* कुशला पाठक
एखाद्या कुटुंबात मुलगा किंवा मुलीचे लग्न ठरले की, त्यांना पोषाखाची चिंता वाटू लागते. प्रत्येकालाच असा पोशाख हवा असतो ज्यामुळे सर्वजण त्यांचे कौतुक करतील. एखाद्या तरुणीला याबाबत सर्वात जास्त काळजी वाटणे स्वाभाविक आहे, कारण वधू होणारी तरुणी त्या लग्न समारंभात मुख्य नायिका असते.
सर्वात सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी एक तरुणी अनेक मालिका पाहाते आणि मासिकांची पाने उलटते. त्यात तिला नववधू झालेल्या मुली दिसतात. इतकंच नाही तर ती वेगवेगळया मॉलमध्ये जाऊन वधूचा पोशाख पाहाते. ती ऑनलाइन साइट्सवर योग्य पोशाख शोधण्यात तासनतास घालवते. मेकअप करण्यासाठी महागडया ब्युटी पार्लरमध्ये जाते, परंतु पोशाख योग्य नसेल तर वधू सर्वांमध्ये उठून दिसत नाही.
लग्न समारंभात कॅमेरा मुख्यत: वधूवर केंद्रित असतो, म्हणून वधू सर्वात आकर्षक पोशाख घालण्याचा प्रयत्न करत असते. बदलत्या युगात नववधू आता साडीऐवजी लेहेंगा घालण्यास प्राधान्य देते. ती काही महिने आधीच तिचा लेहेंगा निवडण्यास सुरुवात करते.
डिझायनर लेहेंगा
लग्न सराईच्या दिवसात बाजारपेठांमध्ये लग्नाच्या पोशाखांचा पूर येतो. दुकानांमध्ये नववधूंनी परिधान केलेल्या कपडयांची संख्या मोठी आहे. बाजारात लेहेंग्यांची इतकी विविधता, रंग आणि डिझाइन आहेत की, नववधूंना योग्य लेहेंगा निवडता येत नाही. तरुण मुली यासाठी अनेक शोरूममध्ये जातात.
मग काही मैत्रीणीसोबत जाऊन लेहेंगा पसंत केला जातो. वधूसाठीचे कपडे बहुधा वराकडील महिलांनासोबत घेऊन खरेदी केले जातात. अशावेळी वधूला लेहेंगा निवडणे अवघड होऊन बसते.
आजकाल लेहेंग्यांची किंमत २० हजार रुपयांपासून सुरू होते आणि ४०-५० हजार रुपयांपर्यंत जाते. तरुण मुली बनारसी आणि कांजीवरम सिल्कपासून बनवलेले लेहेंगा पसंत करतात. सोनेरी बुट्टी आणि मोठे प्रिंट असलेले बनारसी लेहेंगे मोठया प्रमाणावर खरेदी केले जातात.
महागडे लेहेंगेही बाजारात पाहायला मिळतात. त्यावर जरदोजी किंवा भरतकाम केलेले असते. जर तुम्हाला लेहेंग्यावर जास्त काम करायचं नसेल तर तुम्ही ब्लाऊजवर भरजरी डिझाईन करून घेऊ शकता. दुपट्टा शिफॉन किंवा कोणत्याही तलम कपडयाचा असावा. लेहेंगा आणि ब्लाऊज एकमेकांना परिपूर्ण दिसण्यासाठी दुपट्टयावर छोटी बुट्टी बनवता येते.
फिटिंगनुसार निवड
आजकाल राजस्थानी आणि गुजराती तयार नक्षीदार लेहेंगे बाजारात उपलब्ध आहेत. यासोबत ब्लाऊजही मिळतात. तुमच्या फिटिंगनुसार लेहेंगा घालून तुम्ही वधूसारखे दिसू शकता. बनारसी साडीचाही सुंदर लेहेंगा शिवता येतो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ब्रोकेड लेहेंगादेखील खरेदी करू शकता. यामुळे तुमच्या सौंदर्यातही भर पडेल.
नववधूला लग्नानंतर नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांच्या घरी जाण्यासाठीदेखील लेहेंग्याची आवश्यकता असते. नातेवाईक आणि ओळखीचे लोक विशेषत: वधू आणि वरांना आमंत्रित करतात. वधू-वरांना विशेष भेटवस्तूदेखील दिल्या जातात. अशा कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी वधूला खास पोशाखाची गरज असते.
अशावेळी वधू कॉटन, सिल्क, जॉर्जेट, शिफॉन, प्रिंटेड सिल्क किंवा बंधेजचा लेहेंगा घालू शकते. या लेहेंग्यासह वधू मिळताजुळता ब्लाऊज परिधान करू शकते, जो इतर लेहेंग्यांवरही शोभेल. वधू गुजराती आणि राजस्थानी भरतकाम आणि डिझाइन्स असलेले ब्लाऊजही घालू शकते.
मॅचिंगची काळजी घ्या
शिफॉनसह शिमर आणि बनारसीचे मॅचिंग मार्केटमधून खरेदी करता येते. ब्रोकेड आणि शिफॉनचे मिश्रणदेखील वापरले जाऊ शकते. खादी सिल्कच्या कपडयावर शिमर किंवा इतर भरजरी मटेरियलची डिझाईन करून त्याला अधिक आकर्षक बनवता येईल.
लेहेंगा विशेष प्रसंगी वापरला जातो. हा लेहेंगा इतका लांब असतो की पायही पूर्णपणे झाकले जातात. तो जमिनीला स्पर्श करतो. अशावेळी जर लादी ओली असेल तर लेहेंगा उचलून चालावे. कार्यक्रमादरम्यान जमिनीवर कार्पेट पसरवले जाते. त्यामुळे जमिनीवर पसरलेल्या कार्पेटवर चालावे.
खरेदी करण्यापूर्वी
काही मुली किरमिजी किंवा लाल रंगाचा लेहेंगा पसंत करतात. एखाद्या सोहळयात सर्व मुलींनी किरमिजी आणि लाल रंगाचा लेहेंगा घातला असेल तर सर्वकाही लाल दिसेल. तपकिरी, गडद हिरवा, मरून चॉकलेटी, हिरवा सोनेरी, सौम्य केशरी, निळा, गडद जांभळा इत्यादी रंगांमध्येही लेहेंगा घेता येतो. असा रंग इतर कोणत्याही मुलीच्या लेहेंग्याचा नसेल, ज्यामुळे तुम्ही इतरांना अधिक आकर्षित करू शकाल.
लेहेंगा आणि ब्लाऊजचे फिटिंग योग्य असल्यास वधूला लेहेंगा आणि ब्लाऊज शोभून दिसतो. अनेकदा तरुणी दुसऱ्याचा लेहेंगा किंवा ब्लाऊज घेतात आणि घालतात. अशा तरुणी विचित्र दिसतात.
लग्नासाठी लेहेंगा खरेदी करताना त्याच्या रंगाची विशेष काळजी घेतली पाहिजे, कारण त्या महागडया लेहेंग्याचा वापर केवळ एका दिवसासाठी नसतो तर तो इतर सोहळयातही वापरावा लागतो.