* प्रतिभा अग्निहोत्री
माहेरी कुटुंबाची आवडती आणि आपल्या स्वत:च्या पद्धतीने जीवन जगणारी, लग्नानंतर जेव्हा सासरी येते, तेव्हा तिच्या खांद्यावर नवीन घर-कुटूंबाची जबाबदारी तर येतेच, शिवाय तिच्या नवीन कौटुंबिक जीवनात प्रवेश करतात सासू-सासरे, नंणद-दीर यासारखे अनेक नवे संबंध. ही सर्व नाती जपणे आणि त्यांची प्रतिष्ठा राखणे हे नवविवाहित मुलीसाठी खूप मोठे आव्हान असते.
नंणद भलेही वयाने मोठी असो किंवा छोटी, सर्वांची लाडकी तर असतेच, तसेच कुटुंबात तिचे वेगळे आणि महत्वाचे स्थान असते. ज्या भावावर आतापर्यंत फक्त बहिणीचा हक्क होता, वहिनीच्या आगमनाने तोच अधिकार तिला आपल्या हातातून निसटताना दिसू लागतो, कारण आता त्या भावाच्या जीवनात भावजयीचे स्थान अधिक महत्वाचे बनले असते.
नवीन सदस्या म्हणून कुटुंबात प्रवेश करणारी वहिनी नणंदेच्या डोळयात खटकू लागते. बऱ्याच वेळा नणंद वहिनीला तिचा प्रतिस्पर्धी समजू लागते आणि नंतर तिच्या कडवट वागण्याने भाऊ-भावजयीचे आयुष्य नरक बनवते.
अनावश्यक हस्तक्षेप
एका शाळेची मुख्याध्यापिका असलेल्या लीला गुप्ता सांगतात, ‘‘माझी एकुलती एक नणंद कुटुंबात खूप लाडकी होती. लग्न झाल्यावरही ती तिच्या सासरहून माहेरचे संचालन करत असे. जेव्हा-जेव्हा ती माहेरी येई तेव्हा-तेव्हा माझे सासू-सासरे तिची भाषा बोलू लागायचे. मी भले कितीही आवडीने स्वत:साठी किंवा घरासाठी एखादी वस्तू किंवा कापडं आणलं असलं तरी जर ते नंणदला आवडलं तर ते तिचे व्हायचं. एवढेच काय तर माझ्या वाढदिवशी माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी आणलेली भेटही तिला आवडली असेल तर ती देखील तिची होई.
‘‘जेव्हा माझी मुले मोठी झाली, तेव्हा त्यांनी या प्रकारच्या वर्तनास विरोध करण्यास सुरवात केली. यापूर्वी नेहमीच सार्वजनिकरित्या माझ्या इच्छेचा गळा दाबला गेला आणि मला दु:खही व्यक्त करता आले नाही. जरी मी कधी बोलण्याचा किंवा विरोध करण्याचा प्रयत्न केला तरी माझ्या सासू-सासऱ्यांबरोबरच पतीसुद्धा रुसून बसले.’’
रुक्ष व्यवहार
आपल्या लग्नानंतरची १० वर्षे आठवत असताना अरुणाचे हृदय दु:खी होते. ती म्हणते ‘‘माझ्या दोन नणंदा आहेत. एक माझ्या नवऱ्यापेक्षा मोठी आणि एक लहान. मोठी नणंद पैशाने श्रीमंत आहे आणि माझ्या सासू सासऱ्यांना खूप प्रिय आहे. म्हणून जेव्हा ती येणार असते तेव्हा घरात जणू वादळ येते. जोपर्यंत ती राहते, घरातील प्रत्येक क्रियाकलाप तिच्याद्वारेच चालविला जातो.
‘‘छोटया नणंदेची आर्थिक परिस्थिती तितकी चांगली नाही. म्हणून जेव्हा ती येते तेव्हा घराच्या बजेटची पर्वा न करता तिला भरपूर सामग्री दिली जाते. मग भलेही माझ्या आणि माझ्या मुलांच्या गरजा भागवल्या जावोत किंवा नाहीत. ती आल्यानंतर माझे काम फक्त दासीप्रमाणे शांतपणे काम करणे असते. त्यावेळी नवरासुद्धा परक्यासारखा वागतो.’’
जीवनभर सल
आस्थाचे दुसरे लग्न झाले आहे. सासरच्या घरात नवरा आणि सासू शिवाय एक अविवाहित नणंददेखील आहे, जी एका कंपनीत मॅनेजर आहे. आस्था सांगते, ‘‘माझ्या नणंदेने माझ्या कुटुंबाला आग लावली. तिच्या समोर माझ्या सासूला काहीच सुचत नाही. संपूर्ण घर त्यांच्यानुसार चालते. तिचे लग्न न झाल्यामुळे आमचे सुख तिच्याने पाहावत नाही. भावासाठी तर सर्व काही आहे पण माझ्यासाठी त्या कुटूंबात थोडेदेखील प्रेम नाही. नेहमीच माझ्या सासूला माझ्याविरूद्ध चिथावत असते. तिच्यामुळेच आज लग्नाच्या ८ वर्षानंतरही माझ्या लाख प्रयत्नांनंतरही माझे सासू आणि नवऱ्याशी संबंध सामान्य होऊ शकले नाहीत. केवळ तिच्यामुळेच आम्ही लग्नानंतर हनीमूनला जाऊ शकलो नाहीत, ज्याची सल आजपर्यंत आहे.’’
सुंदर नातं
नणंद आणि भावजय यांचे खूप प्रेमळ नाते आहे. जर ते प्रामाणिकपणाने आणि निष्ठेने हाताळले गेले तर त्यापेक्षा सुंदर नाते दुसरे असू शकत नाही, कारण प्रत्येक मुलगी ही कुणाची तरी नणंद आणि भावजय असते. पण बऱ्याच वेळा हे पाहिलं जातं की नणंदला भावाबद्दल प्रेम आणि आपुलकी तर असते मात्र तिच्यात नणंदबद्दल तिरस्कार व द्वेषाची भावना असते. विवाहित नणंद बऱ्याचदा सासरी राहून माहेरी हस्तक्षेप करते आणि तिच्या भावजयीविरूद्ध तिच्या पालकांना भडकवत राहते. ज्यामुळे भाऊ-भावजयीचे घरगुती जीवन प्रभावित होते.
हे खरे आहे की बहुतेक वेळा भावजय आणि नणंद यांच्यातील संबंध गहन नसतात, परंतु याउलट अशीही उदाहरणे बऱ्याचदा बघायला मिळतात की जिथे बहिणीने केवळ आपल्या भावाच्या तुटलेल्या कुटुंबाचे जतनच केले नाही तर आपल्या पालकांकडून भावजयीला मान-सन्मानही मिळवून दिला.
रीमा श्रीनिवास तिच्या २ भावांची एकुलती एक बहीण आहे. एक भाऊ तिच्यापेक्षा लहान आहे आणि एक मोठा आहे. ती सांगते, ‘‘धाकटया भावाने त्याच्या इच्छेनुसार लग्न केले होते. त्यामुळे आई वडीलही भावजयीबद्दल कडवट व्यवहार करायचे. आई-वडिलांकडून होणाऱ्या गैरवर्तनाचा राग वहिनी भावावर काढायची. यामुळे बऱ्याचदा दोघांमध्ये भांडण होऊ लागले आणि नंतर याची परिणीती वेगळे होण्यापर्यंत आली. माझ्या माहेराचे भांडण-तंटे माझ्याने बघवेना. त्यावेळी माझ्या पतीने मला खूप साथ दिली. आम्ही चौघांना एकत्र बसवून समजावून सांगितले. एका सल्लागाराच्या मदतीने त्यांचे नाते पुन्हा ट्रॅकवर आणले.’’
रीमाचा भाऊ रमन म्हणतो, ‘‘माझ्यासारखी बहिण प्रत्येकाला मिळो. तिने माझ्या विवाहित जीवनाला पुनर्जीवन दिले.’’
भावजय अंजलीदेखील तिच्या नणंदेचे कौतुक करताना थकत नाही. ताईने आमचे आयुष्य आनंदाने भरून दिले नाहीतर घर तुटले असते.’’
आयुष्यात प्रत्येक नात्याचे स्वत:चे वेगळे महत्त्व असते. प्रत्येक नात्याला मर्यादा असतात. जर त्याला त्याच मर्यादेत राहून हाताळण्यात आले तर ते अधिक सुंदर होते. त्यात कोणतीही अडचण निर्माण होत नाही.