* पारुल भटनागर

कोरोना काळात आपण विशेषत: तरुणाईने त्वचेच्या काळजीकडे दुर्लक्ष केले. त्यांना वाटले की, आता आपण घरीच आहोत, कुठेही जात नाही, कोणाला भेटत नाही, तर मग त्वचेची काळजी घेतली नाही तरी काय फरक पडणार? पण त्यांची हीच विचारसरणी त्यांची त्वचा खराब करण्याचे काम करते, हे त्यांना माहीत नसते.

फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिल्टरची मदत घेऊन स्वत:ला सुंदर दाखवून इतरांकडून ते स्वत:चे कौतुक करून घेतात, पण वास्तव यापेक्षा खूपच वेगळे असते. म्हणूनच जर तुम्हाला कायम नैसर्गिकरित्या तरुण आणि सुंदर त्वचा मिळवायची असेल, तर आधीच सावध व्हा, अन्यथा तारुण्यातच तुमची त्वचा वयाच्या ६० वर्षांसारखी दिसू लागेल. चला तर मग, स्वत:ला तरुण कसे ठेवायचे ते जाणून घेऊया :

सुरकुत्यांची समस्या कधी निर्माण होते?

वयाच्या २० व्या वर्षी, त्वचा तारुण्यात असते. त्वचेवर समस्या कमी आणि चेहऱ्यावर चमक, तेज तसेच आकर्षकपणा जास्त असतो. मात्र या वयात त्वचेकडे दुर्लक्ष झाल्यास बारीक रेषांसोबतच चेहऱ्यावर सुरकुत्याही दिसू लागतात.

जेव्हा आपल्या त्वचेच्या वरच्या थराला आधार देणाऱ्या कोलेजन आणि इलास्टिन नावाच्या प्रथिनांचा थर कमी होऊ लागतो तेव्हा त्वचेवर सुरकुत्या पडतात. यामुळे त्वचा आर्द्र्रता आणि सौंदर्य गमावते. म्हणूनच सुरकुत्यांपासून दूर राहण्यासाठी त्वचेच्या काळजीसोबतच पौष्टिक खाण्याची सवय स्वत:ला लावून घ्या.

तणावाला ठेवा स्वत:पासून दूर

सध्या घर असो किंवा नोकरी, सर्वत्र तणावाचे वातावरण आहे. काहींना या महामारीत आपल्या माणसांना गमावल्याचे दु:ख आहे. कोणाला भविष्याची चिंता आहे तर कोणाला नोकरी जाण्याची भीती आहे. खासकरून तरुणवर्ग जास्त काळजीत आहे आणि हीच काळजी त्यांचे आरोग्य बिघडवत आहे.

आपल्या शरीरात कार्टीसोल नावाचे स्ट्रेस हार्मोन असते. आपण सतत चिंतेत राहिल्यास त्याचे संतुलन बिघडते. त्यामुळे चेहऱ्यावर पुळया, सुरकुत्या येतात. मेटाबॉलिज्म असंतुलित होऊ लागते. त्यामुळे वेळेवर उपचार करणे अत्यंत गरजेचे असते. म्हणूनच शक्य तेवढा सकारात्मक विचार करून तणावापासून दूर राहा, अन्यथा हा तणाव तुमच्या चेहऱ्यावरील चमक नाहीशी करेल.

घरगुती उपायही प्रभावी

वेळेआधीच म्हातारे दिसावे, असे कोणालाच वाटत नाही. त्यामुळेच घरगुती उपचार केल्यास हे उपाय थोडयाच दिवसांत सुरकुत्या दूर करून त्वचेवरील हरवलेले तारुण्य तुम्हाला पुन्हा मिळवून देतील.

* दररोज अॅलोवेरा जेलने त्वचेची मालिश केल्यास चेहरा चमकू लागेल. त्वचेवर कोलेजन वाढल्यामुळे त्वचा हायड्रेड राहील. सोबतच सुरकुत्याही कमी होतील.

* केळे आरोग्यासाठी चांगले असते, सोबतच ते त्वचेचे रुपडे पालटते. यामागचे कारण म्हणजे त्यात अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असते, शिवाय ते नैसर्गिकरित्या डिटॉक्स करून चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करते. त्यासाठी तुम्ही केळयाची पेस्ट बनवून ती चेहऱ्यावर लावा. त्यानंतर अर्ध्या तासाने चेहरा पाण्याने धुवा. काही आठवडयांतच तुम्हाला फरक दिसेल.

* खोबरेल तेलात मॉइश्चराइज आणि हायड्रेड करणारी तत्त्वे असल्यामुळे ते त्वचेची लवचिकता वाढवून त्वचा मुलायम बनवते. त्यासाठी तुम्ही दररोज रात्री खोबरेल तेलाने मालिश करून सकाळी चेहरा धुवा. यामुळे हळूहळू सुरकुत्या कमी होऊन चेहरा उजळेल.

* ऑर्गन ऑइल सौम्य असल्यामुळे त्वचेमध्ये सहज शोषले जाते. सोबतच यात फॅटी अॅसिड आणि ई जीवनसत्त्व असल्यामुळे ते सुरकुत्या दूर ठेवते. त्यासाठी तुम्ही रात्री चेहऱ्यावर ऑर्गन ऑइल लावून मालिश करा. महिन्याभरात तुम्हाला फरक जाणवू लागेल.

काही खास सवयी ज्या सुरकुत्यांपासून ठेवतील दूर

तुम्ही बाहेर जात नसला तरी दररोज सीटीएम म्हणजे क्लिंजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायजिंग करायलाच हवे. यामुळे त्वचेवर जमा झालेली अस्वछता दूर होऊन त्वचेवरील पीएचची नैसर्गिक पातळी टिकून राहते. ती त्वचेला तरुण ठेवण्याचे काम करते.

अनेकदा असा विचार केला जातो की, घराबाहेर जायचे नसल्यामुळे सनस्क्रीन लावण्याची गरज नाही. प्रत्यक्षात असा विचार करणे चुकीचे आहे, कारण आपण स्मार्ट डिव्हाइसमधून येणारा निळा प्रकाश, अल्ट्राव्हायोलेट किरण यांच्या संपर्कात येतोच. त्यामुळे कोलेजन, इलास्टिक टिश्यूवर आघात होतो आणि वयापूर्वीच त्वचेवर सुरकुत्या पडतात. त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. म्हणूनच सनस्क्रीन अवश्य लावा.

* त्वचेची जळजळ करणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर टाळा, कारण यामुळे त्वचेवरील नैसर्गिक मॉइश्चर आणि चमक गायब होते. सुरकुत्यांची समस्या निर्माण होते.

* मेकअप व्यवस्थित काढल्यानंतरच झोपा, अन्यथा मेकअपमध्ये वापरली जाणारी नैसर्गिक द्रव्ये वय होण्याआधीच सुरकुत्या येण्यासाठी कारणीभूत ठरतात.

* तळलेल्या पदार्थांऐवजी पौष्टिक आहार घ्या. यामुळे तुमची त्वचा अंतर्बाह्य उजळेल.

* शक्य तेवढे साखरेचे प्रमाण कमी करा, कारण रक्तातील साखर वाढल्यामुळे  सुरकुत्या येण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...