* ऋतु वर्मा

श्वेता आजकाल प्रत्येक छोटी-मोठी गोष्ट मनाला लावून घेते. कोरोनाच्या काळात दिवसभर घरात कोंडून घेतल्याने तिचे मन निराश राहत असे. आता कोरोनाचा काळ संपत आला आहे, पण श्वेताच्या मनात अशा निराशेने घर केले आहे की आता प्रत्येक गोष्टीवर पती आणि मुलांना झिडकारणे श्वेताच्या आयुष्यातील सामान्य बाब झाली आहे. परिणामी पती आणि मुले श्वेतापासून दूर राहू लागले आहेत.

मनीषाची गोष्ट वेगळी आहे. नवनवीन पदार्थ, ब्युटी ट्रीटमेंट आणि घराचा प्रत्येक कोपरा चकाचक करणं हा सर्व मनीषाच्या दिनचर्येचा भाग होता. मात्र लग्नाला ४ वर्षे उलटूनही मूल न झाल्याने ती खूप निराश झाली. शेजारी-पाजारी आणि नातेवाईकांनी वारंवार विचारपूस केल्याने मनीषा चिडचिडी झाली होती.

आता ती तिच्या पती आणि सासू-सासऱ्यांच्या प्रत्येक छोट्या-छोटया गोष्टीवर प्रतिक्रिया देते. तिच्या आयुष्याची चमक हरवल्यासारखं तिला वाटत होतं. आता ती फक्त आयुष्य ढकलत आहे.

गौरवच्या कंपनीत कपात सुरू झाली आहे. गेल्या ३ महिन्यांपासून तो एका अज्ञात भीतीमध्ये जगत आहे. घरखर्चावर तो सतत टोकाटाकी करत राहतो. त्याची पत्नी पूनमला आता गौरवला कसे सामोरे जावे हे समजत नाही. दोघांमध्ये गुदमरल्यासारखी स्थिती आहे जी कधीही बॉम्बप्रमाणे फुटू शकते.

नीतीची समस्या काहीशी वेगळी आहे. मुलीला जन्म दिल्यानंतर गेल्या ५ महिन्यांपासून नीतीने पार्लरचे तोंडही पाहिले नाही. तिचे रखरखीत कोरडे झाडूपासारखे केस, वाढलेल्या डोळयांच्या भुवया आणि वरचे ओठ हे सर्व तिला त्रासदायक वाटत आहे.

नीतीच्या म्हणण्यानुसार, ‘‘मी स्वत: माझा चेहरा आरशात पाहण्यास घाबरते, माझ्या मनात एका विचित्र न्यूनगंडाच्या भावनेने घर केले आहे.’’

नीतीला आपली मुलगी शत्रू असल्यासारखे वाटू लागले होते.

आजच्या काळात ही चिडचिड, एकटेपणा, नैराश्य दिवसेंदिवस वाढतच आहे. आयुष्यात कधी कोणता अपघात होईल हे कोणालाही ठाऊक नसते. पण जीवनातील आनंदावर चिडचिडेपणाचा ब्रेक लावू नका. काही छोटे-छोटे बदल करून तुम्ही स्वत:ला स्थिर आणि शांत करू शकता.

सवयी स्वीकारा : चिडचिडेपणाचे मुख्य कारण असते की समोरची व्यक्ती माझ्या म्हणण्याप्रमाणे का वागत नाही? कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ते जसे आहेत तसे स्वीकारा. स्वत:ला बदलू नका, त्यांना ही बदलायला सांगू नका.

स्वत:साठी वेळ द्या : जोपर्यंत तुम्ही स्वत: आनंदी नसाल, तोपर्यंत तुम्ही इतरांना आनंदी कसे ठेवणार?

तुम्हाला ऊर्जा आणि आनंद देणारे असे कोणतेही काम करा. तुम्ही आतून जितके स्वत:ला उत्साही जाणवाल, तितकेच तुमचे इतरांशी असलेले संबंध चांगले होतील.

योजना बनवा : आर्थिक मंदी हे बहुतांश कुटुंबांमध्ये चिडचिडेपणा वाढण्याचे एक प्रमुख कारण असते. आर्थिक मंदीचा हा एक तात्पुरता टप्पा असतो जो निघून जातो. हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही तुमच्या पतीला किंवा कुटुंबातील सदस्यांना मानसिक आणि आध्यात्मिक आधार देऊ शकता.

प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीलाच नियोजन करा आणि तुम्ही अनावश्यक ऑनलाइन शॉपिंग, कपडे, सौंदर्यप्रसाधने इत्यादीसारख्या अनावश्यक खर्चात सहज कपात करू शकता. हे नियोजन करताना तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला यात सामील करा.

सकारात्मक विचार ठेवा : परिस्थिती कोणतीही असो, नकारात्मक विचार ठेवल्यास चिडचिड आणखी जास्त वाढेल. जर तुम्ही सकारात्मक विचाराने परिस्थितीला सामोरे गेलात तर तुम्ही वाईटाहून वाईट परिस्थितीलाही चांगल्या पद्धतीने तोंड देऊ शकाल. सकारात्मक विचार हा तुमच्या आरोग्यासाठीही रामबाण उपाय आहे.

दिनचर्या व्यवस्थित करा : आजकाल लोक कधीही झोपतात आणि उठतात हे सामान्य झाले आहे. पूर्वी शाळेत जाणाऱ्या मुलांमुळे झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा बऱ्यापैकी व्यवस्थित होत्या. आता वेळापत्रक विस्कळीत झाले आहे,

अव्यवस्थित दिनचर्या तणाव वाढवण्यास मदत करते हे लक्षात ठेवा. घरी राहण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही कधीही उठावे किंवा झोपावे. असे केल्याने तुम्ही नकळत अनेक आजारांना ही आमंत्रण देत आहात.

तुलना करणे निरर्थक आहे : तुम्ही कुठेही असाल आणि जशा काही असाल, याक्षणी अगदी परिपूर्ण आहात, जीवनातील चढ-उतारांमध्ये तुम्हाला तुमच्यापेक्षा चांगले आणि खालच्या थराचे लोकही आढळतील.

तुमच्यापेक्षा चांगले काम करणारे तुमच्यापेक्षा कमी पातळीचे लोक असू शकतात पण तुलना करून चिडून जाऊ नका.

‘हा वेळ प्रियजनांच्या मदतीने घालवला जाईल, संयमाने येणारा उद्याचा दिवस चांगला होईल.’

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...