* मनीषा कौशिक
कोणत्याही घरातील स्वयंपाकघर पाहुण्यांचे स्वागत करण्यात व कुटुंबातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडते. इथे सादर आहेत, स्वयंपाकघराला सुविधापूर्ण बनवण्यासाठी सल्ले :
- घरातील अन्य कोपऱ्यांतील साफसफाईबरोबरच स्वयंपाकघरातील सफाईही खूप आवश्यक आहे. स्वयंपाकघरात वापरात येणाऱ्या सर्व वस्तूही बाहेरून आणि आतून स्वच्छ होणे आवश्यक आहे. सर्व उपकरणे, शेल्फचे खण, भांडी ठेवण्याचे होल्डर इ. चांगल्याप्रकारे स्वच्छ केले पाहिजेत. विशेषत: खण आणि कॅबिनेटमध्ये ठेवलेल्या वस्तू वेळोवेळी बाहेर काढून साफ करणे खूप आवश्यक आहे.
- स्वयंपाकघरातील खाण्या-पिण्यापासून इतर कामी वापरात येणाऱ्या वस्तूंच्या उपयुक्ततेच्या क्रमबध्दतेनुसार, कॅबिनेट किंवा त्यासाठी बनवल्या गेलेल्या उपयुक्त ठिकाणी त्या ठेवल्या पाहिजेत. कोणकोणत्या वस्तू सारख्या उपयोगात येतात आणि कोणकोणत्या कधीतरी हे लक्षात घेतले पाहिजे. त्यानुसार त्या लक्षात घेऊन स्टोरमध्ये ठेवल्या पाहिजेत. उदा. सतत वापरात येणाऱ्या वस्तू आपल्याजवळ, तर कधीतरी कामी येणाऱ्या वस्तूंना थोडे लांब ठेवले पाहिजे.
- प्रत्येक वस्तू सहज हाताला सापडेल अशी ठेवली पाहिजे आणि ती चांगल्याप्रकारे साफ झाली पाहिजे. परंतु ती जवळ ठेवण्यापूर्वी हे निश्चित केले पाहिजे की तिची उपयुक्तता किती आहे. उदाहरणार्थ, जर नाश्त्याला तुम्ही टोस्टब्रेड खात असाल, तर टोस्टर स्वयंपाकघराच्या काउंटरच्या बरोबर खाली ठेवला पाहिजे, जेणेकरून तो सहजपणे लगेचच काढता येईल.
- आवडत्या आणि नेहमी कामी येणाऱ्या जेवण बनवण्याच्या वस्तूंमध्ये विशेषत: खाद्यपदार्थ एकत्र ठेवले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा वापर करतेवेळी सहजपणे निवडता येतील. अर्थात त्या वेगळ्या भांड्यात ठेवल्या पाहिजेत, जेणेकरून वापर करताना अडचण येणार नाही व जिरे आणि ओव्यासारख्या वस्तू सहजपणे मिळू शकतील.
- शेल्फमध्ये वस्तू कडेला ठेवाव्यात. आवश्यकतेनुसार आणि एकसारख्या वस्तूंच्या हिशोबाने नीटनेटक्या ठेवल्या पाहिजेत. मोठ्या आणि लांबट वस्तू मागच्या बाजूला, तर आकार व साइजने छोट्या वस्तूंना पुढे ठेवले पाहिजे. ट्रे असलेले रॅक, भांडी ठेवण्याचे वेगवेगळे खण असलेले होल्डर आणि खुंट्या असलेले शेल्फ भांडी ठेवण्यासाठी वापरले पाहिजेत.
- स्वयंपाकघरात काम करताना नजरेसमोर काय-काय ठेवले पाहिजे, हे निश्चित केले पाहिजे. ज्या वस्तूंचा वापर केला जाणार नाहीए, त्या हटवल्या पाहिजेत. जर एखादी वस्तू तुटलेली असेल तर ती तत्काळ दुरुस्त केली पाहिजे आणि निरुपयोगी ठरत असेल तर अशा वेळी ती फेकून नवीन आणली पाहिजे. भाजी वगैरे कापण्यासाठी वापरात येणाऱ्या चाकूची धार चांगली असली पाहिजे.
- जर स्वयंपाकघरात गरजेपेक्षा जास्त रद्दी पेपर किंवा मग निरूपयोगी सामान गोळा झाले असेल तर ते स्टोअरमध्ये ठेवले पाहिजे.
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...
गृहशोभा से और