* डॉ. नीरजा श्रीवास्तव

कोठे दिखाव्याचे सोंग तर कोठे भिति श्रद्धा तर काही भोंदू बाबांच्या रूढी हे सर्व मिळून तयार होतो आपला समाज. जिथे धर्मांधतेमुळे पंडीत, पुजारी उत्सवपर्वांना विविध प्रकारच्या कर्मकांडाशी जोडून तथ्यांना नाकारत आणि त्यांचे खरे मूळ आनंददायी स्वरूप नष्ट करतात. शुभ घडण्याची लालसा आणि अनिष्ट घडण्याची शंका यामुळेच त्यांची सेवा करण्यासाठी सामान्य जनता विवश होते अन् भयभीत मनाने लोक अंधश्रद्धेच्या चक्रात अडकत जातात. कारण आपल्या धार्मिक ग्रंथातूनही ईश्वराविषयी, धार्मिक कार्यांविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करू नये अशी शिकवण असते. विरोध केल्यास सर्व काही नष्ट होईल.

भग्वत गीता श्लोक १८/५८

अथ चेत्त्वमहंकारान्न श्रीष्यसि विनंक्ष्यारी. अर्थात, जर तू अहंकारामुळे ऐकलं नाहीस तर तुझा पूर्णपणे नाश होईल.

न चाशुश्रूषवे वाच्यं न च मां यो भ्यऽसूयति. भग्वत गीता श्लोक १८/६७. अर्थात, हे ज्ञान तू कोणाला सांगितले नाही पाहिजे. त्या व्यक्तीला तर मूळीच नाही जो माझी निंदानालस्ती करतो..

हे सर्व काय आहे

जर देव आहे आणि देव सर्वशक्ति आहे तर हे त्याला सर्वांना सांगण्याची काय आवश्यकता होती? त्यांनी आपले वचन सर्व भाषांत का नाही लिहिली? काम्प्युटर सॉफ्टवेअरप्रमाणे सर्व ज्ञान-विज्ञान त्यांच्याकडे पूर्वीपासूनच आहे. मग पत्रांवर, दगडांवर का लिहून घेतले? जे देवता मानत नाहीत त्यांच्यासमोर गीतेतील वचन वाचण्यास का अडवले? उलट हे वचन त्यांच्या कानी पडताच ते पवित्र झाले पाहिजेत. सरळ गोष्ट आहे की ते या गोष्टीचा तर्क विचारतात आणि यांच्याकडे कोणत्याच प्रश्नांचे उत्तर नसते. मग त्यांची पोल खोल होते. त्यांचे सत्य सर्वांसमोर येते. तथ्यांना नाकारणे, तर्काशिवाय कोणतीही गोष्ट मान्य करणे. धर्मभीरू मन येथूनच दुर्बल होते किंवा गैरसमज होण्यास सुरूवात होते असे आपण म्हणू शकतो. या भितिनेच नव-नव्या अंधश्रद्धेचा जन्म होतो आणि अंधश्रद्धाळूंची संख्या वाढते.

एक गोष्ट जेव्हा मनात खोलवर रूजली गेली की जर तर्काशिवाय हे करणे चांगले आणि नाही केले तर वाईट होईल. जेव्हा इतरांच्या बाबतीत वाईट होते तसेच आपल्या बाबतीतही होऊ शकते. येथूनच अंधश्रद्धेची मालिका सुरू होते. कधी क्रिकेट मॅच जिंकण्यासाठी, तर कधी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यासाठी, कधी निवडणुका जिंकण्यासाठी हवन, पूजा केल्या जातात. जर यामुळे काही होणं शक्य असेल तर बलात्कार, हत्या वा दुर्घटना थांबवण्यासाठी भारतासारख्या देशात कोणतेही हवन का केलं जात नाही, ही विचार करण्यासारखी बाब आहे.

दिखाव्याचे सोंग

मांजर आडवी गेली आणि वाईट घडले तर त्यामुळे आपल्या मनात गैरसमज निर्माण होतो. पुन्हा असेच घडले तर आपला गैरसमज पक्का होतो. मग तिसऱ्यावेळेसही असे घडले तर गैरसमजाचे रूंपांतर अंधश्रद्धेत होते. लोकांच्या मनात भीती एवढी रूजलेली असते की ते आपला मार्ग बदलतात किंवा दुसरे कोणी या रस्त्याने जाईल याची वाट पहात बसणे किंवा पाच पावले मागे जाणे. मनातल्या भितिचे घर एवढे मोठे झाले की कधीकाळी काही चांगलेही घडले असेल याची आठवणच राहिली नाही. एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला असे करत करत याची माऊथ पब्लिसीटीच करून सगळीकडे ही गोष्ट पसरवली आहे. जेवढी संख्या या धर्मभीरूची वाढली नाही त्याहून अधिक संख्या अंधश्रद्धाळूची वाढलेली आहे. धर्मातील नियम हे व्यक्तिचे मन दुर्बळ होण्यामागील दुसरे कारण समजले जाते. ज्यामुळे लोक श्रद्धेच्या तथ्यांना सरळसरळ नाकारू लागले.

दिखाव्याचे सोंग करणे हे तिसरे कारण आहे. जसे की काही लोक धार्मिक कर्मकांडापासून अलिप्त राहतात. मात्र दर्शवतात की ते खूपच धार्मिक आहेत. अतिशय सच्चे आणि विश्वासू अशी पवित्र आत्मा असलेली व्यक्ती आहेत. ते दान-पुण्याच्या आड गोरखधंदा किंवा काळेधंदे चालवतात. जगाच्या आणि न्याय व्यवस्थेच्या डोळ्यांत धूळ फेकत प्रंचड धन-दौलत, मान-सन्मान, प्रतिष्ठा कमावतात.

परंपरांचा धावा करणे

प्रतिष्ठा पणाला लागल्यावर, जीवनात आणखी काय उरणार? अशी लोकांची धारणा बनलेली आहे. भ्रष्ट नेते, करचोरी करणे, सिने तारका मोठ्या थाटात माध्यमांच्या घोळक्यासह मंदिरात प्रवेश करतात. देवी-देवतांचे दर्शन, मोठ्या प्रमाणात दान करून स्वत:ला धार्मिक, पवित्र आणि स्वच्छ चारित्र्याचे असल्याचे ढोंग करतात. हे सर्व काही डोळे उघडण्यासाठी पुरेसे नाहीए? खरंतर आपण झोपत नाही फक्त डोळे बंद करून असतो. झोपणाऱ्या व्यक्तिला जागं करता येत, परंतु झोपेचं सोंग घेणाऱ्याला जागं करता येऊ शकत नाही.

चौथे कारण म्हणजे भोंदूबाबाच्या रूढींचा धावा करणे. आपले पूर्वज, घरातील वृद्ध व्यक्ती ज्या पूर्वापार करत आलेल्या आहेत, त्याचेच डोळे झाकून अनुकरण केलं जातं. असे करण्यातच लोक आपले कर्तव्य मानतात. असे वागण्याला ते मोठ्यांप्रती त्यांचे असलेले प्रेम-आदर दाखवण्याचा मार्ग समजतात. याबाबतीत कोणताही तर्क लावत नाहीत. फक्त अनुकरण करतात. असे करताना सुंतष्टी मिळाली, चांगले वाटले तर हळूहळू विश्वासही बसू लागला. जसे की कुलूप लावून आरामात फिरायला निघून जाणे कारण आता घर सुरक्षित आहे. या कर्मकांडाचे, अंधश्रद्धांचे पालन करून आपले भविष्य सुरक्षित बनत आहे असा अनुभव लोक करू लागतात. थोरामोठ्यांना करताना पाहिले म्हणून त्यांचे अनुकरण काही विचार विनिमय न करता तसेच केले जाते.

पाचवे कारण म्हणजे असाक्षरता आणि अज्ञानता. हेदेखील एक मोठे कारण आहे. आज शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार-प्रचार होत आहे. काही लोकांना का, कसे हे प्रश्न पडू लागले आहेत. व्यक्ती प्रथम त्या गोष्टीचे कारण समजू इच्छितात आणि मग ते मान्य करू इच्छितात. परंतु देशाची संख्या आजही १०० टक्के शिक्षित झालेली नाही. काही लोक मोबाइल आणि गाड्यांचा उपयोग तर करतात, पण भोंदू बाबाच्या चमत्काराच्या आशेने त्यांच्याकडे जातात आणि त्यांच्या कचाट्यात अडकतात. साई बाबा, आसारामबापूसारखे लोक कोठे आहेत? यांची सत्यता आज कोणापासून लपलेली नाही. जीव धोक्यात घालून, दुर्गम डोंगराळ भागात देवी देवतांचे दर्शन घ्यायला लोक मंदिरात जातात. काही वेळा त्यांना आपला जीवही गमवावा लागतो पण त्यांना विश्वास असतो की शरीराला कष्ट दिले, उपवास केला, दान धर्म केल्यास देवीदेवता प्रसन्न होऊन आपले कल्याण करतात. इच्छा-आंकाक्षा पूर्ण करतात. पण जर यांना कोणताही तर्क का आणि कसे शक्य आहे विचारले तर याचे उत्तर त्यांच्याजवळ नसते.

अतार्किक कहाणी

कोणी अडविले तर नजर लागली किंवा काम सुरू होताच कोणी शिंकले तर वाईट होईल. जर कोठे काणा व्यक्ती दिसल्यास खूप वाईट, डोळा फडफडणे, दिवा विझणे, मांजर आडवी गेली, कुत्र्याचे रडणे इत्यादी कोण जाणे किती गैरसमज पाळले जातात. शिक्षण घेऊन त्यांनी आपलं ज्ञान वाढवलं तर त्यांना सर्व कारणे ज्ञात होतील. जगात असे काहीच नाही ज्याचे कारण नाही, तर्क नाही. आपल्याला माहिती नाही हे आपले अज्ञान आहे.

दिवस-रात्र कसे होतात? माहिती नाही म्हणून काही तरी स्वरचित बनावट गोष्ट बनवली. जसे की राक्षस रोज सूर्याला गिळकृंत करतो किंवा यासारखाच आणखी कल्पनाविलास करतात. आजही जगात केवढ्या कला, विज्ञान लपलेले आहे. आपण त्यादृष्टीने आपला मेंदू वापरला पाहिजे. आपण या बनावट गोष्टींपासून वाचले पाहिजे. त्यासाठी साक्षरतेसह ज्ञानाची जोपसना करणे अत्यंत आवश्यक आहे.

आपल्याला मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करायचे सोडून आपण निरर्थक कार्यात व्यस्त राहातो आणि जीवनातील अनमोल वेळ वाया घालवतो. अंधश्रद्धेतच अडकून राहिल्यास, जीवनात संपूर्णत: प्रसन्नही राहू शकणार नाही म्हणूनच प्रत्येकाने साक्षरतेसोबत आपल्या बुद्धीचे बंद दरवाजे उघडून ज्ञानाचा प्रकाश दुरवर पसरवला पाहिजे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...