* रोचिका शर्मा
उद्या सोहाला दरमहा होणाऱ्या तिच्या किट्टी पार्टीला जायचे आहे, म्हणून घरातील कामे पूर्ण करून ती सलूनला निघून गेली. तसे ती दरमहा वॅक्स, हेअर कट, आयब्रोज करते, परंतु यावेळी किट्टी रॅट्रो थीमवर आयोजित केली जात आहे, म्हणूनच तिला ७०-८० च्या दशकातील अभिनेत्रीसारखे काहीसे खास तयार व्हायचे आहे. त्या काळात केशरचनेवर विशेष भर दिला जात असे. म्हणून जेव्हा सलूनमध्ये गेल्यानंतर तिने केशरचनेबद्दल चर्चा केली तेव्हा त्यांनी विविध प्रकारच्या स्टाइल दाखवल्या आणि दुसऱ्या दिवशी येण्याचा वेळ निश्चित केला.
सदस्यता आणि सवलतीचा लोभ
‘‘मॅडम, तुम्ही किट्टी पार्टीची तयारी करतच आहात तर मग आमचा नवीन डायमंड फेशियल का करून घेत नाहीत? एकदा केल्यानेही खूप चमकेल,’’ सलूनमध्ये काम करणारी मुलगी म्हणाली.
‘‘या फेशियलमध्ये काय विशेष आहे?’’ सोहाने विचारले.
‘‘मॅडम, हा टॅन रिमूव्हिंग फेशियल आहे. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील टॅन बरोबरच मृत त्वचादेखील दूर होईल, ज्यामुळे चेहऱ्यावरील डागही कमी होतील. त्यामुळे चेहरा चमकदार होईल. एकदा करून तर पहा.’’
‘‘या फेशियलचा दर काय आहे?’’
‘‘मॅडम काही खास नाही, फक्त रू. २,२००.’’
‘‘हे तर खूप महाग आहे?’’
‘‘मॅडम, आपल्याकडे सलूनची सदस्यता आहे का?’’
‘‘नाही, पण का?’’
‘‘मॅडम, तुम्ही सदस्यत्व घ्या. आम्ही सदस्यांना सवलत देतो. जेव्हा-जेव्हा आपल्या संपूर्ण कुटुंबातील एखादा सदस्य आमच्याकडून सेवा घेईल तेव्हा आम्ही त्याला सूट देऊ आणि आजच्या फेशियलमध्येही तुम्हाला २० टक्के सवलत मिळेल.’’
सोहा काय करावे या पेचात पडली होती. तेवढयात समोरच्या आरशामध्ये तिने चेहरा पाहिला. मुरुमं दिवसेंदिवस वाढतच होते, म्हणून तिने विचारले, ‘‘या फेशियलमुळे हे डागसुद्धा कमी होतील का?’’
‘‘हो मॅम, पण त्यांना काढून टाकण्यासाठी तुम्हाला ३-४ सेटिंग्स घ्याव्या लागतील, कारण डाग जुने आहेत.’’
स्वत:ला सुंदर दिसण्यासाठी फेशियल करून घेण्यास सोहाने सहमती दर्शविली.
एक तासानंतर जेव्हा तिने तिचा चेहरा पाहिला तेव्हा ती खरोखरच चमकली होती.
पण विचार करण्यासारखी बाब म्हणजे मुरुमं कधी फेशियलने जाऊ शकतात का?
होय, तात्पुरता फरक नक्कीच येईल, कारण चेहऱ्याच्या मालिशद्वारे रक्त परिसंचरणात वाढ झाल्याने चेहऱ्याची साफसफाई होऊन जाते. परंतु मृत त्वचा काढून टाकल्यामुळे, मुरूमंयुक्त त्वचा अतिनील किरणांसाठी पूर्वीपेक्षा अधिक एक्सपोज झाली. म्हणूनच सोहा तिच्या त्वचेच्या मुरुमांच्या उपचारांसाठी त्वचारोग तज्ज्ञांकडे गेली असती तर बरे झाले असते.
नवीन उत्पादनांचा वापर आणि खर्च
याचप्रमाणे नेहादेखील एक दिवस सलूनमध्ये गेली होती. तिथे गेल्यानंतर तिने सांगितले की ती बिकिनीची शेव करून-करून अस्वस्थ झाली आहे, मासिक कालावधीत तर विशेषकरून समस्या होते. नंतर जेव्हा केस पुन्हा येऊ लागतात तेव्हा ते खूप दाट असतात, जे टोचू लागतात. आता अशा ठिकाणीवारंवार स्क्रॅच करायला चांगले वाटत नाही. मग सलूनमध्ये काम करणारी मुलगी म्हणाली मॅडम, बिकीनी वॅक्स करा. संपूर्ण महिना आराम वाटेल.
एकदा नेहा कचरली, मग विचार केला की प्रयत्न करण्यात काही नुकसान होणार नाही. मग जेव्हा सलूनमधील मुलीने विचारले मॅडम वॅक्स कोणता, नॉर्मल की मग फ्लेवर्ड, तेव्हा नेहा म्हणाली की फक्त नॉर्मलच करा.
यावर मुलीने म्हटले की ती फक्त फ्लेवर्ड वॅक्सच करेल, कारण यामुळे सहजपणे बिकिनीचे केस निघतात.
आता नेहा पहिल्यांदाच बिकिनी वॅक्स घेत असल्याने म्हणाली ठीक आहे, पण जेव्हा बिल पाहिले तेव्हा ते २ हजार रुपये होते. सामान्य वॅक्सपेक्षा दुप्पट. अरेरे, तिच्या तोंडातून निघाले.
जेव्हा नेहाने घरी येऊन आईला सांगितले तेव्हा आई म्हणाली की वॅक्स ते वॅक्स आहे, त्याचे काम केसांवर चिकटणे आहे. जेणेकरून त्यावर वॅक्सिंग स्ट्रिप चिकटवून केस ओढले जातील. त्यात फ्लेवरने काय फरक पडेल? पैसे कमविण्याचा हा मार्ग आहे.
डोळे दिपवणाऱ्या ऑफरी
नवीन वर्षात सूट किंवा दिवाळी निमित्त हे नवीन पॅकेज अशा अनेक बहाण्यांनी सलून काही ना काही ऑफर देतात. या पॅकेजेसमध्ये वॅक्स, आयब्रो, मॅनीक्योर, पेडीक्योर, हेअर कट इ. सह केसांचा रंग मुक्त.
अशा पॅकेजसमध्ये केसांच्या रंगाचे पैसे आधीपासूनच जोडलेले असतात. मग जर रंगीबेरंगी केस एकदा तुम्हाला अनुकूल ठरलेत, इतर लोकांनी तुमची स्तुती केली, तर आपण दरमहा त्यांचे ग्राहक बनता. एकंदरीत, सलूनने नफा कमावला आणि आपणही आनंदी असता. परंतु यामध्ये आपण हे विसरता की केसांच्या रंगात रसायने असतात, ज्यामुळे आपल्या केसांचे नुकसान होते.
रंगीत केसांची अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक असते, जे आपण करू शकत नाही. आता जेव्हा आपले केस खराब होतात, तेव्हा आपण पुन्हा सलूनवाल्याला विचारता, ‘‘मी काय करावे, माझे केस गळत आहेत आणि केस रफदेखील झाले आहेत.’’
मग ते त्यांच्या सलूनमध्ये ठेवलेल्या बऱ्याच मोठया कंपन्यांची उत्पादने वापरण्यास सांगतात. त्यांचे कमिशन निश्चित असते. एकंदरीत, सलूनवाल्यांचा फायदा आणि आपले बुद्ध बनणे.
पॅकेजांची भरमार आणि आपण बांधले जाणे
याचप्रमाणे, आजकाल सलूनमध्ये आणखी एक नवीन पॅकेज तयार आहे. जर आपण आमच्या सेवांवर ३ महिने सतत ३ हजार रुपये खर्च केले तर आपल्या केसांचा कट चौथ्या महिन्यासाठी विनामूल्य आहे. आता ग्राहक दरमहा दीड किंवा दोन हजार सलूनमध्ये खर्च करतो, परंतु त्या मोफत हेअर कटसाठी तो दरमहा जादा सेवा घेऊन ३ हजार खर्च घेतो. तो विचार करतो की हे ३ हजार सेवेचे आहेत. नंतर हेअर कट मोफत आहे. येथे हे समजण्याचा प्रयत्न करा की जगात काहीही मोफत नसते. आपल्याला कुठेतरी किंमत मोजावीच लागते. अशाप्रकारे, प्रत्येक ग्राहकांकडून 3 हजार मिळविल्यानंतर त्यांचे उत्पन्न निश्चित होते आणि आपण तेथे ४-५ महिन्यांसाठी जाणारच, कारण आपल्याला विनामूल्य हेअर कट जो करायचा आहे.
आपण पैसे देऊन त्या एकाच सलूनमध्ये बांधले जाता. आपल्याला त्यांचे काम जरी आवडत असले किंवा नसले तरीही इतरत्र जाण्याचा विचारही करू शकत नाही.
पॅकेजची आगाऊ रक्कम
त्याचप्रकारे, निहारिकाने एक पॅकेज घेतले जे दोन दिवसात पूर्ण करायचे होते. पहिल्या दिवशी तिने केस रंगवले. तिला टाळूमध्ये खूप खाज येऊ लागली. घरी पोहोचताच तिच्या डोक्यावर लाललाल पुरळ उठली. त्यांच्यामुळेच तिला डॉक्टरकडे जावे लागले. हे कळले की तिच्या केसांमध्ये वापरल्या गेलेल्या रंगामुळे तिच्या डोक्यात एलर्जीची प्रतिक्रिया उद्भवली आहे. तिला खूप राग आला. दुसऱ्या दिवशी ती सलूनमध्ये जाऊन म्हणाली की तिचे पॅकेजचे पैसे परत करावे, ती तेथून कोणतीही सेवा घेऊ इच्छित नाही. पण सलूनवाले पैसे परत देण्यास तयार नव्हते.
ते म्हणाले की मॅडम ऑनलाइन सिस्टममध्ये हे सर्व पूर्वीच दिले गेलेले असते. आपण पॅकेज घेतला आणि त्यासाठी पैसे दिले, आता आपल्याला सेवा घ्याव्या लागतील. जर आपणास अर्ध्या सेवा घेतल्यानंतर सोडायचे असेल तर आमचा दोष काय? आणि आपल्याला कोणत्या उत्पादनापासून एलर्जी आहे हे देखील आपण सांगितले नाही. या उत्पादनाद्वारे अन्य कोणत्याही ग्राहकांचे नुकसान झाले नाही. आपण अशी तक्रार येथे आणणारी पहिलीच महिला आहात.
मग काय, निहारिका स्वत:चे चिमणीएवढे तोंड करून घरी परतली.
बनावट उत्पादनांची ओळख
आजकाल सर्व मोठया ब्रँडचे बनावट प्रॉडक्ट्स बाजारात विकले जात आहेत. अगदी बनावट वस्तूंची विक्रीही ऑनलाइन केली जात आहे. हीच बनावट उत्पादने बऱ्याच सलूनमध्ये वापरली जातात. ग्राहकांना याची कल्पना नसते आणि तेथे मोठी किंमत देऊन ते सेवा घेतात, तर सलूनवाल्यांना कमी किंमतीत ते बनावट उत्पादने मिळतात. सलूनला यातून बरेच पैसे मिळतात.
आता मुद्दा हा आहे की ग्राहक या बनावट उत्पादनांना कसे ओळखू शकेल? तर सर्वप्रथम, जेव्हा ग्राहक सलूनमध्ये सेवा घेतो, तेव्हा वापरलेल्या उत्पादनांच्या पॅकिंगची मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि बॅच नंबर पहा, कारण बाजारात रिपॅकिंग केलेले उत्पादने उपलब्ध असतात म्हणजेच पॅकिंग मटेरियल अस्सल असते आणि त्यामध्ये भरलेला माल बनावट असतो. आपण वापरलेल्या मूळ उत्पादनांच्या रिक्त बाटल्या, डबे रद्दीवाल्याला विकून टाकतो किंवा कचऱ्यामध्ये टाकतो. या बाटल्या आणि बॉक्स बनावट वस्तूंच्या पॅकिंगमध्ये वापरले जातात. बनावट उत्पादनांच्या वापरामुळे जळजळदेखील उद्भवू शकते, हे देखील ते बनावट असल्याचा पुरावा आहे.
सलूनमध्ये विक्री होणारी उत्पादने
त्याचप्रमाणे एकदा निहारिका केस कापण्यासाठी मोठया सलूनमध्ये गेली आणि बरोबर मुलीलाही घेऊन गेली. तिथे केस कापण्यापूर्वी केस धुणे आवश्यक असते. सलूनच्या स्टाफने केस धुऊन हेअर कट केला आणि बिलिंगच्यावेळी म्हणाली, ‘‘मॅडम, तुमच्या मुलीचे केस खूप रफ झाले आहेत. केस कापताना मला कंघी घ्यायलाही त्रास होत होता. तुम्ही त्यासाठी आमच्या सलूनमध्ये ठेवलेली उत्पादने का वापरत नाहीत? हे पहा …’’ असं म्हणत तिने आपल्या सलूनच्या शोकेसमधील बरीच महागडी उत्पादने दाखवली.
आपल्याकडून पैसे काढण्याची ही युक्ती असल्याचे निहारिकाला समजले. म्हणून, उत्पादने पाहिल्यानंतर तिने सांगितले की मी नंतर विचार करेन. पण कर्मचाऱ्याला पुढे ढकलणे कुठे सोपे होते. ते उत्पादन विकल्यानंतर तिला कमिशन मिळणार होते, म्हणून ती म्हणाली की ‘‘मॅडम ऑर्गेनिक उत्पादने आहेत. यामुळे आपल्या मुलीचे केस चांगले राहतील, नाहीतर खूप वाईट होतील.’’
निहारिका त्यांच्या जाळ्यात अडकायला तयार नव्हती, म्हणून ती म्हणाली, ‘‘मी घरी तिचे केस धुण्यासाठी आवळा, रीठा, शिकाखाईचा वापर करते आणि त्यामुळे मी खूप समाधानी आहे.’’
त्याचप्रमाणे, जेव्हा सत्या केस कापण्यासाठी गेली, तेव्हा केस धुताच तिच्या केसांना मेहंदीचा सुगंध येऊ लागला, कारण ती मेहंदी वापरत असे. सलूनची स्टाफ केस कापताना तिला म्हणाली की मॅडम तुमच्या केसांपासून वास येत आहे. मेहंदीऐवजी केसांचा रंग का वापरत नाहीत?
स्टाफचे म्हणणे ऐकून सत्या म्हणाली, ‘‘तुम्ही ज्याला वास बोलत आहात, आम्हाला तो सुगंध वाटतो, आपण केस कापा, त्याशिवाय काहीही करु नका.’’