* पद्मश्री प्रोफेसर डॉ. महेश वर्मा, डायरेक्टर व प्रिंसिपल, मौलाना आझाद इंस्टीट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस
प्रश्न : दातांमधील संवेदनशीलतेचे तात्पर्य काय आहे?
उत्तर : जेव्हा थंड किंवा गरम पेय अथवा खाद्यपदार्थांद्वारे दातांमध्ये वेदना किंवा बेचैनी जाणवते, तेव्हा त्याला दंत संवेदनशीलता म्हणतात. दातांच्या वरील थर (इनॅमल) हटल्यामुळे आतील थर ‘डँटीन’ तोंडाच्या संपर्कात येतो. त्यामुळे त्यातील नसांमध्ये संवेदनशीलता निर्माण होते.
प्रश्न : दातांमध्ये संवेदनशीलतेची समस्या सामान्यपणे आढळते का?
उत्तर : हो, ही समस्या खूप सामान्य आहे. सामान्यपणे २०-५० वयोगटांतील लोकांमध्ये ही समस्या असते.
प्रश्न : संवेदनशीलता किती प्रकारची असते?
उत्तर : हिरड्यांच्या समस्येमुळे संवेदनशीलता.
* दात झिजल्यामुळे संवेदनशीलता.
* दात हिरड्यांच्या ठिकाणी झिजल्यामुळे संवेदनशीलता.
* दातांना कीड लागल्यामुळे संवेदनशीलता.
* आम्लामुळे होणारी संवेदनशीलता.
* दंतप्रक्रियेनंतर होणारी संवेदनशीलता.
प्रश्न : संवेदनशीलतेमागे काय कारणे आहेत?
उत्तर : जर तोंडाची स्वच्छता योग्यप्रकारे केली नाही, तर प्लाक एकत्र झाल्याने दातांच्या वरील थर (इनॅमल) हटतो व दातांमध्ये संवेदनशीलता सुरू होऊ लागते.
* वयाबरोबर हिरड्या दातांना सोडू लागतात. विशेषत: जर स्वच्छता ठेवली नाही. यामुळेही संवेदनशीलता निर्माण होते.
* कडक ब्रशच्या वापराने व वेगाने मागे-पुढे ब्रश केल्यानेही दात झिजतात व संवेदनशीलता जाणवते.
* अनेक लोकांना रात्रीचे ब्रश करायची सवय असते. त्यामुळे दातांच्या वरचा थर हटतो व संवेदनशीलता सुरू होते.
* दातांना कीड लागल्याने बॅक्टेरिया इनॅमलला नष्ट करतात, त्यामुळे दात संवेदनशील होतात.
* दातांना जर मार लागला, तर त्याचा परिणाम आतील थरांवर होऊ शकतो व संवेदनशीलता उत्पन्न होऊ शकते.
* माउथवॉश, ज्यात आम्लता असते, त्याचा वापर इनॅमलच्या थराला हटवतो व संवेदनशीलता निर्माण होते.
* आम्लयुक्त खाद्यपदार्थांमुळेही इनॅमलच्या थराला नुकसान पोहोचते व संवेदनशीलता निर्माण होते.
* काही दंत प्रक्रियेनंतरही संवेदनशीलता निर्माण होते. उदा. दातांची सफाई, क्राउन लावल्यानंतर, दात भरून घेतल्यानंतर इ. काही आठवड्यानंतर ही संवेदनशीलता बरी होते.
प्रश्न : दंत संवेदनशील झाल्यावर कोणते उपचार केले पाहिजेत?
उत्तर : जर दातांवर कॅलकुलस किंवा टार्टर जमा असेल, तर मशीनद्वारे ते काढलं जातं. त्याबरोबरच संवेदनशीलतेसाठी टूथपेस्ट, जिला डिसेंसिटायजिंग टूथपेस्ट म्हणतात व माउथवॉशचा उपयोगही लाभदायक ठरतो.
* फ्लोराइड वार्निश इनॅमल व डेंटीनला मजबुती देतो व संवेदनशील दातांच्या वेदना व बेचैनीला कमी करतो.
* ज्या हिरड्या दात सोडत आहेत, त्यांच्यासाठी मुळांवर बाँडिंग एजेंट लावल्याने खूप प्रभाव पडतो. तोंडाच्या दुसऱ्या एखाद्या भागातून हिरडी घेऊन ग्राफ्टिंगही करू शकता.
* दातांना कीड लागल्याने संवेदनशीलता कमी होण्यासाठी त्यात योग्य मसाला भरू शकता. जर कीड आतपर्यंत लागली असेल, तर रूट कॅनलचा उपचार करून क्राउन लावता येईल.
* दातांच्या झिजण्याच्या सवयीसाठी माउथ गार्डद्वारे उपचार केले जातात, जेणेकरून दातांचे अजून पुढे नुकसान होऊ नये.
* दातांना मार लागल्यानंतर क्षतीनुसार उपचार केले जातात. मसाला भरणे किंवा रूट कॅनलचा उपचार व क्राउन लावला जातो.
प्रश्न : दातांच्या संवेदनशीलतेपासून वाचण्यासाठी काय उपाय आहे?
उत्तर : तोंडाची स्वच्छता चांगल्याप्रकारे केली पाहिजे. दिवसातून २ वेळा ब्रश करण्यासोबतच माउथवॉशचा वापर करणेही चांगले असते.
* मऊ केसांच्या ब्रशचा वापर केला पाहिजे. ब्रश करण्याची योग्य पध्दत स्विकारली पाहिजे.
* फ्लोराइडयुक्त माउथवॉश, ज्यात आम्ल नसेल, त्याचा वापर केला पाहिजे.
* ज्या खाद्यपदार्थांमध्ये आम्लाचे प्रमाण जास्त असेल, त्यापासून दूर राहिले पाहिजे.
* दंत विशेषज्ञांद्वारे नियमितपणे तपासणी करून घेतली पाहिजे. जेणेकरून दातांना कीड लागलेली असेल किंवा हिरड्यांचा आजार असेल किंवा अन्य कोणती समस्या असेल, ज्यामुळे संवेदनशीलता निर्माण होऊ शकते, त्यावर सुरुवातीलाच उपचार होईल, तर ते पुढे वाढणार नाही.