* अनुराधा गुप्ता
आपल्या वयापेक्षा कमी वयाचं दिसायला कोणाला नाही आवडत? महिलांबाबत बोलायचं झालं तर त्या आपलं वय लपवण्यासाठी काहीही ट्राय करायला मागेपुढे पाहात नाहीत.
म्हणूनच कॉस्मेटीक इंडस्ट्रीने वाढत्या वयावर नियंत्रण ठेवणारी बरीच उत्पादनं बाजारात आणली आहेत. यामुळे चेहऱ्यावरच्या वयाच्या खुणा लपवण्यासाठी महिलांना मदत होते. पण ही उत्पादनं वापरण्यापूर्वी त्याविषयी संपूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे, नाहीतर या उत्पादनांचा चेहऱ्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
कॉस्मेटोलॉजिस्ट अवलीन खोखर म्हणतात, ‘‘सौंदर्य प्रसाधनं सौंदर्य वाढवण्यासाठी असतात. यांच्या वापराने चेहऱ्यावरची कमतरता भरून काढली जाऊ शकते. पण ती कमतरता आणि त्यासाठी असलेलं योग्य उत्पादन यांचं योग्य ज्ञान असणं आवश्यक आहे, नाहीतर वय कमी दिसण्यापेक्षा जास्त दिसू लागेल.’’
त्वचेला मेकअपसाठी करा तयार
अवलीनच्या म्हणण्यानुसार त्वचेवर कोणतंही सौंदर्य प्रसाधन लावण्यापूर्वी त्याचा प्रकार जाणून घ्या. कारण त्वचेला अनुरूप निवड केल्यास योग्य लुक मिळतो. बाजारात ड्राय, ऑयली आणि कॉम्बिनेशन स्किनसाठी वेगवेगळी उत्पादनं उपलब्ध आहेत. योग्य निवडीसह त्वचेला मेकअपसाठी तयार करणंही महत्त्वाचं आहे. त्वचा स्वच्छ केली नाही तर धुलीकण त्वचेच्या छिद्रांमध्ये अडकून राहतात आणि मेकअपच्या थरामुळे छिद्र बंद होतात. यामुळे संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे मेकअपच्या आधी त्वचेचं क्लिनिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायजिंग नक्की करा. यामुळे मेकअपमध्ये स्मूदनेस येतो.
कंसीलरचा वापर टाळा
कंसीलरचा उपयोग काळे डाग लपवण्यासाठी केला जातो. चेहऱ्यावर काळे डाग असणाऱ्या भागातच कंसीलर लावलं जातं. पण काही महिला हे पूर्ण चेहऱ्यावर लावतात. यामुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या ठळक होतात. अवलीनच्या म्हणण्यानुसार कंसीलर जाडसर असतं आणि थोडं लावल्यानंतरही परिणाम दिसू लागतो. जास्त लावल्यामुळे चेहऱ्यावर ओरखडे दिसतात. काही महिला काळी वर्तुळं लपवण्यासाठी कंसीलरचा वापर करता. पण हे चुकीचं आहे. डोळ्यांखाली कंसीलर फक्त इनर कॉर्नरवरच लावावं. अधिक प्रमाणात कंसीलर लावल्यास डोळे चमकदार दिसतात जेणेकरून कळून येतं की डोळ्यांवर कंसीलर लावलं आहे.
जास्त फाउंडेशन लावू नका
फाउंडेशनची निवड आपल्या स्किन टाइपप्रमाणे करा. उदाहरणार्थ : नॉर्मल त्वचा असणाऱ्या महिला मिनरल बेस्ड किंवा मॉइश्चराइजरयुक्त फाउंडेशन वापरू शकतात. तर कोरड्या त्वचेसाठी हायडे्रटिंग फाउंडेशन योग्य ठरेल. सेम स्किन टोनचं फाउंडेशनच घ्या. नाहीतर त्वचा ग्रे दिसू लागेल. ऑयली त्वचेसाठी पावडर डबल फाउंडेशन वापरा. हे त्वचेला मेटीफाय करतं.
फाउंडेशनच्या योग्य निवडीसह त्याचा योग्य वापरही आवश्यक आहे. काही महिला संपूर्ण चेहऱ्यावर फाउंडेशन लावतात. हे चुकीचं आहे. फाउंडेशन चेहऱ्यावर लावण्याची योग्य पद्धत म्हणजे थोडंसं फाउंडेशन बोटावर घेऊन डॅब करत योग्यप्रकारे चेहऱ्यावर लावावं. यामुळे वयानुसार त्वचेमध्ये झालेलं डिस्कलरेशन निघून जातं.
कॉम्पॅक्टने द्या फिनिशिंग
बऱ्याच महिला फाऊंडेशननंतर कॉम्पॅक्ट पावडर लावत नाहीत. अवलीन याला मेकअप ब्लंडर म्हणतात. त्यांचं म्हणणं आहे की कॉम्पॅक्ट पावडर मेकअपला फिनिशिंग देतं. पण याचाही अतिवापर करू नये. त्यामुळे ओरखडे उठतात.
याची निवडही काळजीपूर्वक करावी. मुख्य म्हणजे स्किनकलर टोनप्रमाणेच शेड निवडा. आपल्या स्किन टाइपचाही विचार करा. उदारणार्थ, ऑयली त्वचेसाठी ऑइल कंट्रोल मॅट फिनिशिंग कॉम्पॅक्ट पावडर तर कोरड्या त्वचेसाठी क्रिमी कॉम्पॅक्ट घ्या. यामुळे त्वचा निरोगी दिसते. सेन्सिटिव्ह स्किनसाठी इमोलिएंट ऑइल आणि वॅक्सयुक्त कॉम्पॅक्ट सर्वात चांगला पर्याय आहे.
आय मेकअप काळजीपूर्वक करा
तरूण दिसण्यासाठी आय मेकअप योग्यप्रकारे करणं आवश्यक आहे. बऱ्याच महिलांचा गैरसमज असतो की डोळ्यांना गडद मेकअप केल्याने तरूण दिसता येतं. पण अवलीनचं म्हणणं आहे की एशियन स्कीन आणि रस्ट कलरमुळे वय कमी दिसतं. आयशेड्समध्ये हेच रंग वापरावेत. क्रिमी ऑयशेड्समुळे निवडू नका. यामुळे डोळ्यांच्या चुण्या लपल्या जात नाहीत. आयशेड्सह आयलायनरही ब्राउन निवडा.
काजळ आणि मस्काराशिवाय डोळ्यांचा मेकअप अपूर्ण असतो. काजळामुळे डोळे उठून दिसतात. सध्या स्मजप्रूफ काजळ फॅशनमध्ये आहे. त्यामुळे आपल्यासाठी हेच काजळ निवडा. मस्कारा निवडतानाही काळजी घ्या. वाढत्या वयानुसार पापण्यांचे केस गळू लागतात. चुकीचा मस्कारा लावल्याने गळती वाढू शकते. पण हायडे्रटिंग मस्कारामुळे पापण्यांचे केस मजबूत होतात. मस्काराची योग्य निवड आणि योग्य वापर केल्यानेच तरूण दिसता येते. म्हणून मस्कारा नेहमी अपर आणि लोअर लॅशेजवर लावा. यामुळे डोळ्यांना छान लुक मिळतो.
लिपस्टिकच्या ब्राइट शेड निवडा
शास्त्रीयदृष्ट्या ब्राइट शेडमुळे कोणतीही गोष्ट छोटी दिसते. पण ओठांच्या बाबतीत उलट परिणाम दिसतो. डार्क शेड्समुळे ओठ मोठे दिसतात. आपल्या वयापेक्षा तरूण दिसायचं असेल तर न्यूड आणि ग्लॉसी लिपस्टिक निवडा. लिपलायनवर लिपस्टिकच्या शेडशी मॅच होईल याची काळजी घ्या. फाटलेल्या ओठांवर लिपस्टिक लावू नका. ओठ फाटले असतील तर पेट्रोलिअम जेली लावून स्मूद करा.
अशाप्रकारे मेकअपचे बारकावे माहीत असतील तर तुम्ही वाढत्या वयातही तरूण दिसू शकता.