प्रश्न. मी २४ वर्षीय महिला आहे आणि ३ वर्षांच्या मुलीची आई आहे. मला पुढील २-३ वर्षांपर्यंत मूल नकोय. मी महिला कंडोमबाबत ऐकले आहे, पण त्याचा कधी वापर केला नाही. कृपया सांगा की महिला कंडोम काय आहे आणि किती सुरक्षित आहे?
उत्तर. सेक्सला रोमांचक आणि आनंददायी बनवण्यासाठी आजकाल बाजारात पुरुष कंडोमच नव्हे, तर महिला कंडोमही उपलब्ध आहेत. सुरक्षित सेक्ससाठी पुरुषच नव्हे, महिलाही याचा वापर करू शकतात.
महिला कंडोम गर्भनिरोधक म्हणून केवळ उत्तम पर्यायच नव्हे, तर सेक्सला सोपे आणि चिंतामुक्तही बनवतो. याबरोबरच लैंगिक संपर्कामुळे होणाऱ्या अनेक रोगांपासून संरक्षणासाठीसुध्दा सहायक असतो.
महिला कंडोम लांबट पॉलियुथेनची एक पिशवी असते, जी संबंध ठेवताना लावली जाते. याचा वापर करणे सहजसोपे असते. ही दोन्ही काठांनी लवचिक असते आणि यात सिलिकॉनवर आधारित चिकट स्त्राव लावलेला असतो. जेणेकरून सेक्स संबंधाच्या वेळी जास्त आनंद मिळेल.
पिशवीच्या कडेला लवचिक रिंग असते, जी वेजाइनाच्या आत टाकली जाते आणि पिशवीची मोकळ्या काठाची रिंग वेजाइनाच्या बाहेर असते. सामान्यपणे याचा काही साइड इफेक्ट नसतो. महिला कंडोमचा वापर सोपा आहे आणि हा पूर्णपणे सुरक्षितही आहे.
प्रश्न. मी ३५ वर्षीय अविवाहित तरुणी आहे आणि एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करते. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे लग्न करू शकले नाही किंवा असं म्हणा की माझी छोटी बहीण आणि छोट्या भावालाही शिकवून लायक बनवलं आणि बहिणीचं धूमधडाक्यात लग्न लावून दिलं. अचानक वडील वारल्यानंतर जबाबदाऱ्या पार पाडत वेळ कधी निघून गेली कळलंच नाही. कुटुंबातील लोक स्वार्थी नाहीत. त्यांनी अनेकदा लग्न करण्यासाठी माझ्यावर दबावही टाकला, पण प्रत्येक वेळी मी नकार दिला. इकडे १-२ वर्षांपासून मी एका मुलाच्या संपर्कात आहे. तो चांगल्या नोकरीला आहे, पण माझ्यापेक्षा २-३ वर्षे छोटा आहे. तो खूप चांगला आणि केयरिंग आहे. त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझ्याशी लग्न करायची इच्छा आहे, पण मला या नातेसंबंधांबाबत भीती वाटते की घरातील लोक नाराज झाले तर. खरं आम्ही उच्च जातीचे आहोत आणि मुलगा मागास जातीतील. आई, भाऊ-बहिणीच्या नजरेत मी आदर्श आहे. अशा वेळी माझ्या लग्नाचा निर्णय योग्य राहील का? याबाबत मी घरात बोलू शकते का?
उत्तर. आजच्या मुली कोणापेक्षाही कमी नाहीत, हे आपण सिध्द केलं आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर ज्याप्रकारे आपण कुशलतेने घराची जबाबदारी पार पाडली आहे, ती कौतुकास्पद आहे, पण तुम्ही स्वत:बाबत काहीच विचार केला नाही, हे दुर्दैव.
अजून वेळ जाण्यापूर्वी आपण लग्न केलं पाहिजे. मुलगा आपल्याला पसंत आहे आणि त्याला आपल्याशी लग्न करायची इच्छा आहे, तर ही चांगली गोष्ट आहे.
राहिला प्रश्न त्याच्या जातीचा तर आपण शिकलेल्या व जागरूक आहात. उच्च-नीच जाती, अस्पृश्यतासारख्या जुनाट परंपरांपासून स्वत:ला बाहेर काढा.
पत्रात आपण असं म्हटलेय की आपल्या कुटुंबातील लोक स्वार्थी नाहीएत आणि आपल्यावर लग्नासाठी दबावही टाकत आहेत, तर सरळ आहे, आपल्या आनंदासाठी त्यांची या लग्नाला काही हरकत असणार नाही. जर कुटुंबातील लोक तयार झालेच नाहीत, तर आपण कोर्टमॅरेज करू शकता.
प्रश्न. मी ३२ वर्षीय घटस्फोटित महिला आहे. मी सुरुवातीपासूनच मुक्त विचारांची राहिले आहे आणि स्वत:चं आयुष्य मोकळेपणाने जगण्यावर विश्वास ठेवते. इकडे १-२ वर्षांपासून मी अनेक पुरुषांच्या संपर्कात राहिले. त्यांच्यासोबत शारीरिक संबंधही बनले. गेल्या काही दिवसांपासून मला वेजाइनामध्ये खाज येते आणि नंतर तिथे लाल रॅशेसही होतात. १-२ वेळा मेडिकल स्टोरमधून औषध घेऊनही लावलं, पण काही फायदा झाला नाही. कृपया मी काय करू सांगा?
उत्तर. प्रत्येक महिलेला आपले आयुष्य आपल्या पध्दतीने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. नोकरी, पेहराव, खाणे-पिणे, एवढेच नव्हे, तर सेक्स संबंधांबाबतही महिला पहिल्यापेक्षा अधिक मोकळ्या झाल्या आहेत. आपला मुक्तपणे जगण्यावर विश्वास आहे, ही चांगली गोष्ट आहे, पण यावेळी काळजी घेणेही आवश्यक आहे.
आपण आपल्या पत्रात हे सांगितलं नाहीए की, ज्या पुरुषांशी आपले सेक्स संबंध आले, त्यांनी आवश्यक सुरक्षा म्हणजेच कंडोमचा वापर केला होता की नाही? सेक्स संबंध तेव्हाच आनंददायक बनू शकतात, जेव्हा त्यासाठी आवश्यक काळजी घेतली जाईल. एकापेक्षा जास्त पुरुषांसोबत संबंध ठेवताना कंडोमचा वापर फुकटात अनेक रोगांचा संसर्ग होण्यापासून वाचण्याची सोपी पध्दत आहे.
जर वेजाइनामध्ये खाज अथवा जळजळ होत असेल, तर शक्य आहे की हे इन्फेक्शनमुळे होत आहे. त्यामुळे तपासणी केल्याशिवाय एखाद्या निर्णयापर्यंत पोहोचणे सध्या योग्य होणार नाही. आपण एखाद्या विशेषज्ञ डॉक्टरांना भेटणे उत्तम होईल, जेणेकरून इन्फेक्शन अजून पसरणार नाही.
लक्षात ठेवा, एकापेक्षा जास्त सेक्स पार्टनर्ससोबत संबंध ठेवणे अनेक लैंगिक रोगांना आमंत्रण देण्यासारखं आहे.