*प्रतिनिधी

  • मी २५ वर्षीय विवाहिता आहे. लग्नाला एक वर्ष झालं आहे. आम्ही लव्ह मॅरेज केलं होतं, तरीही आम्हा पतिपत्नीमध्ये सतत भांडणं होतात. थोडीफार भांडणं तर प्रत्येक पतिपत्नीमध्ये होतात, पण जेवढे आम्ही भांडतो, तेवढे कदाचित कोणीच भांडत नसेल. आश्चर्य या गोष्टीचे आहे की लग्नापूर्वी सर्वकाही ठीक होते, पण लग्न झाले आणि परिस्थिती बदलली व माझे पतिही. मला विश्वास बसत नाही की ही तीच व्यक्ती आहे का, ज्याच्यावर मी प्रेम केलं होतं व जो माझ्या छोट्यातल्या छोट्या इच्छेचा मान राखत होता. आम्ही तासन्तास एकमेकांशी गप्पा मारायचो आणि आता तर बोलण्यासाठी काही विषय नसतो किंवा तोंड उघडलंही तरी एकमेकांवर गरळ ओकली जाते. कधी-कधी वाटते की खरंच मी माझ्या भावा-बहिणीप्रमाणे अॅरेंज मॅरेज केले असते तर किती बरं झालं असतं. ते सर्व आपल्या घरकुटुंबासोबत अनेक वर्षांपासून किती सुखी जीवन जगत आहेत आणि मी एका वर्षातच त्रस्त झाले आहे.

दोनवेळा तर पती आणि त्याच्या घरच्यांना कंटाळून मी माहेरीही निघून गेले होते. माझी समजूत काढण्यासाठी आणि घरी घेऊन जाण्यासाठी कोणीही आले नाही. दोन्ही वेळा मी स्वत:च परत गेले.

खरं तर सर्व भांडणाचे मूळ माझ्या २ नणंदा आहेत. दोघीही विवाहित आहेत, तरीही त्या आपल्या सासरी जात नाहीत आणि आमच्या घरात बस्तान मांडून बसल्या आहेत. मोठ्या नणंदेच्या विवाहाला १० वर्षे झाली आहेत आणि छोटीच्या लग्नाला ७ वर्षे झाली आहेत. लग्नापूर्वी माझे पती सांगायचे की दोघीही माझ्या लग्नानंतर लवकर आपल्या घरी जातील. आता त्या आईला मदत करायला राहात आहेत. जेव्हा आपले लग्न होईल, तेव्हा आईसाठी त्या निश्चिंत होतील. कारण घर सांभाळणारी त्यांची सून येईल ना, पण लग्नाला १ वर्ष झाले आहे आणि त्या त्यांच्या घरी जाण्याचे नाव घेत नाहीत.

दोन्ही नणंदा सासूसोबत मिळून मला त्रास देतात. एवढेच नाही, संध्याकाळी माझे पती घरी आल्यावर माझी चुगली करतात आणि आधीच त्रस्त झालेली मी जेव्हा पतिकडूनही बोलणी खाते, तेव्हा मात्र माझा धीर सुटतो. मी दिवसभराचा रागही त्यांच्यावर काढते. मानसिक त्रास झेलण्याबरोबरच मी शारीरिक रूपानेही त्रस्त आहे. मला थायरॉईड आहे, त्यामुळे मी खूप जाडी झाले आहे. परिणामी, मला गर्भधारणाही होत नाहीए. कुणास ठाऊक, मी आई बनेन की नाही.

जीवन खूप कठीण झाले आहे. लग्न करून मी काय मिळवले, हा विचार करून मी त्रस्त होते. डोके दुखू लागते. काहीही मार्ग दिसत नाही. छान राहावेसे, कुठे जावे-यावेसे वाटत नाही. घरात ३-३ महिलांनी माझं जगणं मुश्किल केले आहे. आयुष्यभर असंच कुढत जगावं लागणार का, कृपया सांगा काय करू?

आपले वैवाहिक जीवन सुखद नाहीए, याचा दोष आपल्या लव्ह मॅरेजला देऊ नका. अॅरेंज मॅरेजमध्येही समस्या येत नाहीत असे होत नाही. अडचणी बहुतेक सर्वच वैवाहिक जीवनात येतात. त्यामुळे आपल्या विवाहाचे तुलनात्मक मूल्यांकन करू नका की अॅरेंज मॅरेज केले असते, तर सुखी राहिले असते.

आपल्या प्रकरणात मुख्य मुद्दा आपल्या दोन्ही विवाहित नणंदा आहेत. एकट्या सासूबरोबरच जुळवून घेणे सुनेसाठी सोपे नसते. इथे तर ३-३ महिलांनी आपलं जगणं कठीण केले आहे. यामुळेच आपल्या पतिशी आपले संबंध खराब होत आहेत.

स्थिती कोणतीही असो, सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्याला स्वत:च्या हिंमतीवर करावा लागेल. कुठेतरी थोडंसं गोड बोलून, तर कुठेतरी निडरता दाखवत, जेणेकरून पतीच्या आई व बहिणींमुळे तुमचं नातं बिघडू नये. अर्थात, असे करणे सोपे नाहीए, पण याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाहीए. पतिसमोर आपली बाजू मांडा, पण त्यांना टोमणे मारून दोष देऊ नका. जी गोष्ट तुम्ही सामान्य राहून प्रेमाने समजावू शकता, ती भांडण करून समजावू शकत नाही. त्यांचा मूड पाहून त्यांना समजावा की त्यांच्या बहिणींनी आपापल्या घरी जाऊन राहिले पाहिजे. कारण जवळ राहिल्याने संबंध खराब होतात. उलट अंतर ठेवून राहिल्याने प्रेम वाढते.

जिथे भांडून नाराज होऊन माहेरी जाण्याची गोष्ट आहे, तर अशी चूक पुन्हा मुळीच करू नका. त्यामुळे तुमची प्रतिमा बिघडते. समस्यांवर उपाय शोधल्याने त्या दूर होतात, ना की त्यांच्यापासून दूर पळाल्याने.

आपण आपल्या आरोग्याचीही काळजी घ्या. थायरॉइडवरही उपाय करा. त्यामुळे आपण लठ्ठपणापासून काही प्रमाणात सुटका मिळवू शकता.

मातृत्वाबाबत जिथे आपली काळजी आहे, तर आपल्या लग्नाला अजून १ वर्षच झालं आहे. वेळेनुसार आपण मातृत्वसुखही प्राप्त करू शकाल.

जवळच्या एखाद्या कुटुंब कल्याण केंद्रात जाऊन यावर सल्ला घेऊ शकता. पण सर्वात आधी महत्त्वाचे आहे की आपण आपल्या हुशारीने आपली कौटुंबिक स्थिती अनुकूल बनवण्याचा प्रयत्न करा.

यासाठी आम्ही आपल्याला केवळ सल्ला देऊ शकतो, प्रयत्न तर आपल्याला स्वत:लाच करावे लागतील. सकारात्मक विचार बाळगा, हिंमत आणि धैर्याने समस्यांचा सामना करा, मग तो दिवस दूर नाही जेव्हा आपण सर्व समस्यांतून मुक्त होऊन आपले वैवाहिक जीवन सुखी बनवलेलं असेल.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...