* मोनिका
लॉकडाऊनमुळे आपण सगळे घरी आहोत. पण अत्यावश्यक वा जरूरीच्या कामांसाठी आपल्याला घराबाहेर पडावेच लागते. अशावेळी उन्हाळयाच्या या मोसमात उन्हात जास्त वेळ घालवल्याने त्वचा भाजली किंवा होरपळली जाते, ज्याला सनबर्न म्हटले जाते. शरीरावर लाल डाग पडणे, त्वचा काळवंडणे ही सनबर्नची लक्षणे आहेत.
नुकसानदायक प्रभाव
सूर्यातून निघणारी अल्ट्राव्हॉयलेट किरणे जशी आपल्या त्वचेला फायदा पोहोचवतात तशीच त्यांच्यापासून त्वचेला हानीसुद्धा पोहोचते. यांपासून शरीराला व्हिटॅमिन डी तर मिळतेच, परंतु जेव्हा ही किरणे जास्त प्रमाणात शरीरावर पडतात, तेव्हा त्वचेला जळजळ जाणवते. सकाळी १० वाजेपर्यंतचे आणि संध्याकाळी ५ वाजल्यानंतरची किरणे शरीरासाठी फायद्याची असतात.
त्वचारोग विशेषज्ज्ञ डॉक्टर मलिक यांचे म्हणणे आहे, ‘‘सावळ्या वा गडद रंगाच्या त्वचेमध्ये मैलानिन जास्त प्रमाणात पाहिले जाते, ज्यामुळे त्यांच्या त्वचेवर या किरणांचा प्रभाव कमी पडतो. मैलानिनचे प्रमाण कमी असल्याने गोऱ्या त्वचेवर यांचा प्रभाव लवकर पडतो. जेव्हा ही किरणे त्वचेवर पडतात, तेव्हा मैलानिनला बर्न करतात, ज्यामुळे त्वचेवर लाल पुटकळया दिसून येतात.
त्वचेची रक्षा
* जर आपण जास्त वेळपर्यंत उन्हाच्या संपर्कात राहात असाल तर सनस्क्रिनचा वापर जरूर करा. लक्षात ठेवा सनस्क्रिन ३० एसपीएफ पेक्षा कमी असू नये.
* डॉक्टर मलिकच्या मते सनस्क्रिन बाहेर पडण्यापूर्वी २० मिनिट अगोदर लावावे.
* जर तुम्ही सनस्क्रिन लावल्यानंतर लगेच घरातून बाहेर निघालात तर हे आपल्या त्वचेसाठी नुकसान पोहोचवते. दिवसा बाहेर न पडण्याचा प्रयत्न करा.
* त्वचेला कोरडे राहू देऊ नका. अंघोळीनंतर मॉइश्चराइजर अवश्य लावावे. जर तुम्हाला वाटले की आपली त्वचा भाजते आहे तर लगेच त्या जागेवर थंड पाणी किंवा बर्फ लावावे.
सनबर्न कसे हटवावे
सनबर्नला हटवण्यासाठी बरेच घरगुती उपाय आहेत. जर तुम्हाला सनबर्न कमी प्रमाणात झाले असेल तर ते थोडयाच दिवसांत बरे होईल. यासाठी तुम्ही पुढील घरगुती उपायांचा जरूर अवलंब करा :
बटाटयाचा ज्यूस : कच्च्या बटाटयाचा ज्यूस सनबर्नसाठी खूप लाभदायक ठरतो. यामुळे त्वचेवर हरवलेली चमक पुन्हा परत येते. याशिवाय बटाटयाचा ज्यूस त्वचेची सूज, जळजळ आणि लाल डाग यामध्येही खूप आराम पोहोचवतो. याचा उपयोग करण्यासाठी बटाटयाला सोलून घ्या. नंतर त्याला पिळून घ्या.
पुदीन्याची पाने : पुदिन्याची पानेही सनबर्न घालवण्यासाठी फायद्याची असतात. यामध्ये अँटीबॅक्टेरिअल गुण आढळतात, जे त्वचेचे पोषण करून पिगमेंटेशनची समस्या सोडवतात. पुदिन्याच्या पानांच्या उपयोगाने त्वचेला गारवा मिळतो. ही पाने त्वचेला मॉइश्चराइझर देण्याचेही काम करतात.
अॅप्पल साइडर विनेगर : अॅप्पल साइडर विनेगर आरोग्यासाठी फायद्याचे असते. याचा उपयोग सनबर्नचे डाग घालवण्यासाठीही केला जातो. हे त्वचेवर पडलेल्या डागांना दूर करून त्वचेला स्वच्छ करण्यासाठी महत्वाची भूमिका निभावते. याचा उपयोग करण्यासाठी तुम्ही एक चमचा व्हिनेगर पाण्यात मिसळून सनबर्नवर लावावे. ५ ते १० मिनिटांपर्यंत लावून ठेवावे. नंतर थंड पाण्याने धुवून घ्या.
दही : दह्याचे सेवन उन्हाळयाच्या मोसमात जास्त प्रमाणात करायला हवे. कारण यामुळे शरीर व त्वचा दोहोंना गारवा मिळतो. दही एका औषधाप्रमाणे काम करते. यात आढळून येणारे प्रोबायोटिक्स आणि एंजाइम चेहऱ्याची लाली कमी करून त्वचेला स्वच्छ करतात. एका वाटीत दही घेऊन सनबर्नच्या जागी लावून घ्यावे. जवळ-जवळ १० ते १५ मिनिटानंतर धुऊन घ्यावे. असे केल्याने त्वचेची रोमछिद्रे उघडतात आणि त्वचा स्वच्छ होऊन उजळते आणि सनबर्नमध्येही बराच आराम मिळतो.
मुलतानी माती : सनबर्नमुळे त्वचा काळी पडते. अशा स्थितीत मुलतानी मातीचा उपयोग केल्यास त्वचेत उजळपणा येतो. मुलतानी मातीत नारळाचे पाणी आणि साखर मिसळून पेस्ट तयार करून घ्या. आता या पेस्टला त्वचेवर लावून तोपर्यंत लावून ठेवा जोपर्यंत ती पूर्णपणे सुकून जात नाही. नंतर थंड पाण्याने धुऊन घ्या.