* डॉ. अंजलि मिश्रा
भारतीय महिला मासिक पाळीशी संबंधित गोष्टींवर आजही खुलेपणाने बोलणं टाळतात. बहुधा याचमुळे भारतीय महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरनंतर सर्व्हाइकल कॅन्सर दुसरा सर्वसाधारण कॅन्सर बनून समोर येतोय.
कसा होतो
* सर्विक्स गर्भाशयाचा भाग आहे, ज्यात सर्व्हाइकल कॅन्सर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही)च्या संक्रमणाने होतो.
* हे संक्रमण साधारणपणे शारीरिक संबंधांनंतर होते व या आजारात अनियमित रुपाने सेल्स वाढू लागतात.
* यामुळे योनीमध्ये रक्त येणे बंद होणे व संबंधांनंतर रक्तस्त्राव यासारख्या समस्या निर्माण होतात.
लक्षणे
साधारणपणे सुरुवातीला याची लक्षणे ठळकपणे समोर येत नाहीत, परंतु जर थोडीशी सावधगिरी बाळगली तर याची लक्षणे ओळखता येऊ शकतात :
* नियमित मासिक पाळीच्या दरम्यान रक्तस्त्राव होणे, संभोगानंतर रक्तस्त्राव होणे.
* पाण्यासारख्या दुर्गंधीयुक्त पदार्थाचे जास्त प्रमाणात स्त्रवणे.
* जेव्हा कॅन्सरच्या पेशी पसरू लागतात, तेव्हा ओटीपोटात वेदना होऊ लागतात.
* असामान्य अतिरक्तस्त्राव होणे वजन कमी होणे, थकवा जाणवणे व अॅनिमियाची समस्या ही देखील लक्षणे असू शकतात.
कॅट्रोल करण्याचे व्हॅक्सिन व टेस्ट
* तसे तर सुरुवातीला सर्व्हाइकल कॅन्सरची लक्षणे दिसून येत नाहीत, परंतु याला थांबवण्यासाठी व्हॅक्सिन उपलब्ध आहे, ज्यामुळे जवळपास ७० टक्केपर्यंत बचाव होऊ शकतो.
* नियमितपणे तपासणी केली गेली, तर सर्व्हाइकल कॅन्सरची लक्षणे ओळखता येऊ शकतात.
* आजाराचे निदान करण्यासाठी साधारणपणे पॅप स्मीअर टेस्ट केली जाते, या टेस्टमध्ये प्री कॅन्सर सेल्सची तपासणी केली जाते.
* एलबीसी टेक्निकच्या अॅडव्हान्स वापरामुळे सर्व्हाइकल कॅन्सरची तपासणी करण्यात सुधारणा झाली आहे.
उपचार
* जर सर्व्हाइकल कॅन्सरचे निदान सुरुवातीच्या स्टेजला केले, तर वाचण्याची शक्यता ८५ टक्क्यांपर्यंत असते.
* तसे तर सर्व्हाइकल कॅन्सरचा उपचार या गोष्टीवर अवलंबून आहे की कॅन्सर कोणत्या स्टेजला आहे. सर्वसाधारणपणे सर्जरीद्वारे गर्भाशय काढले जाते व जर आजार अगदीच अॅडव्हान्स्ड स्टेजला असेल, तर केमोथेरपी व रेडिओथेरपीदेखील दिली जाते.
सावधानता आहे गरजेची
* डॉक्टरकडून सल्ला घेऊन अँटी सर्व्हाइकल कॅन्सरच्या लसी घ्याव्यात.
* महिलांनी विशेषत: व्यक्तिगत स्वच्छतेकडेदेखील लक्ष दिले पाहिजे, कारण जननेंद्रियांची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे.
* मासिक पाळीत चांगल्या प्रतीच्या सॅनिटरी नॅपकिनचा वापर केला पाहिजे.
* वेळीच डॉक्टरांशी संपर्क करणे कॅन्सरच्या उपचारांवरील सगळयात महत्त्वाचे पाऊल आहे. त्यामुळे शरीरातील बदलांना दुर्लक्षित करू नये.
महत्त्वपूर्ण तथ्य
स्पष्ट शब्दांमध्ये सांगायचे, तर जगातील विकसित देशांमध्ये १०० पैकी एका स्त्रीला आयुष्यात सर्व्हाइकल कॅन्सर होतो, तर भारतात ५३ स्त्रियांपैकी एकीला हा आजार होतो. म्हणजे भारतीय आकडेवारीनुसार जवळपास अर्ध्याचा फरक आहे.
अन्य कारणे
* लहान वयात संभोग करणे.
* एकापेक्षा जास्त पार्टनरसोबत
* शारीरिक संबंध ठेवणे.
* अॅक्टिव वा पॅसिव्ह स्मोकिंग.
* सातत्याने गर्भनिरोधक औषधांचा
वापर.
* रोग प्रतिकार शक्ती कमी होणे.