* समस्यांच्या समाधानासाठी एल्पस ब्युटी क्लीनिकच्या फाउंडर,
डायरेक्टर डॉ. भारती तनेजा द्वारा
माझ्या आयब्रोज खूपच दाट आहेत. मला थ्रेडिंग करतेवेळी खूप वेदना होतात. सांगा मी काय करू?
तुम्ही जिथेदेखील आयब्रोज करायला जाता त्यांना सांगा की त्या आयब्रोज करण्यापूर्वी आयब्रोज वरती थोडासा बर्फ लावा. यामुळे आयब्रोज थोडया सुन्न होतील आणि वेदना होणार नाहीत. त्या हवं असल्यास थ्रेडदेखील ओला करू शकता. ज्यामुळे ट्रेडिंग करतेवेळी वेदना होणार नाहीत. थ्रेडिंग करतेवेळी तुम्ही तुमच्या त्वचेला व्यवस्थित स्ट्रेच करून ठेवलंत तर वेदनादेखील कमी होतील. आयब्रोज करण्यासाठी कोणा दुसऱ्याची मदत घेऊ शकता. ज्यामुळे आयब्रो जास्त स्ट्रेच होतील आणि वेदना कमी होतील. हवं असल्यास लेजरनेदेखील आयब्रोज नेहमीसाठी शेप देऊ शकता.
अलीकडे अॅडमध्ये बीबी ग्लोबद्दल सांगितलं जातं. हे खरोखरच त्वचेसाठी आहे का?
बीबी ग्लो एक अशी ट्रीटमेंट आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या त्वचेमध्ये एका मशीनद्वारे अकॉर्डिंग टू योर स्किन न्यूट्रीएन्ट्स टाकते जातात. हे स्किनमध्ये जाऊन त्वचेला स्ट्रेच करतात. रिंकल फ्री करतात आणि ग्लो देतात. यासोबत बीबी ग्लोमध्ये तुमच्या त्वचेनुसार एक फाउंडेशन त्वचेच्या आतमध्ये टाकलं जातं. ज्यामुळे तुमच्या त्वचेच्या वरती एक हलकासा मेकअप येतो. जो साधारणपणे २० ते ३० दिवस राहतो. सोबतच तुमच्या फेसला शेप देण्यासाठी कंटूरिंग आणि ब्लशरदेखील टाकलं जातं. ज्यामुळे त्वचेला सुंदरसा शेप येतो. ही एक खूपच चांगली ट्रीटमेंट आहे, ज्यामुळे तुमची त्वचा ग्लोदेखील करते आणि सोबत शेपदेखील येतो आणि २० ते ३० दिवसासाठी मेकअप देखील येतो.
हिवाळयात माझ्या टाचा फाटू लागतात आणि रक्तदेखील वाहू लागतं. सांगा मी काय करू?
हिवाळयात त्वचा खूपच ड्राय होते. हिल्सची त्वचा खूप जाड होते आणि कोरडीदेखील होते. अशावेळी जर त्यांची स्वच्छता व्यवस्थित केली नाही आणि सोबतच एखाद्या चांगल्या क्रीमने मसाज केला नाही तर त्या फाटू लागतात. सर्वात जास्त गरजेचं आहे की तुम्ही अंघोळ करतेवेळी एखाद्या स्क्रबरने हलकसं रगडा आणि त्याच्यावरती ऑइल लावून मसाज करा. यामुळे टाचा फोटो फुटणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की सकाळी कमी वेळ असेल तर रात्री रोज हलक्या गरम पाण्यामध्ये पाणी टाकून थोडा वेळ स्क्रबरने हलकं रगडा. त्यानंतर एखादा क्रीम वा हलक्या गरम तेलाने मसाज करा. शक्य असल्यास सुती मोजे घालून झोपा. यामुळे तुमचे तुमच्या टाचा फाटणार नाहीत आणि जर त्या फाटल्या तर घरच्या घरी यावर उपाय करू शकता. पाय स्वच्छ करून तुम्ही एका वाटीत थोडसं मोहरीचं(सरसो)तेल आणि मेणबत्ती टाकू शकता. याला हलकं गरम करा आणि फाटलेल्या टाचांमध्ये भरा. वरून मोजे घालून झोपी जा. टाचा लवकर व्यवस्थित होतील.
उन्हाळयात घराबाहेर पडण्यापूर्वी आम्ही लोक नेहमी सनस्क्रीन लावून बाहेर पडतो. हिवाळयातदेखील असं करणं गरजेचं आहे का?
उन्हाळयाप्रमाणे हिवाळयातदेखील बाहेरून कडक ऊन असतं, परंतु आपल्याला ते जाणवत नाही. कारण हवा थंड असते. सूर्यकिरणं तशीच काम करतात जशी उन्हाळयात देखील. म्हणून उन्हाळयाप्रमाणेच हिवाळयातदेखील सनस्क्रीन लावणं गरजेच आहे. हिवाळयात सनस्क्रीन जेदेखील लावाल ते जास्त मॉईश्चरायझिंग व नरिशिंग असायला हवं. घरातून बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन नक्की लावा आणि त्याच्यावरती हलकी पावडर वा मेकअप करा.
माझं वय ३० वर्ष आहे आणि माझे केस खूप गळतात. गळलेले केस मला पुन्हा कसे मिळतील?
३०शीनंतर हेअर लॉसची अनेक कारणं आहेत ज्यामध्ये मेन फॅक्टर तुमच्या डायटशी संबंधित आहे. तुमच्या डायटमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. केसांसाठी सर्वात जास्त गरजेचं आहे प्रोटीन. जर तुमच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता असेल तर त्याचा परिणाम केसांवरती देखील पाहायला मिळतो. म्हणून तुमच्या डायटमध्ये प्रोटीनचे प्रमाण वाढविण्यासाठी डेरी प्रॉडक्ट्स आणि डाळींचा समावेश करा. हेल्दी केसांसाठी बदाम, फ्लॉवर, मशरूम, अंडयापासून मिळणारं बायोटीन एक गरजेच विटामिन आहे. केस गळती रोखण्यासाठी विटामिन्सचा डायटमध्ये समावेश करणं फायद्याचं असू शकतं. या गोष्टींचा तुमच्या डायटमध्ये समावेश करून तुम्ही विटामिन्सची उणीव पूर्ण करू शकता. भाजलेले चणे, मटर, राजमा, छोले आणि काजूचा डाएटमध्ये समावेश करून तुमच्या केसांसाठीदेखील गरजेचं आयरन मिळवू शकता.
या आयरनच्या कमतरतेमुळे केस गळती व निस्तेज होण्याची समस्या वाढू शकते. विटामिन ए आणि सी असे विटामिन आहेत, जे केसांची वाढ आणि शायनिंगसाठी खूपच परिणामकारक असतात. म्हणूनच तुम्ही विटामिन ए साठी गाजर, रताळं, काजू, पालक, दूध व दह्याचा डाएटमध्ये समावेश करण्याची गरज आहे. तर विटामिन सीसाठी आवळा, लिंबू, पेरू व स्ट्रॉबेरीचा समावेश करा.
केस गळण्याच्या दुसऱ्या फॅक्टर्समध्ये टेन्शनदेखील एक फॅक्टर आहे. ज्यामुळे तुमचे केस गळू लागतात म्हणून टेन्शन कमी करण्यासाठी नियमित मेडिटेशन करा. या वयात तुम्ही स्टायलिश हेअर स्टाईल करण्यासाठी अनेक प्रयोग करता. जे केसांना कमजोर बनवू शकतात. म्हणून केसांवर जास्त एक्सपेरिमेंट करू नका. जर तुम्हाला काही वेगळं करायचं असेल तर त्यासाठी एक्स्पर्टचा सल्ला घ्या.