– प्रतिनिधी
ठंडाई
साहित्य
* १० हिरव्या वेलचीचे दाणे
* दीड लहान चमचा बडीशेप
* अर्धा लहान चमचा काळीमिरी
* अर्धा लहान चमचा धणे
* १ लहान चमचा टरबुजाच्या बिया
* ५० ग्रॅम सोललेले बदाम
* ५ मोठे चमचे साखर
* १ मोठा चमचा बदामपिस्त्याचे काप
* ७५० मिलीलीटर दूध.
कृती
तव्यावर सुका मेवा थोडासा गरम करा. मग दूध सोडून सर्व साहित्य पाण्यात भिजवा. दोन तास सुका मेवा पाण्यात भिजू द्या. यानंतर सुक्या मेव्याची पेस्ट बनवा आणि ती दुधात मिक्स करा. हे दूध मलमलच्या कापडातून गाळून घ्या. शेवटी बदामपिस्त्याने सजवून थंडथंड सर्व्ह करा.
पान मॉकटेल
साहित्य
* २ गोड पानांचे लहान लहान तुकडे
* अर्धा लहान चमचा लिंबाचा रस
* २ मोठे चमचे साखर
* ५०० मिली. स्प्राइट
* अर्धा लहान चमचा जाडसर कुटलेली बडीशेप
* १ मोठा चमचा माउथ फ्रेशनर
* १ पान सजविण्यासाठी
* गरजेनुसार बर्फ.
कृती
एका भांड्यात पानाचे तुकडे, बडीशेप, लिंबाचा रस आणि बर्फाचे तुकडे एकत्रित मिसळा. जेव्हा हे व्यवस्थित मिक्स होईल तेव्हा हे मिश्रण एका ग्लासात एक तृतियांश भाग भरा आणि त्यामध्ये थोडेसे बर्फाचे तुकडे मिसळा. वरून स्प्राइट मिसळा. सर्व्ह करताना माउथ फ्रेशनर आणि पानाने सजवून द्या.