* सुमन वाजपेयी
नवीन फॅशनचा अवलंब करणे आजकालचा ट्रेंड आहे. म्हणूनच फॅशन डिझायनर्सही हटके प्रयोग करत आहेत. कानातले असोत किंवा साडया, यात आदिवासी लुक बराच लोकप्रिय आहे. आजकाल आदिवासी प्रिंट सर्व प्रकारच्या पोशाखांवर पाहायला मिळत आहे.
आदिवासींमध्ये निसर्ग आणि प्राण्यांविषयी ओढ पाहायला मिळते. त्यामुळेच अशा ड्रेस मटेरियलमध्येही नैसर्गिक प्रिंट्स आणि रंगांचा वापर वाढत आहे. आदिवासी प्रिंटस असलेल्या पाश्चात्य कपडयांचीही बरीच चलती आहे. ते फ्यूजन लुक देतात. सोबतच प्रिंट्सही अगदी ट्रेंडी दिसतात. आदिवासी लुक असलेल्या साडयांचीही सध्या चलती आहे. खासकरून कॉटन आणि हँडलूमच्या आदिवासी प्रिंट्स असलेल्या या साडया क्लासी आणि आकर्षक लुक देतात. ऐश्वर्या राय बच्चनपासून जेनेलिया आणि बिपाशाही अशाप्रकारच्या साडया परिधान करताना दिसू शकतात.
आफ्रिकन प्रिंट्सनेही आदिवासी लुकमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. आफ्रिकन प्रिंट्सच्या स्कार्फपासून ते बॅडशीट्स, उशाही पसंतीस उतरत आहेत. आफ्रिकन प्रिंट्सच्या सलवार सूटचा वापरही वाढला आहे. आदिवासी लुक हा पारंपरिक पेहराव, साडीसोबतच कॅपरी, पॅण्ट, ट्यूनिकपासून ते मिनीजपर्यंत सर्वांवर ट्राय करता येऊ शकतो. आदिवासी प्रिंट्स पॅण्टला कूल लुक मिळवून देतात. याला तुम्ही बॉयफ्रेंड शर्टसोबत मॅचिंग करून घालू शकता. आदिवासी प्रिंट्सच्या प्लाझो पँटदेखील घालू शकता, ज्याला टँग किंवा क्रॉप टॉपसह तुम्ही सहज कॅरी करू शकता.
ज्वेलरीही असते खास
ड्रेसबरोबरच ज्वेलरीमध्येही आदिवासींचा लुक कॅरी केला जात आहे. आदिवासी कानातले तरुणींसह वयस्कर महिलाही घालू लागल्या आहेत. यांचे वैशिष्टय म्हणजे हे पारंपरिक किंवा ट्रेंडी अशा कुठल्याही लुकला मॅच करतात. आदिवासी भागात राहणाऱ्या बहुतेक स्त्रिया खूप जड दागिने घालतात. परंतु डिझाइनर त्याच्या हलक्या वजनाच्या डिझाईन्स तयार करत आहेत. अष्टधातू, तांब्याच्या तारांसोबत चांदी मिक्स करून बनविलेली आदिवासी ज्वेलरी इंडोवेस्टर्न आऊटफिटसह खूपच छान दिसते. यात अॅनिमल ज्वेलरी जसे की, कासवाची अंगठी, घुबडाची चेन, पोपटाचे कानातले, लीफ सेट इत्यादींचा सध्या खूपच ट्रेंड आहे.
चांदीच्या पांढऱ्या किंवा काळया धातूपासून बनवलेले कानातलेही सध्या बाजारात उपलब्ध आहेत.
आदिवासी बोहो बांगडयादेखील वेगळा लुक देतात. त्या पाश्चिमात्य तसेच पारंपरिक पेहरावासोबतही घालता येतात. बोहो बांगडयांना कडा किंवा ब्रेसलेटप्रमाणेही घालता येते. आदिवासी प्रिंट्स असलेले स्कार्फ खूपच स्मार्ट लुक देतात. ते जीन्स, ड्रेस किंवा कुर्ती जीन्स अशाप्रकारे कोणत्याही पेहरावासोबत परिधान केले जाऊ शकतात. तुम्ही तुमचा फॉर्मल किंवा कॅज्युअल आदिवासी स्कार्फ कुठल्याही आऊटफिटसह कॅरी करू शकता.
जर तुम्ही प्लेन ड्रेस घालणार असाल तर त्यासोबत आदिवासी प्रिंट स्कार्फ वापरा. यामुळे आपला ड्रेस आणखी आकर्षक दिसेल. जर तुम्ही ब्रोच लावत असाल तर साडीला आदिवासी ब्रोच लावता येऊ शकेल.
मेकअपवरही आहे जादू
आदिवासी लुकच्या मेकअपची वाढती क्रेझ तरुणींमध्ये दिसू शकते. आदिवासी लुक मिळविण्यासाठी डोळयांचा विशेष मेकअप केला जातो. यामुळे डोळे बोल्ड दिसू लागतात. यासाठी वरच्या आणि खालच्या दोन्हीकडील पापण्यांना चांगल्याप्रकारे हायलाईट केले जाते आणि डोळे उठून दिसण्यासाठी काजळ लावले जाते. त्यानंतर आयशॅडो वापरून डोळयांना बोल्ड लुक दिला जातो. नंतर मस्करा लावून आर्टिफिशियल लॅशेज लावल्या जातात.
आदिवासी लुक मिळविण्यासाठी लिक्विड फाउंडेशन आणि ब्रोन्जरचा उपयोग ओठांवर केला जातो, परंतु या उपयोग खूप कमी प्रमाणात केला जातो, फक्त त्याचा हलकासा टच दिला जातो. या लुकसाठी ब्लशरदेखील वापरला जात नाही. लिपस्टिकसाठी मॅट कलर निवडा जे नारंगी आणि कोरलच्यामधले असतील किंवा मग लाल रंगाशी मिळत्याजुळत्या शेडचीही लिपस्टिक लावता येईल.
हेअर स्टाईलबाबत बोलायचे म्हणजे, या लुकसाठी केस मोकळे सोडा किंवा सैलसर बांधा. बोटांनीच केस पसरवा. मोकळे, साधारपणे कर्ल केलेले केस या स्टाईलसाठी योग्य ठरतात. आदिवासी स्त्रिया केस सजवण्यासाठी विविध प्रकारचे जड दागिने वापरतात, परंतु ते दागिने प्रमाण मानून या दिवसात ज्या डिझाईन्स तयार केल्या जात आहेत, त्यांना फॅशन ज्वेलरी असे म्हणतात.