* शैलेंद्र सिंह

फॅशन, मॉडेलिंग आणि अभिनयासाठी पूर्वी स्त्रियांचे वय २० ते ३० पर्यंतच योग्य मानले जात होते. पण आता ३५ व्या वर्षांनंतरही स्त्रिया स्वत:ला एखाद्या मॉडेल किंवा अभिनेत्रीपेक्षा कमी समजत नाहीत. संधी मिळाल्यावर चंदेरी पडद्यापासून ते रॅम्प शो, कॅटवॉक आणि मॉडेलिंगमध्येही त्या सेकंड इनिंगची मजा घेत आहेत.

हा बद्दल फक्त बॉलिवूडपर्यंतच मर्यादित राहिला नसून लहान मोठ्या शहरातील घरगुती स्त्रियासुद्धा यामध्ये मागे राहिलेल्या नाहीत. यामुळेच देशात सौंदर्य, फॅशनेबल कपडे आणि वेलनेसचा व्यवसाय सर्वात अग्रेसर आहे.

हेमामालिनी, माधुरी दिक्षित, मलायका अरोरा, काजोल, जुही चावलाच नाही तर लहान मोठ्या शहरात राहणाऱ्या स्त्रियासुद्धा आता वयाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आधीपेक्षाही चांगले काम करत आहेत. फिटनेस आणि सौंदर्य पाहता त्या आधीपेक्षाही अधिक सुंदर आणि ग्लॅमरस दिसू लागल्या आहेत. हेच कारण आहे की हल्ली लहान मोठ्या सर्वच शहरात ‘मिसेस’ म्हणून वेगलेगळ्या स्पर्धांचे आयोजन होऊ लागले आहे. लग्नानंतर स्त्रिया इतर काही सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय असत. आता फॅशन, ब्युटी, रॅम्प शो आणि मॉडेलिंगमध्येही त्या त्यांचे सौंदर्य आणि फिटनेसची कमाल दाखवत आहेत.

याबद्दल मिळालेल्या माहितीवरून समजते की लग्नानंतर करिअर, कुटुंब, मुलांचे ताणतणाव यामुळे स्वातंत्र्यावर गदा यायची. ३५ व्या वर्षी किंवा त्यानंतर साधारणत: सर्व बाबी सुरळीत झालेल्या असतात आणि मानसिकदृष्ट्या थोडी मोकळीक मिळालेली असते आणि याच कारणामुळे हल्लीच्या काळात महिला वयाच्या दुसऱ्या टप्प्यात जास्त सक्रिय दिसू लागल्या आहेत.

आणि हे फक्त रॅम्प आणि ब्युटी शो पुरतं मर्यादित नाही. आज हॉटेलांमध्ये होणाऱ्या पार्ट्यां पाहिल्या तर कळून येते की सर्वात जास्त पार्ट्यांचे आयोजन स्त्रियांकडूनच केलेले असते. त्याच अयोजक असतात आणि त्याच सहभागीसुद्धा होतात. आधी किट्टी पार्टी फक्त तंबोला खेळण्यापुरतीच मर्यादित होती. पण आता किट्टी पार्टी  ग्लॅमरस होऊ लागली आहे. यामध्ये थीम पार्टीचे आयोजन केले जाते. पार्टीची थीमसुद्धा काही अशाप्रकारे ठरवली जाते की त्यामध्ये महिला त्यांचा फिटनेस आणि सौंदर्यही दाखवू शकतील. थीम पार्टीमध्ये पूलपार्टीसुद्धा असते. तिथं महिला स्विमवेअर परिधान करून येतात. कधी तर स्कर्ट घालून येण्याची वेगळी थीम बनते. थीम पार्टीमध्ये जेव्हा विजेत्यांची निवड होते, तेव्हा कुणाचा स्कर्ट किती शॉर्ट होता, कोणी कशाप्रकारचे स्विमवेअर घातले होते हेही पाहिले जाते.

फिटनेसची कमाल

फिटनेसमुळे महिलांमध्ये हा बदल घडून आला आहे. फिटनेसचे प्रमाण पाहिले तर पुरूषांपेक्षा स्त्रियाच आपल्या फिटनेसवर जास्त लक्ष देऊ लागल्या आहेत. जिमपासून ते ब्युटी पार्लरपर्यंत आणि स्किन स्पेशालिस्ट डॉक्टरांपासून ते प्लॉस्टिक सर्जनपर्यंत या स्त्रिया फेऱ्या मारू लागल्या आहेत. त्यांच्या याच मानसिकतेमुळे आज सौंदर्य आणि फिटनेससाठी मदत करणाऱ्यांचा व्यवसाय भरभराटीस आला आहे. कुठल्याही महिलेला हल्ली जरा जरी फॅट वाढले तरी त्यांना भीती वाटू लागते आणि मग त्या काहीही करून स्वत:चे वजन कमी करण्याचा प्रयत्न करू लागतात. माधुरी दिक्षित, मलायका अरोरा, काजोल, जूही चावला अशा स्त्रिया यांच्या आदर्श असतात. त्यांना पाहून त्या स्वत:ला त्यांच्याप्रमाणे बनवू पाहतात.

लोभसवाणी सेकंड इनिंग

लग्नाच्या २० वर्षांनंतर मिसेस यूनिवर्सपर्यंत मजल मारणाऱ्या रश्मि सचदेवा पहिल्या नॉन बॉलिवूड सेलिब्रिटी बनल्या, ज्यांना कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये रेड कारपेटवर वॉक करण्याची संधी मिळाली.

त्या म्हणतात, ‘‘जर आम्ही थोडे मागे वळून पाहिले तर आम्हांलाही जाणीव होते की आम्ही आधीपेक्षा जास्त सुंदर दिसत आहोत. हा फरक आमच्यात निर्माण झालेल्या आत्मविश्वासामुळे झाला आहे. आज आम्ही निरनिराळे डिझायनर ड्रेस घालू शकतो. आम्हांला असे कधीही वाटत नाही की आम्ही आजाच्या काळातील मॉडेलपेक्षा फिटनेसमध्ये कुठेही कमी आहोत. जे ड्रेस त्या परिधान करतात, आम्हीही तसे ड्रेस परिधान करू शकतो. त्यांच्या आमच्या साइजमध्येही काही फरक आढळत नाही.

‘‘मी पूर्ण भारतात वेगवेगळ्या ठिकाणी सेलिब्रिटी म्हणून गेले आहे. प्रत्येक ठिकाणी मी तेथील महिलांशी बोलले. त्यांचे विचार ऐकले तर आढळले की हा बदल घरोघरी झालेला आहे. त्या महिला रॅम्पवर जरी नसल्या तरी घरातही त्या आधिक सुंदर व फिट राहू लागल्या आहेत. याचे सर्वात मोठे कारण आहे मिडिया. विशेषकरून महिलांमध्ये वाचली जाणारी मासिके. ज्यामुळे हा बदल शक्य झाला आहे. घरोघरी झालेल्या जागरूकतेमुळे प्रत्येक महिलांची सेकंड इनिंग अधिक सुंदर झालेली आहे आणि यामुळेच कापड व्यवसायात मोठा बदल घडून आलेला आहे. तिथे डिझायनर त्यांना डोळ्यांसमोर ठेवून ड्रेस तयार करू लागले आहेत.’’

फिटनेसपासून सर्जरीपर्यंत

पूर्वी अनेक प्रकारच्या समस्यांमुळे महिला फॅशन करिअरमध्ये येण्यास बिचकत असत. पण आता फिटनेसपासून ते सर्जरीपर्यंत अनेक असे उपाय आहेत, ज्यामुळे मनाप्रमाणे सौंदर्य मिळवता येऊ शकते. आता शरीरातील कुठल्याही भागात जमा असलेले फॅट काढून टाकता येणे शक्य आहे. जसे, हिप्स, ब्रेस्ट, वेस्ट आणि हाताजवळील फॅटमुळे शरीर बेढब होते. हे दूर केले जाऊ शकते. अंडर आर्म, लिप्स आणि आयब्रोपासून ते स्माइल म्हणजेच हसण्यातही सुधारणा केली जाऊ लागली आहे आणि यामुळे वयाचा परिणाम स्वत:वर दिसूनच येत नाही. बऱ्याचशा महिलांना सेकंड इनिंगमध्येही हिप्स, ब्रेस्ट, वेस्ट, अंडरआर्म्स, लिप्स किंवा आयब्रोजसारख्या बाबी योग्य करून घेण्यासाठी डॉक्टरांकडे जाण्याची गरज नसते. अनेक प्रकारच्या व्यायामांनीच सर्व ठिक होऊन जाते.

सौंदर्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की पूर्वी लग्न आणि विशेषत: आई बनल्यानंतर शरीराच्या काही भागांचा कसाव नष्ट होत असे. आता फिटनेस आणि डाएट एक्सपर्ट यांच्या मदतीने या सर्व बाबी टाळता येऊ शकतात. आता लग्नानंतरही आई बनल्यानंतर महिला त्यांच्या मुलांना व्यवस्थितपणे ब्रेस्ट फिडिंग करतात आणि त्याचा परिणामही दिसत नाही. इतकेच नाही तर ब्रेस्ट आणि वेस्ट या भागात पडणारे स्ट्रेच मार्क्स नष्ट करता येतात.

गर्भावस्थेदरम्यानसुद्धा असे उपाय करता येऊ लागले आहेत. यामुळेच स्ट्रेच मार्क्स कमी प्रमाणात तयार होतील, असे उपाय आधी महागडे होते आणि सर्वत्र उपलब्ध नव्हते. पण आता तसे नाही. हे उपाय स्वस्त आणि सर्वत्र उपलब्ध आहेत.

फिगरची कमाल

ही बाब फक्त फॅटस्ची नाही. जर तुमची ब्रेस्ट, हिप्स आणि वेस्ट योग्य त्या आकारात नसतील तर त्यांची रचना योग्य केली जाऊ शकते. लहान ब्रेस्ट सुडौल केली जाऊ शकते. ज्यामुळे तुम्ही रॅम्प आणि मॉडेलिंग दरम्यान असा प्रत्येक ड्रेस परिधान करू शकता, जो एखादी नवी मॉडेल परिधान करू शकते. अंडरआर्म्सबद्दल थोडा संकोच असतोच, पण आता यासाठी विचार करण्याची गरज नाही. अंडरआर्म्सच्याखाली जमा झालेले फॅटही काढून टाकले जाऊ शकते. आणि तेथील डार्कनेसही कमी करता येणे शक्य आहे. शॉर्ट ड्रेसच नाही तर गृहिणी आता थिमवेअरसुद्धा आत्मविश्वासाने वापरू लागल्या आहेत. पूर्वीपेक्षा आता हॉटेलांमध्ये जास्त प्रमाणात स्विमिंग पूल बनले आहेत. इथे येणाऱ्यांमध्ये स्त्रियांची संख्या सर्वात जास्त असते. यावरून कळून येते की स्त्रिया त्यांच्या फिगरच्या बाबतीत किती सजग झाल्या आहेत.

आई बनल्याने करिअर संपुष्टात येत नाही

दिवसभर क्लिनिकमध्ये रूग्णांच्या समस्येला तोंड देणाऱ्या डॉ. मेघना सांगतात, ‘‘माझे लग्न ३० व्या वर्षी झाले. त्याचवेळी मी माझे करिअर सुरू केले. तो काळ माझ्यासाठी आव्हानात्मक होता. कारण कुटुंब आणि करिअरमध्ये ताळमेळ बसवणे खूप गरजेचे होते. यानंतर मुलगी झाल्यानंतर दिनचर्या थोडी डगमगली. मी इतर स्त्रियांप्रमाणे फिटनेस बाबतीत निष्काळजी राहू लागले.

‘‘मग मी लवकरच स्वत:ला बदलले आणि नियमित व्यायाम मेडिटेशन करू लागले आणि याचा फायदा मला माझ्या करिअरमध्येसुद्धा दिसू लागला. माझ्याकडे अनेक असे रूग्ण येतात, जे माझ्यापेक्षा वयाने १०-१२ वर्षं लहान असतात. पण फिटनेसमुळे मी त्यांच्यापेक्षा खूप लहान दिसते. मुलगी झाल्यानंतर माझे कुटुंबही पूर्ण झाले.

‘‘आई झाल्यानंतर मला कधीच हे जाणवले नाही की माझे वय ४० पेक्षा जास्त झाले आहे. कारण आजही मी स्वत:वर प्रेम करते. मी मुलीच्या संगोपनात स्वत:ला हरवू दिले नाही. आज सेकंड इनिंगमध्येसुद्धा माझ्यात तोच उत्साह आणि आत्मविश्वास आहे जो माझ्यात लग्नाआधी मला जाणवायचा. लग्न झाल्याने आणि आई बनल्याने कोणाचेही करिअर आणि ग्लॅमर संपुष्टात येत नाही.’’

शहरांमध्ये वेगाने लेडीज जिम सुरू झाल्या आहेत. इथे स्त्रिया वर्कआऊट करून स्वत:ला फिट ठेवतात. हे गरजेचे नाही की प्रत्येक स्त्रीला रॅम्पवॉक करायला पाहिजे किंवा तिला चित्रपट किंवा मॉडेलिंगच करायची असेल. हे मात्र नक्की की ती आज तिच्या कुटुंबाची साथ देते, व्यवसाय सांभाळते आणि यामुळेच तिला फिट राहाणे आवडू लागले आहे. हल्लीच्या काळात साडी आणि नेहमीचे पंजाबी ड्रेस बाद झाले आहेत. आता महिलांना डिझायनर ड्रेस आवडू लागले आहेत. पंजाबी ड्रेसही डिझायनर झाले आहेत.

फिटनेस हल्लीच्या महिलांची मोठी गरज बनली आहे आणि अशात त्या त्यांच्या आयुष्यातील सेकंड इनिंगमध्ये वेगाने पुढे चालल्या आहेत. सोशल मिडियानेही याला पाठिंबा दिला आहे आणि त्यामुळे महिला त्यांची फिगर आणि फिटनेस बाबतीत जास्त जागरूक राहू लागल्या आहेत. यात त्या कुठलीही तडजोड करत नाहीत.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...