– डॉ. अमनजीप कौर, मेडिकल निदेशक, अमनदीप हॉस्पिटल

प्रश्न : मी २४ वर्षांची आहे. मासिक पाळीच्या दिवसात माझे पाय खूप दुखतात. हे काळजी करण्याचे कारण आहे का?

उत्तर : नाही. ही खूप काळजी करण्यासारखी गोष्ट नाहीए. मासिक पाळीच्या दिवसात शरीरातील खालील भागात दुखणे नैसर्गिक आहे. ओटीपोटीत होणाऱ्या वेदना शरीराच्या अन्य भागांपर्यंत पोहोचतात. अनेक स्त्रियांना ही समस्या जाणवते. गर्भाशय आकुंचन पावल्यानेही पाय दुखू लागतात.

प्रश्न : मी २४ वर्षांची आहे आणि मॉडेलिंग करते. रोज उंच टाचेची सॅन्डल घालावी लागते. माझे घोटे दुखतात. यामुळे माझ्या चालण्याच्या पद्धतीवर परिणाम होईल का?

उत्तर : घोट्यांमध्ये थोड्याफार वेदना असोत किंवा जास्त, पण असे असेल तेव्हा जास्त काळजी घ्यावी, सावध राहावे. घोट्यांमध्ये वेदना होण्याचे कारण दुखापत किंवा ताण असू शकतो पण आर्थ्रायटिस हेही कारण असू शकते. यामुळे तुमच्या चालण्याच्या पद्धतीत फरक पडू शकतो. पण जर तुम्ही रोज व्यायाम करत असाल तर हळूहळू दुखणे कमी होऊ शकते. तुम्ही कमीत कमी २० मिनिटे घोट्यावर बर्फाने शेकवल्यास वेदनेला आराम मिळेल. असे तीन दिवस तीनवेळा करा.

प्रश्न : मी ३२ वर्षांची आहे. मला हे सांगा की ल्यूकोरिया म्हणजे काय? मी  असे ऐकले आहे की ९८ टक्के महिला यामुळे त्रस्त आहेत आणि यामुळे पुढे हाडांशी संबंधीत समस्या उद्भवतात. हे खरे आहे का? कृपया मला मार्गदर्शन करा.

उत्तर : तुम्ही घाबरण्याची गरज नाही. ल्युकोरिया म्हणजे योनिमार्गातून स्त्रवणारा घट्ट, पांढरा किंवा पिवळसर स्त्राव असतो. ही कधी ना कधी कितीही वर्षांच्या महिलेला उद्भवणारी सामान्य समस्या आहे. जसे की, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, संसर्ग, हारमोन्सचे असंतुलन इ. ल्यूकोरियामुळे हाडांची शक्ती कमी होते. जर तुम्हाला ही समस्या असेल तर डॉक्टरांना भेटा.

प्रश्न : मी ४१ वर्षांची आहे. मी लष्करात काम करत होते. मी आरोग्य आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत खूप सतर्क असते. तरीही माझी पाठ दुखते. ही मोठी समस्या आहे का?

उत्तर : ही मोठी समस्या नाही पण भविष्यात ही अवघड समस्या बनू शकते. तुम्ही लष्करात होतात, त्यामुळे व्यायामाचे महत्त्व तुम्हाला माहिती असेलच. वाढत्या वयात येणारी ही सामान्य समस्या आहे. पण पाठदुखीवर इलाज म्हणून व्यायामाचा मोठा भाग आहे. दुखण्यासाठी औषधे उपलब्ध आहेत. हीट किंवा कोल्ड थेरेपी (आइस पॅक)ही सूज कमी करून पाठीच्या वेदना कमी करण्यात सहाय्यक ठरेल.

प्रश्न : मी ३६ वर्षांची आहे. मला मधुमेह आहे. यामुळे मला भविष्यात हाडांशी संबंधित त्रास होऊ शकतो का? जर हो, तर त्यावरील उपाय काय?

उत्तर : तुम्हाला मधुमेह आहे, तर डॉक्टरांना भेटून योग्य अशा आहाराचे नियोजन केले पाहिजे. तुम्हाला हाडांचे व सांध्यासंदर्भात अनेक प्रकारचे त्रास उद्भवू शकतात. माहितीनुसार अशा लोकांना आर्थ्रायटिस आणि सांधेदुखीसारखे त्रास होण्याची दुप्पट शक्यता असते. जर तुम्हाला सांधेदुखीची जाणीव झाली तर ‘हॉट अॅन्ड कोल्ड अप्रोच’ वापरून बघा. व्यायामानेही दुखऱ्या स्नायूंना मजबूती मिळेल व वेदनेबरोबरच सूजही कमी होईल.

प्रश्न : मी ४८ वर्षांची आहे. रोज व्यायाम करते आणि चौरस आहारही घेते. पण तरीही माझे सांधे नेहमी दुखतात. या दुखण्यापासून कशी मुक्ती मिळवू?

उत्तर : तुम्ही चौरस आहार घेता ही चांगली गोष्ट आहे व व्यायामही करता पण कुठल्याही दुखण्यापासून बचाव करण्यासाठी जीवनशैलीत बदल करणेही गरजेचे असते. तसेही हल्ली सांधेदुखी ही सामान्य बाब आहे. जर तुमचे दुखणे सहन करण्यापलिकडे असेल तर तुमच्या बसण्याची पद्धत बदला आणि हाडांच्या डॉक्टरांना दाखवा. काही नैसर्गिक उपचार आहेत, ज्यामुळे दुखणे कमी केले जाऊ शकते. तुम्ही हळद व आल्याचा चहा पिण्यास सुरूवात करा. मॅग्निशियम जास्त प्रमाणात घ्या व थोडा व्यायामही करा.

प्रश्न : मी ३८ वर्षांची गृहिणी व दोन मुलांची आई आहे. मी कुठलेही जड सामान उचलू शकत नाही व वाकताही येत नाही. मी काय करू?

उत्तर : तुम्हाला पाठीचा किंवा पोटाचा त्रास होऊ शकतो. जेव्हा तुम्ही काही जड सामान उचलण्याचा प्रयत्न करत असाल, तेव्हा स्नायूंना अतिताण आल्यामुळे तुम्हाला अतिशय वेदना होत असतील. एखादी जुनी जखम किंवा फ्रक्चरही ताणामुळे त्रासदायक ठरते व वेदना वाढवते. त्यामुळे तुम्हीही काळजी घ्या.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...