– डॉ. विपिन त्यागी, कंसल्टंट युरोलॉजिस्ट अॅन्ड रोबोटिक सर्जन,  गंगाराम हॉस्पिटल, नवी दिल्ली

ज्या महिला नियमित लैंगिक संबंध ठेवतात, त्यांच्या ब्लॅडरमध्ये मोठ्या संख्येने बॅक्टेरिया जातात. सतत लैंगिक संबंध ठेवून झालेल्या संसर्गाला हनिमून सिस्टाइटिस म्हटले जाते.

युरिनरी ट्रॅक्ट संसर्ग यूटीआय, युरेथरा (मूत्रनळी) ब्लॅडर (मूत्राशय), युरेटर्स (मूत्रवाहिनी) आणि किडनी (मूत्रपिंड) यांच्या संसर्गाला म्हणतात. हे शरीराचे ते भाग आहेत, ज्यांमधून मूत्र शरीराबाहेर येते. युटीआयमध्ये मूत्रमार्गाचा कुठलाही भाग बाधित होऊ शकतो. यूरिनरी ट्रॅक्टचा संसर्ग जितक्या वर असेल तितकाच तो गंभीर असतो. यानुसार यूटीआयचे अपर आणि लोअर असे वर्गीकरण केले आहे. यूटीआय संक्रमण गंभीर होऊन डीहायडे्रशन, सेप्सिस, किडनी फेल्युअरचे कारण बनू शकते.

या संसर्गाचा धोका अशा महिलांमध्ये जास्त असतो :

* ज्या गर्भनिरोधक म्हणून डायफ्राम किंवा स्पर्मिसीडलचा वापर करतात.

* ज्यांच्या यूरिनरी ट्रॅक्टमध्ये बाधा निर्माण होते जसे की मूतखडा होणे.

* एखाद्या आरोग्याशी संबंधित समस्येमुळे ब्लॅडर पूर्णपणे रिकामे होत नाही. उदाहरणार्थ स्पायनल कॉर्ड इंजुरी.

* ज्यांच्यामध्ये रोगप्रतिकारकशक्ती कमी असेल. एड्स, डायबिटिज, अवयव प्रत्यारोपण करून घेणारे रूग्ण आणि असे रूग्ण ज्यांच्यामध्ये कर्करोगाच्या उपचारासाठी केमोथेरपी केली गेली असेल अशांचा समावेश आहे.

* वयस्क लोक आणि मुलांमध्येही याचा धोका निर्माण होऊ शकतो, कारण ते त्यांचे गुप्त अवयव व्यवस्थित स्वच्छ करू शकत नाहीत.

महिलाच अधिक बळी का पडतात

* महिलांमध्ये युरेथराची लांबी पुरूषांच्या तुलनेत कमी असते. यामुळे बॅक्टेरिया तिथे सहज पोहचतात.

* महिलांमध्ये युरेथरा गुदमार्गाच्या जास्त जवळ असते. यामुळे गुदमार्गातील बॅक्टेरिया युरेथरापर्यंत पोहोचण्याची शक्यता वाढते. लैंगिक संबंधादरम्यान बॅक्टेरिया युरेथरामध्ये पोहोचण्याची शक्यता अधिक असते.

* गर्भनिरोधक म्हणून डायफ्राम वापरल्याने युरेथरावर दबाव येतो. यामुळे ब्लॅडरमधील मूत्र पूर्णपणे रिकामे होत नाही. जेव्हा ब्लॅडरमध्ये थोडे मूत्र शिल्लक राहते, तेव्हा त्यामध्ये बॅक्टेरिया निर्माण होऊ लागतात आणि संसर्गाचा धोका वाढतो.

* मेनोपॉजनंतर यूटीआय संसर्गाचा धोका वाढतो. कारण अॅस्ट्रोजन हार्मोन्सची कमी झाल्यामुळे व्हजायना युरेथरा आणि ब्लॅडरच्या खालच्या भागातील पेशी पातळ आणि कमकुवत होतात.

या तुलनेत पुरूषांमध्ये युटीआयचा धोका कमी असतो. कारण त्यांचा युरेथरा लांब असतो आणि विरोध करण्यासाठी बनणारे द्रव्य बॅक्टेरियाशी लढण्यास सक्षम असतात.

युटीआय थांबवण्यासाठी काही टीप्स

* बऱ्याच प्रमाणात पाणी किंवा द्रव्य पदार्थ घ्यावेत. यामुळे तुम्ही जितक्या वेळा लघवी कराल, बॅक्टेरिया शरीरातून बाहेर फेकले जातील.

* लघवी कधीही थांबवू नये.

* मलमूत्र विसर्जन केल्यानंतर पुढून मागच्या बाजूने धुवावे, मागून पुढच्या बाजूने धुवू नये. यामुळे गुदमार्गाजवळील बॅक्टेरिया व्हजायना आणि युरेथरापर्यंत पोहोचण्याची शक्यता कमी होईल.

* लैंगिक संबंध झाल्यानंतर गुप्त अंग धुवून स्वच्छ करावे व लघवी करावी म्हणजे बॅक्टेरिया शरीरातून बाहेर निघून जातील.

* जर डायफ्रामच संसर्गाचे कारण असेल तर गर्भनिरोधक म्हणून इतर साधनांचा वापर करावा.

* कोणाही प्रौढ व्यक्तीमध्ये किंवा मुलांमध्ये ही युरेनरी ट्रॅक्ट संसर्गाशी लक्षणे आढळली तर लक्षणे दिसल्याच्या २४ तासांच्या आत डॉक्टरांना भेटा.

* डॉक्टरांनी अॅण्टीबायोटिकचा कोर्स दिल्यास तो पूर्ण करा व बरे वाटत असले तरीही उपाचार सुरू ठेवा.

* कॉफी आणि अल्कोहोलचे सेवन करू नये. यामुळे ब्लॅटरला त्रास होतो.

* धुम्रपानही करू नये. यामुळेही ब्लॅडरला हानी निर्माण होते.

उपचार

प्रोस्टेट बरे करण्यासाठी अनेक उपचार उपलब्ध आहेत. यात औषधे, थेरेपी आणि सर्जरीचा समावेश होतो. कोणते उपचार योग्य ठरतील हे अनेक गोष्टींवर अवलबूंन असते. जसे की प्रोटेस्टचा आकार काय आहे, रूग्णांचं वय, रूग्णांचं पूर्ण शरीर स्वास्थ तसेच लक्षणे किती गंभीर आहेत इ.

जर लक्षणे अधिक गंभीर नसतील तर काही दिवस उपचार न करता लक्षणांवर नजर ठेवावी. काही लोकांमधील याची लक्षणे आपोआप निघून जातात.

औषधे : लक्षणे जास्त गंभीर नसतील तर औषधे घेणे हा सर्वोत्तम उपचार आहे. अल्फा ब्लॉकर हे औषध मूत्राशयावरील भागातील स्नायू आणि त्या तंतूंना आराम मिळवून देते, ज्यामुळे मूत्र विसर्जन सोपे होते. ५-अल्फा रिडक्टस इनहिबिटर्स औषध हार्मोन्स परिवर्तन थांबवून प्रोस्टेस्ट संकूचित करते. जर ही दोन्ही औषधे वेगवेगळी उपयोगी ठरली नाहीत तर डॉक्टर दोन्हीही एकत्र घेण्याचा सल्ला देतात.

मिनिमली इनवेसिव सर्जरी : जर लक्षणे मध्यमपासून ते गंभीर आहेत आणि औषधांनी बरे होणार नाहीत, शिवाय मूत्रमार्गातही अडचणी आहेत वा मूतखडा आहे. लघवीवाटे रक्त जाते आहे किंवा किडनीशी संबंधित समस्या असेल तर डॉक्टर सर्जरी करण्याचा सल्ला देऊ शकतात. सर्जरी करून प्रोस्टेस्टचा बाहेरील भाग काढून टाकला जातो.

लेजर थेरपी : हाय एनर्जी लेजर अतिविकसित प्रोस्टेस्ट पेशींना नष्ट करते. लेजर थेरपी केल्यानंतर लवकर आरामही मिळतो आणि याचे साईड इफेक्टही कमी होतात.

अॅण्टीबायोटिक्स : अॅण्टीबायोटिक्सद्वारे यूटीआयचा उपचार केला जातो. कोणते औषध किती काळ दिले जाईल हे रूग्णाच्या आरोग्यावर व ससंर्ग किती गंभीर आहे यावर अवलंबून आहे. जर संक्रमण गंभीर असेल तर अॅण्टीबायोटिक दिले जाते.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...