* शैलेंद्र सिंग
‘‘अगं ऐकतेस का,’’ सारखा थोडया-थोडया वेळाने पतीचा हा आवाज ऐकून पत्नीचा संयम सुटू लागतो.
‘‘ऐकतेय, मी बहिरी नाही, बोला.’’ बायकोने रागाने उत्तर दिले.
बायकोला अस्वस्थ पाहून नवरा मंद स्वरात म्हणाला, ‘‘थोडे पापड तळून दिले असते… कधीतरी पकोडे बनवत जा.’’
असेच काहीसे आवाज आता बायकांच्या नित्यक्रमात सामील झाले आहेत. आता एवढं सगळं बनवून घरची सगळी कामंही करा, कारण लॉकडाऊन आहे, मदतीला कुणी नाही. इतक्या मसालेदार नाष्टयांनंतर जेवणात ही कोणती कसर राहू नये. दररोज चटणी, रायता, कोशिंबीर अदलून-बदलून हवी. वरून ही स्थिती की किचनमध्ये येऊन बोलतील की अगं, हे का बनवलं? हे तर मी उद्या बनवून घेण्याचा विचार केला होता.
रेणू अग्रवाल म्हणते, ‘‘कोरोनामध्ये काय-काय रडायचे, काही नाही बोलायचे आणि सर्व काही सहन करायचे. कुणाला सांगू मी माझ्या मनाची दशा. दशा झालीय माझी दुर्दशा. पतीसाठी घरून काम आणि पत्नींसाठी? दिवसभर काम करा. पूर्वी नवरेमंडळी फक्त रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशीच घरी असायचे. आता सकाळपासून रात्रीपर्यंत स्वत:च लहान मोठया सासूबाईंपेक्षा कमी वाटत नाहीत. आता तर चोवीस तास बनियान घालून इंग्रजीभाषेच्या पांडित्याचे प्रदर्शन करत राहतात. कधी चहा, कधी कॉफीच्या भानगडीत मेंदूचे दही होत चालले आहे. ३ वेळा जेवण, ४ वेळा नाश्ता. कधी कधी तर वाटते की मलाच कोरोना व्हावा, कमीत कमी १४ दिवस क्वारंटाईनमध्ये विश्रांती तर मिळेल.
घरून काम करण्याच्या बाबतीत बायकांना ना स्वातंत्र्य राहिले, ना कुठले टाइम टेबल. नवरा खाण्यापिण्यापासून जेव्हा मोकळा होईल, तेव्हाच तर इतर कामे होतील. तसे बनियानमध्ये आरामात बसून घरून काम करताना त्यांना आरामदायक वाटते, परंतु जेव्हा ऑनलाइन कॉन्फरन्स असते तेव्हा ते पँट-शर्ट आणि सकाळपासून रात्रीपर्यंत स्वत:च लहान मोठया सासूबाईंपेक्षा कमी वाटत नाहीत. आता तर चोवीस तास बनियान घालून इंग्रजीभाषेच्या पांडित्याचे प्रदर्शन करत राहतात. कधी चहा, कधी कॉफीच्या भानगडीत मेंदूचे दही होत चालले आहे. ३ वेळा जेवण, ४ वेळा नाश्ता. कधी कधी तर वाटते की मलाच कोरोना व्हावा, कमीत कमी १४ दिवस क्वारंटाईनमध्ये विश्रांती तर मिळेल.
घरून काम करण्याच्या बाबतीत बायकांना ना स्वातंत्र्य राहिले, ना कुठले टाइम टेबल. नवरा खाण्यापिण्यापासून जेव्हा मोकळा होईल, तेव्हाच तर इतर कामे होतील. तसे बनियानमध्ये आरामात बसून घरून काम करताना त्यांना आरामदायक वाटते, परंतु जेव्हा ऑनलाइन कॉन्फरन्स असते तेव्हा ते पँट-शर्ट आणि टाय घालून व्यवस्थितपणे सजून-सवरून बसतात.
घरातून कामामुळे तणाव वाढला
घरातून कामामुळे हैराण झालेल्या बायकांची कहाणी मोठी आहे. दुखत्या नाडीवर फक्त हात लागायचे निमित्त असते. बायकांच्या वेदना उतू येऊ लागतात.
क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आकांक्षा जैन सांगतात, ‘‘लॉकडाऊनच्या काळात नवरा-बायकोच्या नात्यात वारंवार संघर्ष होताना दिसतोय. आधी असं वाटत होतं की प्रकरण १५-२० दिवसांचे आहे, तर सगळं काही अगदी उत्साहात चाललं. कधी नवरा स्वयंपाक करत असे, तर कधी बायको. नवरा घराची साफसफाई करायचा, मुलांची काळजी घ्यायचा, झाडांची देखभाल करायचा. पती-पत्नीला असं वाटत होतं जणू त्यांना बऱ्याच दिवसांपासून एकत्र काम करण्याची आणि वेळ घालवण्याची संधी मिळत नव्हती ती आता त्यांना मिळाली आहे. परंतु जसजसे लॉकडाऊनचे दिवस वाढू लागले आणि लॉकडाऊननंतरही घरून काम सुरूच राहिले, पती-पत्नीतील भांडणाच्या घटना वाढू लागल्या. कधी कधी या गोष्टी गंभीर होऊन पोलिसांपर्यंतही पोहोचू लागल्या.’’
आकांक्षा पुढे सांगते की, ‘‘लॉकडाऊनच्या सुरुवातीला घरातून कामाबरोबरच घरचा आनंदही लुटता येत होता, पण नंतर हळूहळू हा उत्साह ओसरू लागला.
लॉकडाऊन संपल्यानंतरही सर्व कार्यालये वर्क फ्रॉम होमद्वारे चालत राहिली. हे प्रकरण दीर्घकाळ चालणार हे आता स्पष्ट झाले आहे.
आई ऑनलाइन क्लासमध्ये अडकली
मानसशास्त्रज्ञ सुप्रीती बाली सांगतात, ‘‘गोष्ट फक्त घरून काम करण्यापुरतीच नाही. नवऱ्याचं ऑफिसच नाही, तर मुलांची शाळाही बंद असल्याने बायकांची जबाबदारी वाढत आहे. पूर्वी नवरा ऑफिसला आणि मुलं शाळेत गेल्यावर महिलांना स्वत:साठी वेळ मिळायचा. आता बायकोला दिवसभर घरची कामेही करावी लागतात आणि शिवाय गप्पदेखील बसावे लागते, कारण एकीकडे घरून काम चालू असते आणि दुसरीकडे ऑनलाइन क्लास असतो. मुलाला वेळेवर उठवणे, त्याची तयारी करून देऊन ऑनलाइन क्लाससाठी बसवावे लागते. ऑफिस आणि क्लास दोन्हीची वेळ बरोबर असते. पण मुलांची लवकर तयारी करावी लागते. त्याच वेळी त्यांना मदतही करावी लागते. घरात पूर्ण शांततादेखील ठेवावी लागते.’’
नोकरदार महिलांचे वेगळे दुखणे आहे
चंद्रप्रभा नर्सिंग सेवेत आहेत. कोरोनाच्यावेळी त्यांच्या ड्युटीच्या वेळाही बदलल्या आणि कामाचे तासही बदलले. त्यांचे पतीही नोकरीला आहेत. चंद्रप्रभा सकाळी लवकर उठतात. जेवण, नाश्ता एकाच वेळेस बनवितात. पती आणि मुलांना नाश्ता देऊन तयार करतात. मुलांना मदत करण्यासाठी त्यांची आई घरीच असते. मग त्या आपले कर्तव्य बजवायला जातात. जेव्हा त्या वेळेवर परत येऊ शकत नाहीत तेव्हा त्यांची आईच मदत करते. त्या कामावरून थकूनभागून घरी येतात तेव्हा त्यांची आईही थकलेली असते. जे काही ठेवलेले असते ते खाऊन त्या परत रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागतात. पुन्हा दुसऱ्या दिवसाची चिंता सुरू होते.
आकांक्षा जैन सांगतात, ‘‘गृहिणीपेक्षा नोकरदार महिलांना जास्त त्रास होतो. पूर्वी नवरा ऑफिसला जायचा आणि मुलं शाळेत, मग तेवढा वेळ घराची चिंता नसायची. आता नवरा आणि मुलं घरी आहेत, त्यामुळे तिला ऑफिसमध्ये राहूनही घराची काळजी करावी लागते. ज्या घरात आजी-आजोबा किंवा कोणी नातेवाईक मदतीला असतील तेथे ठीक आहे, पण जिथे एकल पालक आहेत तिथे समस्या जास्त आहेत. नोकरदार महिलांसाठी ऑनलाइन क्लास आणि घरून काम करणे हे जात्यासारखे आहे, ज्यामध्ये स्त्रिया पीसल्या जात आहेत.’’
गेला गप्पांचा काळ
कोरोनापूर्वी महिला पतीला ऑफिस आणि मुलांना शाळेत पाठवल्यानंतर स्वत:साठी वेळ काढून घराबाहेर पडायच्या. कधी किटी पार्टी, कधी फिल्म तर कधी आऊटिंगमध्ये वेळ घालवत असायच्या. फक्त रविवार आणि सुट्टीच्या दिवशीच नवरा आणि मुलांसोबत घरी वेळ घालविला जाई. आता बाहेर पडणे बंद झाले आहे. फोनवरच्या गप्पांमध्ये एक भीती असते की कदाचित समोरची व्यक्ती आपले बोलणे रेकॉर्ड तर करणार नाही ना. अशा परिस्थितीत सासू आणि मैत्रिणींबद्दल उघडपणे बोलणे गॉसिपमध्ये केले जात नाही. कुठेतरी बाहेर जातानाही सर्व प्रकारच्या उपाययोजना कराव्या लागतात. खाण्या-पिण्यापासून ते मास्क लावण्यापर्यंत गोंधळाला सामोरे जावे लागते.
संतोष कुमारी सांगतात, ‘‘४ महिन्यांनंतर मी घरातून बाहेर पडले तेव्हा एखाद्या मोकळया जागेवर आल्यासारखं वाटत होतं. माझंच शहर मला बदलल्यासारखं वाटत होतं, कारण मी खूप दिवसांनी पाहत होते. मास्क घालायची सवय नाही म्हणून गाडी चालवताना मास्क काढला. चौकात पोलिसांनी मास्क न लावलेले बघितल्यावर दंडाची पावती फाडली. गाडीत असताना मास्क घालायची काय गरज? हे समजत नाही. कोरोनापूर्वी आम्ही बिनधास्त हिंडायचो आणि मजा करायचो, आता जणू एका बांधणीत जगतोय असं वाटतंय. गॉसिपच नाही तर मेकअप करण्याची मजाही निघून गेली. जर चेहराच दाखवायचा नाही तर मग मेक-अप काय करणार, स्त्री मेकअपशिवाय अपूर्ण असते.’’
लॉकडाऊन संपल्यानंतरही घरून काम आणि ऑनलाइन क्लासेस चालण्याने बायकांचा त्रास संपलेला नाही. त्यांचा बराचसा वेळ पती आणि मुलांच्या मागण्या पूर्ण करण्यातच जातो. नवरा आणि मुलांसोबत राहायचे आहे आणि त्यांच्या सुखसोयींची काळजी घ्यायची आहे, पण त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळणार नाही, त्यामुळे तणाव आणखी वाढतो. कोरोनाचा सर्वाधिक फटका पत्नींना बसला आहे. काम वाढले पण मजामस्ती कमी झाली.