* प्रतिनिधी
बहुतांश आया मासिक पाळीबाबत मुलीशी मोकळेपणाने बोलत नाहीत. हेच कारण आहे की या दरम्यान मुली हायजिनच्या महत्वाकडे दुर्लक्ष करतात आणि अनेक समस्यांच्या भक्ष्य बनतात.
मासिक पाळीबाबत जागरूकता नसणे याचे मोठे कारण आहे. सादर आहेत काही टीप्स ज्या प्रत्येक आईने आपल्या किशोरवयीन मुलीला द्यायला हव्या. जेणेकरून ती मासिकपाळीदरम्यान येणाऱ्या सगळया समस्यांना तोंड देऊ शकेल.
कपडयाला नाही म्हणा : आजही आपल्या देशात जागरूकता कमी असल्याने मासिक पाळी दरम्यान तरुणी कपडा वापरतात. असे केल्याने त्यांना गंभीर आजार होऊ शकतात. कपडयाचा वापर केल्याने होणाऱ्या आजारांबाबत आपल्या मुलीला जागरूक बनवणे हे प्रत्येक आईचे कर्तव्य आहे. मुलीला सॅनिटरी नॅपकीनचे फायदे सांगा आणि तिला याची माहिती द्या की हे वापरल्यास ती आजारांपासून दूर तर राहीलच, शिवाय या दिवसातही मोकळेपणाने वावरू शकेल.
केव्हा बदलावे पॅड : प्रत्येक आईने आपल्या मुलीला हे नक्कीच सांगावे की साधारणत: दर ६ तासांनी सॅनिटरी नॅपकीन बदलवायला हवे. याशिवाय आपल्या गरजेनुसारसुद्धा सॅनिटरी नॅपकीन बदलायला हवा. जास्त स्त्राव असल्यास तुम्हाला सतत पॅड बदलावे लागते, पण जर स्त्राव कमी असेल तर सतत पॅड बदलायची गरज नसते. तरीही ४-६ तासांनी सॅनिटरी नॅपकीन बदलत राहावे जेणेकरून इन्फेक्शनपासुन सुरक्षित राहू शकू.
गुप्तांगांची नियमित स्वच्छता : मासिक पाळी दरम्यान गुप्तांगांच्या आजूबाजूच्या त्वचेत रक्त गोळा होते, जे संक्रमणाचे कारण बनू शकते. म्हणून गुप्तांगांची नियमित स्वच्छता करण्याचा सल्ला द्या. यामुळे व्हजायनातुन दुर्गंधी येणार नाही.
हे वापरू नका : व्हजायना आपोआप स्वच्छ ठेवण्याची एक नैसर्गीक प्रक्रिया असते, जी चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियाचे संतुलन कायम ठेवते. साबण योनी मार्गात असलेल्या चांगल्या बॅक्टेरियाना नाहीसे करू शकते. म्हणून याचा वापर करू नका, असा सल्ला द्या.
धुण्याची योग्य पद्धत : मुलीला सांगा की गुप्तांगांना स्वच्छ ठेवण्यासाठी योनीकडून पार्श्वभागाच्या दिशेने स्वच्छ करा म्हणजे समोरून मागच्या दिशेने. उलटया दिशेला कधीही करू नका. उलटया दिशेने धुतल्यास पार्श्वभागात असलेले बॅक्टेरिया योनीत जाऊ शकतात आणि संक्रमणाचे कारण बनू शकतात.
सॅनिटरी पॅडची विल्हेवाट : वापरलेले पॅड योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने फेकायाला सांगावे, कारण हे संक्रमणाचे कारण बनू शकतात. पॅडस फ्लश करू नका, कारण यामुळा टॉयलेट ब्लॉक होऊ शकते. नॅपकीन फेकल्यावर हात नीट धुणे आवश्यक आहे.
रॅशेशपासून कसे दूर राहाल : मासिक पाळीत जास्त स्त्राव झाल्यास पॅडसचे रॅशेश येण्याची संभावना खूप वाढते. असे साधारणत: तेव्हा होते जेव्हा पॅड खूप काळ ओला राहतो आणि त्वचेववर घासल्या जातो. म्हणून मुलीला वेळोवेळी पॅड बदलायला सांगा. जर रॅश आलाच तर आंघोळीनंतर आणि झोपताना अँटीसेप्टीक ओइन्टमेन्ट लावा. जर ओइन्टमेन्ट लावूनही रॅश बरा झाला नाही तर तिला डॉक्टरकडे घेऊन जा.
एकाच प्रकारचा सॅनिटरी नॅपकीन वापरा : ज्या किशोर वयीन मुलींमध्ये स्त्राव जास्त होतो, त्या एकाच वेळी २ पॅड्स अथवा एका पॅडसोबत टोपोन वापरू शकतात किंवा कधीकधी सॅनिटरी नॅपकिनसोबत कपडासुद्धा वापरू वापरतात म्हणजे असे केल्याने त्यांना दीर्घ काळ पॅड बदलावे लागत नाही. अशा वेळी मुलीला सांगा की एका वेळी एकाच प्रोडक्ट वापर. जेव्हा एकाच वेळी दोन प्रकारचे प्रॉडक्ट वापरल्या जातात तेव्हा जाहीर आहे की हे बदलता येत नाहीत, ज्यामुळे इन्फेक्शनची संभावना आणखीनच वाढते.