* डॉ. यतीश अग्रवाल

प्रश्न : मी ५३ वर्षांची आहे. बँकेत ऑफिसर आहे. माझ्यावर कामाचा खूप ताण असतो. कदाचित म्हणूनच माझं ब्लडप्रेशर वाढत आहे. माझ्या लक्षात येतयं की गेल्या २-३ वर्षांपासून हिवाळ्यात जास्त वाढतं. घरी मुलं व नवरा माझी थट्टा करतात की असं काही वसंत ऋतुप्रमाणे ब्लडप्रेशर कमी जास्त होत नाही. पण मला भुक लागली की खायची सवय आहे. कृपया मला सांगा की हिवाळ्याचा ब्लडप्रेशर वाढण्यासाठी काही संबंध आहे का? जर असेल तर ते सामान्य ठेवण्यासाठी काय उपाय करावे जेणेकरून माझं आरोग्य मला सुहृढ राखता येईल.

उत्तर : नक्कीच हिवाळ्यात काहीचं ब्लडप्रेशर वाढू शकतं. उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात कित्येकाचं ब्लडप्रेशर ६-७ ते १० अंकांनी वाढत असतं असं वैद्यकीय संशोधनात (क्लिनिकल संशोधनात) आढळलं आहे. जर ब्लडप्रेशर वाढून १४० अंक सिस्टॉलिक व ९० अंक डायस्टॉविकच्यावर गेलं तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने योग्य पावलं उचलावी.

ब्लडप्रेशर वाढणं हे तब्येतीला हानिकारक आहे. शरीरातील नसांवर अतिरिक्त दबाव पडल्याने हृदय, किडणी, मेंदू व डोळ्यांचा पडदा यावर हळूहळू परीणाम होऊ शकतो.

ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी काही उपयुक्त औषधांशिवाय जीवनशैलीत बदल करायची गरज आहे. समतोल आहारत मीठाचा कमी वापर, नियमित व्यायाम व वजनावर नियंत्रण असायला हवं.

जर सकाळी उठल्यावर डोक्याचा मागचा भाग जड वाटत असेल तर ब्लडप्रेशर जास्त आहे असे मानावे व लगेच ब्लडप्रेशर मोजून घ्या. वाढलं असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांनी जर तुम्हाला औषधाचा डोस वाढवून दिला तर त्यात चालढकल करू नका. उलट लगेच सुरू करा. कधीकधी एखादं छोटंसं जास्तीचं औषध घ्यावं लागतं.

हिवाळ्यात काही लोकांचं ब्लडप्रेशर वाढतं कारण ते जेवणात अधिक मीठ वापरतात. त्यामुळे दिवसभरात ५ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये.

ताजी फळं, पालेभाज्या भरपूर खा. शुद्ध दुधाऐवजी स्प्रेटा दुध प्या. जेवणात सॅचुरेटेड फॅट्स कमी करा.

काही रूग्णांमध्ये सकाळी सकाळी ब्लडप्रेशर जास्त आढळते. जर तुमचं असं असेल तर औषधांची वेळ बदलण्याची गरज आहे. काही औषधं सकाळी तर काही संध्याकाळी घेऊन ब्लडप्रेशर नियंत्रणात आणता येतं. याबाबतीत तुम्ही डॉक्टरांना विचारा.

तुमच्या कार्यशैलीतला बदल तुमचा ताण कमी करू शकेल. हसण्या खेळण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी वेळ येण्याची गरज आहे. शिवाय एकत्र व्यायाम, ध्यान, वगैरे हे ताण कमी करण्याचे उत्तम उपाय आहेत.

प्रश्न : माझं वय ४४ वर्षं आहे. मला मासिक पाळीच्या काही दिवस आधी स्तनांमध्ये जडत्त्व व वेदना जाणवतात. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर आहे की काय असं वाटतं. माझ्या मावशीला हा रोग झाला होता. त्यामुळे लहान वयातच ती वारली. आता मी काय करायला हवं?

उत्तर : तुमची मावशी ब्रेस्ट कॅन्सरने गेली. त्यामुळे तुमच्या मनात भीतीचा आजाराप्रति असणं स्वाभाविक आहे. परंतु ज्याप्रकारे मासिक पाळीबरोबर स्तनांमध्ये होणारे बदल तुम्ही सांगता आहात, ते मला फायब्रोयडिनोसिस किंवा फायब्रोसिस्टिक ब्रेस्ट डिसीज याची लक्षणं वाटतात. यात मासिकपाळीच्या ३-४ दिवस आधी वेदना सुरू होतात व स्त्राव सुरू झाल्यावर थांबतात. स्तनांच्या हालचालीबरोबर वेदना वाढतात. हे मासिकपाळीच्या चक्राबरोबर होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे प्रेरीत होतं. त्याचा ब्रेस्ट कॅन्सरशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काहीही संबंध नाही.

वेदना कमी करण्यासाठी तुम्ही काही छोटेछोटे उपाय करू शकता. आधी तर दिवसभर २४ तास ब्रेसिअर घालून राहा. ज्यामुळे स्तनांना आधार मिळतो. तरीही    वेदना जाणवल्या तर एखादं सौम्य वेदनाशमक औषध उदा. पॅरासिटामोल, इबुप्रोफेन घ्या. तरीही फायदा झाला नाही तर एखाद्या सर्जनला भेटा. गरज असेल तर व्हिटॅमिन ई व हारर्मोनल औषधांनी बरं वाटेल.

तुमच्या मावशीला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. तुमचं याबाबतीत जागृत असणं चांगलं आहे. त्यामुळे दर महिन्याला तुम्ही तुमच्या ब्रेस्टची स्वयंतपासणी नियमितपणे करणं फारच उत्तम ठरेल. बेडवर झोपून किंवा आरशासमोर उभं राहून दोन्ही स्तनांमध्ये गाठ, त्वचेतील बदल व स्तनाग्रातील बदल यांचं निरिक्षण करा. थोडा जरी संशय आला तर ताबडतोब तपासणी करा. चालढकळ करू नका. वेळेत उपचार घेतल्याने कितीतरी केसेसमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं मुळासकट निर्मुलन झालं आहे.

आपण वजन, आहार यांचा नेहमी समतोल ठेवा. लठ्ठपणा, जंकफूड, तळलेले पदार्थ, मांसाहार वगैरे ब्रेस्ट कॅन्सरला आमंत्रण देऊ शकतात. तुमच्याकडे असा इतिहास आहे (मावशीचा) तुमच्या कुटुंबात आधीच हा रोग आहे त्यामुळे या रिस्कला अधिक वाढू न देणंच योग्य आहे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...