* सोमा घोष
एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग अॅप ग्लीडनच्या मते, भारतातही लोक आता उघडपणे व्यभिचाराच्या संधी शोधत त्यांच्या साइट्सला भेट देतात आणि अशा अनेक साइट्स आहेत, ज्यावरून कोणताही विवाहित किंवा अविवाहित पुरुष त्याच्या इच्छेनुसार महिलांशी संपर्क साधू शकतो. विश्वासघात ही पूर्वीच्या काळी आश्चर्याची गोष्ट नव्हती आणि आजही नाही. ‘साहब बीवी गुलाम’सारख्या चित्रपटात जमीनदार कुटुंबात लग्न झालेल्या पत्नीवर तिच्या पतीने व्यभिचारी असल्याचा संशय घेऊन ठार मारले होते, जेव्हा की तो स्वत: उघडपणे इतर स्त्रियांकडे जात होता.
एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणारा नीरज त्याच्या पत्नीमुळे त्रासला आहे. त्याला वाटते की, लग्नाच्या ७ वर्षानंतर पत्नीचे तिच्या कार्यालयातील अधिकाऱ्याशी प्रेमसंबंध आहेत. तो तिला याबाबत विचारायलाही घाबरतो, कारण त्याला या गोष्टीवर पूर्ण विश्वास नाही. पत्नी त्याच्यापेक्षा चांगली कमावते. अनेकदा त्याने तिचा मोबाईल किंवा मेसेजही तपासले, पण त्याच्या हाती काही लागले नाही. हे सर्व मागील २ वर्षांपासून सुरू आहे. आजकाल तो तिच्याशी प्रत्येक गोष्टीवरून भांडतो. सोसायटीतील लोक या भांडणाची मजा घेतात. आपापसात कुजबुजतात. त्यांच्या भांडणाला घाबरून त्यांची मुलगी नीरा हळूच जवळच्या खोलीतून आत डोकावून पाहाते. अनेकदा नीरजला पत्नीला सोडून जावंसं वाटतं, पण तो मुलगी आणि पैसा आठवून गप्प बसतो. त्याने आपल्या कुटुंबीयांना हे सर्व सांगितले आहे. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की काय करायच, हे त्यानेच ठरवायला हवे.
राग विनाशाकडे नेतो
अशा प्रकारची समस्या शहरांमध्ये सामान्य आहे. येथे पती-पत्नी दोघेही नोकरी करतात, कारण येथे फ्लॅट विकत घेण्यासाठी आणि आजच्या जीवनशैलीशी जुळवून घेण्यासाठी दोघांनाही काम केल्याशिवाय पर्याय नसतो. अशा परिस्थितीत जर पत्नीने संपूर्ण दिवस कार्यालयात घालवला आणि एखाद्याशी जवळीक निर्माण केली तर मात्र पतीला ते सहन करणे अशक्य होते. अनेक पती मारहाण करतात तर काही तिची हत्या करतात. नंतर कळते की, हे प्रकरण तितके गंभीर नव्हते, जितके त्यांना वाटत होते, पण रागाच्या भरात चुकीचे कृत्य केल्यावर ती चूक भरून काढता येत नाही. कधीकधी उलट घडते. व्यभिचारी पत्नीच आपल्या पतीची हत्या करते.
गंभीर परिणाम
एका अहवालानुसार, लखनऊत सप्टेंबर २०२२ मध्ये पत्नीने तिच्या प्रियकरासह पतीचा खून केला. त्याचा अपघाती मृत्यू झाला हे दाखवण्यासाठी आधी त्याचा गळा दाबून खून केला आणि नंतर मृतदेह कारने चिरडला. पोलिसांनी तपासाअंती पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले. अशाच प्रकारे नुकतेच गाझियाबाद येथे पतीने पत्नीला प्रियकरासह पाहिल्यामुळे दोघांनीही त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह गोणीत भरून शेतात फेकला. तपासाअंती दोघेही पकडले गेले.
नैतिकता तपासा
कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी नैतिकता तपासणे गरजेचे आहे. या विषयावर एक प्रसिद्ध लेखक म्हणतात की, निसर्गाने स्त्रीला जन्मापासूनच असे संस्कार दिले, ज्यामुळे तिला नेहमीच सहन करावे लागते. इतिहास साक्षी आहे की ४० वर्षांपूर्वी स्त्रिया याला सहन करणे, असे म्हणत नव्हत्या. पतीचे एखाद्या स्त्रीशी संबंध असल्यास तो त्याचा हक्क असून अशा पतीला सहन करणे हे त्या स्वत:चे कर्तव्य समजायच्या.
२० वर्षांपूर्वीपासून स्त्रियांनी ही सहनशीलता स्वीकारली आहे. लग्नानंतर महिलांचे एखाद्या पुरुषाशी संबंध असले तर ते केवळ शारीरिक सुखासाठीच असतील असे नाही. अनेकदा कुटुंबाकडून दुर्लक्ष झाल्यामुळे स्त्रियांना मानसिक आधाराची गरज भासते, जी त्यांना पतीकडून मिळत नाही, परिणामी, त्या ज्या कोणाशीही त्यांचे विचार मांडू शकतात त्यांना आपले मानतात. अनेकदा काही स्त्रियांना एका पुरुषाकडून समाधान मिळत नाही, त्यामुळे त्या पर पुरुषाचा आधार घेतात, पण हे प्रमाण खूपच कमी आहे. त्यांना वारांगना म्हणता येणार नाही.
नातं टिकवणं महत्त्वाचं
आज नैतिकतेची मूल्ये बदलली आहेत. स्त्री बाहेर एखाद्या पुरुषासोबत संबंध ठेवत असेल तर ते का? स्त्रिया नेहमीच कुटुंबाची जबाबदारी घेत आल्या आहेत. कोणतेही नाते त्या अगदी सहजपणे तोडू इच्छित नाहीत. एखाद्या पुरुषाला आपल्या पत्नीवर संशय असेल तर तो तिला मारहाण, शिवीगाळ करणे आणि समजात बदनाम होण्यापेक्षा अशा अनेक संस्थांकडे जाऊ शकतो, ज्या पुरुषांसाठी काम करतात.
साधारणपणे एखाद्या पुरुषाचे बाहेरच्या स्त्रीशी प्रेमसंबंध असले तर त्याचा दोष स्त्रीला दिला जातो. लोक म्हणतात, तिचा पती बाहेर का जातो? कदाचित पत्नीमध्ये काही दोष असू शकतो. पतीला कधी व्यभिचारी मानले जात नाही. त्याच्या वागण्यावर पडदा टाकला जातो. भारतीय संस्कृतीत एकीकडे स्त्रीला देवी मानले जाते, तर दुसरीकडे तिला मानवी अधिकारही दिला जात नाही.
शांतपणे तोडगा काढा
हे खरं आहे की, पुरुष कधीकधी पत्नीच्या मैत्रिणीच्या प्रेमात पडतात. आजूबाजूला कोणी विधवा असेल तर तिला जाळयात ओढायला बघतात. यात कोणालाही काही चुकीचे वाटत नाही, पण पत्नीने असे केल्यास तिला मारहाण आणि शिवीगाळ करून घराबाहेर काढले जाते किंवा तिची हत्याही केली जाते.
जर पत्नीचे कोणावर प्रेम असेल तर पतीने शांतपणे बसून त्या समस्येवर तोडगा शोधायला हवा. कोणत्याही निष्कर्षावर येण्यापूर्वी काही गोष्टींची खात्री करून घ्यायला हवी. कारण आता हा फौजदारी गुन्हा ठरत नाही.
२०१०पर्यंत भारतीय दंड संहितेच्या कलम ४०७ नुसार, विवाहित स्त्रीवर प्रेम केल्याबद्दल पती एखाद्या पुरुषाविरुद्ध फौजदारी खटला दाखल करू शकत होता, परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देताना ते घटनाबाह्य ठरवले आहे. एडल्ट्री म्हणजे व्यभिचार आता केवळ वैवाहिक गुन्हा आहे. या आधारावर केवळ घटस्फोट घेता येतो.
धर्मापासून दूर राहा
पत्नीचे कोणाशी प्रेमसंबंध असले तर गैर काय? असे अनेक पुरुष आहेत जे पत्नीव्यतिरिक्त २-३ स्त्रियांशी संबंध ठेवतात, तरी त्यांना कोणी काही बोलत नाही. काही धर्मात तुमची क्षमता असेल तर तुमच्या पत्नीशिवाय तुम्ही २-३ पत्नी करू शकता. त्यांना तशी परवानगी असते.
जर तुमच्याकडे संयम असेल तर शक्य आहे की २-३ दिवसांनी तिला तिची चूक समजून ती घरी परत येईल. असह्य झाल्यास घटस्फोट घ्या. वाद घालू नका, कारण हे पूर्वापार चालत आले आहे आणि पुढेही सुरू राहील. लोक सत्य कधी ओळखू शकले नाहीत आणि कधी ओळखू शकणार नाहीत. समाज आणि धर्माच्या नावाच्या आड कधी जाऊ नका, ते सर्व निरर्थक आहे.