* प्रतिनिधी

  • मी २१ वर्षांची आहे. माझ्या ओठांच्या बाजूला लहान-लहान मुरुमे आहेत. ते दिसायला अतिशय विचित्र आणि कुरूप वाटतात. कृपया मला उपाय सांगा?

ओठांभोवती मुरुमे येण्याची अनेक कारणे असू शकतात. जसे उष्णता, मेकअप व्यवस्थित साफ न करणे इ. लिपस्टिकमध्ये असलेल्या रसायनांमुळेही संक्रमण होऊ शकते.

याचे निराकरण करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा लाभ घेऊ शकता. उदा :

बर्फाने शेक द्या : बर्फ सूज कमी करण्यास मदत करते. तसेच त्वचेतील घाण काढून टाकण्यासही मदत होते. जर तुमच्या चेहऱ्यावर मुरुमे किंवा पिंपल्स असतील तरीही तुम्ही बर्फ वापरू शकता. बर्फाने शेक देण्यासाठी बर्फ एखाद्या कापडाने गुंडाळा आणि नंतर तो प्रभावित जागेवर लावा.

हळद : हळद त्वचा आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. हळदीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म आढळतात, जे चेहऱ्यावरील मुरुमे काढून टाकण्याचे काम करतात.

हळद वापरण्यासाठी तुम्हाला हळदीची पेस्ट बनवावी लागेल.

यासाठी तुम्ही १ टीस्पून हळद घ्या आणि त्यात थोडे गुलाबपाणी मिसळून पेस्ट बनवा.

आता ही पेस्ट ओठांवर लावा आणि १० मिनिटे सोडा.

मध : मधामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे आणि विरोधी दाहक गुणधर्म आढळतात, जे मुरुमांना कारणीभूत असलेल्या जीवाणूंना मारण्याचे काम करतात.

मध सूज कमी करण्यासाठीदेखील कार्य करते. जर तुम्हाला फोडे येण्याची समस्या असेल तरी तुम्ही मध वापरू शकता. संसर्गापासून मुक्त होण्यासाठी ओठांच्याभोवती मध चांगल्या प्रकारे लावा. ही प्रक्रिया २-३ वेळा पुन्हा करा.

  • मी १९ वर्षांची आहे. पूर्वी माझे दात पांढरे दिसायचे, पण आता ते हळूहळू पिवळे होत आहेत. मी सकाळी दातदेखील चांगले स्वच्छ करते. माझे दात पूर्वीप्रमाणे पांढरे दिसण्यासाठी मी काय करावे?

दातांची योग्य काळजी न घेतल्याने दात पिवळे होऊ लागतात. दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी आपण या उपायांचे पालन केले पाहिजे :

तुळस : तुळशी हा दातांचा पिवळसरपणा दूर करण्यासाठी सर्वात सोपा उपाय आहे. तुळशी अनेक रोगांपासून दातांचे रक्षणदेखील करते. तसेच तोंड आणि दातांच्या आजारांपासून सुटकाही मिळते.  हिचा वापर करण्यासाठी तुळशीची पाने उन्हात वाळवा. यांची पावडर टूथपेस्टमध्ये मिसळून ब्रश केल्याने दात चमकू लागतात.

मीठ : मीठ ही दात स्वच्छ करण्याची खूप जुनी कृती आहे. मीठात थोडा कोळसा घातल्याने दात चमकू लागतात.

व्हिनेगर : सफरचंद व्हिनेगर १ चमचे ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळा. तुमचा टूथब्रश या मिश्रणात बुडवा आणि हळूवारपणे आपल्या दातांवर ब्रश करा. ही प्रक्रिया सकाळी आणि रात्री पुन्हा करा. हे मिश्रण वापरल्याने दातांचा पिवळसरपणा दूर होतो. तसेच श्वासातील दुर्गंधीची समस्यादेखील राहत नाही.

  • मी २२ वर्षांची आहे. जेव्हाही मी वॅक्सिंग किंवा थ्रेडिंग करते, माझे केस पूर्णपणे निघत नाहीत. हे केस खूप लहान असतात, जे त्वचेतून बाहेर पडताना दिसतात. कृपया मला सांगा की ते पूर्णपणे कसे काढायचे?

या केसांना इनग्रोथ हेअर म्हणतात. आपण त्यांना एक्सफोलीएट करून काढू शकता. यामुळे त्वचेच्या आत अडकलेले केस मऊ होतील आणि बाहेर येतील. यासाठी तुम्ही घरी उपलब्ध साहित्य वापरू शकता.

एवोकॅडो आणि मध : एवोकॅडो मॅश करा, आता त्यात २ टेबलस्पून मध आणि १ टेबलस्पून साखर घाला. साखर एक सौम्य एक्सफोलिएशन देईल आणि मध व एवोकॅडो आपल्या त्वचेला पोषण देईल.

जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही १-२ चमचे ताज्या लिंबाचा रस घालू शकता. लिंबाच्या रसाने त्वचा घट्ट होईल आणि यामुळे छिद्रदेखील बंद होतील.

हा मास्क १५-२० मिनिटांसाठी लावून ठेवा आणि नंतर तो पूर्णपणे धुऊन काढा.

टीट्री ऑइल : टीट्री ऑइलमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे, जंतुनाशक आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे त्वचेच्या संसर्गाचा धोका टाळतात आणि इनग्रोथ केसांची समस्यादेखील दूर करतात. टीट्री ऑइलमध्ये डिस्टिल्ड वॉटर मिसळून ते त्वचेवर लावा आणि काही वेळानंतर स्वच्छ पाण्याने स्वच्छ करा. वॅक्सिंगनंतर १ दिवसांनी हे उपाय अवलंबा.

  • मी २८ वर्षांची महिला आहे. मला पायाच्या नखांमध्ये बुरशीजन्य संसर्ग झाला आहे. याचे निराकरण करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगा?

नखांमध्ये बुरशीची समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा आपले पाय शूजमध्ये बराच काळ बंद असतात, ते व्यवस्थित साफ केले जात नाहीत. बुरशीपासून मुक्त होण्यासाठी लसूण आणि लवंग तेल मोहरीच्या तेलात मिसळा आणि चांगले गरम करा. आता रात्री झोपण्यापूर्वी ते पाय आणि नखांवर लावा.

तेल लावल्यानंतर मोजे घाला आणि झोपा. असे केल्याने, बुरशीजन्य संसर्गामध्ये सुधारणा दिसून येईल.

त्यातून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही अँटीस्पिरंट पावडरदेखील वापरू शकता. जर समस्या अजूनही कायम राहिली तर निश्चिंतपणे संबंधित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...