* सोमा घोष
मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले आहे, अशा ताराराणींची गाथा सोनी मराठीवर ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेतून उलगडणार आहे. या मालिकेनिमित्त रविवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४:३० वाजता, कोल्हापुरातील ताराराणी चौक स्टेशन रोड येथे महाराणी ताराराणी यांना मानवंदना दिली गेली. या सोहळ्याला कोल्हापूरचे श्री छत्रपती शाहू महाराज, इतिहासकार जयसिंगराव पवार आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे, सोनी मराठीचे बिझनेस हेड श्री. अजय भाळवणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
कलाकार स्वरदा थिगळे, संग्राम समेळ, रोहित देशमुख, अमित देशमुख, यतिन कार्येकर, आनंद काळे हे उपस्थित होते. मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले आहे, अशा ताराराणींची गाथा सोनी मराठी वाहिनीवर स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेतून १५ नोव्हेंबरपासून , सोम.-शनि. संध्या. ७:३० प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.
करारी नजर, स्पष्ट शब्दोच्चार, पहाडी आवाज आणि शिवकुळातले जाज्वल्य तेज यांमुळे स्वरदाला प्रेक्षकांची विशेष प्रशंसा लाभते आहे. स्वरदाच्या आजवरच्या अभिनय प्रवासातले हे एक वेगळे आव्हानात्मक रूप आहे. डॉ. अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स निर्मित ही मालिका ताराराणींचा दुर्दम्य आत्मविश्वास, स्वराज्याप्रती अढळ निष्ठा, स्वराज्यासाठी केलेला त्याग आजच्या पिढीसमोर मांडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्य अबाधित राखून ते वर्धिष्णू करणार्या जाज्वल्य इतिहासाचे अपरिचित पर्व ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेतून उलगडणार आहे.
जीवात जीव आणि श्वासात श्वास असेपर्यंत हे स्वराज्य अबाधित राहील आणि त्या औरंग्याची कबर दख्खनच्या मातीत खोदली जाईल!’ हे स्वराज्याबद्दलची जाज्वल्य निष्ठा आणि करारीपणा व्यक्त करणारे ताराराणींचे शब्द आणि युद्धभूमीवर मोगलांना सळो की पळो करून सोडणारे त्यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व साकारणे; हे शिवधनुष्य पेलण्यासारखेच आहे. ‘मराठ्यांच्या मुली ज्या हाताने फुगडी खेळतात, त्याच हाताने गर्दनही मारू शकतात!’ ह्या उद्गारातून महाराणी ताराराणींची लढवय्या व्यक्तिमत्त्वाची झलक दिसली आहे.
१५ नोव्हेंबरपासून ताराराणी आणि औरंगजेब यांना छोट्या पडद्यावर समोरासमोर पाहणे, म्हणजे इतिहासातला तो काळ साक्षात अनुभवणे! पहायला विसरू नका स्वराज्य सौदामिनी ताराराणी , सोम.-शनि.संध्या. ७:३० वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर.
प्रमुख उपस्थिती
डॉ. अमोल कोल्हे – (मालिकेचे निर्माते)
श्री. अजय भाळवणकर – (बिझनेस हेड, सोनी मराठी)
उपस्थित कलाकार आणि त्यांच्या व्यक्तिरेखा
स्वरदा थिगळे – स्वराज्य सौदामिनी ताराराणी
यतीन कार्येकर- औरंगजेब
संग्राम समेळ- छत्रपती राजाराम राजे
संताजी घोरपडे – अमित देशमुख
धनाजी जाधव – रोहित देशमुख
हंबीरराव मोहिते – आनंद काळे