* पूनम अहमद
ऑफिसच्या कपडयांमध्ये चांगले दिसल्याने केवळ कौतुकच होत नाही तर आत्मविश्वासही वाढतो. एखाद्या स्मार्ट, कामासाठी योग्य आणि ट्रेंडी परिधान केल्याने व्यक्तिमत्व खुलते. पूर्वी महिलांना ऑफिसमध्ये साडी किंवा सूट घालणे आवडायचे पण आता नाही. आज त्या आपल्या ऑफिसच्या लुकमध्ये नव-नवीन गोष्टींचा प्रयोग करू इच्छित आहेत.
व्यावसायिक तसेच स्टायलिश दिसण्यासाठी खालील टीप्सचा विचार करा :
- आपल्या ऑफिसमध्ये आपल्याला जीन्स घालण्याची परवानगी असल्यास पांढऱ्या शर्टसह ब्लू जीन्स आणि ब्लॅक ब्लेझर घाला. हाय हील किंवा पीप टोजने आपण खूप स्मार्ट दिसाल. हे प्रासंगिक आणि व्यावसायिक दोन्ही स्वरूप आणेल.
- प्लेन ब्लाउजसह स्ट्रीप प्लाझा खूप छान दिसतो पण तुम्हाला सिंगल कलरचा प्लाझा घालायचा असेल तर त्यास प्रिंट केलेल्या ब्लाऊजसह परिधान करा. एखाद्या महत्त्वपूर्ण मीटिंगला किंवा प्रेजेंटेशन डेला ही प्लाझा पॅन्ट आणि ब्लाउज घालता येऊ शकतो.
- आपल्याला परिपूर्ण कॉर्पोरेट लुक हवा असल्यास व्हाइट शर्टसह ब्लॅक सूट वापरुन पहा. अगदी व्यावसायिक महिला दिसाल आणि याची फॅशन कधीच आऊट होत नाही.
- फॉर्मल लुकसाठी, चांगल्या फॉर्मल टॉपसह पँट घाला. पातळ लेदर बेल्ट आणि हाय हिलसह खूप छान दिसाल.
- लांब कुर्ती आणि सिगरेट पँट वापरुन पहा. हा ड्रेस त्यांच्यासाठीच आहे, ज्यांना इंडो-वेस्टर्न फॉर्मल लुक हवा आहे. वेस्टर्न टच असलेले हे भारतीय रूप चांगले दिसते. काही वर्षांपासून सिगरेट पँट फॅशनमध्ये आहे आणि लांब कुर्ती तर सदाफुली आहे.
- बिजनेस वूमन लुकसाठी, फॉर्मल शर्ट आणि ब्लेझरसह पेन्सिल स्कर्ट घाला, तसेच पेन्सिल हिल पंप आणि कमीतकमी अॅक्सेसरीज घाला.
- कॅज्युअल ड्रेसाठी रंगीबेरंगी पोलो नेक टी-शर्टसह एकल रंगाचा फॉर्मल ट्राउजर घाला. ब्राइट कलरचा टी-शर्ट आउटफिटला आकर्षक बनवेल.
- आजच्या युगात, तरुणांना जीन्ससह कॅज्युअल शॉर्ट किर्ती खूप आवडतात. आजकाल, बहुतेक कॉर्पोरेट घरांमध्ये कंफर्टेबल ड्रेसिंगवर जोर देण्यात येत आहे. हा इंडो-वेस्टर्न पोशाख खूप लोकप्रिय आहे. आपण त्यास सूती स्कार्फसह परिधान करू शकता.
- सलवार सूटमध्ये जवळजवळ प्रत्येक स्त्री चांगली दिसते. आपल्या ऑफिसच्या खास प्रसंगासाठी, काही पेस्टल रंगाचे सलवार सूट सॉर्ट करून ठेवा. भले सूती सूट असो वा रेशमी फॅब्रिक, त्यात चांगले दिसाल. पारंपारिक भारतीय हातमाग प्रिंट्सदेखील घातले जाऊ शकतात. यात स्टायलिश आणि व्यावसायिक दिसाल.
ऑफिस लुकसाठी अतिरिक्त सूचना
- आजकाल बहुतेक कॉर्पोरेट घरे कॅज्युअल ड्रेस कोडचे पालन करतात. तरीही मीटिंगसाठी किंवा महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी फॉर्मल ड्रेस घातला पाहिजे.
- प्रत्येक शनिवारी व रविवारी स्वत:ला तयार करण्यासाठी थोडा वेळ घालवा. नियमितपणे पेडीक्योर, मॅनीक्योर, वॅक्सिंग व आयब्रोजसाठी जावे.
- जे आपल्या शरीराचा प्रकार आणि शैलीस अनुरूप असेल तेच खरेदी करा. एखाद्या फॅशन मासिकामध्ये एखाद्या मॉडेलला परिधान केलेले पाहुन खरेदी करू नका. तोच पोषाख परिधान करा, जो आपल्यावर परिपूर्ण दिसेल आणि ज्याने आपण गॉर्जियस दिसाल.
- असे काही खरेदी करा, जे वेगवेगळया कपडयांसह परिधान करून वेगवेगळया प्रकारे छान दिसाल. उदाहरणार्थ एखादा असा टॉप खरेदी करा, जो जीन्स, ट्राउजर किंवा अगदी स्कर्टसहदेखील चांगला दिसेल.
- ऑफिससाठी परिधान करण्यात येणारे कपडे अधिक सैल किंवा फार घट्ट नसावेत. चुकीच्या फिटिंगच्या कपडयात आपण अस्वस्थ राहाल आणि चांगलेही दिसणार नाहीत, म्हणून आपल्यास अनुकूल असे काहीतरी घाला.
- कार्यालयात व्यवस्थित प्रेस केलेले कपडे घाला. एक महाग परंतु दुमडलेला पोशाख संपूर्ण लुक खराब करेल.
- लाउड मेकअप करू नका आणि बिझनेस सूटसह चंकी दागिने घालू नका अन्यथा पोशाखाचा संपूर्ण लुक खराब होईल. ऑफिससाठी कमीतकमी मेकअप करा आणि अॅक्सेसरीजसुद्धा कमी घाला.
- कामावर जात असताना जसे चांगले कपडे घालणे आवश्यक आहे, चांगले शूज घालणेदेखील तितकेच महत्वाचे आहे. जर शूज आउटफिट्समध्ये न जुळले तर सर्व व्यक्तिमत्व वाईट दिसेल. शूज स्वच्छ आणि पॉलिश केलेले असले पाहिजेत. काळे शूज, सँडल आणि न्यूड पंप चांगले दिसतात. जर तुम्हाला काही ब्राइट घालायचे असेल तर निश्चित करा की ते पोषाखाच्या रंगसंगतींसह संयोजित होत आहे.
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...
गृहशोभा से और