शाहाना परवीन

मित्रांनो, सेक्स ही एक नैसर्गिक आणि निरोगी क्रिया आहे ज्यामध्ये दोन प्रौढ व्यक्तींच्या संमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित होतात. लग्नानंतर, पती-पत्नीमध्ये घडणारी ही एक महत्त्वाची घटना आहे, जी दोन व्यक्तींना जवळ आणते. मूल जन्माला घालण्यात महत्त्वाची भूमिका बजावते आणि जोडीदाराला आनंद तसेच शांतता मिळवून देते.

कोणत्याही विवाहित जोडप्यासाठी सेक्स हा चांगला आणि उपयक्त मानला जातो. त्याचवेळी, तो जबरदस्तीने करणे देखील योग्य मानले जात नाही. इथे आपण पती-पत्नी आणि लैंगिक संबंधांबद्दल बोलत आहोत. जेव्हा एखादी मुलगी लग्न करून दुसऱ्या कुटुंबात जाते तेव्हा तिच्यासाठी सर्व काही पूर्णपणे नवीन आणि अनोळखी असते. तिला तिथे काय कसे वागावे, हेच सूचत नाही. अशा परिस्थितीत, तिच्या जीवनसाथीने तिला प्रोत्साहन दिले आणि मदत केली तरच ती नवीन घरात जुळवून घेऊ शकते.

पती-पत्नीच्या नात्यात विश्वास आणि जवळीक महत्त्वाची असली तरी, विशेषत: लग्नानंतर लैंगिक संबंधदेखील खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. सेक्स ही एक अशी प्रक्रिया आहे, जी फक्त पती-पत्नीच्या संमतीनेच योग्य मानली जाते. पतीने कधीही आपल्या पत्नीला लैंगिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करू नये आणि पत्नीनेही कधीही असे करू नये.

यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली

केवळ आपणच नाही तर अनेक डॉक्टर आणि वैद्यांचा असा विश्वास आहे की, सेक्सशिवाय जीवन बेचव आहे आणि खरं तर ते तसंच आहे. आपण असे अनेक पती- पत्नी पाहिले असतील, ज्यांचे वैवाहिक जीवन केवळ लैंगिक संबंध ठेवण्यातील अडचणी आणि असंतोषामुळे उद्ध्वस्त झाले आहे. आजकाल वातावरण खूप बदलले आहे.

पूर्वी या विषयावर बोलणे शक्य नव्हते, लोक संकोच करायचे, पण आज भारतीय समाजात सेक्सबद्दल मोकळेपणा सतत वाढत आहे, यात शंका नाही. लोकही सेक्स करण्यात आणि सेक्सची इच्छा व्यक्त करण्यात संकोच करत नाहीत. तरीही, अनेक लोकांसाठी ते एखाद्या निषिद्ध गोष्टीपेक्षा कमी नाही. आजही अनेक तरुण, मग ते पुरुष असोत किंवा महिला, लैंगिकतेबद्दल उघडपणे चर्चा करू शकत नाहीत. मनातल्या इच्छा मनातच साठवून ठेवल्या जातात. बऱ्याचदा यामुळे गैरसमजही निर्माण होतात. निरोगी लैंगिक संबंध ठेवण्यात सर्वात मोठा अडथळा म्हणजे एकमेकांशी स्वेच्छेने न बोलणे किंवा एकमेकांशी बोलू न शकणे आणि दुसरी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जीवनासाठी लैंगिक संबंध का महत्त्वाचे आहेत, या विषयाबद्दल ज्ञान कमी असणे.

सहवास किंवा संभोग कशाला म्हणतात?

लैंगिक संबंधांना संभोग, मैथुन किंवा सहवास असेही म्हणतात. या प्रक्रियेत, पुरुषाचे लिंग मादीच्या योनीत प्रवेश करते, ज्यामुळे ती गर्भवती होते आणि मूल जन्माला येते. याला अनेक नावांनी ओळखले जाते, जसे की संभोग, योनी मैथुन, काम क्रीडा, रती क्रीडा इ.

वेगवेगळ्या सजीव प्रजातींनुसार समागम किंवा संभोग वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो. इतिहासाकडे पाहिल्यास तुम्हाला आढळेल की, प्राचीन काळापासून लैंगिक संभोगाचा मुख्य उद्देश मुलांची उत्पत्ती आणि संगोपन हा मानला जात आहे. यामुळे, वंश पुढे नेण्यावर खूप भर देण्यात आला.

निरोगी लैंगिक संबंधांसाठी, या गोष्टी लक्षात ठेवा :

शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहाणे : मित्रांनो, निरोगी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी, तुमच्या जोडीदाराच्या शारीरिक आणि मानसिक भावना समजून घेणे खूप महत्वाचे आहे, कारण जर जोडीदार शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ असेल तर तो त्याच्या जोडीदाराला लैंगिक सुख देऊ शकणार नाही आणि जर तो सेक्ससाठी मानसिकदृष्ट्या तयार नसेल तर तो तुम्हाला साथ देऊ शकणार नाही.

भावनिक संबंध आणि विश्वास निर्माण करा : पती -पत्नीमध्ये लैंगिक संबंध लगेच होऊ नयेत, प्रथम दोघांनीही एकमेकांची काळजी घेतली पाहिजे, एकमेकांना जाणून घेतले पाहिजे आणि एकमेकांवर प्रेम केले पाहिजे, पतीला त्याच्या नववधूबद्दल माहिती असली पाहिजे, जसे की, तिला काय आवडते आणि काय आवडत नाही? पत्नीला सेक्स करायला कसे आवडेल किंवा त्याला सेक्स करायला कसे आवडेल, याबद्दल पतीने आपल्या पत्नीशी मनमोकळेपणाने बोलले पाहिजे.

लक्षात ठेवा की, पती-पत्नीमध्ये लाज नसावी, तुम्ही जितके मोकळेपणाने बोलाल तितका तुम्ही सेक्सचा आनंद घेऊ शकाल. पतीने आपल्या पत्नीवर विश्वास दाखवावा आणि तिला असे वाटावे की, आता पती प्रत्येक दु:खात तिच्यासोबत आहे. ज्या जोडप्यांनी पूर्वी कोणतेही संभाषण केलेले नाही त्यांच्यामध्ये सेक्स करताना खूप संकोच असतो.

पत्नीवर दबाव आणू नका, तिला आरामात राहू द्या : काही पती घाई करतात. त्यांना सर्वकाही लगेच हवे असते. यामुळे जोडीदाराच्या मनात भीती निर्माण होते आणि ती तिच्या इच्छेशिवाय स्वत:ला तिच्या जोडीदाराला अर्पण करते. यामुळे, दोघांनाही आनंद मिळत नाही आणि सेक्स नीरस, कंटाळवाणा होतो.

पतीने कधीही पत्नीला असे सांगू नये की, हेच जीवन आहे, आपण फक्त यासाठी लग्न केले आहे, सेक्स हेच सर्वस्व आहे. पती-पत्नीमध्ये लैंगिक संबंधांपेक्षाही एकमेकांच्या भावना आणि समस्या समजून घेणे आणि एकमेकांना आधार देणे महत्त्वाचे आहे.

सेक्स ही स्पर्धा नाही : जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी लग्न करते तेव्हा आपण अनेकदा ऐकले आहे की, मुलगा आणि मुलगी यांच्याभोवती जमा झालेले मित्र आणि मैत्रिणी वधू आणि वरांना सांगतात की, पाहूया कोण जिंकते, मुलगा की मुलगी?

त्यांना कोणीतरी समजावून सांगावे की, ही स्पर्धा नाही, किंवा हा जिंकण्याचा किंवा हरण्याचा खेळ नाही, ज्यामध्ये एक हरेल आणि दुसरा जिंकेल किंवा जो जिंकेल त्याला बक्षीस दिले जाईल. जर मुला-मुलीच्या मनात अशा प्रकारची स्पर्धा असेल तर ते दोघेही त्याचा आनंद घेऊ शकणार नाहीत आणि त्यांना विनाकारण अनेक समस्या आणि ताणतणावाचा सामना करावा लागेल. सेक्स ही अशी परीक्षा नाही जिथे तुम्हाला गुण मिळतील किंवा मुलाखत होईल.

जर हे आपोआप होऊ दिले तर ते शरीर आणि मन दोघांनाही आराम तर देतेच, सोबत आनंद देखील देते.

फोरप्ले : आजच्या सुशिक्षित तरुणांना हे चांगलेच माहिती आहे की, सेक्सपूर्वीच्या प्रक्रियेला फोरप्ले म्हणतात. यामध्ये सेक्स करण्यापूर्वी शारीरिक स्पर्श, चुंबन आणि शरीराला स्पर्श करणे समाविष्ट आहे. येथूनच सेक्स सुरू होतो. आजच्या धावपळीच्या जीवनात जिथे कोणाकडेही वेळ नाही, तिथे फोरप्ले ही एक निरुपयोगी प्रक्रिया आहे असे अनेक लोक मानतात. यामुळे फक्त वेळ वाया जातो, असे त्यांना वाटते.

ग्रामीण भागात याला निर्लज्जपणाचे नावही देण्यात आले आहे. तिथे, महिला डोक्यावर पदर घेऊन पलंगावर किंवा जमिनीवर झोपलेली असते आणि पती तिच्याशी काहीही करतो तरी ती एक शब्दही उच्चारू शकत नाही. अशा परिस्थितीत पत्नीला कामोत्तेजना कशी मिळेल? ती सेक्सला फक्त उपभोगाचे आणि गरजेचे साधन मानून पतीची साथ देत राहाते.

मोकळेपणाने बोला : पती-पत्नी एकमेकांशी बोलल्याशिवाय त्यांना एकमेकांबद्दल काहीही माहिती होणार नाही. लग्नाच्या पहिल्या रात्री, दोघांनीही एकमेकांशी उघडपणे आणि स्वेच्छेने प्रत्येक विषयावर बोलले पाहिजे, जे त्यांच्या भविष्यासाठी खूप महत्वाचे आहे. पतीने आपल्या पत्नीला विचारावे आणि सांगावे आणि पत्नीने पतीला लैंगिक संबंधांबद्दल विचारावे आणि सांगावे. पती-पत्नीला काय आवडते? त्यांनी ते ऐकले आहे का? सेक्स म्हणजे नक्की काय? आपापसात या सर्व गोष्टींवर चर्चा केल्यानंतर जर तुम्ही दोघांनी एकमेकांच्या इच्छा लक्षात घेऊन सेक्स केला तर दोघांनाही समान आनंद मिळेल, अन्यथा दोघेही कंटाळून झोपून राहातील आणि सेक्स एक ओझे बनेल.

लैंगिक शिक्षण : लैंगिकतेबद्दलची आपली बहुतेक माहिती चुकीची आणि दिशाभूल करणारी असते. चांगल्या पुस्तकांमधून आणि तज्ज्ञाकडून लैंगिक संबंध, त्याच्या पद्धती, पुनरुत्पादन आणि लैंगिक संक्रमित रोग (एसटीडी) याबद्दल सखोल ज्ञान मिळवले पाहिजे. जर पती-पत्नीला लैंगिक संबंधांबद्दल एखादी भीती किंवा चिंता वाटत असेल तर त्यांनी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सेक्स नंतर काय करावे : सेक्स नंतर काय करावे, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक महिला सेक्स केल्यानंतर लगेच उठतात आणि थेट स्नानगृहात जाऊन अंघोळ करतात. हे फक्त महिलाच करतात असे नाही तर काही पुरुषांमध्येही ही सवय दिसून आली आहे. हे सर्व बरोबर नाही.

सेक्स केल्यानंतर लगेच उठू नये तर एकमेकांशी बोलून आपले अनुभव सांगावेत आणि पुढे कसे जायचे हे ठरवावे, जेणेकरून दोघेही अधिक आनंद घेऊ शकतील.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...