* पूनम अहमद
जगभरात ‘हेल्दी खाणे आणि वेट कमी करणे’ या दोन गोष्टींसाठी लोक जिममध्ये जाण्याचा अट्टाहास करताना दिसून येतात. मात्र कालांतराने हा उत्साह थंड झालेला दिसून येतो. कोणाकडे वेळ कमी असतो तर कोणाला जेव्हा मनासारखा परिणाम दिसून येत नाही, त्यांचा उत्साह हळूहळू कमी होऊ लागतो.
अशात आपल्या दृष्टिकोन आणि फिटनेस प्लॅनमध्ये काही बदल करून तुम्ही कायम वर्ष फिट आणि फ्रेश राहू शकता.
कसे रहाल फिट
फिटनेस ट्रेनर गौरव गुप्ता सल्ला देतात की वेट उचलायला मागे पुढे पाहू नका. बरेच लोक धावणे आणि ट्रेडमिलवर चालणे यालाच फिटनेस समजतात. असे ब्रिस्क आणि जॉगिंग पुरेसे समजले जाते. वेट ट्रेनिंगमुळे तुमचा मेटाबोलिक रेट वाढतो. ज्यामुळे तुमचे शरीर आराम करूनही फॅट बर्न करते.
झुंबा स्पेशालिस्ट आणि मास्टर सविता पाल म्हणतात, तुमचे शरीर काळानुसार बदलत असते, तुमच्या एक्सरसाइजच्या स्ट्रेस नुसार अॅडजस्ट आणि मजबूत होत असते. कधी कधी बॉडी वेट बूट कॅम्पमध्ये जा. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर छोटे छोटे वर्कआउट करा.
होलिस्टिक लिविंग कॉन्सेप्टच्या डॉक्टर दीपा यांचे म्हणणे आहे की कुठेही १० ते ३० मिनिटांचे हाय इंटेन्सिटी वर्कआउट करा. यामुळे कमी वेळात जास्त कॅलरी बर्न होईल आणि वर्कआउटनंतर काही तासांसाठी तुमचा मेटाबोलिक रेट वाढलेला असेल.
यू ट्यूबवर फिटनेस ब्लॉग आणि फूड चॅनेलचे रणवीर सांगतात आपल्या शेड्युलमध्ये एक्सरसाइजचे रुटीन ठरवून टाका आणि त्यापासून मागे हटू नका. कोणताही वेळ जो तुम्हाला सोयीचा आहे तो निवडा आणि हे आपले जरुरी काम समजा आणि याला इग्नोर करू नका.
सविता पाल सल्ला देतात, ‘‘एक फिटनेस सोबती शोधा. त्याच्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल. जेव्हा तुम्हाला वाटेल तुम्ही खूप एक्सरसाइज केली आहे, तेव्हा तोच सोबती तुम्हाला आणखी एक सेट करण्यासाठी उत्तेजन देऊ शकतो. हे आणखी जरासेच तुम्हाला खूप मोठा फरक जाणवून देईल. तुम्ही स्वत:ला जास्त स्ट्राँग फील कराल.’’