* सोमा घोष
- सौंदर्य ही एक मानसिक अवस्था आहे, जी आतून येते. जर तुम्ही विचार केला की आपण सुंदर आहोत तर तुम्ही नेहमीच सुंदर दिसाल. जसा तुम्ही स्वत:बाबत विचार कराल तशाच तुम्ही दिसाल. जर तुम्ही स्वत:ला स्वर्गातील परी समजत असाल तर तुम्ही स्वत:ला नक्की तसेच अनुभवाल.
- सकारात्मक मानसिकतेने सौंदर्य उजळते. गोरा रंग अथवा पिंगट केस याने कोणीच सुंदर दिसू शकत नाही. स्मिता पाटीलचे सौंदर्य आजच्या सगळया अभिनेत्रींपेक्षा सुंदर आहे. सुंदर दिसण्यासाठी गोरे असणे आवश्यक नाही.
- 3. साधे राहूनही सौंदर्य दिसते, कमी आणि लाईट मेकअपमध्येसुद्धा अनेक अभिनेत्री सुंदर दिसतात. अनेकदा सामान्य मेकअपमुळे तुमचे नाकडोळे उठून दिसतात. मेकअपपूर्वी आपल्या त्वचेला तयार करण्यासाठी प्रायमर लावायला विसरू नका, यामुळे मेकअप करणे सोपे जाते.
- 4. याशिवाय मेडिटेशन आणि योगा केल्यानेही सौंदर्यवृद्धी होते, कारण जितकी एखादी व्यक्ती तणावमुक्त असेल तेवढी तिची त्वचा ताजीतवानी आणि तेजस्वी वाटेल.
- सुंदर दिसण्यासाठी सध्याच्या काळात योग्य ग्रुमींग आवश्यक आहे. यात तुमच्या आयब्रोचा योग्य आकार, हेअरकट, फिगर योग्य असणे वगैरे सामील असते, कारण कोणत्याही कामात योग्य प्रेझेंटेबल महिलेलाच चांगली नोकरी मिळते. जर तिचे केस लांब असतील तर तिने आपल्या चेहऱ्यानुसार योग्य हेअरकट करण्याचा प्रयत्न करावा.
- याशिवाय हेअर कलर तुमचे वय आणि रंगानुरूप असावा.
- सौंदर्यासाठी तुमची त्वचा निरोगी असणे आवश्यक आहे आणि यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. यामुळे तुम्ही शांत राहाता, ज्याचा परिणाम त्वचेवर होतो. जर त्वचेवर डाग अथवा पिगमेंटेशनची समस्या असेल तर मेकअपने तुम्ही ते लपवू शकत नाही.
- जास्त हायपर झाल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. शरीरात अनेक समस्या जाणवू लागतात, ज्याचा परिणाम त्वचेवर होतो. म्हणून वेळोवेळी स्वत:ला डिटॉक्स करण्यासाठी कारल्याचा रस प्यावा किंवा चेहऱ्याला बर्फ लावू शकता. सब्जा घातलेले पाणी प्यायल्याने त्वचा उजळते.
- व्हिटॅमिनयुक्त उत्पादने चेहऱ्यासाठी वापरल्याने चेहऱ्यावर चमक येते आणि त्वचा ताजीतवानी वाटते.
- चेहऱ्याच्या आकारानुसार मेकअप करा. जर चेहरा रुंद असेल, तर चेहऱ्याला कटुरिंग करणे आवश्यक असते. शाईन अजिबात लावू नका. शाईन लावल्याने चेहरा गुटगुटीत वाटेल. ज्यांचा चेहरा गुटगुटीत आहे अशांनी जास्त ब्लशऑन न लावता आपला चेहरा क्लीन ठेवला पाहिजे. अशा फेसकटसाठी केसांच्या काही बटा चेहऱ्यावर आणाव्या, जेणेकरून चेहऱ्याचे कटुरिंग होईल. याशिवाय लिपस्टिकसुद्धा हलक्या रंगांचा लावणे योग्य ठरेल.
- अशा आकाराच्या महिलांना आपल्या डोळयांना व्यवस्थित शेप द्यायला हवा, ज्यात लायनर, मस्कारा लावणे आवश्यक आहे.
- ज्यांच्या चेहऱ्यावर डाग असतील, त्यांनी बी बी आणि सी सी क्रीम वापरून पाहावे, ज्यामुळे डाग फिकट होतील.
- लिपस्टिकबाबत बोलायचे झाले तर नोकरदार महिलांसाठी मॅट फिनिश लिपस्टिक योग्य ठरते, या अलीकडे ट्रेंडमध्येही आहेत. ग्लॉसी लिपस्टिक जास्त करून ओठांवर पसरते, म्हणून त्याचा वापर टाळा.
- दिवसा ग्लॉस लिपस्टिक लावणे टाळावे. मॅट फिनिशिंग असलेल्या लाँग लास्टिंग लिपस्टिक बाजारात उपलब्ध आहे, त्यांचा वापर करावा.
- नेहमी स्किन टोनच्या हिशोबाने लिपस्टिक लावावा. डस्की स्किन टोन असलेल्यांना मरून, पिची अथवा ऑरेंज शेड चांगली दिसते. त्यांच्यावर गुलाबी लिपस्टिक खूपच वाईट दिसते. ब्लशऑनसुद्धा गुलाबी न लावता पिची असावे.
- गोऱ्या स्किन टोन वर गुलाबी लिपस्टिक आणि गुलाबी ब्लशऑन खूपच छान दिसते. अशा स्किन टोनवर गडद रंगाची लिपस्टिक लावल्यास चेहरा हार्श वाटतो.
- सावळया किंवा डस्की रंगावर ब्राऊन आय लायनर खूप छान दिसते.
- पिची क्रीम लिपस्टिक तुम्ही कोणत्याही वेळी किंवा मूडमध्ये लावल्यास तुमच्या चेहऱ्यावर तेज येते. याशिवाय लाल रंगाची लिपस्टिक कोणालाही कोणत्याही वेळी सूट करते.
- दिवसा चमकणारे आयशॅडो खूप भयानक वाटतात. मॅट अथवा क्रेयॉन पेन्सिल टाईप आयशॅडो कोणतीही स्त्री लावू शकते, हे लावून थोडे स्मच केल्यास चेहरा सुंदर दिसतो, सॉफ्ट पिची कलर दिवसा नेहमी छान दिसतो. सध्या आय लायनरपेक्षा आय शॅडो लावण्याचा ट्रेंड आहे. मस्कारा आणि आयशॅडो डोळयांसाठी पुरेसे असतात. याने चेहरा नेहमी नाजूक वाटतो.
- म्यॅच्युअर महिलांनी कधीच चमकणारी आयशॅडो लावू नये, यामुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या दिसू लागतात. मॅट फिनिश नेहमी छान दिसते. तरुण मुलींसाठी क्रिमी मेकअप जास्त चांगले असते. यामुळे चेहऱ्यावर निरागसता दिसते.
याशिवाय ओजस संदेश देते की स्वत:ला नेहमी तरूण आणि ताजेतवाने ठेवा, मेकअप कमीतकमी करा, नेहमी खुश राहा, प्रेमाने वागा आणि सर्वांना प्रेम वाटा.
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...
गृहशोभा से और