* पूनम पांडे

काही वर्षांपूर्वी लोकांना सायकल चालवायला तसा संकोच वाटायचा. परंतु तीच लोक आता अगदी ज्यांच्या घरी लक्झरी कार असूनदेखील सायकल चालवत आहेत. तरुण वर्गात मुलं तंदुरूस्त रहाण्यासाठी सायकल चालवत आहेत. तर काही तरुणी सडपातळ राहण्यासाठी सायकलचा वापर करत आहेत.

सायकल चालविण्याचे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्हीही देखील चकित व्हाल की फक्त ३० मिनिटे सायकल चालविण्याचे एवढे फायदे असतात :

* जर तुम्ही दररोज २ किलोमीटर वा ३० मिनिटे सायकल चालवत असाल तर दीर्घकाळ तरूण दिसाल. याचं कारण हे आहे की रक्ताभिसरण अधिक चांगल होतं आणि स्फूर्ती दिवसेंदिवस वाढत जाते.

* अर्धा तास सायकल चालविल्याने शरीराचे सर्व अवयव अधिक अॅक्टिव्ह होतात आणि रात्री गाढ झोप लागते.

* अर्धा तास सायकल चालविल्यामुळे बॉडीचे इम्युन सेल्स अधिक अॅक्टिव्ह होतात आणि तुम्ही कमी आजारी पडता.

* सायकल चालविल्यामुळे शरीराच्या सर्व मासपेशी निरोगी आणि मजबूत होतात, त्यामुळे आत्मविश्वासदेखील वाढतो.

* सायकल चालविल्यामुळे बुद्धिमत्ता अधिक वाढते. कायम सायकल चालविनाऱ्याची निर्णय क्षमता सामान्य लोकांपेक्षा अधिक असते.

* अर्धा तास सायकल चालविण्याने एवढया कॅलरी जाळल्या जातात की त्यामुळे  शरीराची चरबीदेखील कमी होते. नियमितरित्या सायकल चालविण्याचे इम्युन सिस्टीम मजबूत होते. युनिव्हर्सिटी ऑफ कॅरोलिनामध्ये एका संशोधनाअंती आढळले की जे लोक आठवडयातून कमीत कमी पाच दिवस अर्धा तास सायकल चालवतात त्यांची आजारी पडण्याची शक्यता ५० टक्के कमी होते. रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी सायकल चालवणं अधिक लाभदायक ठरतं.

* सायकल चालवतेवेळी हृदयाचे ठोके वाढतात, ज्यामुळे शरीराचं रक्तभिसरण ठीक होतं. यामुळे हृदयरोगसारख्या समस्या उद्भवत नाहीत. हृदयाशी निगडित इतर आजार होण्याची शक्यतादेखील कमी होते.

* विविध अभ्यासात आढळले आहे की नियमितरित्या सायकल चालविणाऱ्यांना इतरांच्या तुलनेत तणाव होण्याची शक्यता खूपच कमी होते.

* सायकलमुळे ब्लड सेल्स आणि त्वचेत ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होतो. यामुळे त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसते. तुम्ही समवयस्क लोकांच्या तुलनेत अधिक तरुण दिसता. केवळ तरुणच नाही तर शरीर वास्तवात अधिक तरुण होतं आणि शरीरात स्टॅमिना वाढला आहे आणि शरीरात नवीन ऊर्जा आणि ताकद आली आहे याची जाणीव होते.

* सायकलिंगचा एक मोठा फायदा असा आहे की यामुळे शरीराच्या सर्व अवयवंवाना व्यवस्थित व्यायाम मिळतो. हात, पाय, डोळे या सर्वांमध्ये व्यवस्थित को-ऑर्डिनेशन होऊन शरीराच एकूण संतुलन व्यवस्थित होतं. एवढेच नाही तर तुम्हाला बाईक वा स्कुटी चालवायला शिकायची असेल तर सायकलची माहिती तुमच्या कामी येऊ शकते. सायकल चालविल्यामुळे मनात एक समाधान निर्माण होतं की आपण पर्यावरणाच्या हितामध्ये काम केलं आहे आणि जे योगदान दिला आहे ते निसर्गासाठी अनुकूल आहे. म्हणजे सायकल चालविण्याचा एक अर्थ असादेखील आहे की तुम्ही तुमच्या धरतीवर प्रेम करता.

कोणती सायकल विकत घ्याल

सायकल कशी असावी हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. जर तुम्ही दररोज सायकलिंग करत असाल तर अशी सायकल विकत घ्या ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ चालविताना त्रास होणार नाही.

जर तुम्ही तुमच्या दिनचर्येत प्रत्येक काम सायकलीनेच पूर्ण करत असाल आणि तुमचा छंद पूर्ण करण्यासाठी एक सायकल विकत घेण्याच प्लॅनिंग करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शोरूममध्ये विविध प्रकारच्या फॅन्सी सायकल असतात. ज्यांच्या आकर्षणापायी लोक त्यांच्या खऱ्या गरजा मागे सोडून महागडी सायकल विकत घेतात आणि नंतर पश्चाताप करत बसतात. साधारणपणे बाजारात ४-५  प्रकारच्या सायकली असतात. कोणती सायकल विकत घ्यायची आहे हे ज्याच्या त्याच्या गरजेवर अवलंबून आहे. कोणाला रस्त्यावर चालवायची असेल वा पार्कमध्ये दोन तास वा चार तास बाजारात काम आहे वा डोंगरांवर रेसिंग करायची आहे वा नॉर्मल सायकलिंग करायची आहे.

रोड सायकल

याला रेसिंग सायकलदेखील म्हणतात. ही खूप हलकी असते आणि याची चाके खूप पातळ असतात. साधारणपणे याचा वापर अशी लोकं करतात ज्यांना अधिक काळ सायकलिंग करायची आहे. खास म्हणजे जे प्रोफेशनल सायकलिस्ट आहेत. या सायकलने काही तासातच शंभर ते सव्वाशे किलोमीटर अंतर पार केलं जाऊ शकतं. याची किंमत तीस हजारांपासून लाखापर्यंत आहे. खरंतर याचं मेंटेनन्सदेखील खूप महागडं आहे. रेसिंग वर्कआउटमध्ये ही सायकल सर्वात उत्तम मानली जाते. ही सायकल परदेशातून येते. अधिक सायकली या चीन व व्हिएतनाममधून येतात. सध्या यांची बरीच मोठी वेटिंग म्हणजेच प्रतीक्षा चालू आहे. जर तुम्ही शहरात राहात आहात आणि दररोज वीस ते तीस किलोमीटर सायकलिंग करत असाल तर ती सायकल तुमच्यासाठी नाही आहे. परंतु दररोज शंभर किलोमीटर पर्यंत चालवायची असेल तर तुम्ही खरेदी करु शकता. याची बनावट अशी असते की तुम्ही दीर्घकाळ सायकल चालवूनदेखील थकवा येणार नाही.

जाड टायरची सायकल

अलीकडे ही सायकल खूपच ट्रेंडमध्ये आहे. मोठे टायर असल्यामुळे याला फॅट टायर बाईकदेखील म्हणतात. साधारणपणे याचा वापर वाळू आणि बर्फ असणाऱ्या जागी केला जातो. या जागी ही खूप छान चालते. साध्या रस्तावर ही बाईक तेवढी यशस्वी नाही आहे. खरंतर या बाइकला रस्त्यावर चालविण्यासाठी खूप ताकद लावावी लागते. जर कोणाला वजन कमी करायचं असेल तर ही सायकल विकत घेऊ शकतात. बाजारात याची किंमत दहा ते वीस हजाराच्या दरम्यान आहे.

माऊंटन सायकल

ही देखील कुठेही चालवू शकतात. या सायकली सर्वात अधिक विकल्या जातात. साधारणपणे दररोज सायकलिंग करणारे याचा वापर करतात. या सायकल रस्त्या बरोबरच डोंगर व पायवाटांवर व्यवस्थित कामी येतात. ही उत्तम पकड, आरामदायक व गेयरच्या व्हरायटी असल्यामुळे लोकांची ही सर्वाधिक पसंती आहे. याला एडवेंचर सायकलदेखील म्हणतात. याचे टायरदेखील जाड असतात. ज्यांना सायकलींगची सुरुवात करायची आहे त्यांनी ती काळजीपूर्वक चालवावी, खास करून डोंगराळ रस्ते, कारण यामध्ये बॅलन्सिंग वा डिक्स ब्रेक अचानक लावल्याने पडण्याची भीती असते. याची किंमत १० हजार ते २० हजारापर्यंत असते.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...