* कुशला पाठक
एखाद्या कुटुंबात मुलगा किंवा मुलीचे लग्न ठरले की, त्यांना पोषाखाची चिंता वाटू लागते. प्रत्येकालाच असा पोशाख हवा असतो ज्यामुळे सर्वजण त्यांचे कौतुक करतील. एखाद्या तरुणीला याबाबत सर्वात जास्त काळजी वाटणे स्वाभाविक आहे, कारण वधू होणारी तरुणी त्या लग्न समारंभात मुख्य नायिका असते.
सर्वात सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी एक तरुणी अनेक मालिका पाहाते आणि मासिकांची पाने उलटते. त्यात तिला नववधू झालेल्या मुली दिसतात. इतकंच नाही तर ती वेगवेगळया मॉलमध्ये जाऊन वधूचा पोशाख पाहाते. ती ऑनलाइन साइट्सवर योग्य पोशाख शोधण्यात तासनतास घालवते. मेकअप करण्यासाठी महागडया ब्युटी पार्लरमध्ये जाते, परंतु पोशाख योग्य नसेल तर वधू सर्वांमध्ये उठून दिसत नाही.
लग्न समारंभात कॅमेरा मुख्यत: वधूवर केंद्रित असतो, म्हणून वधू सर्वात आकर्षक पोशाख घालण्याचा प्रयत्न करत असते. बदलत्या युगात नववधू आता साडीऐवजी लेहेंगा घालण्यास प्राधान्य देते. ती काही महिने आधीच तिचा लेहेंगा निवडण्यास सुरुवात करते.
डिझायनर लेहेंगा
लग्न सराईच्या दिवसात बाजारपेठांमध्ये लग्नाच्या पोशाखांचा पूर येतो. दुकानांमध्ये नववधूंनी परिधान केलेल्या कपडयांची संख्या मोठी आहे. बाजारात लेहेंग्यांची इतकी विविधता, रंग आणि डिझाइन आहेत की, नववधूंना योग्य लेहेंगा निवडता येत नाही. तरुण मुली यासाठी अनेक शोरूममध्ये जातात.
मग काही मैत्रीणीसोबत जाऊन लेहेंगा पसंत केला जातो. वधूसाठीचे कपडे बहुधा वराकडील महिलांनासोबत घेऊन खरेदी केले जातात. अशावेळी वधूला लेहेंगा निवडणे अवघड होऊन बसते.
आजकाल लेहेंग्यांची किंमत २० हजार रुपयांपासून सुरू होते आणि ४०-५० हजार रुपयांपर्यंत जाते. तरुण मुली बनारसी आणि कांजीवरम सिल्कपासून बनवलेले लेहेंगा पसंत करतात. सोनेरी बुट्टी आणि मोठे प्रिंट असलेले बनारसी लेहेंगे मोठया प्रमाणावर खरेदी केले जातात.
महागडे लेहेंगेही बाजारात पाहायला मिळतात. त्यावर जरदोजी किंवा भरतकाम केलेले असते. जर तुम्हाला लेहेंग्यावर जास्त काम करायचं नसेल तर तुम्ही ब्लाऊजवर भरजरी डिझाईन करून घेऊ शकता. दुपट्टा शिफॉन किंवा कोणत्याही तलम कपडयाचा असावा. लेहेंगा आणि ब्लाऊज एकमेकांना परिपूर्ण दिसण्यासाठी दुपट्टयावर छोटी बुट्टी बनवता येते.