– अपर्णा मुजूमदार
सुधा सकाळपासून त्रस्त झाली होती. तिला संध्याकाळी तिच्या बेस्ट फ्रेंडच्या घरी फेस्टिव्ह पार्टीला जायचे होते. तिला कळत नव्हते की कोणता ड्रेस घालून पार्टीला जावे. तिच्या वॉर्डरोबमध्ये ड्रेसेसची कमतरता होती असे नव्हे, तिचा वॉर्डरोब ड्रेसेसनी खचाखच भरला होता, तरी ती कोणता ड्रेस घालावा, याची निवड करू शकत नव्हती.
एखाद्या खास पार्टीचे आमंत्रण मिळाले किंवा सणासुदीचे दिवस असतील तर मन कसे प्रफुल्लित होऊन जाते, परंतु त्यासाठी ड्रेसची निवड करताना कोणताही ड्रेस पसंतीस उतरत नाही, तेव्हा मात्र मन खट्टटू होऊन जाते. अशावेळी आपल्याला स्वत:चाच राग येतो की काही खास निमित्तांसाठी आपण १-२ ड्रेस का घेऊन ठेवले नाहीत?
जर अशा समस्येतून तुम्हीही जात असाल, तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही, कारण ९० टक्के महिला किंवा तरुणींना अशा प्रॉब्लेममधून जावे लागते. आतापर्यंत जे झाले ते झाले, पण पुढे मात्र या काही गोष्टींची काळजी घेतलीत, तर अशा समस्येचा सामना करावा लागणार नाही.
वॉर्डरोब ब्लंडर्सपासून वाचा
बहुतेक महिला आपल्या वॉर्डरोबला व्यवस्थित ठेवत नाहीत. त्यांचा वॉर्डरोब अस्ताव्यस्त असतो. उलट तो नीटनेटका ठेवला पाहिजे.
निरीक्षण करा
वेळोवेळी आपल्या वॉर्डरोबचे निरीक्षण करा. निरीक्षण करताना जर एखादा ड्रेस तुम्हाला अनफिट, आउट डेटेड किंवा कमी स्टाइलिश वाटला, जो पुन्हा घालण्याची इच्छा नसेल तर असे ड्रेस लगेच वॉर्डरोबबाहेर काढा. कारण अशा ड्रेसेसमुळे खास प्रसंगी एखादा ड्रेस निवडताना आणखी समस्या निर्माण होते.
मोह करू नका
अनेक महिला अनफिट, आउटडेटेड, अनकंफर्टेबल किंवा कमी स्टायलिश ड्रेस यासाठी वॉर्डरोबमध्ये जमा करून ठेवतात, कारण त्यांच्यासोबत काही आठवणी जोडलेल्या असतात. उदा. हा खूप महागडा आहे, हा आजोबांनी दिला आहे, हा सिंगापूरवरून आणलाय, हा गोल्डन नाइटला घातला होता. या सगळया गोष्टी बाजूला ठेवून तो वॉर्डरोबबाहेर काढा.
अलबम बनवा
तुमच्याजवळ किती ड्रेस आहेत, कोणत्या स्टाइलचे आहेत, कोणत्या कलर किंवा प्रिंटचे आहेत, या गोष्टी आपल्या लक्षात नसतात. यासाठी तुम्ही एक अल्बम बनवा. मोबाइलमध्ये कॅमेरा असल्याने तुम्ही आपल्या प्रत्येक ड्रेसचा फोटो काढून मोबाइलमध्ये सेव्ह करून ठेवू शकता. ते पाहून तुम्ही खास प्रसंगी ड्रेसची निवड करू शकता.
जेव्हा तुम्ही ड्रेस घेण्यासाठी बाजारात जाल, तेव्हा अल्बम पाहून त्यापेक्षा वेगळया स्टाइल, कलर आणि प्रिंटचे ड्रेस खरेदी करू शकता.
वॉर्डरोबची देखभाल
वॉर्डरोबमध्ये अनेक कप्पे असतात. कॅज्युअल ड्रेस, पार्टी ड्रेस, हेवी ड्रेस, ऑफिस ड्रेस इ. वेगवेगळया कप्प्यांत ठेवा. जेणेकरून प्रसंगानुसार ड्रेस शोधताना त्रास होणार नाही.
होमवर्क करा
शॉपिंगला जाण्यापूर्वी चांगल्याप्रकारे होमवर्क करा. वाटल्यास हे नोट करून ठेवा की मार्केटमध्ये जाऊन आपल्याला कोणत्या स्टाइल, कलर आणि कोणत्या बजेटचा आउटफिट खरेदी करायचा आहे, तसेच ही गोष्टही लक्षात घ्या की आपल्याला कोणत्या प्रकारचे आउटफिट उदा. कॅज्युअल, ऑफिशिअल, हेव्ही किंवा पार्टीवेअर खरेदी करायचे आहेत.
नंबर ऑफ ड्रेसेस
वॉर्डरोबमध्ये नंबर ऑफ ड्रेसेस वाढविण्यापेक्षा क्वालिटीवर विशेष लक्ष द्या. बहुतेक वेळा महिला क्वालिटी पाहण्याऐवजी ड्रेसेसची संख्या पाहतात. त्यांच्या वॉर्डरोबमध्ये ड्रेस भरलेले असतात, पण काही खास कारणासाठी त्यांच्याकडे ड्रेस नसतात. कॅज्युअल, ऑफिशिअल, हेव्ही किंवा पार्टी ड्रेसच्या संख्याकडेही लक्षा द्या. कुठे असे होऊ नये की वॉर्डरोबमध्ये हेव्ही आणि पार्टी ड्रेसेसची संख्या जास्त आणि कॅज्युअल, ऑफिशिअल ड्रेसेसची संख्या कमी असेल.
ड्रेसची फिटिंग
ड्रेस कितीही महागडा असला तरी त्याची फिटिंग व्यवस्थित नसेल, तर तो चांगला दिसत नाही. त्यामुळे शरीरानुरुप ड्रेस पसंत करा, तरच तो शोभून दिसेल. एखादा ड्रेस दुसरीला चांगला दिसत असेल, तर तो तुम्हालाही चांगला दिसेल हे जरूरी नाही. म्हणून स्वत: घालून ट्राय करून पाहा. जर तो तुमच्या शरीराला शोभून दिसत असेल, तरच खरेदी करा.
कोणताही ड्रेस असा विचार करून घेऊ नका की तो तुम्हाला एकदाच घालायचा आहे. ड्रेस कोणत्याही निमित्ताने खरेदी करा, पण तो घालून पाहिल्यानंतरच खरेदी करा. नाहीतर खरेदी करून आणल्यानंतर तो आवडला नाही, म्हणून मग वॉर्डरोबमध्येच पडून राहील.
कलर्सची निवड
प्रत्येक कलरचा ड्रेस सर्वांनाच चांगला दिसेल, असं नाही. म्हणून ड्रेस घालून नॅचरल प्रकाशात स्वत:ला कसा दिसतोय, ते पाहा. ज्या ड्रेसचा रंग चेहऱ्याला ग्लो देईल, असाच ड्रेस पसंत करा.
एक्सक्लिव्ह ड्रेस
आजकाल एक्सक्लिव्ह ड्रेसचा काळ आहे. म्हणून कोणाची नक्कल करू नका. स्वत:ची स्टाइल बनवा. टीव्ही सीरियल किंवा एखाद्या अभिनेत्रीची कॉपी करू नका. आपल्या एज, प्रोफेशन आणि कॉम्प्लेक्शननुसार ड्रेसची निवड करा.
विंडो शॉपिंग
वेळ काढून अधूनमधून विंडो शॉपिंग करावी. विंडो शॉपिंगमुळे ट्रेंड आणि रेटबाबत सहजपणे कळून येते. त्याचबरोबर आउटडेटेड ड्रेसेस वॉर्डरोबमधून बाहेर काढण्यातही मदत मिळते.
ड्रेसची देखभाल
डेली वेअर वेगळे ठेवा. त्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. हेवी व पार्टीवेअरला ड्रायक्लीन करा. कोणत्याही ड्रेसची कुठल्याही बाजूने शिलाई निघाली असेल, तर लगेच शिवा. जरी किंवा मोती निघाले असतील, तर त्यांना ठीक करा. खूप ड्रेसेस एकावर एक ठेवू नका. बनारसी व कोसाच्या साड्यांच्या जागा बदलत राहा.
वॉर्डरोबमध्ये कपडे ठेवताना त्यांना योग्य जागी ठेवा. बाहेरून आल्यानंतर कपडे व्यवस्थित झाडा. नंतर हँगरला टांगून ठेवा. घाम सुकल्यानंतरच ड्रेस वॉर्डरोबमध्ये ठेवा. सेफ्टीसाठी त्यात नॅप्थोलिनच्या गोळया किंवा ओडोनिल जरूर ठेवा.