त्वचा लगेच चमकदार होईल.

माझ्या पोटावर केस आहेत. त्यांच्यामुळे मला शॉर्ट टॉप किंवा ब्लाउज घालता येत नाही. मी त्यांना मुंडण करून उतरवू शकते का?

नाही, तुम्ही रेझर वापरून ते काढू शकत नाही कारण यामुळे जास्त केस परत येतील. जर तुमच्या पोटावर केस कमी असतील तर तुम्ही त्यांना ब्लीच करू शकता. ब्लीचमुळे केसांचा रंग हलका होईल. जोपर्यंत हे केस हलके दिसतील तोपर्यंत काळजी करण्याची गरज नाही.

ते काढण्यासाठी तुम्ही हेअर रिमूव्हल क्रीम वापरू शकता. फक्त लक्षात ठेवा की तुम्ही वापरत असलेली क्रीम तुमच्या त्वचेला सूट करणारी असावी. पोटावरील केस काढण्यासाठी तुम्ही पल्स लाइट लेझरदेखील वापरू शकता.

लॉकडाऊनमध्ये फेस मास्कमुळे मेकअप पूर्णपणे खराब होतो. मी मास्क लावून मेकअप करू शकत नाही का?

मास्कसह मेकअप टिकवण्यासाठी तुम्ही मॅट फिनिश आणि खूप वेळ टिकणारे फाउंडेशन आणि कन्सीलर वापरा. याने तुमचा मेकप पसरणार नाही.

हे दोन्ही तुमच्या त्वचेत चांगले मिसळून स्थिरावतात आणि कोरडी चमक आणतात. बेस मेकअप करण्यापूर्वी तुम्हाला कमी वजनाचा, हायड्रेटिंग प्राइमर वापरावा लागेल. यामुळे तुमची त्वचा स्वच्छ आणि गुळगुळीतदेखील दिसेल.

मेकअप केल्यानंतर तुम्हाला मेकअप स्पंज किंवा मोठया फ्लॅकी ब्रशच्या मदतीने तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर थोडी सैल पावडर लावावी लागेल. अतिशय हलकी पावडर लावल्याने तुमची त्वचा चांगली दिसेल आणि तुमचा मेकअपही दिवसभर टिकून राहील. यानंतर तुम्ही पावडरवर सेटिंग स्प्रे करा. कोरडे होऊ द्या. त्यानंतरच मास्क लावा जेणेकरून तुमचा मेकअप योग्य राहील.

लिपस्टिक पसरण्याची शक्यता कमी करण्यासाठी हायड्रेटिंग घटक असलेले मॅट फॉर्म्युला किंवा लिक्विड लिपस्टिक वापरा, जे तुमचे ओठ कोरडे होण्यापासून प्रतिबंधित करते.

पर्याय म्हणून तुम्ही कायमस्वरूपी लिपस्टिकही लावू शकता. तुमच्या चेहऱ्यावर फक्त तुमचे डोळे असतात जे मास्क घातल्यानंतरही दिसतात. यासाठी तुम्ही काहीही करून पाहू शकता.

तुम्ही सॉफ्ट स्मोकी आईजपासून रंगीत आयशॅडो, ग्राफिक आयलाइनरपर्यंत काहीही ट्राय करू शकता. भुवया भरण्यास आणि पापण्यांना मस्करा लावण्यास विसरू नका.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...