* डॉ. रंजना शर्मा

बहुसंख्य महिलांना आपल्या पीरियड्सबाबत बोलायला आवडत नाही. हेच कारण आहे की यादरम्यान त्या हायजीनच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करतात आणि नवीन समस्यांच्या शिकार बनतात.

मासिक पाळीबाबत जागरूकतेचा अभाव हेदेखील या समस्यांमागील मोठे कारण आहे. पीरियड्सदरम्यान होणाऱ्या समस्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी काही सुचना लक्षात घ्या :

1) नियमित बदल : सर्वसाधारणपणे दर ६ तासांनी सॅनिटरी पॅड बदलायला हवे. तुम्ही टँपॉन वापरत असाल तर दर २ तासांनी ते बदला. याशिवाय तुम्ही आपल्या गरजेनुसारही सॅनिटरी पॅड बदलायला हवे. जसे की जास्त अंगावरून जात असल्यास तुम्हाला सतत पॅड बदलावे लागतात. फ्लो कमी असेल तर सतत बदलण्याची गरज नाही. तरीही दर ४ ते ८ तासांनी पॅड बदला, जेणेकरून स्वत:ला इन्फेक्शनपासून वाचवू शकाल.

2) आपल्या गुप्तांगाला नियमित धुवून साफ करा : पीरियड्सदरम्यान गुप्तांगाच्या आसपासच्या त्वचेजवळ रक्त साचते, ते संसर्गाचे कारण ठरू शकते. म्हणूनच गुप्तांगाला नियमित धुवून साफ करा. यामुळे योनीला दुर्गंधीही येणार नाही. दरवेळी पॅड बदलताना गुप्तांग चांगल्या प्रकारे साफ करा.

3) हायजीन प्रोडक्ट्स वापरू नका : योनस्वत:हूनस्वच्छहोण्याची नैसर्गिक प्रक्रिया असते, जी चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियांना संतुलित ठेवते. साबण योनीतील चांगल्या बॅक्टेरियांना नष्ट करू शकतो, म्हणून त्याचा वापर करू नका. तुम्ही फक्त पाण्याचा वापर करू शकता.

4) धुण्यासाठी योग्य पद्धत वापरा : गुप्तांग स्वच्छ करण्यासाठी योनीपासून गुद्द्वाराकडे साफ करा. म्हणजे पुढून पाठच्या दिशेपर्यंत जा. उलटया दिशेने कधीच धुवू नका. उलटया दिशेने धुतल्यास गुद्द्वारातील बॅक्टेरिया योनीत जाऊन संसर्ग होऊ शकतो.

5) वापरलेले सॅनिटरी प्रोड्क्ट योग्य ठिकाणी फेका : वापरलेले सॅनिटरी प्रोड्क्ट योग्य पद्धतीने आणि योग्य ठिकाणीच फेका, कारण ते संसर्गाचे कारण ठरू शकतात. फेकून देण्यापूर्वी ते गुंडाळा जेणेकरून दुर्गंधी किंवा संसर्ग पसरणार नाही. पॅड किंवा टँपॉन फ्लश करू नका, कारण यामुळे टॉयलेट ब्लॉक होऊ शकतो. नॅपकिन फेकल्यानंतर हात चांगल्याप्रकारे धुवा.

6) पॅडमुळे होणाऱ्या रॅशेसपासून बचाव करा : पीरियड्समध्ये हेवी फ्लोवेळी पॅडमुळे रॅशेस होण्याची शक्यता खूपच वाढते. असे सर्वसाधारपणे तेव्हा होते जेव्हा पॅड जास्तवेळ ओला राहतो आणि त्वचेशी घासला जातो. म्हणून स्वत:ला कोरडे ठेवा. नियमितपणे पॅड बदला. रॅशेस पडल्यास आंघोळीनंतर आणि झोपण्यापूर्वी अॅण्टीसेप्टिक मलम लावा. यामुळे रॅशेस बरे होतील. मलम लावूनही ते बरे न झाल्यास त्वरित डॉक्टरकडे जा.

7) एकावेळी एकाच प्रकारचे सॅनिटरी प्रोडक्ट वापरा : काही महिला ज्यांच्या जास्त अंगावरून जाते त्या एकाचवेळी दोन पॅड्स किंवा एका पॅडसोबतच टँपॉन वापरतात. कधी सॅनिटरी पॅडसोबतच कपडाही वापरतात. त्यामुळे त्यांना दीर्घकाळपर्यंत पॅड बदलण्याची गरज भासत नाही. पण तुम्ही एका वेळी एकच प्रोडक्ट वापरणे आणि ते सतत बदलणे हेच उत्तम आहे. जेव्हा एकाचवेळी दोन प्रोड्क्टचा वापर केला जातो, तेव्हा तुम्ही सतत ते बदलत नाही, यामुळे रॅशेस, संसर्गाची शक्यता वाढते. तुम्ही पॅडसोबत कपडाही वापरत असाल तर संसर्गाची भीती अधिकच वाढते, कारण जुना कपडा अनेकदा हायजिनिक नसतो. पॅड्सच्या वापराबाबत बोलायचे तर ते आरामदायक नसतात आणि रॅशेसचे कारणही ठरू शकतात.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...