* प्रतिनिधी
पाचशे आणि हजाराच्या नोटांवर बंदी आणल्यानंतर तर क्रेडिट कार्ड अधिकच महत्त्वाचं झालंय.
खरंतर याचं एक वास्तव म्हणजे क्रेडिट कार्डने खरेदी करतेवेळी थोडीशी लालूच वाढते आणि तेव्हा स्वत:वर नियंत्रण ठेवणं कठीण होऊन बसतं. अशावेळी थोडासा समजूतदारपणा दाखवणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्ही एकाचवेळी क्रेडिट कार्डचं सर्व लिमिट संपवाल आणि हप्ते भरताना तुम्ही अडचणीत याल वा गरजेला खर्च न करण्याची पाळी येईल.
क्रेडिट कार्ड फायद्याची वस्तू आहे. तर जाणून घेऊया, अशा ६ टिप्स, ज्या उत्तम खरेदीसोबतच क्रेडिट कार्ड हुशारीने वापरण्याची योग्य पद्धतही माहीत करून देतील :
- क्रेडिट कार्डने खरेदी करतेवेळी प्रत्येक वेळी तुम्ही रिवॉर्ड पॉईंटस कमावता. अनेकदा १००-२५०च्या खरेदीवर तुम्हाला १ पॉईंट मिळतो. मात्र हे वेगवेगळे कार्ड आणि बँकेवर अवलंबून असतं. यासाठी चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही जमविलेल्या पॉइंट्सबाबत अपडेट राहा आणि शॉपिंगचं पेमेंट करताना हेदेखील वापरा. अशाप्रकारे तुमची खास बचत होऊ शकते.
- क्रेडिट कार्डने खरेदी केल्यानंतर तुमच्या मोबादल्यामध्ये सर्व पेमेंट डिटेल्स आणि इन्स्टॉलमेण्टचे रिमाइंडर लावा, यामुळे ड्यू डेटपूर्वीच तुम्हाला हे क्लीअर करायचंय याची आठवण राहील. तसंच नंतर तुमच्यावर व्याजाचं ओझं राहाणार नाही. लक्षात असू द्या की, जोपर्यंत तुम्ही पहिलं पेमेंट चुकतं करत नाही तोपर्यंत अधिक खरेदी करू नका.
- विनाकारण खर्च करू नका. कधीही बंपर ऑफर्स वा सेल पाहून याचा सर्व फायदा आताच घ्यावा असं अजिबात करू नका. लक्षात ठेवा की, कंपन्या आणि ब्राण्ड्स अनेकदा कोणती ना कोणती ऑफर घेऊन येतच असतात. अशावेळी घाई करू नका. अन्यथा व्याजासोबत याचं अधिक ओझं तुमच्या पाकिटावर पडू शकतं.
- बजेटपेक्षा थोडा कमी खर्च करण्याचं टार्गेट बनवा. जर तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिट १ लाख असेल तर ८० हजारात तुमचं शॉपिंग आटपा. असं केल्याने गरजेच्यावेळी तुम्ही या वाचविलेल्या क्रेडिटचा वापर करू शकता.
- दर महिन्याला तुमच्या क्रेडिट कार्डची स्टेटमेण्ट बारकाईने चेक करण्याची सवय लावा. अजून एक उत्तम पद्धत म्हणजे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या सामानाचं बिल नेहमी पेमेंट क्लिअर होईपर्यंत सांभाळून ठेवा. यामुळे तुम्ही सहजपणे स्टेटमेंटसोबत बिल व्हेरीफाय करू शकाल की कुठे एखादा अधिक चार्ज तर नाही लावलाय ना आणि कुठे गडबड तर नाही ना.
- याव्यतिरिक्त सायबर सिक्योरिटीदेखील एक मोठा मुद्दा आहे. कधीही तुमच्या क्रेडिट कार्डचा पिन क्रमांक आणि सिक्योरिटी कोड कोणालाही देऊ नका. यामध्ये तुमच्याच पैशाची सुरक्षा आहे.
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...
गृहशोभा से और