* पुनम अहमद

रमा उत्तर प्रदेशातून मुंबईत नवीनच आली होती. ती एका ब्युटी पार्लरमध्ये गेली, तेव्हा तिथे एक दुसरी स्त्रीदेखील स्वत:च्या नंबरची वाट पाहताना भेटली. रमाचं स्पष्ट हिंदी ऐकून त्या स्त्रीने बोलायला सुरुवात केली, ‘‘आप भी नॉर्थ इंडियन है? ’’

रमा म्हणाली, ‘‘जी, आप भी?’’

‘‘हा, मेरा नाम अंजू है, मै  दिल्ली से हूं. आप कहा से हैं?’’

‘‘मेरठ.’’

दोघींनमध्ये गप्पा सुरु झाल्या. अंजूने खूप गप्पा मारायला सुरुवात केली, तिने सांगितलं की ती घरातच पंजाबी सूट विकण्याचं काम करते. तिला काही ना काही काम करायला आवडतं. ती जास्त शिकलेली नाहीये. नोकरी तर मिळू शकत नाही, त्यामुळे हे काम ती एन्जॉय करते आणि तिचं काम खूप छान चाललं आहे.

अंजूने तिथेच बसल्या बसल्या रमाकडून तिचा फोन नंबर आणि घरचा पत्ता घेतला जो रमाने आनंदाने तिला दिला. तिलादेखील आनंद झाला होता की इकडे येताच आपल्या भागातील हिंदी बोलणारी एक मैत्रीण बनली. दुसऱ्या दिवशी अंजूला आपल्या घरी आलेलं पाहून रमाला खूप आनंद झाला.

रमाने आपल्या कुटुंबियांशीदेखील अंजूशी ओळख करून दिली. दोघींनी एकत्रित बसून जेवता जेवता खूप गप्पा मारल्या. एवढया कमी वेळात दोघी एकमेकींशी खूप छान मिक्सअप झाल्या होत्या.

काही दिवसांनंतर अंजूने रमाच्या कुटुंबीयांनादेखील घरी बोलवलं. सर्वजण एकमेकांना भेटून खूप आनंदी झाले. काही महिने असेच एकमेकांना भेटण्यात गेले.

स्वार्थी मैत्री

रमाने आपल्या सोसायटीत एक किटी ग्रुप जॉईन केला होता. अंजूला समजलं तेव्हा ती बोलू लागली, ‘‘जेव्हा  तुझ्या किटी पार्टीचा नंबर येईल तेव्हा काही सूट  विकण्यासाठी घेऊन येईन, कदाचित कोणी तरी काही विकत घेईल.’’

रमा म्हणाली, ‘‘ठिक आहे,’’ जेव्हा रमाच्या घरी पार्टीत सोसायटीच्या १० आणखी स्त्रिया आल्या, तेव्हा अंजू तिची मोठी बॅग घेऊन ड्रेसेस दाखवू लागली. काही स्त्रियांना हे काही आवडलं नाही. एक तर सरळसरळ म्हणाली, ‘‘पार्टीला बिजनेसपासून दूरच ठेवायला हवं. आपण एक गेम खेळूया.’’

कोणी काही विकत घेतले नाही. प्रत्येकाची आवडनिवड वेगवेगळी होती. कोणीतरी हेदेखील म्हणालं की, ‘‘या दहा कपडयामधून काय घ्यायचं… दुकानात खूप चॉईस असते तिथेच विकत घेऊ.’’

भरवसा उठतो

रमाला गरजेच्या वेळेस काही विकत घेण्याची सवय होती. आता तिच्याजवळ खूपच कपडे होते. फॅशन येत जात असते. तिला खूप कपडे घेण्याची एवढी आवड नव्हती. तरीदेखील तिने अंजूच्या आनंदासाठी काही कपडे विकत घेतले होते.

यानंतर अंजू कधीही आपल्या कपडयांची मोठी बॅग घेवून दर दुसऱ्यादिवशी तिच्याकडे केव्हाही यायची. कधी रमा आपल्या मुलांना शिकवत असायची तर कधी आराम करत असायची आणि अंजू प्रत्येक वेळी तिच्याकडून अपेक्षा करायची की रमाने काहीतरी विकत घ्यावं, परंतु असं किती विकत घेतलं जाऊ शकत होतं.

एके दिवशी अंजू म्हणाली, ‘‘एक काम कर, मला हे तुझं ड्रॉइंगरूम दिवसभरासाठी दे. मी इथे माझं सामान सजवते आणि तुझी सोसायटी मोठी आहे. तुझं ड्रॉईंगरूमदेखील खूप मोठं आहे. लोकांना सांगून माझ्या कामाचा इथेच प्रचार करते.

रमाने विनम्र स्वरात समजावलं, ‘‘हे खूपच कठीण आहे, अंजू. मुलांना मीच शिकवते. लोक दिवसभर कपडे पाहण्यासाठी येत जात राहतील. खूप डिस्टर्ब होईल आणि अनेकदा पाहुणे येत असतात तेव्हा मग खूपच त्रास होईल.’’

अंजूला रमाच्या बोलण्याचा खूप राग आला की ती मोठया आवाजात म्हणाली, ‘‘तू तर माझ्या काहीच कामाची नाही. मला वाटलं माझं काम वाढवून देशील. मी नवीन लोकांना भेटेली तर काही काम वाढेल. पण तू तर माझ्या काहीच कामाची नाहीस.’’

हे ऐकून रमाला मोठा धक्का बसला. म्हणाली, ‘‘तू  माझ्यासोबत मैत्री फक्त कामाचा विचार करून करत होतीस?’’

‘‘ह? म्हणजे काय, मला तर नवनवीन कॉन्टॅक्ट बनवायचे असतात. मला माझं कपडे विकण्याचे काम खूप पुढे वाढवायचं आहे. ठीक आहे, तू तुझं कुटुंब सांभाळ,’’ म्हणत अंजू निघून गेली. त्याच वेळी दोघींची मैत्री संपून गेली.

सीमा काय असाव्यात

ही तर एक साधी घरगुती स्त्रीची गोष्ट होती, ज्याबद्दल अनेकदा विचार केला जातो की साधारण स्त्रिया तर हे सर्व करतातच. असं नाही की तथाकथित बुद्धिमान स्त्रिया खूप उदार आणि या सर्व गोष्टींपासून वेगळया असतात. असं अजिबात नाहीये. साधारण स्त्रीयांबद्दल तर आपण ऐकतच असतो. परंतु आज काही उदाहरणं अजून पहा. ज्यांना मैत्रीच्या सीमारेषा पार करण्यात जरादेखील वाईट वाटलं नाही.

एक लेखिका आहे अंजली, जी पुण्यात राहते. सर्वांना नेहमीच मदत करण्यास तयार असते. अनेक जागी त्यांच्या कविता प्रकाशित होत असलेल्या पाहून भूमी नावाच्या लेखिकेने अंजलीशी मैत्री केली. फेसबुकवर त्यांची मैत्री झाली. भूमी अंजलीला नेहमीच फोन करायची आणि तिला तिच्या कविता पाठविण्यासाठी कॉन्टॅक्टस विचारायची. सर्व ईमेल आयडी जाणून घ्यायची. लेखनाच्या क्षेत्रात जेवढी माहिती मिळवायची होती तेवढी तिने तिच्याकडून माहिती घेतली. जेव्हा तिला वाटलं की जेवढं हवं होतं ते मिळालं. त्यानंतर तिने अंजलीशी बोलणं बंद केलं. तिला फेसबुकवरून अनफ्रेंड केलं आणि जेव्हा कोणी अंजलीबद्दल बोलायचं तेव्हा ती सांगायची कोण अंजली आणि जरी मी तर कोणत्याच अंजलीला ओळखत नाही. म्हणजे स्वार्थ पूर्ण होताच अंजलीला तिने सर्व जागेवरून ब्लॉक केलं.

मैत्रीचा मुखवटा

स्वार्थी आणि चलाख लोक मैत्रीचा मुखवटा घातलेले आपले असे शत्रू आहेत, जे वाळवीप्रमाणे आपल्याला आतल्या आतच खात राहतात आणि आपल्याला याची कल्पनादेखील येत नाही. अशा लोकांपासून अंतर ठेवणं योग्य आहे, जे मैत्रीच्या नावाखाली स्वार्थ साधतात. खऱ्या मैत्रीत कुठेही स्वार्थ आणि धूर्तपणाला जागा नसते.

खऱ्या मित्राची ओळख करणं खूपच गरजेचे आहे. आणि खऱ्या मित्राची ओळख करून त्याच्यासोबत मैत्रीचं नातं ठेवणं एक प्रकारची अनोखी कला आहे. असं नाही की वय आणि शिक्षण स्वार्थी माणूस होणं वा न होणं यावर आपला प्रभाव सोडते. शेजारी एक काकू आहेत, खूप  भरलेलं घरदार आहे. परंतु शेजारच्या इतर वयाच्या मुलींना बाळ बाळ बोलून काम करून घेण्यात जणू काही त्यांनी कोणती पदवीच मिळविली आहे.

कोणाला भाजी आणायला जाताना पाहून त्या त्वरित हाक मारून पिशवी देतात आणि बोलतात, बाळ जरा माझ्यासाठी भाजी घेऊन ये. कोणाला कुठे येता जाताना पाहिलं तर सांगणार जरा मलादेखील घेऊन जा. त्यांच्या घरी सर्व जण आहेत. परंतु नंतर त्या ऐटीत हेदेखील सांगतात की मला कोणाकडूनही माझे काम करून घ्यायला चांगलंच येतं. मी कोणाला काही सांगितलं तर माझं वय पाहून कोणीही नकार देत नाही. मग मी माझ्या म्हातारपणाचा फायदा चांगलाच घेते.

आता मूर्ख तेच बनतात जे त्यांच्या वयाचा आदर करतात. एखादी स्त्री बाळाला उचलून भाजी घ्यायला जाते तेव्हा ती त्यांची पिशवीदेखील उचलते. ते शेजारच्या तरुण स्त्रिया ज्यांना या आपली मैत्रीण म्हणतात त्या त्यांचं वय पाहून काहीच उत्तर देत नाहीत, तेव्हा त्या आरामात सांगत सुटतात की या सर्वांमुळे तर माझी कामं आरामात होतात.

प्रिय नातं

मैत्री खूपच जवळचं नातं आहे. त्यावर स्वार्थ आणि लबाडीचा मुलामा चढवू नका. चांगली मैत्री करा. हे नातं प्रेमाने आणि खरेपणाने करा. खरी मैत्री करून, चांगले चांगले मित्र मिळवून मनाला खूप आनंद मिळतो. आपल्या मित्रांच्या भावनांना कधीही दुखावू नका. या नात्यात नफातोटा यांचा विचार करू नका.

मैत्रीसाठी हृदयात प्रेम आणि आदर ठेवा

मैत्रीचं नातं विश्वासाच्या आधारावर टिकलेलं असतं. एक खरा मित्र कधीदेखील आपल्या मित्राशी खोटं बोलणार नाही आणि नाही त्याच्यासोबत कोणत्याही प्रकारचं कपट करेल आणि हिच खऱ्या मैत्रीची निशाणी आहे. खरा मित्र कोणत्याही बहुमुल्य रत्नांपेक्षा कमी नसतो. स्वार्थी भावनेने मैत्री करू नका. स्वार्थी मित्र संकटाच्या वेळी साथ सोडतात म्हणून अशा लोकांपासून कायमच अंतर ठेवा. खऱ्या मैत्रीत कुठेही लबाडी आणि स्वार्थ भावना नसते. अशा द्वेष ठेवणाऱ्यांपासून दूर राहा. असे मित्र व मित्र जे समोर गोड गोड बोलतात परंतु मागे बदनामी करतात त्यांच्याशी मैत्री करू नका. अशी लोक कधीही तुमचं मन दुखवू शकतात.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...