– गरिमा पंकज

सुंदर दिसणं आपल्यासाठी आनंददायी तर असतंच, पण यामुळे आत्मविश्वासही वाढतो, जो तुम्हाला जगाशी सामना करायला शिकवतो. परंतु आजच्या काळात वाढते प्रदूषण, आहाराच्या वाईट सवयी, वाढता तणाव इत्यादी कारणामुळे त्वचा सगळयात जास्त प्रभावित होते. एवढेच नव्हे तर रात्री उशिरापर्यंत जागणे आणि जीवनशैलीशी संबधित इतर अनेक वाईट सवयी त्वचेला निर्जीव बनवतात व मुरुमांची शिकारही. या, अशाच काही सवयींबद्दल जाणून घेऊ, ज्या मुरुमांचे कारण ठरतात.

सतत त्वचेला स्पर्श करणं : आपले हात दिवसभरात हजारो बॅक्टिरियाच्या संपर्कात येत असतात. अशावेळेस पुन्हा-पुन्हा हात धुण्याची आवश्यकता वाटत नाही. पण अशा स्थितीत कितीतरी वेळा कळत नकळत आपण आपल्या त्वचेला स्पर्श करत असतो. अशाप्रकारे आपण आपल्या त्वचेपर्यंत बॅक्टिरिया, धूळ आणि अस्वच्छता पोहोचवण्याचे काम करत असतो. जे मुरुमांना कारणीभूत ठरते.

चुकीच्या पद्धतीने स्क्रब करणे : आपल्याला वाटते की आपण चेहऱ्यावर वारंवार स्क्रब करून किंवा टॉवेलने पुसून आपल्या रोमछिद्राला खोलपर्यंत साफ करत आहोत. पण वास्तविकता काही वेगळीच असते. असे करून आपण त्वचेला इजा पोहोचवत असतो.

घाणेरड्या मेकअप ब्रशचा वापर : बऱ्याच वेळा आळशीपणामुळे आपण आपला मेकअप ब्रश न धुता त्याचा वारंवार वापर करतो. आपल्याला वाटते की याचा वापर आपल्याशिवाय कोणी दुसरे करत तर नाहीए. पण ही एक मोठी चूक आहे. ब्रशमध्ये जमलेली धूळ आणि शिल्लक राहिलेले मेकअप त्याच्या तंतूंमध्ये अडकून राहतो.

व्यायाम केल्यावर स्नान न करणे : व्यायाम केल्यानंतर शरीरातून घाम येतो, बाहेरचे प्रदूषण, धूळ-माती इत्यादी घामात मिसळून मुरूमे तयार करतात.

पूर्ण झोप न घेणे : पर्याप्त झोप न घेतल्यामुळे शारीरिक आणि मानसिक स्ट्रेस लेव्हल वाढते. याचा थेट परिणाम त्वचेवर होतो. म्हणून निरोगी त्वचेसाठी आणि मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठी पुरेशी झोप घ्यायला विसरू नये.

मुरुमांना दाबणे किंवा स्क्रॅच करणे : मुरुमांना दाबू वा फोडू नये कारण यामुळे त्वचेत संक्रमण होण्याचा धोका वाढतो.

सन एक्सपोजर : कडक ऊन्हात जास्त वेळ राहिल्यामुळेही मुरुमांची समस्या उद्भवते. कडक ऊन्हामुळे ना केवळ  टॅनिंगची समस्या निर्माण होते तर याचबरोबर त्वचाही जास्त रूक्ष होते. यामुळे त्वचेतील ऑईल वाढते आणि मुरुमे जास्त होऊ लागतात. म्हणून कडक ऊन्हात जाण्यापूर्वी चेहरा झाकून घ्या किंवा सनस्क्रीन लावूनच बाहेर पडा.

तणावाग्रस्त राहणे : ज्यांना मुरुमांची समस्या आहे, त्यांच्यासाठी तणावाग्रस्त राहणे नुकसानदायक ठरू शकते. कारण तणावामुळे मुरुमे जास्त वाढत असतात, तणावापासून वाचण्यासाठी प्रत्येक स्थितीत खुश राहायला शिकले पाहिजे. आपण जेवढे आनंदी राहाल, तेवढेच मुरुमांपासून दूर राहाल.

चुकीच्या आहारपद्धती : मुरुमांचे एक कारण चुकीची आहारपद्धती आहे. दिवसाला कमीतकमी ८-१० पेले पाणी प्यावे. यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते. ज्यामुळे त्वचा चमकदार आणि डागरहित राहते. हिरव्यागार भाज्या जास्त खाव्या, चिंच, बटाटे, मिरची, वांगी, कच्चा कांदा, मुळा कॉपी, चहा इत्यादींचे सेवन कमीतकमी करावे, मध सेवन करू नये, ग्रीन टी घ्यावी. हर्बल फेस वॉशचा वापर करावा.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...