* गरिमा पंकज

लिव इन हे आजच्या बदलत्या जीवनशैलीनुसार तरुणांनी निर्मित केलेली थोडी कमी आजमावलेली कॉन्सेप्ट आहे. मुलामुलीची विवाहित जोडप्याप्रमाणे सोबत राहाण्याची व्यवस्था म्हणजे लिव इनमध्ये वैवाहिक जीवनातील आकांक्षा पूर्ण होतात, एकमेकांचा सहवासही लाभतो परंतु दीर्घकालीन जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी ते बांधील नसतात. कधीही विलग होण्याचं स्वातंत्र्य असतं. ही कॉन्सेप्ट विवाह करण्याची मानसिकता नसणाऱ्यांना वरकरणी आकर्षक भासते, परंतु आतून तितकीच पोकळ आणि अस्थिर तर आहेच शिवाय त्यातही अनेक जबाबदाऱ्या आहेत. कदाचित हेच कारण आहे की बहुतेक जण खासकरून मुली आजही याचा स्वीकार करत नाहीत.

अपूर्णतेची जाणीव

एक प्रकारे हे नातं धार्मिक मान्यतांच्या बंधनापासून सामाजिक रुढीपरंपरा आणि शोबाजीच्या रंगापासून दूर आहे आणि कायद्यानेसुद्धा याला काही मर्यादेपर्यंत मान्यता दिली आहे. परंतु तरीदेखील या नात्याच्या अपूर्णतेला दुर्लक्षित करता येणार नाही खासकरून मुली अशाप्रकारच्या नात्यांमध्ये अनेकदा गहिऱ्या मानसिक त्रासातून जातात.

वास्तविक, लिव इनमध्ये नातं जेव्हा गहिरं होतं आणि दोघे एकमेकांच्या जवळ येतात, शारीरिकसंबंध साधतात, तेव्हा ती भावना मुलीच्या मनात कायम सोबत राहाण्याच्या इच्छेला जन्म देते. ५० मिनिटांची जवळीक ५० वर्षांच्या सहवासाच्या इच्छेमध्ये बदलू लागते. परंतु जरुरी नाही की मुलगासुद्धा याच पद्धतीने विचार करेल आणि जबाबदाऱ्या पूर्ण करायला तयार होईल.

बहुतेक प्रकरणांमध्ये या गोष्टीवरून नातेसंबंध तुटतात आणि अखेरीस शारीरिक प्रेमावर आधारीत हे नातं आयुष्यभराचं दुखणं बनून राहातं. अनेकदा या दुखण्यातून निर्माण झालेली वेदना इतकी त्रासदायक असते की मुलगी स्वत:ला संपवून टाकण्यासारखं चुकीचं पाऊल उचलायलाही मागेपुढे पाहात नाही.

अशा नातेसंबंधांमध्ये प्रेम कमी वाद अधिक

अशा नातेसंबंधांमध्ये मुलामुलींचा एकमेकांवर पूर्ण हक्क नसतो. ते संयुक्त निर्णयसुद्धा घेऊ शकत नाहीत. जसं की, विवाहित दाम्पत्य मात्र घेतात. उदाहरणादाखल संपत्ती एक तर मुलाची असते वा मुलीची. दोघांचा अधिकार नसतो. दुसऱ्याला हे विचारण्याचा अधिकार नाही की पैसे कशाप्रकारे खर्च होत आहेत. दोघे आपले पैसे आपल्या मर्जीने खर्च करतात.

याच कारणामुळे बहुतेकदा यांच्यात हक्क आणि अधिकारावरून भांडणं होत राहातात. हा वाद सहजासहजी मिटत नाही. ते प्रयत्न करतात की प्रेम दर्शवून वा आपसांत बोलून वाद मिटवावा. परंतु बहुतेकदा असं होत नाही; कारण कोणतेही नातेसंबंध कायम राखण्यासाठी आणि दोन व्यक्तींना जवळ ठेवण्यासाठी जे गुण सर्वाधिक जरुरी आहेत ते आहेत, विश्वास, प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि आत्मिक निकटता.

हे गुण विकसित करण्यासाठी वेळ हवा असतो. केवळ भौतिक वा शारीरिक जवळीक मानसिक आणि भावनिक आधार देईल असं जरुरी नाही. अशा पोकळ नात्यांमध्ये कटुतेचा काळ सहजी संपत नाही.

जबाबदाऱ्यांपासून पळायला शिकवतं लिव इन

लिव इन रिलेशनशिप ही वास्तविक भावनिक बंधनांच्या आधारेसोबत राहाण्याची एक व्यक्तिगत आणि आर्थिक व्यवस्था आहे. यामध्ये कायमस्वरूपी एकमेकांना सोबत देण्याचं कोणतंही आश्वासन नसतं, शिवाय संपूर्ण समाजकायद्यासमोर अशाप्रकारचा कोणताही करार केला जात नाही. त्यामुळे पार्टनर्स एकमेकांवर (लेखी/तोंडी) कोणत्याही प्रकारचा कसलाही दबाव आणू शकत नाहीत. असं नातं एकप्रकारे रेंटल एग्रीमेंटसमान असतं. हे अतिशय सहजतेने बनवलं जातं. आणि जोपर्यंत दोन्ही पक्ष योग्य वर्तन करतात, एकमेकांना खूश ठेवतात तोपर्यंत ते सोबत असतात. याउलट विवाह या पार्टनरशिपहून अधिक गहिरा आहे. हा एक सार्वभौमिक पातळीवर केलेला करार आहे, ज्यासोबत कायदेशीर आणि सामाजिक जबाबदाऱ्या संबंधित असतात. वास्तविक लग्न केवळ २ व्यक्तिचं, २ कुटुंबांचं व समुदायांमध्ये बनलेलं नातं आहे, जे आयुष्यभरासाठी स्वीकारार्ह आहे. जीवनात कितीही दु:ख, समस्या आल्या, तरी परस्पर नातं जपण्याचं आश्वासन यात दिलं जातं.

असं म्हटलं जातं की, हृदयाच्या तारा जुळल्या की मग रीतिरिवाजांची काय गरज? परंतु मुद्दा इथे रीतिरिवाजाचा नाही तर सामाजिक स्तरावर केलेल्या कमिटमेंटचा आहे. कायम जबाबदारी घेण्याची कमिटमेंट, नेहमी साथ निभावण्याची कमिटमेंट, विवाहामध्ये एका वेगळ्या पातळीची कमिटमेंट असते, त्यामुळे एका वेगळ्या पातळीवरील संरक्षण, स्वातंत्र्य आणि परिणामी वेगळ्या पातळीवरील आनंदही यातून मिळतो. जे नातं केवळ परस्पर प्रेम आणि आकर्षण कायम आहे तोपर्यंत निभावलं जातं, त्यापासून हे नातं खूप निराळं आहे. त्या संबंधात उत्तम पर्याय मिळताच विलग होण्याचा मार्ग खुला असतो. कायम मानसिक तयारी ठेवावी लागते की हे नातेसंबंध कधीही संपुष्टात येऊ शकतात.

समर्पण हवं तर लिव इन नको

जेव्हा समर्पणाचा विषय येतो, तेव्हा विवाहित जोडीदार या दृष्टीने अतिशय प्रामाणिक आढळून येतात. ५ वर्षांच्या एका संशोधनानुसार ९० टक्के विवाहित स्त्रिया पतिव्रता असल्याचं आढळलं, याउलट लिव इनमध्ये असणाऱ्या केवळ ६० टक्के स्त्रियाच प्रामाणिक होत्या असं आढळलं.

पुरुषांच्या बाबतीत स्थिती अधिकच आश्चर्यकारक होती. ९० टक्के विवाहित पुरुष आपल्या पत्नीप्रती प्रामाणिक होते. याउलट लिव इन प्रकरणात अवघे ४३ टक्के पुरुषच प्रामाणिक आढळले.

इतकंच नव्हे, लिव इनचं संकट म्हणजे प्रीमॅरिटल सेक्श्युअल एटीट्यूड आणि वर्तन विवाहानंतरही बदलत नाही. जर एक स्त्री लग्नापूर्वी एका पुरुषासोबत राहात असेल तर बऱ्याच प्रमाणात शक्यता असते की ती विवाहानंतरही आपल्या पतीला धोका देईल.

संशोधन व अभ्यास अहवालांनुसार जर एखादी व्यक्ती विवाहापूर्वी सेक्सचा अनुभव घेते, तर विवाहानंतरही ती व्यक्ती एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्समध्ये गुंतेल अशी सर्वाधिक शक्यता असते. हे खासकरून स्त्रियांसाठी अधिकीने सत्य आहे

पालकांपासून अंतर

लिव इनमध्ये राहाणाऱ्या मुलामुलींच्या जीवनात सामान्यत: आईवडिलांचा हस्तक्षेप नाममात्र असतो; कारण यासाठी त्यांची संमती नसते आणि ते आपल्या मुलांपासून अंतर राखतात.

घरच्यांना या गोष्टीची माहिती त्यांनी दिली नाही, तरी हे रहस्य अधिक काळ लपवून ठेवणंही सोपं नसतं. अनेक प्रकारच्या गोष्टी जसं की आईवडिलांकडून पैशांची मदत घेणं, पार्टनर आणि त्याचं सामान लपवणं जेव्हा पालक अचानक भेटायला येतात, सातत्याने त्यांच्या इच्छेविरुद्ध वागण्याचा अपराधभाव आणि खोटं बोलणं यासारख्या अनेक गोष्टी आहेत, ज्या लिव इनमध्ये राहाणाऱ्यांना अस्वस्थ करतात.

विश्वासाचा अभाव

जे विवाहापूर्वी सोबत राहातात, त्यांच्यात बऱ्याचदा अविश्वासाची भावना विकसित होते. परिपक्व प्रेमामध्ये गहिरा विश्वास असतो की तुमचं प्रेम केवळ तुमचं आहे आणि कुणी तिसरं त्यात नाही. परंतु विवाहापूर्वीच जवळीक साधल्यावर व्यक्तिच्या मनात अनेक प्रकारचे संशय निर्माण होऊ लागतात की माझ्यापूर्वी तर जोडीदाराच्या जीवनात कुणी नव्हतं ना वा माझ्याशिवाय भविष्यात दुसऱ्या व्यक्तीसोबत याचे संबंध बनणार नाहीत ना.

अशाप्रकारचा अविश्वास आणि संशयीवृत्ती बळावल्याने व्यक्ती हळूहळू आपल्या पार्टनरप्रती प्रेम व सन्मान गमावू लागतो. याउलट वैवाहिक जीवनात विश्वास एक महत्त्वपूर्ण भाग असतो.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...