– गरिमा

मुले कच्च्या मातीसारखे असतात. त्यांना कोणते रूप द्यायचे आहे हे आपल्यावर अवलंबून आहे. मोठा झाल्यावर तो चांगल्या व्यक्तिमत्वाचा धनी व्हावा, प्रगती करावी आणि आपले नाव उज्ज्वल करावे ही इच्छा प्रत्येक आई-वडिलांची असते. पण हे शक्य तेव्हा होईल, जेव्हा आपण सुरूवातीपासून मुलाच्या उत्तम पालनपोषणावर लक्ष देऊ. उत्तम पालनपोषणासाठी ही गोष्टही खूप महत्त्वपूर्ण आहे, ज्याकडे बऱ्याचदा आईवडिल दुर्लक्ष करतात आणि ते आहे मुलांना आदर देणे.

मुलाला कधी त्याच्या लहान भाऊ वा बहिणीसमोर ओरडू नये
जर तुमच्या मुलाने एखादे काम तुमच्या मनासारखे केले नाही किंवा त्याने काही खोडी केली, मार्क्स कमी आलेत किंवा मग त्याच्या खोटया बोलण्याचा तुम्हाला राग आला असेल, तर गोष्ट कितीही मोठी असो, मुलाला त्याच्या लहान भावंडासमोर अपमानित करू नये.

कारण छोटा भाऊ वा बहिण, जो मोठयाला आपल्याकडून मार खाताना पाहतोय, वेळ आल्यावर तो ही मोठयाचा आदर करणे सोडून देईल. छोटया भावंडांच्या नजरेत मोठयाचा आदर कमी होईल. तो मोठया भावाची वा बहिणीची टर उडवेल, ज्यामुळे मोठयाच्या मनात निराशा घर करेल. यासाठी जर मुलाला काही बोलायचे असेल तर छोटयांच्या समोर नव्हे तर एकांतात सांगावे.

इतरांच्या समोर आपले नियंत्रण सोडू नका
समजा, मुलाने आपली एखादी वस्तू हरवली आहे किंवा एखादी मोठी चूक केली जिच्याबद्दल आपल्याला दुसऱ्या कोणाकडून कळलंय, तेव्हा बातमी कळताच एकदम त्याला आरडा-ओरड करू लागणे योग्य नाही.

लोकांसमोर मुलाला कधी अपमानित करू नये. एकांतात त्याच्याशी बोलावे. एकदम नियंत्रण वा ताबा सोडण्याऐवजी मुलाला त्याने केलेल्या चुकीबद्दल सांगावे आणि मग त्याचे उत्तर ऐकावे. होऊ शकते कधी परिस्थितीमुळे असे घडले असेल. त्याला स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्याची संधी द्यावी. त्याची बाजू ऐकल्यावर निर्णय घ्या की त्याची चूक आहे वा नाही. जरी त्याची चूक असली तरीही त्याला मारझोड करण्याऐवजी तार्किक पद्धतीने समजवावे. त्याला त्याची चूक पटवून द्यावी आणि वचन घ्यावे की भविष्यात असे काही त्याने करू नये. प्रेमाने समजावलेल्या गोष्टीचा प्रभाव खूप खोलवर होतो तर मारझोडीने समझावण्यात आलेल्या गोष्टीने मुलामध्ये संताप आणि असंतोषाची भावना निर्माण होते किंवा मग तो डिप्रेस्ड राहू लागतो.

मुलाच्या त्रुटी दाखवू नयेत
प्रत्येक वेळी मुलाला कामचोर, आळशी, मूर्ख, नालायक, असभ्य यासारख्या शब्दांनी डिवचू नये. आपण त्याला जेवढे फटकाराल, त्याच्या चुका दाखवत राहाल त्यामुळे त्याची तेवढीच जास्त वाईट मार्गावर जाण्याची शक्यता बळावते. बऱ्याच घरात आई-वडील प्रत्येक वेळी मुलाला कोसत राहतात. बाहेरचे, शेजारी आणि नातेवाइकांसमोर त्याच्या दोषांची चर्चा करत राहतात. यामुळे मुलामध्ये नकारात्मक दृष्टीकोन तयार होतो. याउलट जर आई-वडिलांनी मुलाच्या छोटया-मोठया कामगिरींना उत्सवांसारखे साजरे केले, इतरांसमोर त्याची प्रशंसा केली, त्याच्या सुप्त गुणाविषयी रंजकपणे सांगितले तर मुलामध्ये सकारात्मकता वाढीस लागते. त्याच्यात अजून जास्त चांगले काम करून प्रशंसा प्राप्त करण्याची लालसा जागृत होते. त्याच्या मनात क्रोध, दु:ख किंवा प्रतिस्पर्धेऐवजी उत्साह, एकाग्रता आणि निर्दोष स्पर्धेची भावना प्रबळ होते.

मुलाच्या इच्छांना सन्मान द्या
प्रत्येक मूल इतरांपेक्षा वेगळे असते. प्रत्येक मुलांत वेगवेगळया विशेषता असतात. वेगवेगळे कौशल्य असते.

मुलामध्ये जे कौशल्य आहे, त्याला जे करणे आवडते, त्याची भविष्यात जे बनण्याची आकांक्षा असेल त्याला तुम्ही पाठबळ द्यावे. त्याला तेच बनू द्या जे बनण्याची त्याची इच्छा आहे. बऱ्याच घरांत मुलाची इच्छा हे सांगून दाबली जाते की तो अजून छोटा आहे, चांगले वा वाईटाची समज नाही. परंतू अशी प्रवृत्ती योग्य नाही.

मुलाच्या जीवनावर आपला अधिकार दाखवू नका. त्याला पूर्ण सन्मानाने आपले जीवन आणि जीवनाशी निगडित निर्णय घेऊ द्या, ज्यामुळे वय वाढल्यानंतर त्याच्यामध्ये फ्रस्ट्रेशन, तडफड, कोंडमारा आणि क्रोधाची अग्नी नव्हे तर समाधान, आनंद, आपलेपणा आणि प्रेमाचा प्रवाह वाहील. तो तुम्हालाही प्रेम देईल आणि इतरांनाही.

मुलाचे नाव बिघडवू नका
नेहमी आई-वडील वा नातेवाईक मुलाच्या नावात बिगाड करून पुकारतात. जसे चंद्रला चंदर, देवला देवू, मीनलला मिनुआ इत्यादी. त्यांच्या बाहेरील त्रुटीमुळेसुद्धा त्याला त्या नावाने बोलू लागतात. जसे मुलगा काळा असेल तर तो काळू, जाडजूड असेल तर जाडया, छोटा असेल तर छोटू इत्यादी. म्हणून चुकूनही मुलांना कधी अशा नावांनी बोलू नये. उलट जर कोणी परिचित वा नातेवाईक असे करत असेल तर लगेच त्याला असे करण्यास मनाई करा.

बिगडलेल्या नावाबरोबरच मुलाचे व्यत्तिमत्वही बिगडू शकते. नेहमी मुलाला त्याच नावाने बोलवा जसे आपण त्याला पाहू इच्छिता. जसे हर्ष, आशा, निहाल, प्रथम सारखी चांगल्या अर्थाची नावे मुलांमध्ये सकारात्मक ऊर्जा तयार करतात.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...