– शैलेंद्र सिंह
कोरोना संकटात घरगुती भांडणे बऱ्याच प्रमाणात वाढली. पुजाअर्चेचे समर्थक मंदिरे उघडून महिलांना आपला त्रास टाळण्यासाठी देवाच्या आश्रयास जाण्याचा उपदेश देऊ लागले. कोरोना संकटात देवाचे दरवाजे प्रथम बंद केल्याने लोकांचा विश्वास उडत चालला होता. अशा परिस्थितीत प्रत्येक धर्मामध्ये पूजास्थळं उघडण्याची मागणी वाढू लागली, जेणेकरून दानदक्षिणेचा व्यवसाय थांबू नये.
जनतेला हे समजले आहे की धार्मिक स्थळांमध्ये जाऊन कोरोनापासून रक्षण होऊ शकत नाही, यामुळे या ठिकाणी अजूनही लोकांची गर्दी दिसत नाही. आता कपटींनी दान आणि दक्षिणा या दोन्हींसाठी ऑनलाईन सुविधा सुरू केली आहे. यानंतरही महिलांचा विश्वास वाढत नाही. ज्या मंदिरात दर्शन घेणाऱ्यांसह पुजारीदेखील भीतिच्या सावटाखाली जगत आहेत, ते इतरांच्या समस्या कसे दूर करू शकतील.
कोरोना संकटाच्या वेळी सर्व मूलभूत अधिकार जणू संपले. लॉकडाऊनमध्ये पूजा करण्याच्या हक्कासाठी मंदिरे आणि चर्च उघडण्याची मागणी अमेरिकेपासून भारतापर्यंत एकाचवेळी होऊ लागली, याउलट कोरोना संकटात मंदिरे उघडण्यावर केवळ बंदी होती, मात्र आपापल्या घरात उपासना करण्यास बंदी नव्हती.
पूजास्थान उघडण्याच्या मागणीमागे कारण केवळ इतकेच होते की मंदिरातील पुजाऱ्यांना दक्षिणा मिळत नव्हती. देवळांच्या दानपेटीत देणगी दिली जात नव्हती. मंदिरांमध्ये देणगी देणाऱ्यांत महिलांची संख्या अजूनही सर्वात जास्त आहे. अशा परिस्थितीत स्त्रियांना मंदिरात आणून पूजा करण्यासाठी मंदिरे उघडली जाणे आवश्यक होते.
तीन महिन्यांच्या लॉकडाऊनमध्ये मंदिरातील पुजारी आणि ब्राह्मणांच्या काही संघटनांनी अशी लेखी मागणी केली की पुरोहितांसमोर रोजीरोटीचे संकट उद्भवले आहे. अशा परिस्थितीत मंदिरांचे दरवाजे उघडले पाहिजेत.
कोरोना संकटात मंदिरे आणि इतर उपासनास्थळे कुलूपबंद होते. मंदिरांचे काम तर लोकांकडून दान आणि दक्षिणेवर अवलंबून होते. अशा परिस्थितीत दान आणि दक्षिणा न मिळाल्याने मंदिरांसमोर कमाईचे संकट उभे राहिले. मंदिरांकडे जे आधीपासून सोने, चांदी आणि दान होते, त्यांना या संकटाच्या वेळीही ते बाहेर काढायचे नव्हते. दुसरीकडे लोक विचार करू लागले की मंदिर आणि देव, ज्यांनी कोरोनाच्या भीतिमुळे आपले दरवाजे बंद केले आहेत, ते जनतेला कोरोनापासून कसे वाचवू शकतील.
जेणेकरून धार्मिक भावना कायम राहतील
लॉकडाऊनदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: जनतेत धार्मिक भावना कायम राहतील असा प्रयत्न केला. २२ मार्च रोजी संध्याकाळी ‘जनता कर्फ्यू’च्या दिवशी लोकांना ‘टाळी आणि थाळी’ वाजवायची विनंती केली गेली. यानंतर २४ मार्च रोजी संपूर्ण लॉकडाऊन केल्यावर ‘शंख’, ‘टाळी,’ ‘थाळी’ आणि ‘दिवे पेटवून’ घरात राहून देवाची उपासना करण्याचा संदेश दिला.
हळूहळू कोरोनाचे संकट वाढत गेले. कोणत्याही प्रकारचे प्रयत्न कामी आले नाहीत. पंतप्रधान जनतेत धार्मिक भावना जागृत करण्याचा प्रयत्न करत राहिले. नवरात्र आणि रमझानचा कोरोनावर परिणाम होईल, अशी ग्वाही त्यांनी जनतेला दिली. कोरोना पराभूत होईल. तीन महिन्यांच्या मोठया लॉकडाउननंतरही कोरोना थांबला नाही, म्हणून देवळांचे दरवाजे उघडले गेले, जेणेकरून देवळांमध्ये दान आणि दक्षिणा येत राहिल.
देवळांमध्ये दानदक्षिणा देता यावी यासाठी फक्त मंदिरे आणि उपासनास्थळेच उघडली गेली नाहीत तर दर्शन घेणाऱ्यांचे कोरोनापासून रक्षण करण्यासाठी तेथेही काही बदल करण्यात आले. त्यातील सर्वात मोठा बदल म्हणजे मंदिरात प्रसाद वाटला जाणार नाही तसेच दर्शन घेणाऱ्यांनी मूर्तींना स्पर्श करायचा नाही.
मंदिरांचे पुजारी नक्कीच मंदिर उघडण्याची आणि पूजा करण्याची मागणी करत होते, परंतु कोरोनाच्या भीतिने त्यांनाही ग्रासले आहे. मंदिर उघडण्याच्या शासनाच्या आदेशानंतर प्रत्येक मंदिराने कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी बदल केले. यात दर्शन घेणाऱ्यांना दूरवरून दर्शन घेण्यास सांगितले गेले. आरतीच्या वेळीच मंदिरे उघडली जात आहेत. एकमेकांपासून अंतर ठेवून चालणे आणि मास्क घालणे अनिवार्य केले गेले.
मंदिर उघडण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे एकदा ही बाब लोकांच्या मनात बसली की मंदिर आणि देव आपले रक्षण करू शकणार नाहीत, तर ते पुन्हा मंदिरात सहजासहजी जाऊ शकणार नाहीत.
वास्तविक धर्मदेखील एखाद्या व्यसनासारखा आहे. एकदा हे व्यसन सुटले की पुन्हा परत लागणे कठीण होते. ज्या पद्धतीने दारू विक्रेते, पानगुटखा विक्रेते सरकारवर दबाव आणत होते, त्याच प्रकारे मंदिरांशी संबंधित लोकही त्यांच्यावर दबाव आणू लागले. कोरोना लॉकडाऊनदरम्यान फक्त मंदिरे बंद होती, घरून पूजा-अर्चना करण्यास कोणतीही बंदी नव्हती. जर गोष्ट दान आणि दक्षिणेची नसती तर मंदिरे उघडण्याची चर्चा का झाली असती. गोष्ट पूजेची नव्हे, दान दक्षिणेची होती, मंदिरांपासून होणाऱ्या कमाईची होती, यामुळे मंदिरे उघडणे आवश्यक झाले होते.
दानपेटया हटवल्या नाहीत
आरतीच्यावेळी मंदिरे उघडण्याचे कारण म्हणजे आरतीच्या वेळी जास्तीत जास्त दक्षिणा दिली जाते. देवळांनी बरेच बदल केले, पण दानपेट्या हटवल्या नाहीत. त्यांना बंद केले नाही. आरतीच्या वेळी मंदिरे यासाठी उघडली जात आहेत की भाविक आरतीदरम्यान दक्षिणा देऊ शकतील.
परंतु कोणत्याही मंदिरामध्ये पूर्वीप्रमाणे भाविकांची गर्दी दिसत नाही. जर देवाने संरक्षण केले असते तर मंदिरांचे दरवाजे बंद झाले नसते, किमान मंदिरांमध्ये पुजारी मास्क घालून किंवा तोंड झाकून भक्तांना भेटत नसते.
देवळांच्या बाहेर पुजेच्या वस्तू विकणारी बहुतेक दुकाने बंद आहेत. मंदिरे उघडण्याचा प्रयत्न यासाठी केला जात आहे की जेणेकरुन जे पुजेची सामग्री विकतात त्यांचे कामही सुरू करता येईल. खरे पाहिले तर मंदिर, दान, दक्षिणा आणि मंदिरासमोर उघडलेली यांच्याशी संबंधित दुकानांचा आपापसांत गाढ संबंध आहे. त्यांचा उदरनिर्वाह मंदिरात येणाऱ्या लोकांवर चालतो.
अनेक लहान-मोठया मंदिरांच्या व्यवस्थापनांनी यावरदेखील ताबा मिळविला, यामुळे मंदिराच्या अधिकृत दुकानांतूनच ही सामग्री विकण्यास सुरूवात झाली. अनेक मंदिरांनी स्वत:च्या आवारात दुकाने बांधली आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या उत्पन्नावर टिकून राहिले. मंदिरांपर्यंत लोकांना पोहोचण्यासाठी दरवाजे यासाठी उघडले गेले की जेणेकरून मंदिरांचा आणि त्यांच्याशी संबंधित लोकांचा व्यवसाय चालविला जाऊ शकेल.
समस्या उपासनेमुळे दूर होत नाहीत
कोरोना संकटाच्या काळात सर्वाधिक प्रभाव महिलांवर होत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी, स्त्रियांना खाण्या-पिण्याच्या वस्तू सुरक्षित ठेवणे, धुणे आणि स्वच्छ करणे यासारख्या गोष्टी कराव्या लागल्या. ‘वर्क फ्रॉर्म होम’मध्ये महिलांचे घराबाहेर पडणे थांबले, परंतु त्यांना घरून काम करावे लागले. अशा परिस्थितीत सर्वात मोठी समस्या म्हणजे घराबाहेर पडणे आणि शॉपिंगला जाणे समोर येऊ लागली. घराबाहेर पडल्यावर त्यांना इच्छित वातावरण मिळायचे, जे घरात राहिल्यामुळे बंद झाले.
घरी राहणे व मित्रांपासून अंतर वाढल्याने महिलांमध्ये मानसिक ताणतणाव वाढला आहे. घरांमध्ये भांडण होऊ लागली. घरगुती वादांची आकडेवारी असे दर्शविते की लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक पती-पत्नीमध्ये वाद झाले आहेत. या वादाचा जास्तीत जास्त परिणाम महिलांवरच झाला आहे, ज्यामुळे कुटुंबातील तणाव वाढला आहे. या तणावाचा सर्वात जास्त परिणाम स्त्रियांवर झाला आहे.
आकडेवारी दर्शवते की लॉकडाऊननंतर भारतात घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महिलांविरोधात गुन्हेगारीत घरगुती हिंसाचार, विनयभंगाशी संबंधित तक्रारींमध्ये वाढ दिसून आली. बायका म्हणतात की नवरे मनातील राग काढतात. यापूर्वीही पती-पत्नीमध्ये वाद झाले होते, पण लॉकडाऊनमुळे त्यांच्या घरात राहण्याने हे संघर्ष वाढत गेले. आता मारहाणीची प्रकरणे सुरू झाली. अशा घटनांमध्ये महिला तक्रार देण्यासाठी बाहेर जाऊ शकत नव्हत्या. लॉकडाऊनमध्ये व्यस्त पोलिस स्वत: अशा तक्रारी ऐकण्याच्या बाजूचे नव्हते.
मंदिरात जाऊनही या संकटांचा अंत नाही. हे संघर्ष टाळण्यासाठी आपापसांत मेळ जमवून शांततेत जगणे महत्वाचे आहे. वाद झाल्यास मंदिरेही कामी येणार नाहीत.