* सोमा घोष
सुंदर, हसतमुख आणि विनम्र अभिनेत्री, केतकी कुलकर्णीने २०१५ मध्ये ‘अस्मिता’ या मराठी टेलिव्हिजन मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले, या मालिकेत तिने पूजाची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले’ या मालिकेतून हिंदी टेलिव्हिजनवर पदार्पण केले, ज्यामध्ये तिने तरुण वयातील सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारली. या मालिकेतील तिच्या अभिनयाचे समीक्षक आणि प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. त्यानंतर तिने ‘हम बने तुम बने’, ‘बॅरिस्टर बाबू’ इत्यादी अनेक मालिकांमध्ये काम केले. मराठी आणि हिंदी मालिकांव्यतिरिक्त तिने ‘1920: हॉरर्स ऑफ द हार्ट’ या चित्रपटातही काम केले.
मुंबईत राहणाऱ्या केतकीला लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती, त्यासाठी तिच्या आईने तिला खूप सहकार्य केले. तिचे आर्थिक व्यवहार चार्टर्ड अकाउंटंट असलेले तिचे वडील विश्वास कुलकर्णी सांभाळतात. केतकी तिच्या यशाचे श्रेय कठोर परिश्रम आणि चिकाटीला देते. सध्या, केतकी झी मराठीवरील ‘कमळी’ या मालिकेत अनिका नावाच्या एका तरुणीची भूमिका साकारत आहे, तिने यासंदर्भात खास ‘गृहशोभिका’शी गप्पा मारल्या. चला, तिच्याच शब्दात तिची कथा जाणून घेऊया.
‘कमळी’ या मालिकेत काम करण्याचे तुझे नेमके कारण काय?
ही व्यक्तिरेखा खूप वेगळी आहे. गेल्या काही दिवसांपासून, मला एक चांगली मराठी मालिका करायची होती, ज्यामध्ये मी मुख्य भूमिका साकारत असेन आणि मला विरोधी, भूमिका साकारताना पाहाण्याची माझ्या पालकांची इच्छा होती. या भूमिकेच्या माध्यमातून मला खूप काही वेगळे करायला मिळत आहे, कारण मी मौजमस्ती करत जगणारी मुलगी आहे आणि मला तशीच भूमिका साकारायला मिळत आहे. ही भूमिका सासू- सुनेसारख्या कथानकावर आधारित नाही. ही आधुनिक काळातील बिघडलेली तरुणी आहे, मोकळ्या मनाची, कधी रोमँटिक, कधी खेळकर तर कधी विरोधात वागणारी. या भूमिकेत अनेक छटा आहेत, ज्या प्रेक्षकांना आवडत आहेत.
तुझे वास्तविक जीवन या व्यक्तिरेखेशी कितपत मिळतेजुळते आहे?
जशी मालिकेतील माझी व्यकिरेखा आहे तशी केतकी अजिबात वागत नाही, त्यामुळे अनेकदा ही व्यक्तिरेखा साकारणे कठीण होऊन जाते. मालिकेतील अनिकाची फॅशन करण्याची पद्धत मात्र माझ्याशी मिळतीजुळती आहे, कारण मलादेखील फॅशन आवडते. मी मालिकेतील डिजिटल गोष्टींशी स्वत:ला जोडू शकते, कारण मी स्वत: डिजिटल युगातली आहे.
तू अभिनय क्षेत्रात कशी आलीस?
मी जेव्हा तीन वर्षांची होते, तेव्हाच मी ठरवले होते, की मला अभिनय करायचा आहे, कारण त्यावेळी मी टीव्हीवर एक कार्यक्रम पाहून त्याबाबत आईला विचारले होते. माझ्या आईने मला माझ्या शब्दात समजावत सांगितले होते की, ते सर्व कलाकार आहेत आणि अभिनय करत आहेत. तेव्हा मी आईसमोर अभिनय करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासूनच, मी आजूबाजूला होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमात अभिनय करू लागले. जेव्हा कधी मला शक्य असेल तेव्हा मी रंगमंचावर सादरीकरण करायचे.
कोणत्या मालिकेने तुझे आयुष्य बदलले?
प्रेक्षकांनी मला लहानपणी ‘अस्मिता’ या मालिकेत पहिल्यांदा पाहिले होते आणि त्यांनी माझ्या कामाचे कौतुक देखील केले होते. आता मी ‘कमळी’ ही मालिका करत असून या मालिकेतील माझ्या कामामुळे मला प्रेक्षकांचे आणखी प्रेम मिळत आहे. जर बारकाईने पाहिले तर प्रत्येक भूमिकेने मला काही प्रमाणात लोकप्रियता दिली आहे.
तुला कुटुंबाचा कितपत पाठिंबा मिळाला?
संपूर्ण कुटुंब नेहमीच पाठिंबा देत आले आहे, परंतु माझी आई, स्वाती कुलकर्णी, हिने मला सर्वात जास्त पाठिंबा दिला. त्यामुळेच या टप्प्यापर्यंत पोहोचण्याचे श्रेय मी माझ्या आईला देतो. मी अभिनय क्षेत्रातच करियर करावे, यावर ती ठाम होती, कारण तिला हे क्षेत्र आवडते. माझे वडील चार्टर्ड अकाउंटंट असून तेदेखील मला नेहमीच पाठिंबा देत आले आहेत.
तुला इथपर्यंत पोहोचणे किती आव्हानात्मक होते?
सुरुवातीला सर्वात मोठे आव्हान शाळा होती, कारण काम आणि अभ्यास दोन्ही जुळवून घेणे कठीण होते. जशी मी मोठी होत गेले तसे रिजेक्शन म्हणजे नकाराचा टप्पा सुरू झाला, जो माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होता.
निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक किंवा विरोधी आणि पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक भूमिकेत काय फरक आहे, असे तुला वाटते?
दोघांमध्ये खूप फरक आहे, पण माझ्या आईला मी नकारात्मक भूमिका करावी, असे वाटत होते, कारण सकारात्मक भूमिकेत खूप रडावे लागते आणि माझे पालक टीव्हीवर ते पाहून दु:खी होतात. म्हणूनच मी नकारात्मक भूमिका करावी, अशी त्यांची इच्छा होती. आता ते खूप आनंदी आहे, कारण त्यांना मला दु:खी झालेले पाहायला आवडत नाही. मलाही नकारात्मक भूमिका आवडतात, कारण अशा विरोधी भूमिका मला माझ्या अभिनयातील अनेक छटा दाखवण्याची संधी देतात.
तुला हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा आहे का?
नक्कीच. जसे काम मिळत जाईल तसे मी ते करेन. हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याची माझी खूप इच्छा आहे, जिथे संजय लीला भन्साळी, धर्मा प्रोडक्शन आणि रोहित सराफसारखा अभिनेता असेल आणि मला एक रोमँटिक चित्रपट करायचा आहे.
इंटिमेट सीन्स म्हणजे अंतर्गत दृश्य तू किती सहजपणे करू शकतेस?
मला खूप जास्त अंतर्गत दृश्य करायला आवडत नाहीत. मी अजून त्याबद्दल विचारही केलेला नाही. पण, मी अशी दृश्य करण्यासाठी फारशी सहज नाही.
तू कास्टिंग काउचची शिकार ठरली आहेस का?
कधीच नाही, कारण इतरांचे हेतू माझ्या सहज लक्षात येतात. चुकीच्या लोकांसोबत मी कधीच गेले नाही. जे काही लोक भेटले त्यांनी नेहमीच मला चांगले मार्गदर्शन केले.
तू ऑडिशनमध्ये निराशेला कसे तोंड दिलेस?
मला सुमारे १०० वेळा ऑडिशनमध्ये नाकारण्यात आले. मी मालिका मिळण्याच्या उंबरठ्यावर होते. मॉक शूटसाठी माझी निवडदेखील झाली होती, पण नंतर नकार मिळाला. करारावर स्वाक्षरी झाल्यानंतरही रिजेक्शन म्हणजे नाकारले जाते. याची अनेक कारणे आहेत. उदाहरणार्थ, मालिका सुरू न होणे किंवा माझा चेहरा त्या व्यक्तिरेखेच्या अपेक्षांनुसार नसणे इत्यादी. माझा चेहरा माझ्यासाठी सर्वात मोठे आव्हान ठरला. मी १५ वर्षांची असताना, १२ किंवा १३ वर्षांसारखी दिसत होते. माझ्या वयापेक्षा लहान दिसणे, ही माझी सर्वात मोठी अडचण आहे. बऱ्याच वेळा, यामुळे मी भूमिकांना मुकले. त्यावेळी मी खूप रडत असे आणि रडणे माझ्या दैनंदिन दिनचर्येचा एक भाग आहे.
तू किती फॅशनेबल आणि खवय्यी आहेस?
मी फॅशनची खूप मोठी चाहती आहे. जर मी अभिनेत्री नसते तर स्टायलिस्ट असते, कारण मला कपडे खरेदी करायला आवडतात. माझे कपाट नेहमीच सर्व प्रकारच्या कपड्यांनी भरलेले असते. माझ्या मैत्रिणींना माझे कपडे घालायला खूप आवडतात, म्हणून मी बरेच कपडे स्वत: डिझाइन करून तयार करते. मला भविष्यात एक दुकानही उघडायचे आहे.
मी फार जास्त खवय्यी नाही, त्यातही मला सडपातळ राहायचे असल्याने मी जास्त खाऊ शकत नाही. मला उकडीचे मोदक, पास्ता, फ्रेंच फ्राईज आणि ब्राउनी खूप आवडते. विशेषत: गोड पदार्थ मला खूप आवडतात.
प्रेमाबद्दलची तुझी व्याख्या काय आहे?
माझ्या दृष्टीने, प्रेम हेच सर्वस्व आहे; तेच जग चालवते. प्रेमाशिवाय सर्वकाही निरर्थक भासते.
तू तुझे आर्थिक व्यवस्थापन कसे करतेस?
माझे वडील माझ्या आर्थिक व्यवहाराची काळजी घेतात, त्यामुळे माझ्यावर ताण येत नाही. माझ्या मते, कमावणाऱ्या प्रत्येक मुलीने तिचे आर्थिक व्यवस्थापन चांगले केले पाहिजे आणि ती जे काही कमावते त्यातून थोडीफार बचत करत राहिले पाहिजे.
आवडते रंग : गुलाबी, जांभळा.
आवडता पोशाख : पाश्चात्य, भारतीय.
आवडता परफ्यूम : व्हॅनिला सेंट, उद.
आवडते पुस्तक : वन इंडियन गर्ल.
आवडते पर्यटन स्थळ : उदयपूर, मालदीव.
जीवनातील आदर्श : वेळ किंवा काळाने समजावून सांगणे.
वेळ मिळाल्यास : नृत्य.
स्वप्नातील राजकुमार : ‘लव्ह मी लाईक ब्रीद’.





