* दीपा पांडेय

आपल्याकडे मुलींना सातत्याने सांगितले जाते की तुझे काय ते नखरे सासरी जाऊन पूर्ण कर, आम्ही म्हणून हे सगळं सहन करतोय. जेव्हा तू सासरी जाशील, तेव्हा समजेल. सासूची सर्व उठाठेव करावी लागेल ना, तेव्हा तुझे डोकं ठिकाणावर येईल. यामुळे मुलींच्या मनात सासरबद्दल नकारात्मक प्रतिमा तयार होते. मग माहेरून सासरी पाठवणी झाल्यावर ती विविध प्रश्न घेऊन सासरी पाऊल ठेवते.

पण जेव्हा आधुनिक विचारसरणीची सासू खुल्या मनाने स्वागत करते, तेव्हा त्यांच्या सुप्त इच्छांना वाव मिळतो.

त्या आपल्या नोकरी, व्यवसायात सासूचा सहयोग पाहून भावुक होऊन जातात. सासू-सुनेचे पारंपरिक रूप काळाच्या मागे पडून त्याला मैत्रीचे स्वरुप प्राप्त झालेले आहे, जिथे दोघींच्या विचारांतून प्रत्येक समस्येवर तोडगा काढला जातो. अन् घरातील अन्य सदस्यांना याचा सुगावाही लागत नाही.

सासू-सुनेचं अतूट नाते

सासू-सुनाच्या अशा काही जोडयांशी तुमची भेट घालून देणार आहोत, ज्या दूधात साखर मिसळल्यासारख्या एकमेकांत एकरुप झालेल्या आहेत.

मिनाक्षी पाठक एक सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे आणि मिडीया कॉलनी, गाझियाबादमध्ये राहते. तिचे या नात्याविषयी म्हणणे आहे, ‘‘माझ्या नोकरी करण्याला माझ्या सासूचा संपूर्ण पाठिंबा आहे. एकीकडे माझ्या मैत्रिणी जेवणाच्या सुट्टीमध्ये आपल्या सासूवर टिका-टिपण्णी करत असतात. दुसरीकडे मी मात्र निशिचंत असते. माझ्या सासूच्या छत्रछायेत मुले असतात, जी त्यावेळी शाळेतून येऊन जेवून झोपी गेलेली असतात. एवढेच नाही तर माझ्या सासू माझ्या पेहरावाला घेऊन काहीच रोक-टोक करत नाही. उलट त्याच मला नव-नवीन गोष्टी करायला सांगत असतात. मला माझ्या मनाप्रमाणे वेशभूषा धारण करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे.’’

मिनाक्षीच्या सासूचे म्हणणे काय ते ही तिने सांगितले, ‘‘माझ्या मुली लग्न करून दुसऱ्या शहरात गेलेल्या आहेत. परंतु ही मुलगी माझ्यासोबत असते. जी माझा आहार, औषधे, छोटया-मोठया समस्येची पूर्ण काळजी घेते. घरी येणाऱ्या माझ्या मैत्रिणींचे छान स्वागत करते. असे सर्व असताना मला माझ्या मुलीकडून कसली तक्रार असेल.’’

आणखी काही उदाहरणे

वैशाली, गाझियाबादमध्ये राहणाऱ्या एम.बी.ए श्वेता नागोईचे म्हणणे आहे, ‘‘मी स्वतचा व्यवसाय करण्यास इच्छुक होते. परंतु मला माझ्या माहेरी यासाठी परवानगी मिळाली नाही. परंतु सासरी मात्र सासूच्या सहयोगी वृत्तीमुळे मी आज आर्टिफिशीअल ज्वेलरीचा व्यवसाय घरी बसून करू शकते. माझ्या छोटया मुलाकडे त्याच लक्ष देतात.

‘‘लोक म्हणतात की सासू कधीच आई होऊ शकत नाही. पण हे अजिबातच खरे नाही. जर आपण प्रत्येक नात्याला मान-सन्मान दिला तर प्रत्येक सासू-सूना या मायलेकी बनू शकतात.’’

श्वेताच्या सासूचे म्हणणे आहे , ‘‘मी माझ्या सूनेच्या पेहरावात तसेच इतर कामात हस्तक्षेप करत नाही. मला वाटते की मोठयांचा मनापासून मान ठेवला पाहिजे फक्त दिखावा करण्यासाठी नाही. माझी सूनही माझा मान ठेवते आणि मी ही तिच्या आत्मनिर्भरतेचा पूर्ण सन्मान करते.’’

फरीदाबादची रहिवाशी तनु खुराना ही शासकीय संस्थेत सॉफ्टवेअर इंजिनीयर आहे. ती या नात्याबाबत खूप भावुक आहे. ‘‘मी ब्राह्मण कुटुंबातून प्रेम विवाह करून पंजाबी कुटुंबात आलेली आहे. येथील आहार, आधुनिक जीवनशैली माझ्या पारंपरिक कुटुंबापेक्षा खूप वेगळी आहे.

‘‘पण माझ्या सासूच्या सहयोगाने मी सासरच्या रंगात रंगून गेले आहे. कारण इथे नोकरीवरून माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकण्यात येत नाही. जर कधी मला ऑफिसला जाण्यास उशीर झाला तर माझी सासू माझ्यासाठी नाश्ता बनवून ठेवते. जर आम्ही दोघे पती-पत्नी लेट नाईट पार्टी करण्यासाठी गेलो तरीही माझ्या सासूला कसलीच हरकत नसते.’’

तेथेच तनुच्या सासू किरण, खुराना सांगतात, ‘‘माझे तीन मुलगे आहेत. मुलगी असावी अशी इच्छा होती, जी माझ्या मोठया सुनेच्या म्हणजेच तनुच्या रुपात पूर्ण केली. तनुची सजण्याची आवड पाहून मला आनंद होतो. आम्ही दोघी मिळून ब्युटी पार्लर, शॉपिंग इ. ठिकाणी एकत्र जातो.’’

नात्यातील समजूतदारपणा

नीतूच्या सासूबाई चंदा गौतम म्हणतात, ‘‘जेथे मला घरातील जेष्ठ व्यक्ती म्हणून कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी घ्यावी लागते, तेथेच कुटुंबाला एकत्रित ठेवण्यासाठी प्रत्येकाने सहभागी होणे गरजेचे आहे. नीतू माझा मान राखते आणि कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी माझा सल्ला घेते.’’

गृहिणी चहक मोर्दिया म्हणते, ‘‘मी ग्वाल्हेरच्या विभक्त कुटुंबातून संयुक्त कुटुंबात दुसऱ्या क्रमांकाची सून झाले. सासरी आले तेव्हा मनात भीती होती की मी सर्वांना खूश ठेवू शकेन की नाही. पण सासूने सर्व घरातील गोष्टी इतक्या प्रेमाने आणि धीराने शिकवल्या की मी आज एक कुशल गृहिणी बनले आहे. माझे संपूर्ण कुटुंब माझ्यावर खूप प्रेम करते. आम्ही एकत्र सहलीलादेखील जातो. माझी सासू विनाकारण रोक-टोक करत नाही. मला त्यांची ही गोष्ट आवडते.’’

तेथेच चहकच्या सासूबाई मोर्दिया म्हणतात, ‘‘सुनेमधील नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड पाहून मलाही तिला नवीन गोष्टींची माहिती द्यायला आवडते. ती खूपच लवकर येथील प्रथा-परंपरा शिकल्या. मुले आपल्या संसारात सुखी राहू देत हीच प्रत्येक आईची इच्छा असते. मुलांनी या वयात मज्जा-मस्ती करायची नाही तर मग कधी करणार?’’

या दोघींच्या बोलण्याचा असाच निष्कर्ष निघतो की सासरी जेव्हा सूनेचा सामना सासूशी होतो तेव्हा लहानपणापासून मनात बसवलेली भीतिच वरचढ ठरू लागते.

पण जेव्हा तिच सासू सुनेचा हात पकडून धीराने तिला संसारातील पाठ शिकवते, सूनेला तिच्या आवडीनुसार व्यवसाय, नोकरी करण्याची मुभा देते, तिला मदत करते, तेव्हा सूनेच्या मनीचे मोर नाचू लागतात, तिचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि ती म्हणते, ‘‘सुरेख माझे सासर आहे…’’

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...