* प्रतिनिधी

चणाडाळ चटणी

काय लागेल

* अर्धा कप चण्याची डाळ

* ३ लाल मिरच्या

* चिमूटभर चमचा एल. जी. हिंग

* ५-६ कढीपत्ते

* १ मोठा चमचा तेल

* १ मोठा चमचा लिंबाचा रस

* अर्धा छोटा चमचा राई

* २ मोठे चमचे दही

* मीठ चवीनुसार.

कसं कराल

डाळ कोरडी भाजा. मग धुऊन अर्ध्या तासासाठी पाण्यात भिजवा. डाळ, लाल मिरच्या बारीक वाटा. पॅनमध्ये तेल गरम करून राई, चिमूटभर चमचा एल. जी. हिंग फोडणीला द्या. मग कापलेली कढीपत्त्याची पाने घालून परता. वाटलेल्या डाळीत ही फोडणी ओता. दही व मीठ मिसळा. हीसुध्दा ४-५ दिवस फ्रीजमध्ये ठेवता येईल.

फायदा

यात प्रोटीन व फायबर विपूल प्रमाणात असते.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...