डॉ. अनुजा सिंह, शांता आयव्हीएफ सेंटर, नवी दिल्ली
प्रश्न : माझं वय २७ वर्षं आहे आणि पतीचं ३० वर्षं आहे. आमच्या लग्नाला ५ वर्षं झाली आहेत. आमच्या सर्व तपासण्या नॉर्मल आल्या आहेत. पतीच्या शुक्राणूंची संख्याही जवळजवळ ९० दशलक्ष आहे. पण तरीही आम्हाला मूल होत नाही. आम्ही आयव्हीएफ तंत्रज्ञानाची मदत घेतली पाहिजे का?
उत्तर : काळजीचं काहीच कारण नाही. तुमच्या पतीच्या शुक्राणूंची संख्या चांगली आहे. त्यामुळे तुम्हाला आययूआय तंत्रज्ञानाच्या मदतीची गरज नाही. आयव्हीएफचा पर्याय तुमच्यासाठी योग्य आहे. याच्या मदतीने तुम्हाला संतती प्राप्त करून घेता येईल. पण त्यासाठी एखाद्या चांगल्या डॉक्टरची मदत घ्या.
प्रश्न : माझ्या लग्नाला २ वर्षं झाली आहेत. पण अजूनही मी गर्भवती राहू शकत नाही. तपासणीमध्ये माझा रिपोर्ट चांगला आहे. पतीच्या शुक्राणूंची संख्याही ३२ दशलक्ष आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ही संख्या समाधानकारक आहे. पण तरीही मी गर्भवती राहू शकत नाही आहे. याचं कारण काय असू शकेल?
उत्तर : हो, तुमच्या पतीच्या शुक्राणूंची संख्या समाधानकारक आहे. तुमचे रिपोर्ट्सही नॉर्मल आहेत. त्यामुळे कोणत्याही निर्णयावर पोहोचण्याआधी तुम्हाला सल्ला देऊ इच्छितो की तुम्ही निराश न होता प्रयत्न करत राहा. गर्भवती होण्यासाठी अनुकूल स्थिती असणाऱ्या दिवसांत पतीशी संबंध नक्की बनवा. उदाहरणार्थ तुमची मासिक पाळी महिन्याच्या पहिल्या तारखेला आली असेल तर तुम्ही ८ ते २० तारखे दरम्यान संबंध ठेवा. त्यानंतरही गर्भधारणा न झाल्यास आययूआय तंत्रज्ञानाची मदत घ्या.
प्रश्न : मी २६ वर्षीय अविवाहिता आहे. माझी उंची ५ फूट ३ इंच आहे आणि वजन ७० किलो. ५ महिन्यांपूर्वी माझी पाळी आली नव्हती. पण पुढच्या महिन्यात पाळी आली. त्यानंतर १० दिवसांनी मी सुरक्षित लैंगिक संबंध ठेवले. त्या महिन्यात माझी पाळी वेळेवर आली. पण आता पाळी उशिराने येत आहे. याचं कारण काय असू शकते? काहींनी मला सांगितलं की मी थायरॉइडची तपासणी करून घेतली पाहिजे. कृपया सांगा मी काय करू?
उत्तर : अनियमित किंवा उशिराने पाळी येण्यामागे बरीच कारणं असू शकतात. तुम्ही लैंगिकदृष्ट्या सक्रिय असाल तर तुम्ही गर्भावस्थेबाबत तपासणी करून खात्री करून घेतली पाहिजे. याशिवाय अंडाशयातील सिस्ट किंवा पौलिसिस्टिक ओवरीजची तपासणी होण्यासाठी पॅलविक अल्ट्रासाउंड तपासणी होणं आवश्यक आहे. हे मासिक पाळी उशिराने येण्यामागचं कारण असू शकतं. अतिवजनाचाही परिणाम पाळीवर होऊ शकतो. तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन ६० किलो असलं पाहिजं. तुम्ही तुमचा आहार आणि जीवनशैलीमध्ये योग्य बदल करून वजन कमी केलं पाहिजे. यामुळे पाळी नियमित होण्यास मदत मिळेल.
प्रश्न : माझं वय ३८ वर्षं आहे. लग्नाला दहा वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. पण अजूनही आई बनण्याचे सुख मला अनुभवता आलेलं नाही. डॉक्टरने मला सांगितलं की, माझं अंडाशय कमकुवत आहे. यामुळेच एकदा माझा ३ महिन्यांनतर गर्भपात झाला आहे. मी का करू?
उत्तर : या वयात गर्भधारणा करणं थोडं कठिण असते. तुमचा ३ महिन्यांचा गर्भपात झाला आहे. यावरून हेच सिद्ध होतं की तुमचं अंडाशय कशाचीही कमकुवत आहे. पण तुम्ही निराश होऊ नका. तुमच्य पतीमध्ये कशाचीही कमतरता नसेल तर तुम्ही एग डोनेशन तंत्रज्ञानाची मदत घेऊ शकता. दुसरी एखादी महिला म्हणजे तुमची बहिण किंवा वहिनी यांचे अंडाशय तुमच्या गर्भाशयात ट्रान्सप्लांट करता येऊ शकते. पण ती महिला विवाहित असावी आणि तिने बाळाला जन्म दिलेला असावा.
प्रश्न : माझं वय २८ वर्षं आहे. मी एका खाजगी कंपनीत काम करते. माझ्या पतीच्या वीर्यांमध्ये शुक्राणू नाहीत आहेत. कृपया सांगा मुलाला जन्म देण्यासाठी आम्ही काय करू?
उत्तर : तुमच्या पतीच्या शारीरिक रचनेची तपासणी करून घ्या. स्पर्म बँकमधून स्पर्म विकत घेऊन डोनर आयईयूचा पर्याय प्रभावी ठरू शकतो. कदाचित तुमच्या पतीचे स्पर्म कुठेतरी थांबत असतील. असं असेल तर यावरही उपचार शक्य आहे.
प्रश्न : मी मल्टिनॅशनल कंपनीमध्ये काम करते. मी आणि माझे पती मुलाला जन्म देण्यासाठी तयार नाही. मी गर्भनिरोधक गोळ्या घेतो. मग आम्ही कंडोम वापरण्याची गरज आहे का?
उत्तर : गर्भनिरोधक गोळ्या किंवा इंजेक्शन नको असलेली गर्भधारणा टाळतात. पण यामुळे लैंगिक रोगांपासून संरक्षण मिळत नाही. कंडोमच्या वापराने नको असलेली गर्भधारणा तर टळतेच पण तुम्ही आणि तुमचा जोडिदार लैंगिक रोगांपासून सुरक्षित राहता.