* भावना ठाकर ‘भावू’
प्रत्येक तिसऱ्या पोस्टवरती स्त्री विमर्श आणि स्त्रियांच्या हक्कांबाबत लिहिलं जातं. त्या लेखनाच्या माध्यमातून स्त्री सन्मानाच्या भावनेबद्दल पुरुषांना न जाणो कितीतरी गोष्टी ऐकवल्या जातात. परंतु आपल्या समाजात स्त्रियां यासाठी मागे नाही राहत की तिच्या आवाजाला, तिच्या प्रगतीला पुरुष दाबतात. यासाठी मागे राहतात कारण दुसऱ्या स्त्रिया तिचा आवाज बनत नाही, तिला साथ देत नाहीत, आदर देत नाहीत.
पुरुष स्त्रीचा सन्मान करत नाही हे तर आहेच, परंतु आई, बहीण, मुलगी, सासू, सून आणि मैत्रिणी या सर्वांच्या मनात एकमेकांबद्दल सन्मानाची भावना असते का? एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा सन्मान करते का?
राग, द्वेष, इर्षा ग्रस्त मन जेवढं स्त्रीचं आहे तेवढं पुरुषाचं नसतं. अगदी दोन खास असणाऱ्या स्त्रियांच्या मनात कुठे न कुठे एकमेकांसाठी इर्षेचा भाव असतोच. अशावेळी सासूसून, नणंद भावजय, जावाजावा त्यांच्यामध्ये सामंजस्याची आशा करणं तर विचारूच नका.
भले प्रत्येक स्त्री अशी नसते परंतु अनेक स्त्रिया अशाच असतात. आया मुलीला प्रत्येक प्रकारचे संस्कार देतील, प्रत्येक काम शिकवतील परंतु मुलीला हे शिकवलं जात नाही की आपल्या सासूला आई समजणं, जावेला मोठी बहीण आणि नंदेला मैत्रिण. या विपरीत सासरला काळ्या पाण्याची सजा असल्याचं सांगून आपल्या मुलीला हे शिकवलं जातं की सासूला घाबरायचं नाही, सर्व कामे एकट्याने करायची नाही ,जावेचं म्हणणं अजिबात ऐकायचं नाही आणि नंदेचे नखरे तर अजिबात सहन करायचे नाहीत.
हा भेदभाव का
सासू आपल्या सुनेला मुलगी समजण्याची सुरुवात करतच नाही. सून नोकरदार असेल तर किती सासवा ऑफिसमधून थकून परतलेल्या सुनेला चहा देतात वा गरमागरम पोळी बनवून खायला देतात? वा अशी कोणती जाऊ छोट्या जावेला छोटी बहिण समजून प्रत्येक कामात मदत करते? नणंद वहिनीला सन्मान देत नाही आणि खूपच कमी स्त्रियांमध्ये ही समज असते आणि स्त्रियांची हिच कमी कुटुंबाला विभागण्याचं काम करते, कुटुंबात क्लेश निर्माण करतात.
सासू हुंड्यासाठी सुनेला त्रास देते, मुलगी झाल्यावरती टोमणेदेखील सासूच सुनेला मारते, सासू सुनेची बाजू का घेत नाही? असं म्हटलं जातं की स्त्रियांमध्ये क्षमा, दया, ममतासारखे नैसर्गिक गुण असतात. परंतु अनेकदा पाहण्यात आलंय की त्यांच्या सहानुभूतीमध्ये भिजण्याची संधी पुरुषांनाच जास्त मिळते. जेव्हा मुलगी लग्न करून येते तेव्हा सासरे, दीर आणि नंदोबा तिच्यासाठी एखाद्या देवतासारखे असतात. परंतु बिचारी सासू वा नणंद साक्षात विलनच्या स्वरूपात असतात. स्त्री प्रत्येकाला सहजपणे माफ करते परंतु सासूला याचा विचार देखील एखादी मुलगी करणार नाही.
सून मुलगी का नाही
आता आयुष्यच एका छताखाली काढायचं असेल तर सासू सुनेला मुलीची जागा का देऊ शकत नाही आणि सून सासूला आईची जागा का देऊ शकत नाही, खरंतर हे नातं सर्वात अधिक मजबूत असायला हवं.
कधीही पहा स्त्रीच स्त्रीच्या विरुद्ध असते. मग ती शिक्षित असो वा अशिक्षित. वर्षानुवर्षे हेच चालत आलंय आणि हेच चालत राहणार. फक्त एकदा तरी सासूने सूनेमध्ये मुलीचं रूप पहावं आणि सुनेने सासूमध्ये आईचं रूप. खरोखरच ‘स्त्री ही स्त्रीची दुश्मन’ अशा कथा लिहिणाऱ्या साहित्याच्या प्रत्येक पानाचं विसर्जन होईल.
परंतु गॉसिपमध्ये माहीर असणाऱ्या स्त्रिया आपल्या आजूबाजूला असलेल्या स्त्रियांना कमीपणा दाखवण्याची एकही संधी काही सोडत नाहीत. अनेकदा किटी पार्ट्यांमध्ये एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला कमीपणा दाखविण्याचं काम करते. स्टेटसपासून पेहराव, आवड निवड आणि राहणीमानावरती टीका करताना स्वत:ला सुंदर सक्षम आणि समजूतदार दाखविण्याची स्त्रियांमध्ये जणू स्पर्धाच लागलेली असते.
पुरुष अशा प्रकारच्या गोष्टी खूपच कमी करत असतील. कुटुंबाचा पाया स्त्री असते. प्रत्येक आईचं कर्तव्य आहे की तिने आपल्या मुलीला हे शिकवायला हवं की आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा सन्मान करावा. जेव्हा तुम्ही समोरच्याला मान द्याल, चांगलं वागाल, तेव्हाच तुम्हाला मान मिळेल. प्रत्येक स्त्रियांना एकमेकांना समजण्याची गरज आहे, एकमेकांना मान आणि आधार देण्याची गरज आहे. मग ती मैत्री असो, कुटुंब असो वा समाज. स्त्री जेव्हा दुसऱ्या स्त्रीचा सन्मान करणं शिकेल तेव्हाच विभक्त कुटुंब एकत्र होतील, एकत्र कुटुंबाची सुरुवात होईल. आपोआप आपलेपणा आणि शांतीने भरलेल्या समाजाची निर्मिती होईल.
अपेक्षा स्त्रियांकडूनच असावी
जर कुठेही खुलेआम एखाद्या स्त्रीवर अत्याचार होतो, तेव्हा महिलांनी एकत्रित येऊन त्याचा सामना करायला हवा. जसं अगदी काही काळापूर्वी मणिपूरमध्ये एक घटना घडली होती. एक स्त्रीला निर्वस्त्र करून पूर्ण गावांमध्ये फिरवण्यात आलं होतं. त्यानंतर राजस्थानमध्येदेखील एका पतीने आपल्या पत्नीला निर्वस्त्र करून फिरवलं. जरा विचार करा त्या स्त्रीच्या मानसिक अवस्थेबद्दल. तेव्हा जर एकजूट होऊन दुसऱ्या स्त्रियांनी या गोष्टीचा विरोध केला असता तर बाकीच्या बायका अपमानित होण्यापासून वाचू शकल्या असत्या .
गर्दीला तर सिंहदेखील घाबरतो, म्हणून आता वेळ आली आहे की राग, द्वेष , इर्षा सोडून महिलांनी एकत्रित होण्याची. जिथे कुठे एखाद्या महिलेवर अत्याचार होताना दिसला तर स्त्रियांनीच पुढे येऊन विरोध करायला हवा, तेव्हाच या दुर्घटनांना आळा बसेल.
फक्त पुरुषांकडून ही आशा ठेवू नका की पुरुषानेच प्रत्येक स्त्रीचा सन्मान करावा. स्त्रियांकडूनदेखील ही अपेक्षा ठेवायला हवी. प्रत्येक मुलीला लहानपणापासून हे शिकवलं तरच या अनेक वर्षांपासून चालत असलेल्या परंपरा तुटतील, सासु सुनेचे संबंध आई मुलीसारखे बनतील आणि रागाचं शमन होताच समाजदेखील संस्कारवान दिसेल.





