* तोषिनी राठोड
प्रत्येक नववधूला वाटत असतं की तिची स्टाइल आणि लुक असा पाहिजे, ज्याने ती फक्त तिच्या जीवनसाथीचंच नव्हे तर सासरच्यांचंही मन जिंकेल. मग असं काय करावं जेणेकरून नववधूचं सौंदर्य पतीचं मन मोहीत करेल?
सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट ओजस राजानी सांगतात की सर्वात आधी नववधूचं व्यक्तिमत्त्व, स्किन टाइप, केसांचं टेक्सचर, कलर, आयब्रोजचा शेप आणि फेस कट पाहावा लागतो. जर यात कोणत्या प्रकारची कमतरता असेल तर नववधूला एक्सरसाइज आणि स्किन केअर रूटीनचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे मेकअपपूर्वी त्वचा अधिक टवटवीत आणि उजळलेली दिसावी
स्किन केअर रूटीन
स्किन केअर रूटीनबद्दल सांगताना ब्रायडल मेकअप आर्टिस्ट आकांक्षा नाईकचं म्हणणं आहे की नववधूला आपला स्कीन टाईप माहिती असणं खूप गरजेचं आहे. लग्नाआधी तिने रोज क्लिंजिंग, टोनिंग आणि माइश्चरायिझंगचं रूटीन अवलंबलं पाहिजे. जर स्किन ड्राय असेल तर सोप फ्री कंसीलरचा वापर केला पाहिजे. त्वचेला दिवसातून दोन वेळा माइश्चरायझरही केलं पाहिजे.
जर स्किन टाईप ऑयली असेल, तर क्लिंजिंगसह दिवसातून २-३ वेळा चेहरा धुतला पाहिजे. ऑयली स्किन टाइपसाठी टोनिंग खूप गरजेचं आहे. याने चेहऱ्याचे पोर्स बंद होतात आणि त्वचेतून तेल बाहेर येणं थांबतं. त्याचबरोबर त्वचेला माइश्चराइज्ड करण्यासाठी वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर लावलं पाहिजे. ऑयली स्किनसाठी फेस मास्क लावणंही खूप गरजेचं आहे. याने चेहऱ्यावरील डेड स्किनपासून सुटका मिळते आणि त्वचा श्वास घेऊ शकते.
वॉटर बेस्ड व क्रीम बेस्ड मेकअपमधील निवड
मेकअपमध्ये फाउंडेशन योग्य असणं खूप जरूरी आहे. जर बेस मेकअप चांगल्याप्रकारे लावलं गेलं आणि फाउंडेशनचा रंग स्किनच्या अनुरूप असेल, तर एक लायनर लावूनही नववधू सुंदर दिसू शकते.
अशाप्रकारे क्रीम बेस्ड मेकअप त्यांच्यासाठी उत्तम ठरतो. ज्यांच्या चेहऱ्यावर डाग, पिंपल्स आणि डार्क स्पॉट्स नसतात. पण ऑयली स्किनसाठी क्रीम बेस्ड मेकअपचा वापर अजिबात करू नये, तर डाग असणाऱ्या स्किनसाठी वाटर बेस्ड मेकअप गरजेचा आहे.
कॉप्लेक्शननुसार मेकअप
आकांक्षाने सांगितलं की भारतीयांचे कॉप्लेक्शन ३ प्रकारचे कॉप्लेक्शन असतात. गोरा, गव्हाळ आणि सावळा कॉप्लेक्शननुसार मेकअपची निवड करा.
गोरी त्वचा : जर तुमचा रंग गोरा आहे तर तुमच्यावर रोजी टिंट बेस कलर आणि काही प्रसंगी सोनेरी रंगाचं फाऊंडेशन बेस सूट होईल. डोळ्यांचा मेकअप करताना लक्षात ठेवा की आयब्रोज ब्राउन कलरने रंगवा. गोऱ्या रंगावर पिंक आणि हलक्या लाल रंगांचं ब्लशर खूप सुंदर वाटतं. तिथेच ओठांवर हलक्या रंगाचीच लिपस्टिक चांगली वाटते.
गव्हाळ रंग : जर तुमचं कॉप्लेक्शन गव्हाळ असेल तर तुम्ही तुमच्या स्किन कलरला मॅच करणारं वॉटर बेस्ड फाऊंडेशन लावलं पाहिजे. त्वचेवर हलक्या रंगांचं फाऊंडेशन वापरू नये. डोळ्यांच्या मेकअपसाठी ब्राँज किंवा ब्राउन कलरचा वापर केला पाहिजे. गालांवर ब्राँज कलरच्या ब्लशरचा वापर केला पाहिजे. या स्किनटोननुसार तुमच्यावर डार्क रंगांची लिपस्टिक शोभून दिसेल.
सावळी त्वचा : सावळ्या त्वचेचा मेकअप करण्याआधी सर्वात जास्त काळजी घ्यायला हवी. सावळ्या त्वचेसाठी वॉटर बेस्ड नॅचरल ब्राउन टोन फाऊंडेशनचा वापर केला पाहिजे. यासाठी फाऊंडेशनच्या ब्लेडिंगवरही चांगल्याप्रकारे लक्ष दिलं पाहिजे.
लक्षात ठेवा तुम्ही त्वचेच्या रंगापेक्षा गडद शेडच्या फाऊंडेशनचा वापर टाळा. डोळ्यांचा मेकअप करताना लाइट रंगांच्या आयब्रोज कलरचा वापर करू नये, पण आउटलाइनसाठी काजळचा वापर करा. ब्लशरसाठी प्लम आणि ब्राँज कलरचा वापर करा. लिप कलरसाठी पर्पल, रोज आणि पिंक ग्लासचा वापर करू शकता.
ओजसच्या म्हणण्यानुसार नववधूने मेकअप अधिक गडद होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. ती वयस्क दिसू लागते म्हणून आणि मेकअप टाळावा.
काळजीपूर्वक लिप कलर निवडा
ओजसच्या म्हणण्यानुसार आजकाल बॉलिवूडच्या तारकासुद्धा कमी मेकअप आणि लाइट शेडची लिपिस्टिक लावणं पसंत करतात. आता हाय डेफिनेशन कॅमेऱ्याचे दिवस आहेत, जे तुमच्या मेकअपचे बारकावे अधोरेखित करतात. जर तुम्ही डार्क रंगाची लिपस्टिक लावली तर याने तुमच्या लग्नाच्या फोटोमध्ये तुम्ही भयानक दिसाल.
ट्रेंडनुसार आजकाल मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लाइट शेडच्या लिपस्टिक आल्या आहेत, ज्या लाइट असूनही तुम्हाला डार्क लिपस्टिकसारखा लुक देतात. यामुळे तुमच्या लिप्सला थोडा पाउट लुकही मिळेल. त्याऐवजी जर तुम्ही डार्क लिपस्टिकचा वापर केला, तर तुम्ही डोळ्यांचा मेकअप कमी केला पाहिजे. जर तुम्ही हेवी आय मेकअप करत असाल, तर तुम्ही लिप कलरमध्ये लाइड शेडच निवडली पाहिजे.
रंगीत लेन्सची निवड
ओजस सांगते की तुमचा रंग गोरा असो, गव्हाळ असो किंवा सावळा असो, तुम्ही आय लेंससाठी हलक्या तपकीरी रंगाचा वापर केला पाहिजे. आय लेंसमध्ये ग्रीन आणि ब्राउन मिश्रित एक नवीन कलर बनवला आहे, जे दिसायला खूप चांगला वाटतो.
मेकअपआधी फ्लॅश टेस्ट
नववधू असो किंवा कलाकार तुमचा मेकअप बेस किंवा फाऊंडेशन परफेक्ट असला पाहिजे. कॅमेऱ्याच्या फ्लॅशमुळे मेकअप आधीच ग्रे दिसतो. अशात तुम्ही बेस लावल्यानंतर आपल्या फोनच्या कॅमेऱ्याचा फ्लॅश ऑन करून एक फोटो काढायला हवा. यामुळे तुम्हाला समजेल की तुम्ही फाऊंडेशन चांगल्याप्रकारे लावलं आहे की नाही. याला मेकअप आर्टिस्ट फ्लॅश टेस्ट म्हणतात.
कमी बेससह गरजेच्या मेकअपकडे लक्ष दिलं पाहिजे. कमी फाऊंडेशन, लाइट कलर ब्लश आणि हलक्या रंगांची लिपस्टिक तुमच्या लुकला उभारी देईल. या सॉफ्ट स्टाइलिंगबरोबर नववधू खूप सुंदर दिसते. याव्यतिरिक्त नेहमी आपलं व्यक्तिमत्त्व लक्षात घेऊन मेकअप केला पाहिजे.